धोंड्या धोंड्या पानी दे रें!
धोंड्या धोंड्या पानी दे रे!
☀️☀️⛅🌞🌤️🌈🌥️🌨️
💐💐💐💐💐💐💐💐
**************************
... नानाभाऊ माळी
.....इतला का बरं रागे भरेलं से कोन जानें? रागन्हा धंगडाम्हा निस्ता उचेकलंपना करी ऱ्हायना!वावरनं ढेकाये आसं लायी अभरायगंमं दखी ऱ्हायनं!आंग धोयी इघरागुंता नांगरेलं ढेकाया तपी-धपी ऱ्हायनात!सासुले सासुले झाडेस्ना हातपाय(फांट्यास्ना) तरी धोयी जावो नां त्यांनी?पन नई, भलता यंगरटपना करी ऱ्हायना!टकोराबन येवो!तोंडं दखाडी जावो!मया हारकी जातीनं!झाडे हुलकी जातीनं!शेतकरीनं तोंडं फुली जायी!घरनं वारुई सोडी भायेर पयतीन! वक्खरं,पाम्हेर घर म्हायीन भायेर इतीन!पन नई? कव्हयं पोक्कय
ढगनं घोंगडं पंघरी बटस तें कव्हयं
वार्गानी लगाम धरी ढागेंढागं उडत सुटस!यांले वाच्चाय म्हनो का
मखडेलं ठिकरं म्हनो आते?⛅
माले तें वाटस यांन्हा चांगला डांख्या लायीस्नी कान झोडत बठो!कान फोडो!यांन्हा चांगला धडांग-धडांग कान फोडत ऱ्हावो!उठो आनी उच्चातडांगं टोकर घायी खालेतीन टोचीं-टोची उठाडतं बठो!पन कितलां कां मांगे लागेनां,भलता जाड कातडीनां सें!पडमथ्या से हावू!निलाज्यागंतं तोंडं मयडी ल्हेस!आंग चोरी मव्हरे निंघी जास!यान्हा दुक लागेलना पाह्यरें हुभा मिरीग सरी ग्या!बाट्टोडनी तरी भी ढुकी दख नई!कव्हयं-मव्हयं जीव तयतयी जास!आस वाटस यांले चांगल्या इसड्या फोक गाया देतं बठो यांले!निस्ता डोयान्ह पानी काढी ऱ्हायना बाट्टोड!उज्जी जाड कातडीनां से हावू!
चांगला हेंगडा-वाकडा,रवसडी यवो!बिलगी-बिलगी कुमचाडी धरो!पन नई!!!येवानं सोडी,तद्दन चकारी सोडी चाली ऱ्हायना!चुकायेंलनां मायेक बठ्ठासले हासीस्नी तथाना मेरवर बठी गंमत दखी ऱ्हायना!काही लोके तें आते ',धोंडी धोंडी पाणी दे!' बोली ऱ्हायनात!पडता पानी धिवसा देतं ऱ्हास!कव्हयं हात्ती बनी येस!कव्हयं मोर बनी येस!पन हावू आंगवर पखाल टाकी कोठे पयी ग्या कोन देव जाने? तथा लामेनम्हा समुंदरनां काटले ग्या तें नई नां?दिनलें यांय चटकाडी ऱ्हायना!हुक्की उनी कां वार्ग सोडी देस!गदारालें वार्गानं आवशद भेटन कां हुपारा पयी जास!..आते तशीचं व्हयी ऱ्हायनं!
मिरीगना धिवसा ऱ्हास!पन हावू कुशीद मिरीगलें आंगठा दखाडी पयी ग्या!जेठ सरी ग्या!आखाड लागी ग्या!समुंदरनां घाम लेवालें पखाल्या ग्या तें तथाच घुशी बठेल से!आपन तर्हे देवो!घामनां ढग,पखाल्या व्हयी तथाच घुशी बठेल से!बठ्ठा,वावरे तिश्या-पिश्या व्हयी जायेल सेतंस!
जनावरे, मानसे, वावरे, झाडे,उनम्हा हापी ऱ्हायनात!कोरी कोरी हेरनी कंनंगीम्हा,खोल दल्लानां तय ढुकी दखो तें गुढघाँखाले पानी जायेल सें!बाकींन्या हेरी तें कोल्ल्या खट्टक व्हयी जायेल सेतीस!हेरमा निरानाम पानी दिखत नई!हेट्या-वऱ्हा
उचडेल ढग तें येरायरनी खेसर करतं पयेत दिखतस!आपली भी खेसर करी पऱ्हा पऱ्हा,काने-काने पयी ऱ्हायनात!🌹
बैल वाडघाम्हा शेपटीवरी गोमाशा मारतं बठेल सेतंस!बठी बठी वाघुल करत निस्ता सिंगडां हालायी ऱ्हायनात!भाहेर टुक्कार ढग निक्खार हेट्या वऱ्हा पयी ऱ्हायनात!आपले कां येडा बांग्या समजी ऱ्हायनां कोन जाने?आपन मुक्या व्हयी सोतानी इज्जत झाकी ऱ्हायनुतं!या पानींनी आपले काटास्वर हुभ करी ठेयेंल सें!उन पंघरी हुपलायी ऱ्हायनुतं!आनी हावू कोल्ला-मोल्ला ढग तऱ्होटा व्हयी आपला जीव जावाना खेय दखी ऱ्हायना!बुदभवरा उडी उडी भागना ढग व्हयी हेट्या वऱ्हा उडी ऱ्हायना!🙏
हावू कायमुक्ख्या पानीं.. खडक,भुरट वावरेस्ना जीव ली ऱ्हायना!तिखी जरात लोंगी मिर्चीगंतं बांध शेकी ऱ्हायना!हुश्श हुश्श कराले लायी ऱ्हायना!हावू उपाधीखोर पानी दांगडो करी दूर निंघी जायेल सें!दिन सरकी ऱ्हायनात!तो त्यान्हा पलोनं समुंदर भरी लयी उपसी जावो नां? पन नई!आथा तथा चौमेंर भवडी ऱ्हायना!आपला धिवसा सुटी ऱ्हायना!त्यांनी दडदड शेरावर शेरा येवो!ढेकाया इघरा तवलोंग पडो!उक्कय फोडी पडो!मन गरास तवलोंग पडो!पंडायभरी पडो!कायजले धिवसा दि जावो!पहेरी-पुहेरी निय्येगार पीक डोयालें दखाडो!पानीनं आनी शेतकरीन नातं रंगतनं व्हयी जायेल सें!पानीनं रंगत शेतकरीना आंगम्हा फिरस तव्हयं शेतकरी वावरंम्हा पयेत ऱ्हास!
आंगवार उनन्ही झावर लिसनी
पडमथ्या पानी डोया लायी पडेल सें!शेतकरी काढी-झटकी,दूर फेकी दडदड यी आशी आस लायी बठेल से!आंगे पांगे तलाव,डाबरा व्हयी पानींनी पडो!डोकांना सीन चालना जायी!... पानीनी आते कोन्हीचं परीक्षा दखो नई!इज्जतदार व्हई पडो!कायमुख्ख्या व्हयी आथ तथ दपत नई फिरो!दर वरीसलें खे मांडी ऱ्हायना!जग सबागतथून सांगी ऱ्हायन!रावनायी करी सांगी ऱ्हायन!खाले मुंडी व्हवो नई!.. 🌹
🌨️🙏⛅☀️🌈🌨️🙏⛅🌥️
***************************
.... नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा, जि. धुळे
(ह.मु. हडपसर, पुणे ४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२३जून २०२३
Comments
Post a Comment