चला जाऊया गड किल्ल्यांवर(जरंडेश्वर किल्ला)

चला जाऊ गड किल्ल्यांवर
       (जरंडेश्वर किल्ला)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**********************
.... नानाभाऊ माळी 

'चला जाऊ गड किल्ल्यांवर' या हृदयातील शब्द मोहिणीनें माणूस गर्वाने गड किल्ल्यांकडे वळतो आहे!आम्ही सुद्धा केवळ श्री वसंतराव बागूल सरांच्या या मिहिमेत सहभागी झालो आणि त्या मोहिमेचे घटक झालो!... गड किल्ला मोहीम म्हणजे श्री बागूल सरांचं किल्ला सफारी मोहीम स्वप्न आहे!... आम्ही खरोखर या मोहिमेमुळे आरोग्य संपन्न जीवन जगत आहोत!...... तर आजची किल्ला सफारी आहे "जरंडेश्वर किल्ला!"... 💐💐

......जिथे सहजासहजी पोहचू शकत नाही अशा अवघड,आव्हानात्मक ठिकाणास गड,किल्ले,दुर्ग म्हणतात!कधी प्रचंड उभट कडा,कधी खोल दरी,जंगल आणि घोंगावणारा वारा आपल्यासमोर ताठपणाने उभे असतात!त्यांना नतमस्तक होतं,त्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी येणारा व्यक्ती त्या अफाट निसर्ग दुनियेचा एक भाग होऊन जातो!सखा होऊन जातो!श्वासाशी श्वास एक होतो!या लढवय्या इतिहासाचां कधी अंश होऊन जातो हे कळत देखील नाही!🌹

'अवघड' या शब्द निर्मितीच्या प्रक्रियेत 'विपरीत'या शब्दाची साथ मिळाली की छाती पोलादाची होऊ लागते!मन पोलादाचं व्हायला लागतं!शरीर पोलादाचं व्हायला लागतं!तेथे 'शिवगर्जना'जन्म घेऊ लागते!तेथे राष्ट्रनिष्ठा प्रबळ होऊ लागते!राष्ट्रप्रेमासाठी प्राण अर्पण करण्याची उर्मी जन्म घेऊ लागते!मुखे शिवप्रताप ऊर्जा होतो!लढवय्या मावळ्याच्या हृदयात शिवभक्तीची प्रचंड ऊर्जा निर्माण होतें!त्या ऊर्जास्रोताठिकाणी अभिमानाने,एकनिष्ठा ठेवून आपला माथा टेकला जातो त्यासं 'किल्ला' म्हणावा!🌹

किल्ला राज्याचा केंद्रबिंदू असतो!किल्ला स्थिर राज्याची मध्यवर्ती ठिकाणं असतात!आम्ही आज ११मे २०२३रोजी सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील पाडळी रेल्वेस्टेशन जवळील जांब गावाच्या शिवारात जरंडेश्वर किल्ला सफारीला गेलो होतो!जांब शिवरातील,पाडळी स्टेशनजवळचा हा किल्ला प्राचीन वैभवाची ओळख करून देतं असतो!प्राचीन इतिहासाची पाने उलगडली जात असतात!जरंडेश्वर किल्ला जंगलांनी वेढलेला आहे!अनेक वनस्पती या किल्ल्यावर पहायला मिळतात!अनेक आयुर्वेदिक झाड वनस्पतीनीं उपयुक्त असं हे जंगल आहे!

किल्ल्यावर पोहचायला साधारण दोन तास लागले!किल्ला साहसी आहे!आव्हानात्मक आहे!आमची ३० सिटांची बस सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा, लोणंद, वाठार मार्गे निकम वस्ती,जळगाव,जांब अशी गांवे पार करीत जरंडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोहचली!आम्ही सकाळी ०६-३०वाजता निघालो होतो!सकाळी १०-००येऊन पोहचलो होतो!

आमची मोहीम सुरु झाली!सुरुवातीला निम्या चढापर्यंत सिमेंटच्यां पायऱ्या होत्या!तोपर्यंत चढणे अवघड नव्हते!पुढे पायऱ्या नव्हत्या!फक्त अंगावर येणारी, घसरडी-निसर्डी वाट होती!छोटी-मोठी दगडं वाटेत आडवी पडली होती!मध्येच डोक्यावर काही ढग गोळा झालें!पावसाचे काही थेंब ओघळले अन काही क्षणात निघूनही गेला!ढग आणि पाऊस दोघेही खेळीया आहेत!फसवे आश्वासन देऊन पळून जाण्यात पटाईत आहेत!आम्ही जिद्दी मावळे होतो!वाटेवर एक एक पाय रोवून पुढे सरकत होतो!मध्येच डोक्यावरील उन चटक्याचा फटका देतं घाम काढत होतं!मध्येच सावली देणारी झाडं मागे जात होती!उन चटक्याचा प्रसाद देतं होतं!आम्ही दम घेत घेत पुढे वर सरकत होतो!🌹

झाडांच्या आड शिखरावर लपलेले मंदिर दिसलं!दुरूनच जणू दर्शन देतं होतं!आम्हाला हायेसे वाटले!पुन्हा अंगात जोश भरत पुढे वाटचाल सुरूचं होती!उमेद आणि जोश अंगात होता!उन होतं पण ढगातं लपून लपून चटका देतं होतं!अन घाम गाळून गाळून,हास-हुस करीत जरंडेश्वर किल्ला सर केला!तेंव्हा वाजले होतें दुपारचें १२-२०!

किल्ल्यावर प्राचीन जरंडेश्वर हनुमानाचं भव्य मंदिर आहे!दगडं चुण्यातं बांधकाम केलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मिशा असलेली एकमेव हनुमान मूर्ती असावी!आम्ही भावभक्तीने दर्शन घेतले!हनुमान मंदिराच्या पाठीमागे स्वतः संत रामदास स्वामींनी बांधलेलं हनुमान मंदिर आहे!या मंदिरा पाठीमागे राम मंदिर असून!श्रद्धेनें नमस्कार करीत नतमस्तक झालो!किल्ल्यावर असलेल्या ऋषी-मुनीसाठी निवासस्थाने बांधलेली दिसली!त्यातील एका निवास्थानी अवाढव्य जातं दिसलं!तेव्हा पीठ दळण्यासाठी या जात्याचा उपयोग केला जातं असावा!मागील भव्य प्रांगणात चुण्याचा गोल घाना आणि घाण्याचं दगडी चाक दिसलं!त्याच्या पाठीमागे एका दगडाच्या गुहा रुपी अडोशाला संत रामदासांच्या पादुका होत्या!समोरच संत रामदासांचा रंगीत फोटो देखील दिसला!🌷

किल्ल्यावरून लांबवर सातारा शहर नजरेस पडतं!अशा या किल्ल्यावर निसर्गाने भरभरून वन्यसंपदा बहाल केली आहे!... प्राचीन दंतकथेनुसार श्रीराम आणि रावण युद्ध झालं होतं!त्याच्या आधी श्री लक्ष्मण आणि रावण पुत्र मेघनात(इंद्रजित)यांच्यात घनघोर युद्ध झालं होतं!ढगांच्या आड लपून इंद्रजितनें श्रीजिथे सहजासहजी पोहचू शकत नाही अशा अवघड,आव्हानात्मक ठिकाणास गड,किल्ले,दुर्ग म्हणतात!कधी प्रचंड उभट कडा,कधी खोल दरी,जंगल आणि घोंगावणारा वारा आपल्यासमोर ताठपणाने उभे असतात!त्यांना नतमस्तक होतं,त्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी येणारा व्यक्ती त्या अफाट निसर्ग दुनियेचा एक भाग होऊन जातो!सखा होऊन जातो!श्वासाशी श्वास एक होतो!या लढवय्या इतिहासाचां कधी अंश होऊन जातो हे कळत देखील नाही!🌹

'अवघड' या शब्द निर्मितीच्या प्रक्रियेत 'विपरीत'या शब्दाची साथ मिळाली की छाती पोलादाची होऊ लागते!मन पोलादाचं व्हायला लागतं!शरीर पोलादाचं व्हायला लागतं!तेथे 'शिवगर्जना'जन्म घेऊ लागते!तेथे राष्ट्रनिष्ठा प्रबळ होऊ लागते!राष्ट्रप्रेमासाठी प्राण अर्पण करण्याची उर्मी जन्म घेऊ लागते!मुखे शिवप्रताप ऊर्जा होतो!लढवय्या मावळ्याच्या हृदयात शिवभक्तीची प्रचंड ऊर्जा निर्माण होतें!त्या ऊर्जास्रोताठिकाणी अभिमानाने,एकनिष्ठा ठेवून आपला माथा टेकला जातो त्यासं 'किल्ला' म्हणावा!🌹

किल्ला राज्याचा केंद्रबिंदू असतो!किल्ला स्थिर राज्याची मध्यवर्ती ठिकाणं असतात!आम्ही आज ११जून २०२३रोजी सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील पाडळी रेल्वेस्टेशन जवळील जांब गावाच्या शिवारात जरंडेश्वर किल्ला सफारीला गेलो होतो!जांब शिवरातील,पाडळी स्टेशनजवळचा हा किल्ला प्राचीन वैभवाची ओळख करून देतं असतो!प्राचीन इतिहासाची पाने उलगडली जात असतात!जरंडेश्वर किल्ला जंगलांनी वेढलेला आहे!अनेक वनस्पती या किल्ल्यावर पहायला मिळतात!अनेक आयुर्वेदिक झाड वनस्पतीनीं उपयुक्त असं हे जंगल आहे!

किल्ल्यावर पोहचायला साधारण दोन तास लागले!किल्ला साहसी आहे!आव्हानात्मक आहे!आमची ३० सिटांची बस सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा, लोणंद, वाठार मार्गे निकम वस्ती,जळगाव,जांब अशी गांवे पार करीत जरंडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोहचली!आम्ही सकाळी ०६-३०वाजता निघालो होतो!सकाळी १०-००येऊन पोहचलो होतो!

