शब्द गझलेतं ओतंणारा गझलकार!आप्पासाहेब शिवाजी साळुंके सर!

शब्द गझलेत ओतंणारा गझलकार!
आप्पासाहेब शिवाजी साळुंके सर!
💐🌷💐🌷🙏💐🌷💐
**************************
.... नानाभाऊ माळी 

मी देव शोधतो आहे!
मला माणूस भेटतो आहे!
 माणसातील देवरूपाचे 
रोज अमृत वाटतो आहे!🌷

मला रोज भेटतो आहे !
हृदयी संसार थाटतो आहे
शोध देवाचा सुरूचं माझा 
मला माणूस भेटतो आहे!🌷

माणसातील देवपण
मी हृदयी ओढतो आहे 
दर्शनाने स्वच्छ होतांना 
मी आतुनी घडतो आहे!🌷

भावलेल्या माणसांतं 
मीचं मानसाळतं आहे 
माणसांचा मी भुकेला
मनी तुळशी माळत आहे!🌹 

ऋणानुबंधांच्या धाग्यांनी
मज माणूस भेटतो आहे
मानसातील देवारूपाचे
मी नाम वाटतो आहे...!🌹

संस्कार देवा मजवर असू दे 
दिव्य मंदिरी पळतो आहे
देव समजुनी माणसाच्या 
 संस्काराकडे वळतो आहे!🌹

.....कुणाला दगडात देव दिसत असतो!कुणाला देवळात दगड दिसतो!दगडाच्या सुंदर मूर्तीत कुणाला साक्षात स्वर्ग दिसतं असतो!कधी माणसात देव दिसतं असतो!हृदयार्पण सेवा आणि श्रद्धा देवाजवळी नेत असते!मी माणूस प्रेमाचा भुकेला आहे!देव माणसं शोधित त्यांच्या पर्यंत जाऊन पोहचत असतो!त्यांनां वंदन करीत असतो!नतमस्तक होतं त्यांच्या पायांवर माथा टेकवत असतो!अशा गुरुतुल्य आणि देवतुल्य माणसांच्या संस्कारांनी मी देखील घडतो आहे!त्यांच्या आशिर्वादांनी श्रीमंत होतं आहे!जेष्ठ, गुरुजनांच्या आशिर्वादाचीं किंमत अनमोल असते!मी अनमोल संगे हिंडतो आहे!💐

मला माणसातील देवमाणूस भेटला होता!सदसशीलतेच्या साऱ्या खाणाखुणा सहित भेटला होता!... निम्मित ही तसंच होतं!.. दिनांक १८जून २०२३ रोजी प्रसिद्ध हिंदी,उर्दू आणि मराठी गझलकार आदरणीय प्राध्यापक उद्धवजी महाजन बिस्मिल सरांच्या "व्यथांचीं वादळे"या मराठी गझल संग्रहाचां प्रकाशन समारंभ होता!प्रकाशन समारंभाला गुरुतुल्य अन देवतुल्य व्यक्तिमत्वास देखील आमंत्रण होतं!आमचं व्हाट्सअपच्या माध्यमातून सांभाषण चालुचं असतं!पण समारंभाला पाहून मला सुखद धक्का बसला होता!... प्रसिद्ध हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी अन अहिराणी गझलकार-कवी आदरणीय आप्पासाहेब शिवाजी साळुंके सर भेटले होतें!गझलेल्या उत्तम सूर लावणाऱ्या आर्त-गोड गळ्याचे गझलकार भेटले होतें!🌹

प्रकाशन समारंभातचं आम्ही एकमेकांना मिट्ठी मारून भेटलो होतो!वयाचं अंतर विसरून भेटलो होतो!आदरणीय आप्पांचं वय फक्त ७६वर्षांचं आहे!अशा वयाने,मनाने, प्रतिभेने समृद्धीचं शिखर गाठलेलं आदरणीय व्यक्तिमत्व भेटलं होतं!चंद्र -तारे आपल्या लेखणीत सहज भरणारे!वाऱ्यास घोडा समजून स्वार होतं सर्वांना आभाळ सैर करून आणणारे कल्पनां अक्षरशास्त्री मला भेटले होतें!आदरणीय साळुंके सरांच्या कवितेवर-गझलेवर जीव ओवाळणारा माझ्यासारखा सामान्य रसिकास आप्पासाहेबांसारखा सूर्य भेटला होता!🌷

