नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन (भाग -०१)

नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन
            (भाग-०१)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
... नानाभाऊ माळी 

.....संमेलन!.. बठ्ठा गोया व्हयी एक दुसरानां मनम्हा संगयेलं गोमडालें, चाव्वयले मव्हरे सरकावत ऱ्हातसं त्याले संमेलन म्हंतंस 🤔🤔का??का आयको जास्ती,बोलो मोजीटोजी त्या आयकनुकलें संमेलन म्हंतंस व्हतीन 😃🤔मंग?मनलें भी नल्ल ऱ्हास,आशी कल्पना करी ते मनन्हा नल्लाम्हा उज्जी ढोशी-ढाशी, दाबी दुबी संगयेंल फटूकडा तोंडंवाटे फुटतंस त्या इचार प्रकाटीकरनंलें ते नई संमेलन म्हंतंस मंग?का संमेलनां एक तुकडा समजो याले? 🥰🤔😄 त्या फटुकडा इचारन्हा हुंडूक गुंता एक खट्टे गोया व्हयी चाव्वयलें गती देतंस त्याले ते संमेलन म्हनंतसं नई मंग?आज माले "संमेलन" या सबदनी भलतं बांग करी टाक बरं!🙏😌

आज पुनाथून आदरणीय बापूसाहेब पिंगळे सरजी यासना संगे नासिकलें गयथु!.. नासिकलें देवनं शहर म्हंतंस!गोदावरी मायलें गंगा म्हंतंस!गंगा मायना काटले कई जुगना मंदिरे सेतस!श्रीराम-सीता मायनां पाय नाशिकलें लागेल सेंतस आशी पवतीर श्रद्धा सें!.. नाशिकले दर बारा वरीसम्हा कुंभमेळा व्हस!आशा देवभूमीलें आज "रिमझिम काव्य संमेलन" आनी "सन्मान सोहळा" ठेयेलं व्हता!आज आयतवारनां दिन व्हता!सुट्टीनां दिन व्हता!बठ्ठया गाड्या बोंब भरी भरी जा यें करी ऱ्हायत्यांतं!....अहिराणी भाषागुंता ज्या अहिराणी लालस्न धाकलं-मोठं कार्य सें,योगदान सें,त्यास्ले शक्ती आनी ऊर्जा- हुभारी देवागुंता आज गौरव सोहळा ठेयेलं व्हता!🌹

संमेलन आनी सोहळा या आठनूक ठी जातंस!कव्हयं हिरद तठेचं ऱ्हायी जास!आठनूकनीं गोंटी मोठी ऱ्हास!शिगेशिग भरेलं ऱ्हास!आपुन गोंटीलें गाठ मारी फिरत ऱ्हातस!शरीरथून मांगे मांगे फिरी येतंस!आपन तर्हे देवो तरी भी मांगे लागी तठली आठनूक पाठ सोडत नई!पराया मानसे, कवी लेखक, साहित्यिक, रसिक बठ्ठा
 रंगतथून जोगेना व्हयी जातंस!काय ऱ्हास इतलं?संमेलन आसं ठिकानं ऱ्हास जशी हिरदथून रंगत गायी-गुयी  मव्हरे सरकतं ऱ्हास!शुद्ध इचारन्हा रंगतन्हा लोके जोगे उनात का त्यास्लें  गह्यरं सुटस!वल्ला गह्यरं पराया ऱ्हात नई!तो सघ्घा व्हयी जास!सखा व्हयी जास!तो सघा व्हयी जास!तो सबद नातामा आडकी जास!🌹

आज नाशिकनां कालिकामाता मंदिर या पवतीर ठिकाने रिमझिम काव्य संमेलन व्हयनं!लगीनम्हा ज्या
सघासायी भेटतसं!तश्या आटा-फाटानां, जीव भावनां जेठा-मोठा भेटनात!मंदिरनं ठिकानं सत्संगनीं पवतीर गोडी लावत ऱ्हास!नेम्मन नाशिकनां पवतीर मंदिरनं कावड हुघाडी आम्ही सत्संगी व्हयी
गवूतं कवी आनी आयोजक दोन्ही एकजीवं व्हयी गुईनां काला व्हयी गयतातं!..🌹

आज आनंद सागरनां अमृदानुभाव पेवाले भेटनां!.. जीव भावनां अहिरानी भाउभन भेटनात!मायनीं वाडे लायेल अहिरानी सबद खल्ली खोल हिरदम्हा जिरी जायेल सेतंस!त्या सबदसले जागे करनारं!उजागरा करनारं हक्कानं ठिकान भेटन!मन शुद्धीनं ठीकान भेटनं!... त्या ठिकानं नाव रिमझिम काव्य 'संमेलन' व्हतं!मी पराया व्हतु!माले सबद रंगत
 देनारा भाऊ-बहिनी भेटनात!त्यास्मा कोनी पराया ऱ्हायनं नई!बठ्ठा अहिरानी मायनां आंडोर-आंडरी एक ताटे बठी अहिरानी मायनी गोडी चाखी ऱ्हायंतातं!जित्ता रंगतन्हा,माय बोलींना भाऊ-बहिनीसले कसं इसरसु मी!!!!!🙏🙏😌
(पुल्ला भाग-०२म्हा आखो आपला आशीर्वादथून हिरदना बोल लिखी टाकसू मी एस टीम्हा पुनाना
परवासलें सें!भाहेर रिमझिम पानी पडी ऱ्हायना!.. आखो भेटसूत तवलोंग!राम रामजी!)

जय अहिराणी!जय खान्देश!
🌹🌷🌷🙏🌷🌷🌹
**********************
.... नानाभाऊ माळी
मु पो तां शिंदखेडा जि धुळे
(ह मु हडपसर पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२५जून २०२३
(नाशिक ते पुणे प्रवासम्हा)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)