दिंडीतील भक्ती रसात डुंबली कविता

दिंडीतील भक्ती रसात डुंबली कविता
🚩👏🚩👏🚩👏🚩👏🚩
**************************
.... नानाभाऊ माळी 

.....आज दिनांक १४जून २०२३!आज विशेष दिवस आहे!आज योगिनी एकादशी आहे!आज बुधवार देखील आहे!महाराष्ट्र भक्तीचं आराध्य दैवतं विठ्ठलाचा वार आहे!दोन दिवस पालख्यांचा मुक्काम पुण्यात होता!दोन दिवस अथांग भक्तीसागरात पुणे चिंब भिजले होतें!हरी नामाच्या गजरात पुणे शहर तल्लीन झाले होते!ठायी ठायी भजन,कीर्तनात तल्लीन झालेले वारकरी हरी नामात एकरूप झाले होतें, भजनात तल्लीन झाले होतें!अनंत पालख्या,अनंत दिंड्याच्यां संगतीने लाखों वारकऱ्यांच्या मुखातून विठू नामाची अमृतवाणी कानी ऐकू येत होती!डोळे अनंत भगवे पताके टिपत होतें!वारकरिंचां भक्तीभाव टिपत होतें!त्यांची तल्लीनता टिपत होतें!भक्तीरसाचा गोडवा टिपत होतें!

आज "ज्ञानोबा माऊली तुकाराम!"चा गोडवा घेऊन अनंत पालख्यांसोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी हडपसरहून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या!🌷

संतांचं आगमन आनंददायी असतं!!माणूस आतून-बाहेरून भक्तिमय होऊन जात असतो!वारकरीचं आगमन भावभक्तीकडे घेऊन जाणार असतं!टाळ-मृदूंगाच्या मांगलीक संगीताने विठू भेटीची ओढ लागलेली असतें!दिंड्यांच्या वारकरी मुखातून  भारूड,भजन,कीर्तनाचा गोडवा कानी ऐकू येत असतो!भावभक्तीचा हा अवीट गोडवा पेहरीत दिंड्या विठू भेटीला निघून जातात!घर-दार,संसार कमरेला बांधून माणूस विठ्ठल नामात रंगून जातो!एकचित्त होतो!टाळ-मृदूंगातं जीव ओततो!समरस होतो!वीणा हाती घेऊन नाचू लागतो!हरी चरणी स्वतःस अर्पण करतो!विठ्ठलाच्या नामात रमतो!विठ्ठल नामाची अमृत संजीवनी घेऊन दिंड्या
गावा गावातून निघतात!🌹

....आज हरीची पंढरी डोळ्यासमोर येत राहिली!रामकृष्णचा गजर कानी येत राहिला!मंदिराचा कळस डोळ्यांना दिसतं राहिला!विठ्ठलाची अवीट मूर्ती डोळे प्राशून घेत राहिलें!पालखीच्या दर्शनासाठी आम्ही आतुर झालो होतो!संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली!वाहत्या गर्दीतूंनंचं दर्शन घेतलं!वाहत्या विशाल जनसागराच्या रेट्यात पालखी रथाला स्पर्श केला!दिंडीतील पालखी वारीसोबत पुढे जात राहिली!डोळ्यात न मावणारा भक्तीचा जनसागर पुढे जात राहिला!माऊलीला स्पर्श केला!मनातले विकार गळू लागले होतें!आम्ही पालखी मार्गांवरच थांबलो होतो!पंढरपूरच्या दिशेने वाहणाऱ्या विशाल जन सागरातील लाटेत ओढलें जात होतो!बाहेर पडायला मार्ग सापडत नव्हता!भक्तीदैवत,पंढरीचा कानडा विठ्ठल दिंडीसंगे बोलावीत होता!ज्ञानमाऊलीची विशाल लाट वाहत्या जन सागरात निघून गेली!

काही वेळाने भजनात तल्लीन,टाळ मृदूंगच्या कर्णमधुर सुरावटीचा आवाज कानी येऊ लागला!जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर हमरस्त्यावरून पुण्यातून हडपसरकडे येतांना दिसली!पालखी मध्यभागी होती!सभोवती भक्तीसागर दिसतं होता!दुरूनच पालखीस डोळ्यातून हृदयात उतरवून घेतलं!मनोमनी तुकोबारायांना नमन केलें!पालखी जवळ येत होती!आम्ही देखील पालखीला स्पर्श करण्यासाठी विशाल जन सागरात उडी घेतली!वाहत्या पाण्यासारख वारकरी पळत होतें!पालखीला स्पर्श केला!दर्शन घेतले!गाथा हृदयात जाऊन बसली!पांढरीच्या वाटेवर उभे आम्ही भक्तीचे उपासक तुकाराम महाराजांच्या नाम गजरात एकरूप झालो!

संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकारामांची पालखी हडपसरच्या गाडीतळावर काही वेळ विसावा घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या!दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गांवरून निघून गेल्या!आम्ही भक्तीअमृत पिवून संजीवन विठ्ठलाजवळी गेलो होतो!🌷

विठू माऊलीची वारी दुःख विसरायला लावते!'रामकृष्ण हरी' म्हणत संसार सुखाचं अमृत हाती देतं निघून जाते!वारी जीवन सार सांगते!अति मोहमायेतूनबाहेर पडण्यास सांगत असतें!कपाळी चंदन टिळा, बुक्का,हाती विटकरी रंगाचा ध्वज पाऊलें चालतं असतात!पंढरपूरकडे!माय माऊली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू वाटेकडेभक्तीच्या आतुरतेने पळत सुटते!ही सारी लगबग कोणासाठी असतें? तर व्याकुळ मनाला विठ्ठलाचा आधार मिळावा,संसारात ठायीठायी विठ्ठल दिसावा!कृपा व्हावी म्हणून विठू भेटीस निघालेला वारकरी सर्व काही विसरतो!अभंगातं  रंगतो!टाळ-मृदूंग भक्ती संगीतात,भजनातं तल्लीन होऊन जातो!पाऊले पंढरपूर दिशेले पडू लागतात!🌹

 हडपसर गाडीतळावर विसावा होता!तासभर विसावा घेऊन पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली!नंतर संत तुकारामांची पालखी आली!पुन्हा भक्तांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढीत 
हडपसरचा निरोप घेऊन भक्तीसागर पुढे मार्गस्थ झाला होता!🌹

कोणाचीही वाट न बघता दिंडीतील पाऊले पडू लागतात!कुठलीही यंत्रणा नाही!कोणी पाठीमागे लागत नाही!आग्रह नाही!स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्रातील लाखों लाखों वारकरी भावभक्तीने पंढरपूर वारीला येतात!विशाल जनसागर डोळ्यात मावत नसतो!अगणित ठिकाणाहून दिंड्या निघतात!आषाढी एकादशीला पंढरपूरात यात्रा असतें!देवाच्या भेटीची यात्रा असतें! भोळ्या
भाबळ्या भक्तांची यात्रा असतें!कोणी बोलवत नाही,स्वतःहून विठू दर्शनाची आसं ठेवून माऊलीचा जयजयकार करीत वारी निघते!हे घडतं कसं?हा भक्तीसंप्रदायचा चमत्कार आहे!सगुण साकार आणि निर्गुण निराकार भावभक्तीचा चमत्कार आहे!🌷

..... काल दिनांक १३जून रोजी पुण्यातल्या रामटेकडी एस आर पी कॅम्पमध्ये पंढरीच्या वारीतील खुले कविसंमेलन पार पडले!कित्येक शतकांपासून वारी निघते आहे!विठ्ठल भक्तीची महिमा अपार आहे!विठ्ठल नामाचा गजर करीत वारी निघते!त्यात वारकऱ्यांसोबत भजन कीर्तनात दंग होतं असतांना भक्ती रसातील अनेक कवितां हृदयास भक्ती रस पाजित राहिल्या!रामटेडीला ह भ प बडघे महाराजांच्या वारीत भक्तीत कविता न्हात होती!भक्तीरस कवितेत उतरत गेला!कविता भारूड झाली,गवळण झाली!कविता भक्तीअमृत वाटीत राहिली!मन तृप्त होतं राहिलं!श्रद्धा दैवताची साधना करीत राहिलो!शद्धा प्रबळ होती!ती मंदिरातील गाभाऱ्यात घेऊन गेली!कविता भजनात रंगली !कविता भारूड झाली!कविता कीर्तनातून नाचू लागली!कवितेतून भक्ती गोड होतांना काळजाला भिडली!काल कविता भक्तीत न्हाली!आज आम्ही वारीतील दिंडीत विठ्ठल नाम घेवून नाचतं होतो!🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१४जून २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)