चारधाम यात्रेच्या वाटेवर (भाग -१४ समारोप भाग)

चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-१४समारोप भाग)
🌹🌹🙏🙏🌹🌹
******************

... नानाभाऊ माळी 

.....मे महिना सुरु होता!कडाक्याचा मे महिना सुरु होता!वैशाख संपला आणि जेष्ठ सुरु आहे तरीही वैशाख उन वनवा जमिनीला भाजतो आहे!जमीन भाजून निघते आहे!आश्चर्य म्हणजे भाजून निघणाऱ्या उन्हात झाडं हिरवीगार आहेत!चमत्कार आहे ना हा!!तसंच असतं आपलं जगणं!मनात कितीही चटके बसत असलें!कोणी दुःख पचवत असेल!.. चेहरा मात्र झाडांसारखा टवटवीत दिसतं असतो!आनंदी,हिरवागार दिसतं असतो!चेहऱ्यावरील हिरव्यागार आनंदात सुप्त झुंज लपलेली असतें!सगळं भोगून उभे रहाणे,भाजलेल्या जमिनीवरील हिरवगार झाड होणे यालाच जीवन म्हणू या का आपण?

.....झुंज वेगवेगळी असेलही,स्वरूप वेगळं असेलही!मानवी मन प्रत्येक झुंजीचां केंद्रबिंदू असतं!चढ-उतार येत असतात!जसं दुपारी चटका देणारं उन असेल तर संध्याकाळी मावळता सूर्य भाजलेल्या जमिनीसं दान म्हणून चंद्र देऊन जातो!अंधाऱ्या रात्रीची शीतलता देऊन जातो!तसंच मानवी मनाचं देखील आहे!मन भाजत असतं!चेहरा हसून उन झाकत असतो!दु:ख लपवत असतो!अशा दुःखावर अध्यात्मरुपी मलम गुणकारी असतं!मनाची झीज थांबविण्यासाठी देवरुपी औषधं गुणकारी असतं!आम्ही औषधाच्या शोधार्थ हिमालयात गेलो होतो!औषधं सहज मिळतं नसतं!वणवण होतं असतें!आम्ही चारधाम औषधाच्या शोधासाठी कष्ट घेत होतो!चार गुणकारी औषधं मोठया कष्टाने भेटली!आम्हाला आत्मिक शांतीचं देवरूपी औषधं भेटलं होतं!मोठया कष्टाने भेटलं होतं!... आमचं देवंदर्शन झालं होतं!चार धाम झालं होतं!मनाची तप्त शिळा शांत झाली होती!आम्हाला यमनोत्री,गंगोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ धमाचे दर्शन गणेशानें करवून दिलं होतं!तप्त मन शांत,शीतल झालं होतं!amchi🙏बस हरिद्वारच्या दिशेने पळत होती!
जन्माचं सार्थक होण्याचं पवित्र स्थळ हरिद्वार आलं होतं!🌷

....आम्ही दिनांक २९मे रोजी हरिद्वारला पोहचलो होतो!एका हॉटेलमध्ये मुक्काम होता!दुसऱ्या दिवशी.. अर्थात ३० तारखेला हरिद्वार "गंगा दसऱ्याचां" समारोप दिवस होता!!सलग दहा दिवस चालणाऱ्या गंगा दसऱ्याला हरिद्वार येथे असणं आमच्या भाग्यात होतं!पहाटे लवकर उठलो!गंगामातेच्या सर्वांनंद घाटावर जाऊन गंगामातेंच्या पवित्र कुशीत डुबकी लावली!कित्येक युगे वाहणाऱ्या गंगा मातेने देखील भरभरून आशीर्वाद दिला होता!दिवस भाग्याचां होता!वर्षांतून येणाऱ्या दसरा महोत्सवाचीं सांगता होती!गंगा मातेच्या घाटावर अलोट जनसागर आला होता!भक्तीच्या सागर पवित्र गंगेत न्हाऊन निघाला होता!हरीचं हरिद्वार दसरा सांगता समारोहात तल्लीन होतं!🌹

....हरिद्वारला देवांचं घर आहे!गंगा माता  अनेक घाटातून भक्तांना आपल्या पवित्र जलात डुबकी लावण्यासाठी बोलवीत असतें!भक्तीचा अलोट सागर हरिद्वारला आला होता!हर की पौडी येथील गंगा माता मंदिरात दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या डोळ्यात मावतं नव्हती!आम्ही अंघोळ करून  मंसा देवीच्या दर्शनाला गेलो!तेथेही अलोट गर्दी होती!खालून 'रोप वे' देखील होता!उंच डोंगरावर विराजमान असणाऱ्या मातेस पायथ्यावरून नतमस्तक होतं आशीर्वाद घेतला!🌹

....हरिद्वार गंगा मातेंच्या घाट घाटांचं शहर आहे!दर १२वर्षांनी येणाऱ्या कुंभ मेळ्याचं पवित्र स्थळ आहे!२०२१साली आयोजित केलेल्या विशाल कुंभमेळा आयोजित करणारं पवित्र स्थळ आहे!🌷

आम्ही शांतीकुंज येथील गायत्री मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!मन शांतीचं स्थळ शांतीकुंज येथे भारतीय प्राचीन संस्कृतीचं दर्शन घेतलं!मंदिर, मठ,धर्मशाळा,गंगा मातेचं विशाल रूप असलेलं "हरिद्वार".. मोठं रेल्वे स्टेशनंचं शहर देखील आहे!आम्ही मनोभावे हरिद्वार देवभूमीच दर्शन घेतलं!३०तारखेच्या पश्चिमेला जाणाऱ्या सूर्य देवाच्या साक्षीने संध्याकाळी ०५-२०वाजता रेल्वेत बसलो!चारधाम यात्रेचं पुण्य गाठीशी बांधून देवाभूमी शहर हरिद्वारचां निरोप घेतला!.. आम्ही हरिद्वारहून भुसावळला निघालो होतो!थकवा होता!मन तृप्तीने भरलं होतं!आसं अशी काही नव्हती!भक्तीच्या सागरातं चिंब भिजलो होतो!जीवन कृतकृत्य झालं होतं!माझ्यातला 'मी'गळून पडला होता!🌹

....आम्ही मनतृप्तीने परतीच्या प्रवासात होतो!शरीर सोबत होतं!मन चारधामातं तल्लीन होतं!शरीर रेल्वेत होतं!मन तृप्ती सागराच्या तटावर बसलं होतं!चार धाम यात्रेत यमनोत्री, गंगोत्री,केदारनाथ,बद्रीनाथ धाम शोधत होतो!लोभ,मोह गळून पडला होता!फक्त सत्संग आसं राहिली होती!चारधाम यात्रेसाठी आईचा आशीर्वाद घेऊन निघालो होतो!घरी हडपसरला आलो!आईचे आशीर्वाद घेतले!माझी आई देव जगलेली आहे!पुन्हा देवस्वरूप आईच्या पायांवर माथा ठेवला!🌷

अनुभवांच्या शिदोरीचां 
जगणं हा प्रवास आहे
भेटतं गेली भली माणसं
तृप्तीचा सहवास आहे!🌷

कोण ती भली माणसं
बोल त्यांचे हृदयी आहेतं
 प्रवास होईल एकट्याचा
आसं लावुनी जगताहेत!🌷

चारधाम प्रवास होता
हाती शिदोरी देऊन गेली
प्रवासातील तीचं माणसं
आपलीच होऊनि गेली!🌹

आज मीचं मागे गेलो
जाता जाता भरुनी गेलो
बोट धरुनी अनुभवांचा
जगण्याची पायरी झालो!🌷
🙏💐🙏💐🙏💐🙏
************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-०२जून २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)