माणसांच्या जिंदगीवर आपल्या लेखणीतून फुले उधळणारे आप्पासाहेब नक्षत्र तारा सारखे दिसलें!सूर्याहून विशाल दिसलें!त्यांच्या गोड गळ्याच्या सुरावटीचा मी फॅन आहेचं!.... प्रकाशन समारंभाचा समारोप सुरु होता!... मी देवतुल्य सूर्य नजर असणाऱ्या आप्पासाहेबांना घरीं येण्याची विनंती केली!प्रथमता: सरांनी दुर्लक्ष केलं!रात्रीचे ९-३० वाजले असतील मी आग्रह केला आणि मला कठीण कवाचाच्या नारळातील गोड खोबऱ्याचा अनुभव आला होता!आप्पासाहेबांनी आपल्या हास्यवदनाने येण्यास होकार दिला होता!मी मनोमनी अत्यानंदाने नाचू लागलो होतो!आभाळाहून विशाल हृदय असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या घरीं येतं आहे याचा निरोप वाऱ्याला द्यावा का इतका आनंदित झालो होतो!🌹

आम्ही अर्थात माझे मित्र श्री उदयभानजी पाटील,आप्पासाहेब आणि मी रात्रीच्या उजेडातून गाडी पळवत हडपसरला घरीं पोहचलो!घरीं पोहचलो तेंव्हा रात्रीचे १०-३०वाजले होतें!आम्ही हातपाय धोऊन जेवायला बसलो!ताट वाढत असतांना घरातली लाईट नाखुष झाली असावी म्हणून दिव्याच्या अंधारात जेवायला बसलो!ताटात पुरणपोळी पाहून आप्पासाहेब आश्चर्यचकित झाले, बोलले, "आज हा कसला सुखद धक्का आहे!".. आम्ही गप्पा मारत जेवत होतो!नंतर रात्री ११-०० वाजेपासून आप्पासाहेबांच्या भावस्पर्शी गझल गायनाने मी मंत्रमुग्ध झालो होतो!पूर्व रात्र संपली असावी अन उत्तर रात्रीचा प्रारंभ असावा!मी आप्पासाहेबांच्या गझलेत चिंब भिजत राहिलो!या गझलकारास गायकीची दैवी देणगी असावी!देव सर्व काही अशा
दैवताच्या स्वाधीन करीत असतो!इंद्रधनूचे सप्तरंग सप्त सुरात एकनिष्ठ झाले होतें!अनेक रसांची उधळण होतं राहिली!आदरणीय आप्पासाहेब शिवाजी साळुंके सरजी गझलेंतून सूर आळवीत राहिले!💐

रात्रीचे जवळपास १२वाजले असतील!७६वर्षांचा तरुण गझलकार दिवसभर कार्यक्रम आटोपून पुन्हा आमच्यासाठी आपला विशाल साहित्य खजिना रिता करीत राहिले!!मी मंत्रमुग्ध होत रसिकमनाची दाद देतं राहिलो!अशी ऋषींतुल्य व्यक्तिमत्व भाग्यानें आपल्या वाट्याला येतं असतात!आपण त्यांनी दिलेलं शब्ददान ओंजळीत घेत राहायचं!मी ही अचानक धनलाभ व्हावा असें शब्द ज्ञानी भेटलें होतें!माझ्यासाठी १८जून ही तारीख स्मरणात राहिलं अशीच आहे!🌷

भाग्य लिहिणारे वेगळे असतात!आपण त्या भाग्याचें वाटेकरी असतो!माझं अहोभाग्य होतं!गझलेवर जीव ओतणारा गझलकार गायक, मानवतेची पूजा करणारा महान साहित्यिक संत भेटला होता!देव माणसातं रूपात अचानक भेटला होता!साहित्यावर निस्सीम भक्ती असणारा शब्दधनी माझ्या वाट्यास आला होता!आपली साहित्य सेवा अविरत घडतं राहो!भाषिक सीमा ओलांडून आपलें भावस्पर्शी सुश्राव्य सूर आपल्या वयाच्या १००री पार वर्ष आयुष्याच्या शिखरापर्यंत घडतं राहो! काव्यात मग्न असणारा शायर आपल्या घरीं येणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो!आपली गझल मेजवानीचा आस्वाद कदाचित माझ्या भाग्यात असावा म्हणून या देवदूतास परंपीत्यानें आमच्या घरीं येणाचं टिकट काढून दिलें असेल!सरजी आपल्या शत शत ऋणात राहून लाख लाख वेळा आभार मानतो!🌷
💐🌷🌹🙏💐🌷🌹🙏
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२०जून २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol