चार धाम यात्रेच्या वाटेवर (भाग -०६)

चारधाम यात्रेच्या वाटेवर
       (भाग-०६)
🌹🌹🌹🌹🌹🌹
******************
... नानाभाऊ माळी 

.........मीचं माझा मलाच शोधतो आहे! निरर्थक मी,स्वार्थाची मोळी बांधतो आहे!स्वार्थ माझा धर्म होऊनि बसला होता!कोणीतरी माझ्या जाळ्यात येऊनी फसला होता!मी मीचं एकटा वाजत राहिलो होतो!कशात ही स्वार्थी मी,गाजत राहिलो होतो!कुठेतरी ठेचं मजला लागणार होती!एवढ्यावर ठेचं ती मग भागणार होती?स्वार्थाचां अर्थ मज नकार देत होता!मस्तवाल मीचं बेकार झालो होतो!कधीतरी 'ती' वेळ येणार असतें!डोळे उघडून देण्याची संधी देणारं असतें!स्वार्थ सारा सारा जाळून टाकला होता!सर्व सारं खोटं नाट माझं गाडून टाकलं होतं!अहो किती दिवसांचा प्रवासी आपण असतो?पळून थकून स्वार्थ कमवत मात्र असतो!एकटा धाम निवासी झाले बहुत आता!न होणे किडे मी गहूत आता!दिवस किती असतांत  जगण्याचे आपुले?साठ-सत्तरीतही खोटे वागण्याचे आपलें!मज तेथे शरण जाऊद्यातं आता!राहुनी गेले अधुरे करूद्याततं आता!मीचं माझा गळूद्यात आता!.......काल आम्ही एक "धाम" केलें होते!यमनोत्री धाम केलें होते!दर्शनानें 'मी' गळू लागला होता!अहंकार गळू लागला!उडणाऱ्या तीनक्या समान होऊ लागलो होतो!💐

मी नदीचं मुख पाहिले होते!नदीचां उगम पाहिला होता!परिक्रमा कष्टाची फळास आली होती!मी स्वतःस भाग्यशाली समजत होतो!जगणं माझं...माझं राहिलं नव्हतं!विशाल त्यांच दर्शन झालं तें झालं होतं!...मनाची अशांतात यमनोत्री धामानें शांत होतं होती!🌷

काल यमनोत्री धाम हृदयात ठेवून नतमस्तक होऊन पुढील प्रवासासाठी निघालो होतो!प्रवास असतो कठीण अन कष्टाचा!..आमची बस पुन्हा विशाल हिमालयाच्या कुशीत शिरली होती!पर्वतांच्या कुशीत शिरली होती!प्रचंड घनदाट पाईन हिमालयीन देवदार वृक्षांची उंची मोजत होती!नजर आपुली ती आभाळभर फिरत होती!वाकूनी शत नमस्कार, नतमस्तक होतं होती!झाडांच्या उंचीतून वय शोधित होती!दीडशे तें पाचशे वर्षं वय त्यांचे!देवदार ताट मानेने उभा होता!मी क्षणभगुरं गर्द झाडीत एक झालो होतो!बस आमुची वाट काढीत होती!सूर देवभूमीचे आतून वाढीत होती!देवदार हिमालय छातीत दिसला होता!हिमालय उंच उंच आतुनी हसला होता!आम्ही आमची उंची मोजीत होतो!कसा रें मानवा तू स्वतःचं ढोल वाजवीत होता? खुजा मी हिमालयांस पाहुनी वाकलो होतो!शतदा गर्द,किर्रर्र देवदार झाडीत झुकलो होतो!घाट- पोट पर्वतांतं आम्ही आम्हास शोधित होतो!.. बस आमुची उत्तरकाशीकडे पळत होती!श्री.विश्वनाथ भगवानकडे पळत होती!🌹

आम्ही निघालो त्या खरादी गावाहून १००किलोमीटर दूर,१००% घाटरस्ता होता!जीवघेण्या अरुंद रस्त्यावरून बस पळत होती!चढ आणि उतारांची सापशिडी खेळत होती!आम्ही निघालो तें ठिकाण यमनोत्री धामाचं होतं!आता डोळ्यात न मावणारा हिमालय पर्वतातून प्रवास सुरु होता!उत्तर काशीच्या श्री. विश्वनाथ दर्शनाची आसं लागली होती!आम्ही सकाळी ११.०० वाजता बसमध्ये बसलो होतो!१००किलोमीटर घाट रस्त्यावर आव्हानांची मेजवानी वाढून ठेवली होती!ताट भरलेला होता!नजर ताटावर होती!मन उतावीळ होतं!मन आतुर होतं!ताट भरलेलं होतं!घाट मुरलेला होता!तृष्णा जागवीत होता!तृष्णा मनाची होती!तनाचीही होती!मन आतुर झाले होते!रस्ता संपत नव्हता!विशाल
 अगम्य,प्राचीन तो हिमालय रस्ता परीक्षा घेत होता!वेडीवाकडी वळणे घेत पुढे नेत होता!नैसर्गिक विशालकाय तें मुक्त्तस्ते देत होता!ओढ श्री.विश्वानाथाची लागून राहिली होती!मृदू हृदयी पर्वत सारा हिमालय ठिसूळ होता!जागोजागी रस्त्यावर सांडलेला होता!कधी कुठे रस्त्यात
ढासळलेला होता!हिमालयधिश्वर खूप खूप ठिसूळ होता!🌹

हिमालयाच्या पोटात अनेक गावं दिसली होती!माणसांचं अस्तित्व होऊन तुरळक ती वसली होती!...शिखर माथ्यावरून बस चढतं चढत थकली होती!उताराच्या दिशेने मग हळूहळू झुकली होती!१००किलोमीटर अंतर कापित दणके खात वाकली होती!...कडेकडेने गावं दर्शन घेत बस मात्र थकली होती!संध्याकाळी ०५-००वाजता उत्तर काशीत आम्ही पोहचलो होतो!देव भूमीचा निसर्ग नजारा डोळ्यातून पीत होतो!भागीरथी काठी देव दर्शन घेत होतो!🌹


काल २२मे रोजी बडकोट,खरादीहून प्रवास सुरु झाला होता!१००किलोमीटर अंतर कापित उत्तर काशी या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचलो!समुद्रसपाटी ३५८३मिटर उंचीवर असलेलं हे ठिकाणी जाऊन श्री काशिविश्वनाथ मंदिरात पोहचलो!भागीरथी तटावर दर्शन घेत अंतरीची तृष्णा भागविली!येथे आदिशक्ती माता मंदिर,काली मंदिर, हनुमान मंदिर,गणेश मंदिराचं दर्शन घेतलं!येथे संस्कृत पाठशाला देखील आहे!येथेचं महाभारतातील पांडव कालीन लाक्ष्यगृह होतं!आता तेथेच लाक्ष्य मंदिर आहे!... अशा या उत्तर काशीला प्राचीन काळापासून महत्व आहे!..🌹

आत्मिक श्रद्धा दृढ विश्वासात परवर्तीत होतं राहिली!अनाकलनीय प्राचीनतेची साक्ष देत राहिली!नतमस्तक त्या प्राचीनतेला जे टिकून राहणार आहे!मी अंश या निर्मितीचा कधी निघूनी जाणार आहे!माझ्या भोवतालीचे कुंपण विरुनी जाणार आहे!.... रात्र होतं आली होती!निजूनी पुढे गंगोत्रीसं जाणार होतो!विशाल हिमालय कुशीत धाम पाहणार होतो!...🌹

आज मंगळवार दिनांक २३मे २०२३!.. ब्रम्हमुहूर्थावर पहाटे ०३-००वाजता उठलो!... स्नानादी आटोपून ०४-०० वाजता गंगोत्री
धामास निघालो आहोत!अजून एका उगमाकडे निघालो आहोत!.. उगम प्राचीनतेचा,त्यांवरं फुले वाहणार आहोत!शोध स्वतःचाच उगमाकडे जाणार आहोत!बस सोबत मनास मी शोधास अर्पित केलें आहे!खाली खोल नदी दरीतून वहात आहे!क्षणोक्षणी भयास डोळ्यात घेत आहे!सूर्यदर्शन होता आता नतमस्तक होतं आहे!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
(आता बसमधून गंगोत्री धाम प्रवासात)
मो.नं-९९२३०७६५००
       ७५८८२२९५४६
दिनांक-२३मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)