उद्धव महाजन बिस्मिल सरांची व्यव्थाची वादळे

उद्धव महाजन 'बिस्मिल' सरांची
      🌹व्यथांची वादळे🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी 

संवाद जगण्याची आशा असतें!संवाद जीवनाची ऊर्जा असतें!संवाद भेट घडवीत असतें!संवाद वादावरील गुणकारी औषध असतं!संवाद हुरूप देतं असतं!संवाद माणसं जोडीत असतो!संवादाचं दान सकारात्मकतेला हातभार लावीत असतं!संवाद कधी कधी श्वास होऊन बसतो!एखाद्या व्यक्तीचा श्वास जर "गझल" असेल तर ती व्यक्ती संवादिनी म्हणून प्रचलित होतें!अशाच जीवन संवादकांची "गझल" संवादिनी होऊन संवाद साधत माणसं जोडायचं महान कार्य करीत आहे!जात,धर्म,पंथ,अन भाषा यातून पार होतं हा गझलकार जग जोडायचं महान कार्य करीत आहे!🌷

हिंदी,उर्दू या भाषांचीं हृदयातून पूजा बांधणाऱ्या या शायराचं नाव मुळातच जगविख्यात आहे!जागतिक उर्दू मुशायरातं आपला ठसा आणि विशेष ओळख निर्माण केलेले जागतिक किर्तीचे शायर जेव्हा "मराठी गझले"तून व्यक्त होतात तेव्हा बहुभाषिक संकल्पना हृदयात निवासाला येऊन गुलाब पुष्पासोबत चंदन सुगंध देखील देऊन जातात!घडलं ही तसंच.... अशा महान गझलकारास नतमस्तक होतं आहे!... आदरणीय उद्धवजी महाजन 'बिस्मिल'.. या नावाने जागतिक शायर म्हणून ठसा उमटवला आहे!बिस्मिल सर हिंदू असूनही वयाच्या ६०व्या वर्षी आपले गुरु नजीर फतेहपुरी यांच्या कडून उर्दूचे धडे गिरवत आज गुरूंचं नावलौकिक करीत आहेत!गुरुजींच्या आशीर्वादाने जागतिक उर्दू
मुशायरात जागतिक "उर्दू शायर" म्हणून आदराने नाव घेतलं जात आहे!असें हे उर्दू शायर जेव्हा मराठी गझलेतून आपल्या समोर येतात तेव्हा त्यांची शिखर विशालता आपल्या नजरेत भरते!उर्दू-हिंदीच महान योगदान असणाऱ्या या गझलकाराने मराठी भाषेत आपली गझल घेऊन पूर्ण तयारीनिशी उतरावं ही त्यांच्या गझलेंची प्रचंड ताकद आहे!🌷

गझल.. शब्दांचां अतिशय काटेकोर पणे खेळला गेलेला अक्षर खेळ असतो!गझल मात्रा,वृत्तातून आपला खेळ खेळीत असतें!बुद्धिबळाच्या डावा प्रमाणे शब्द तोला मोलाने वापरीत अर्थ जन्माला घालणारी 'गझल' हृदय फाडून आत शिरते!कळ येते,वेदना होतात!पण त्या वेदना हव्या हव्याशा वाटतात कारण गझल विरहातूनही जन्माला येतं असतें!... अशा वेदनेला आपलेसे करीत उद्धवजी महाजन बिस्मिल सरांनी "व्यथांचीं वादळे" या गझल संग्रहातून  रसिकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलें आहे!🌹

गझल मोहिनी घालते!हुरहूर लावते!जीव कासावीस होतो!त्यातून उरातले शब्द ओठी येतात तेंव्हा गझल अतिशय खट्याळ होते!कधी गझलेतून विस्फोटकता जन्म घेतो! उग्र रूप धारण करीत संपूर्ण मानव जातीवर सूड सुद्धा उगवण्यासाठी मागे पुढे पाहात नाही!मग कधी नागीण बनून दंश करायला तयार होतें!...आदरणीय बिस्मिल सरांची "व्यथांचीं वादळे" उठत असतात!आर्तता उरात जन्म घेत असतें व्यथांचीं वादळे चक्री वादळ होत असतं!दिनांक १८जून २०२३रोजी उद्धवजी महाजन बिस्मिल सरांचा "व्यथांचीं वादळे" हा मराठी गझल संग्रह पुण्यातल्या टिळक रोड वरील साहित्य परिषदमध्ये प्रकाशित झाला!🌹

प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले,साहित्य क्षेत्रातील नामवंत,ख्यातकीर्त साहित्यिक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीपाल सबनीस सर होतें!प्रसिद्ध गझलकार,संगीतकार आदरणीय रमण रणदिवे सरांच्या हस्ते गझल संग्रहाचे प्रकाशन झाले! आणि प्रसिद्ध उर्दू शायर आणि बिस्मिल सरांचे गुरुवर्य हे देखील प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतें!"व्यथांची वादळे"तून अनेक विषयांना  स्पर्श करणारे गझलकार महाजन सरांनी जीवनाचा अर्थ उलगडून सांगायचा प्रयत्न केला आहे!🌷

मुळातचं शिक्षकी क्षेत्रात समरसून जाणारे बिस्मिल सर आपल्या प्रतिभेतून जीवनचिंतन मांडताना दिसतात! सृजनशीलतेतुन जन्म घेणाऱ्या सर्वचं गझला जणू मानवतेचा ,माणुसकीचा ,शोषिकतेचा,दारिद्र्य अन वैफल्यग्रस्तेचा नेतृत्व करतांना दिसतात!आपल्या दमदार शेरातून गझल राखेतून उठते आणि जीवंत होत नव्या ताकदीने उभी राहतांना दिसते आहे!🌷

"भले बुरे असें कितीक भेटले मला इथे
स्मृती भल्या-बुऱ्या जपून ठेवल्या उरात मी

कुणी गुन्हे न लादले सजा स्वतःस मी दिली
वृथा हसून साहिली नि राहिलो तुम्हात मी!"

