चारधाम यात्रेच्या वाटेवर (भाग-०७)

चारधाम यात्रेच्या वाटेवर
        (भाग-०७)

🌷🌷🌷🌷🌷🌷
*****************
... नानाभाऊ माळी 

माझ्यातील अहंम
मज सोडूनि चालला आहे!
नतमस्तक होत
ताठा मोडूनि चालला आहे!

मी यांचक देवा,
आज तूझ्या द्वारी आलो आहे !
माझ्यातील वाईट,
आता गळूनी मी भारी झालो !

गंगोत्री धाम!..हिमालयाच्या कुशीतील एक आश्चर्य आहे!घनदाट हिमालयीन देवदार वृक्षांच्या घनदाट जंगलातील चमत्कार आहे!मानवी मनाला ओढ असणारा सत्कार आहे!महान निसर्गाचा साक्षात्कार आहे!प्रवासात सगळंच अजब आहे! नाम रुपी भावास तीर्थ म्हणावे!तीर्थ ऊर्जा असतें!...जसं आपण तीर्थ शुद्ध भावनेने पीत असतो!तसंचं तीर्थधाम असतं!अशा तिर्थांची ओळख
धामरुपी सगुण,साकार मोक्ष मार्गाशी झाल्यावर जगणं-मरणं या फेऱ्याची मुक्तता होऊन जात असतें!

तीर्थ हा शब्द नेहमीच उच्चारला जात असतो!पावित्र्याचें थेंब थेंब गोळा करून शुद्ध मनाने प्राशन करीत असतो,त्याला तीर्थ म्हणावे का मग? तीर्थात मंगल भाव उतरलेले असतात!मंगल सूर एकरूप झालेले असतात!तीर्थ प्रासादिक असतं!सकारात्मक शुद्ध भावनेने तीर्थ घेतले जात असतं!सगुण नाम रुपी भावास तीर्थ म्हणावे!तीर्थ ऊर्जा असतें!...जसं आपण तीर्थ शुद्ध भावनेने पीत असतो!तसंचं तीर्थधाम असतं!अशा तिर्थांची ओळख
धामरुपी सगुण,साकार मोक्ष मार्गाशी झाल्यावर जगणं-मरणं फेऱ्याची मुक्तता होऊन जात असतें!काल दिनांक २३ मे २०२३ रोजी पहाटे ०४-००वाजता आम्ही बसने निघालो होतो!उत्तर काशीहून संकल्पसिद्धीसं निघालो होतो!त्या सिद्धीचं नावं होतं "गंगोत्री धाम"!गंगोत्री धाम तपोभूमीत आहे!राजा भागीरथाच्या तपस्थळी आहे!उत्तरकाशीहून,धराली,भैरोघा टी, हर्षिल तें नेलाँग बॉर्डर मार्गे प्रवास सुरु होता!मुळातच हा मार्ग एकेरी होता!🌷

उत्तरकाशी पासूनच अत्यंत
जीवघेणा घाटास सुरुवात झाली होती!माता गंगोत्रीचां प्रवास अत्यन्त कठीण आणि अंगाला थरकाप उडवाणारा होता!बस एका बाजूला पर्वताचा अवघड उभट कडा तर दुसऱ्या बाजूला डोकं गरगरायला लावणारी खोल दरी होती!आतापर्यंतच्या प्रवासातील हा प्रवास अत्यंत कठीण होता!बसचा ड्रायवर क्षणोक्षणी वळणावळणावर अतिशय कुशलतेने स्टीयरिंगवर ताबा ठेवून गाडी पळवत होता!रस्त्यावर अन बसवर संयमाने नियंत्रण ठेवून गाडी पळवतं होता!

धाम करणे सहज सोफ नसतं!हिमालय पर्वत रांगेततील अतिशय दुर्गम,घनदाट-घनघोर देवदार वृक्षाच्यां घाट माथ्यावरून डोळ्यातून प्राण आणून होणारा प्रवास हृदयाचे ठोके वाढवणारा होता!मानसाची खरंच कमाल आहे,हिमालय पर्वताच्या पोटात शिरून कित्येक शतक त्याला कोरून कोरून आपल्या सोयीनुसार 
आव्हानांत्मक गंगोत्री मातेच्या स्थानापर्यंत पोहचला असेल!त्या काळात कितीतरी प्रसंगानां तोंडं देत माता गंगेच्या चरणी माथा टेकला असेल!आता बस सुविधा आहे!सोयीनुसार बसमध्ये बसून धामाचं दर्शन होतं आहे!आकाशाशी स्पर्धा करणारे डोंगरं पाहून डोळे विसफारतात!डाव्या उजव्या दोन डोंगराच्या मधून खोल खोल दरीच्या तळातून कधीही नं थकणारी, प्रचंड वेगाने वाहणाऱ्या गंगा मातेचं रूप मनाला,हृदयाला स्फूर्ती देत असतं!आम्ही गंगा मातेच्या अवतरणस्थळी निघालो होतो!गंगा माता देवरूप आहे!🌹

गंगोत्री धाम!..हिमालयाच्या कुशीतील एक आश्चर्य आहे!घनदाट हिमालयीन देवदार वृक्षांच्या घनदाट जंगलातील चमत्कार आहे!मानवी मनाला ओढ असणारा सत्कार आहे!महान निसर्गाचा साक्षात्कार आहे!प्रवासात सगळंच अजब आहे! नाम रुपी भावास तीर्थ म्हणावे!तीर्थ ऊर्जा असतें!...जसं आपण तीर्थ शुद्ध भावनेने पीत असतो!तसंचं तीर्थधाम असतं!अशा तिर्थांची ओळख
धामरुपी सगुण,साकार मोक्ष मार्गाशी झाल्यावर जगणं मरणं फेऱ्याची मुक्तता होऊन जात असतें!

उत्तरकाशीहून प्रवास सुरु झाला होता!पर्वताच्या कडा ढासळणे!निखळणे!हे हिमालयातलं आव्हान आहे!मुळातचं येथील निसर्ग नियम आहे!स्वभाव आहे!स्वभाव विचित्र आहे!निसर्ग वात्रट आहे!कधीही लहान मुलासारखं खोडकरपणे उन,पाऊस,थंडी,बर्फ रूपात खोड्या करीत असतो!पण मानव घुसखोरीने तो आक्रमक आणि उग्ररूप धारण करतो आहे!अशा हिमालयातल्या सूर,गाण संगीतात आम्ही तल्लीन होण्यासाठी माता गंगोत्रीच्या कुशीत निघालो होतो!हिमालय पर्वतावरील, शिखरावरील वनराई जणू पर्वताचे सुंदर विंचरलेले केस आहेत!धीप्पाड पहिलवानच्या डोक्यावरील केस वाटतात!असं नयन मनोहारी रुपडं पाहात,श्रद्धेला उरी ठेवून माय गंगोत्रीच्या दर्शनाला आम्ही निघालो होतो!🌹

गंगोत्री धाम!..हिमालयाच्या कुशीतील एक आश्चर्य आहे!घनदाट हिमालयीन देवदार वृक्षांच्या,घनदाट जंगलातील चमत्कार आहे!मानवी मनाला ओढ असणारा सत्कार आहे!महान निसर्गाचा साक्षात्कार आहे!प्रवासात सगळंच अजब आहे!जगातील सर्वात उंच पूल गंगा मातेच्या खोल नदीवर बांधलेला दिसला!अरुंद चिंचोळी खोल खोल तळात वेगाने वाहणारी गंगा माता देखील आपल्या साध्याकडे निघाली होती!पुलावरून तिचं अजब,अजस्र रूप डोळ्यात भरतांना वाटत होतं या मातेस भगवान शंकराने आपल्या जटेवर कसं धारण केलें असेल!गंगा माता वाराणसीला,वाहतांना शांत, शितल वाटते!पण जेथून उगम होतो तेथे अतिशय आक्रमक,उग्ररूप धारण केलेलं असतं!अशा जगण्मयी मातेच्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो!गंगोत्री धाम दर्शनासाठी निघालो होतो!

आमची बस गंगा उगमाच्या दिशेने पळत होती!जाता जाता अवघड घाटात तिच्याच काठाने पळत होती!तिच्या अजस्र,भव्य दिव्य रूपाचं भावविभोर होऊन दर्शन घेत होतो!मातेला शत शत नमन करीत होतो! विशाल रूप डोळ्यातून हृदयात स्थापित करीत होतो!चढ उतार, घाट, अनेक जीवघेणे वळण पार करीत निसर्गाचा अविस्मरणीय अविष्कार पाहात!आम्ही भक्तीने गंगोत्रीला पोहचलो!काल सकाळी ४-३०वाजता सुरु झालेला प्रवास करून सकाळी ९-३० वाजता गंगोत्री धामास पोहचलो होतो!

प्राचीन काळी ज्या भागीरथ राजाने  पूर्वजांचपापक्षालनासाठी,२१पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी,पाप मुक्तीसाठी ज्या ठिकाणी कित्येक वर्षे  तप केलं होतं!तपस्या केली होती!देवी गंगा प्रसन्न होतं जालरूपात प्रकट झाली होती!तें ठिकाण म्हणजेच गंगोत्रीधाम आहे!स्वर्गातून पृथ्वीतलावर येतांना तिचा वेग कित्येक पटीने होता!गंगा सरळ पृथ्वी तलावर आली असती तर तिच्या अतिवेगाने प्रचंड हानी झाली असती!राजा भगीरथ महादेवास शरण जाऊन आराधना करीत गंगामातेस डोक्यावर,आपल्या जटात स्थान द्यावे अशी याचना केलें!भगवान महादेव प्रसन्न होतं स्वर्गातून अतिवेगाने कोसळणाऱ्या गंगेस आपल्या जटेत घेतले!अन भगवान शंकराच्या जटेतून पृथ्वी तलावर अवतरली त्या ठिकाणाला "गंगोत्री धाम" म्हणून पवित्र स्थळ नावारूपाला आले!जगातील हिंदू धर्मातील श्रद्धाळू येथे येऊन आपल्या मागील २१ पिढ्यांचा  उद्धार करण्यासाठी, स्वर्ग मार्गाचा प्रवास आणि मोक्ष प्राप्तीसाठी गंगाजल पूजा करतात!आम्ही देखील गंगोत्रीला जाऊन ब्राम्हणाकडून पूजा करून घेतली!पूर्वजांचा उद्धारासाठी पूजन केलें!मनात संकल्प करून मोक्ष प्राप्तीसाठी उद्धार केला!

गंगोत्री ठिकाणी भगीरथ राजाची समाधी असून,गणपती मंदिर, महादेव मंदिर आणि भैरवनाथ मंदिरात जावून श्रद्धापूर्वक पूजा केली!मनाची व्याकुळता गंगोत्रीधाम दर्शनानें,पवित्र स्नानाणे पूर्ण झाली होती!या भक्ती सोहळ्याची अतृप्तता दर्शनानें पूर्ण झाली होती!समाधान मनी बाळगून भक्तीआनंद हृदयात बांधून पुन्हा त्याचं विशाल घाट रस्त्यावरून माघारी उत्तर काशीला मुक्कामी पोहचलो!. कष्टातून तृप्तीचा आनंद ओसंडून वहात होता!या आनंद सोहळ्यासं पावसानें देखील हजेरी लावली होती!सोबतचं उंचचं उंच डोंगर दर्यातून गुंजन करणारे,जागोजागी कोसळणारे, फेसाळणारे झरे,धबधबे आनंद द्विगुणित करीत होता!रात्रभर पाऊस सूर लावीत होता!आमची भक्ती, आमची श्रद्धा फळाला आली होती!उद्याच्या गुप्तकाशी दर्शनासाठी रात्री तृप्तीने झोपी गेलो होतो!
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
       *******************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
(आता गुप्त काशीच्या प्रवासात आहोत)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२४ मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)