आमची मोहीम सुरु झाली!सुरुवातीला निम्या चढापर्यंत सिमेंटच्यां पायऱ्या होत्या!तोपर्यंत चढणे अवघड नव्हते!पुढे पायऱ्या नव्हत्या!फक्त अंगावर येणारी, घसरडी-निसर्डी वाट होती!छोटी-मोठी दगडं वाटेत आडवी पडली होती!मध्येच डोक्यावर काही ढग गोळा झालें!पावसाचे काही थेंब ओघळले अन काही क्षणात निघूनही गेला!ढग आणि पाऊस दोघेही खेळीया आहेत!फसवे आश्वासन देऊन पळून जाण्यात पटाईत आहेत!आम्ही जिद्दी मावळे होतो!वाटेवर एक एक पाय रोवून पुढे सरकत होतो!मध्येच डोक्यावरील उन चटक्याचा फटका देतं घाम काढत होतं!मध्येच सावली देणारी झाडं मागे जात होती!उन चटक्याचा प्रसाद देतं होतं!आम्ही दम घेत घेत पुढे वर सरकत होतो!🌷

झाडांच्या आड शिखरावर लपलेले मंदिर दिसलं!दुरूनच जणू दर्शन देतं होतं!आम्हाला हायेसे वाटले!पुन्हा अंगात जोश भरत पुढे वाटचाल सुरूचं होती!उमेद आणि जोश अंगात होता!उन होतं पण ढगातं लपून लपून चटका देतं होतं!अन घाम गाळून गाळून,हास-हुस करीत जरंडेश्वर किल्ला सर केला!तेंव्हा वाजले होतें दुपारचें १२-२०!🌷

किल्ल्यावर प्राचीन जरंडेश्वर हनुमानाचं भव्य मंदिर आहे!दगडं चुण्यातं बांधकाम केलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मिशा असलेली एकमेव हनुमान मूर्ती असावी!आम्ही भावभक्तीने दर्शन घेतले!हनुमान मंदिराच्या पाठीमागे स्वतः संत रामदास स्वामींनी बांधलेलं हनुमान मंदिर आहे!या मंदिरा पाठीमागे राम मंदिर असून!श्रद्धेनें नमस्कार करीत नतमस्तक झालो!किल्ल्यावर असलेल्या ऋषी-मुनीसाठी निवासस्थाने बांधलेली दिसली!त्यातील एका निवास्थानी अवाढव्य जातं दिसलं!तेव्हा पीठ दळण्यासाठी या जात्याचा उपयोग केला जातं असावा!मागील भव्य प्रांगणात चुण्याचा गोल घाना आणि घाण्याचं दगडी चाक दिसलं!त्याच्या पाठीमागे एका दगडाच्या गुहा रुपी अडोशाला संत रामदासांच्या पादुका होत्या!समोरच संत रामदासांचा रंगीत फोटो देखील दिसला!🌷

किल्ल्यावरून लांबवर सातारा शहर नजरेस पडतं!अशा या किल्ल्यावर निसर्गाने भरभरून वन्यसंपदा बहाल केली आहे!... प्राचीन दंतकथेनुसार श्रीराम आणि रावण युद्ध झालं होतं!त्याच्या आधी श्री लक्ष्मण आणि रावण पुत्र मेघनात(इंद्रजित)यांच्यात घनघोर युद्ध झाले!पण ढगांच्या आड लपून इंद्रजितनें लक्ष्मणावर अस्र टाकलं होतं!त्यात लक्ष्मण मुर्छीत झाले होतें!यामुळे श्रीराम व्यथित झाले होतें!रावण बंधू बिभीषण यांनी यावर उपाय शोधण्यासाठी धावपळ केली!तेव्हा कळले की याची 
वनऔषधी आरवली पर्वतावर आहे!

श्री हनुमान यांना आरवली
पर्वतराईत पाठविण्यात आले!वन औषधी कुठली हे श्रीहनुमान यांना कळले नसावे!त्यांनी अरवली पर्वताचा काही हिस्सा उचलून घेऊन गेले!त्या वन औषधीमुळे मुर्छित झालेले श्रीलक्ष्मण शुद्धीवर आले होतें!.. महत्वाचा भाग असा आहे की ज्यावेळेस श्रीहनुमान अरवली पर्वताचा वनौषधीयुक्त पर्वत तुकडा घेऊन लंकेसाठी उड्डाणं केलें होतें!जाता जाता त्यातील एक भला मोठा तुकडा श्री.जरंडेश्वर येथे पडला असावा!कारण अरवली पर्वत राईतीलचं वनऔषधी वनस्पती येथे आहेत!जरंडेश्वर किल्ल्यात आहेत असं प्रमाण सापडले आहे असं म्हणतात!.. हा प्राचीन संदर्भ अतिशय महत्वपूर्ण आहे 🌹

अशा रामायण कालीन संदर्भ असलेल्या किल्ल्यावर जाता आलं हे आमचं भाग्य आहे!किल्ला चढायला अवघड असला तरी संत रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेल्या अन छत्रपती शिवारायांच्या राज्यातील एक किल्ला पाहता आले हे आमचं भाग्य आहे!
🌷🌷🌷🌷🙏🌷🌷🌷🌷
****************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-११जून २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)