अनेक गझला अनुभूतींतून जातांना वास्तवतेला स्पर्श करीत जानिवांची प्रखरता टिपत पुढे सरकत आहेत!उद्धवजी महाजन बिस्मिल सर आपल्या अस्वस्थ मनाला चिंतनाची जोड देतांत!व्यथांची वादळे मनातून उठत असतात!एका मागून एक वादळ उठत असतं!आपल्या संयत सृजनातून वादळानां शमवीत जातात!गझल प्रसवत जाते!स्वतः यातनेतून प्रसवतातं!दुःखास वाचा फोडतात!जगण्यातून जीवनाचा अर्थ स्पष्टपणे मांडतात!म्हणूनच महाजन सरांची गझल मनाला भिडते!हृदयातल्या खोल डोहात उडी मारते!डुंबत,धडपडत अनुभूतींचा प्रवास मांडते म्हणून!गझल दर्जेदार होत जाते!एक प्रसिद्ध उर्दू शायर मराठी गझलेतून डोळस मार्गाचा आदर्श वाटाड्या होतो!भाव गर्भात शिरून चिंतन करतो त्यासं अस्सल शब्दबोध होतो!बोधीत वास्तवाच्या कडेवर बसून जीवननिष्ठा मांडणाऱ्या गझला संवाद साधू लागतात!अशा गझला रसिक मनाला आपल्या वाटू लागतात!महाजन सरांच्या गझला अंधार भेदून उजेड दाखवीत निघाल्या आहेत!🌷

"आसवांची रोज जी बरसात आहे
वेदनेचा घाव या हृदयात आहे!

वंचना केली तिने माझी करू दे
आजही खेळी तिची स्मरणात आहे!"


गझल सत्याच्या वाटेवरील वाटाडया असतें!रस्ता दाखवीत असतें!प्रेम आणि विरहाच्या अंधार मार्गावरील मिनमिंनती ज्योती असतें!जीवन प्रकाश देणारी बिस्मिल सरांची गझल मैत्रीचा संदेश देतं आहे!अनेक चढ उतारा वरून मार्ग काढीत ठामपणे पुढे सरकत आहे!व्यथांचीं वादळे वेदना देऊन निघून जातात!मागे मागमूस आणि विस्कटलेल्या खाना खुणा ठेवून जातात!आपल्या शब्द सृजनशिलतेमुळे गझल प्रवाहीत होत राहते!बिस्मिलजी डोळ्यातल्या असवांतं गझलेला भिजवतात!व्यथा गालावरून ओघळतात!अर्थ घेऊन ओघळलेले उष्ण शब्दथेंब सांत्वन करीत राहतात!पुन्हा आव्हान स्वीकारित संवेदनशीलतेला आपल्या गझलेचा आशय अन आत्मा मानीत शेर पुढे सरकत राहातात!भावभावनांचा खेळ सुरूचं राहतो!वादळ व्यथांनी रौद्ररूप धारण करतात!अशा अनंत गझल अर्थ, शब्द श्रीमंतीने नटलेल्या आहेत!गझलकार उद्धवजी महाजन "बिस्मिल"सरांची दर्जेदार गझलियत हृदयाला भावतें!शब्दांच्या फुलमाळेतून गुणात्मक पूजा बांधणारे मराठीतील गझलकार बिस्मिल सरांच्या या पहिल्याच गझल पुष्पातून हृदयातून डोळस जीवन दर्शन होत आहे!

"जाहलो आहे जणू लाचार आता
कोण मज देईल मग आधार आता

सोडले आहेत जेव्हा पाश सारे
वाटते होईल मज उद्धार आता!"

आपल्या व्यथा मांडताना बिस्मिल सर सांगतात...

"कोण येथे जीव ज्याच्यावर जडावा
कोण येथे अश्रू ज्यावर ओघळावा

भेटले आणि दूर गेले खूप सारे
कोण येथे बंध ज्याच्याशी जुळावा!"

कधी कधी बिस्मिल सर आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणतात,

"मला वाटलें की इथे मी स्वैर व्हावे
तूला नित्य गीतापरी गुणगुणावे

तुझे बोलणे पुष्पवृष्टी प्रमाणे
तुझे बोलणे नित्य कानी पडावे!"

 गझलांचें अनेक शेर दृष्टी देतं असतात आणि बिस्मिल सरांची गझल आड वाटेने, हमरस्त्याने मार्गक्रमण करीत राहते!... उर्दूतून मराठीतील आपलं स्थान निर्माण करण्यासाठी उभे असलेल्या या महान शायरानें वास्तवाला स्पर्श करणारी गझल दिलेली आहे!अनेक शुभेच्छा देतं!मराठीतील सुरेश भाटांच्या पंक्तीत जाऊन बसाल अशी समृद्ध गझल आपल्या लेखणीतून प्रसावावी हिचं मनोकामना!🌷
🌷🌷🙏🌷🌷🙏💐🌷🙏
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२१जून(योगादिन)२०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol