आर्धा मिरीगलें आंबानं जेवन
आर्धा मिरीगलें आंबानं जेवन
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
.... नानाभाऊ माळी
........पयभारा पयी जानारा लोके कोनले घाबरतसं व्हतीन बरं?त्यास्नी येवो का नई बरं!!बजारम्हाईन चांगला केशर,हाफूस आंबा लयी इसूत! घरमा खापरन्या पुऱ्या करालें
सांगसू!रसीनां मगमगातं वासम्हा भूक रवसडतं यी!भजी दखी जीभले पानी सुटी!भजी आनी कुल्लाया
रसीम्हा कुस्करीस्नी,ऱ्हायी सुयी
कंटोलनां तांदुई नई तें मंग दुकानं वरतीन इकत लेयेल तांदुईनां धव्व्या भात पित्तयनां बोघनाम्हा फुगी फुगी वर यी!आते तें साखरनीं पुरी खावामां मज्या नई से!कोन आजारपन लाई ली!गावरानीं गुईनीं पुरी दखी जीभ निस्ती चटचटात करसं!पुरणपोयीनं जेवण आक्सी ध्यानमा ऱ्हासं!पन गंजज कायेजनां मानसे,पाव्हना येतंस!कव्हयं पयभारा नई तें मंग तोंडं दखाडी पयेत सुटतस!🌹
आते आर्धामर्धा मिरीग चालना ग्या!मिरीगनीं पह्येरनी लागी जायी!पानी दिखत नही!पन ढग हेट्या वऱ्हा पयी ऱ्हायनात!गदारा व्हयी ऱ्हायना!पानी पडावर पह्येरनी सुरु व्हयी!पाम्हेरनां मांगे पयेत सुटो तसा घर येणारा पाव्हना,घरमां पाय का दारमां पाय!लकडी लें मकडी लायी निस्ता पयांमांगे सेतसं!मंग आंबानां रस खावाले कोनलेचं येय नई दिखी ऱ्हायनी!🌹
नांगरेल-वखरेलं वावरे!उन्हम्हा
भुंजायेलं वावरे!…..वर आभायांगमं आसं लायी दखी ऱ्हायनात!आते मिरीग आर्धा सरी ग्या!कव्हयं वार्ग सुटी ऱ्हायनं तें कव्हयं एखादा बोन्डभर कपाशीनां तुकडाभर भी ढग दिखत नई!बी-बिवारं बठ्ठ तयार से!पानी पडानां मव्हरे जे काही खावा पेवानं से,तें भी उरकी वार्की लेवो!सहेरनां पाव्हना!गावंगंमनां यायी भायी,बठ्ठास्नी गोड धोड खायी खुयी जावो आसं वाटस!पन बाकीना पाव्हना उज्जी चत्रा सेतंस!त्या 'येतंस बरं का!''आंगे पांगे!यांनगंमं त्यानंगंमं जायी येतंस!🌹
...आपला गंम पाव्हनासले पुरणपोयीनां आग्रोह करा का निस्ता च्या पी पयेत सुटतस!का बरं तें म्हणे, "एक दोन रोजम्हा पानी पडी!देव घाऱ्या वाऱ्या करी ऱ्हायना!वावर तयार करणं से!आपले भेटनं व्हतं,भेटनूतं!चार सबद आथानां तथाना चाव्वयानुत!येरा येरनं सुख दुःख जानी लिध!च्या काय नि जेवन काय एकचं से!"... आसं सांगी दारानां मव्हरे काढेल चप्पलम्हा पाय घाली सुख दुखनं व्हझं हालकं करी निंघी जातंस!🌷
कोनी डोयांमां आसू लयी जातंस!कोनी डोयांम्हा आसू ठी जातंस!हावू सवासारनां व्हडा सुटत नई!मानोस जित्ता से तवलोंग व्हडी व्हडी व्हडत ऱ्हासं!वावर,घर,नवकरी सवसार या
बठ्ठास्मझार मानोस पुर्ता चेपायी ऱ्हायना!भुंजायी ऱ्हायना!चेपायी-चुपायी मव्हरे पोरेंस्ना व्हडा!त्यास्नी गिरजदारी!आखो मांगे मांगे धयेडपन यी जास!धाकल्पनं चांगलं ऱ्हास!धयेडपन नको वाटस!सोतालें तरास,घरले तरास,पैसास्नी खुवारी डाक्टरनं बेड भरेलं ऱ्हास!🌹
यांय सकायलें उगस!दिनभर उरकी वारकी वरलांगे चालना जास!बुडी जास!अंधारं करी निंघी जास!... मानोस्न आशिचं ऱ्हास!जिंदगिनी सकाय,दुफार, तिसरापार आनी
दिम्हूयी हायी ठरेलं ऱ्हास!हिसाब चुकता व्हयी जास!आठेचं पहिरो, आठेच कापीकूपी कंनगी भरी सरावत ऱ्हावो!भरनं आनी सरनं हायी जिंदगी ऱ्हास!जिंदगी सरनी का आवरी-उवरी चालना जावो!दुसरालें जागा खाली करी देवो!हावू न्यामिना रिवाज पिढी जात चालतं यी ऱ्हायना!मंग मांगे मानोस्न कमायेल याद ऱ्हास!इस्टन-बारदान नई!... आपन कोनले कामम्हा पडनूतं!आपली वागणूक हायी मनोसनी कमायी ऱ्हास!ती कमायी पाठगोयी बांधी निंघी जावो!मांगलांसले गिनती करू देवो!........
🌹 🌹 🌹 🌹
.....दखा!! मी कोटेंग कोठे चालना गवू!मिरीग आर्धा सरी जायेलं से!ऱ्हायेलं सुयेलं आंबानां सीजन दखी पुरणपोयीना जेवनंलें बलायी ऱ्हायंतू!भज्या कुल्लाया,रसी भात घरनं खटलं करी खावाडी ऱ्हायनी!एक दोन रोजम्हा पानी पडी!... आंबा कोन खानार से मंग?.... आर्धा मिरीगले का व्हयेना पानी येडाचाया करी मांगे वसरी ऱ्हायना!.. आंबानं जेव तवलोंग चाली!... तर मंग या जेवनं लें!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१६ जून २०२३
Comments
Post a Comment