चारधाम यात्रेच्या वाटेवर(भाग-१३)
चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-१३)
🌷🌷🌷🌷🌷🌷
*******************
... नानाभाऊ माळी
शास्वत सत्य काय असतं बरं? शास्वतीचां आधार घेऊन माणूस पुढे मार्गक्रमण करीत असतो!शास्वती देणारा उभारी देत असतो!कालावधीचीं मोहमयी सवलत देत असतो!मग मोहमयी सवलतीच्या उजेडात मार्ग शोधण्याचं काम सुरु राहात!आपलं जगणं हे आश्वासित असतं!जगण्यासाठी मिळालेली संधी असतें!अशा संधीचा लाभ घेत माणूस जगत असतो!त्यात कर्म-धर्म सांभाळून आदर्श जीवन आचारसंहितेचा काटेकोरपणे पालन करीत असतो!कर्म पोट अन जगण्याची उमेद देत असतो!धर्म आत्मिक,आंतरिक तृष्णा शांत करीत मानसिक तंदुरुस्तीचं माध्यम म्हणून अमृतऔषधी असतं!हेचं औषध जीवन घडविण्यासाठी गुणकारी असतं!🌷
... आम्ही गुणकारी औषधीच्या शोधासाठी निघालो होतो!औषधी दुर्मिळ होती!कष्ट होतं!शारीरिक आणि मानसिक कुवतीची अत्यंत कठीण परीक्षा होती!अमृतऔषध आमचां श्वास होऊन बसला होता!तो श्वास साक्षात ईश्वर होता!आम्ही ईश्वर चरणाचें याचक होतो!याचकास कष्टाने ईश्वर दर्शन झालं होतं!चारधाम यात्रा पार पडली होती!यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथधाम दर्शन झालं होतं!आम्ही भाग्यशाली होतो!साक्षात यमुना माता,गंगा माता मंदाकिनी माता आणि अलकनंदा मातेच्या उगमा ठिकाणी जाता आलं होतं!कैलास आणि वैकुंठ अंतःकरणात बसवलं होतं!.... कमलाहास्य हृदयात घेऊन आमचा प्रवास सुरु होता!आमची बस दिनांक २९मे रोजी तपोभूमी ऋषिकेशला पोहचली होती!🌹
ऋषिकेश...श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांच्या वास्तव्याने पुणीत झालेली भूमी आहे!साधू मुनींची तपोभूमी आहे!गंगामातेचं विशाल पात्र या ठिकाणी नजरेतं भरत होतं!ऋषिकेशमध्ये बंधूभक्त भरत यांनी तपस्या केली होती!येथेच राम झुला आणि लक्ष्मण झुला आहे!श्रीरामास गंगा नदी पार करायची होती!अनुज लक्ष्मनांनें आपली देवंशक्ती,रामभक्ती आणि योगशक्तीद्वारा बाण मारून पूल बांधला होता!झुला बांधला होता!त्या पुलाचं नावं लक्ष्मण झुला म्हणून परिचित आहे!त्या नंतर त्याचं ठीकानी साधू-मुनीनीं लाकडी पूल बांधला होता!... अलीकडच्यां काळात इंगराजांनी त्याच ठिकाणी पूल बांधला होता!आता पुन्हा नवीन पूल बांधकाम सुरु आहे!प्राचीन आध्यत्मिक वारसा लाभलेंल्या ऋषिकेशला श्री.लक्ष्मणाचं भारतातील स्वतंत्र पहिले मंदिर आहे असं मानतात!मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!💐
भारतीय प्राचीन संस्कृतीचां वारसा चालवणाऱ्या अन आधुनिकतेंचां अंगीकार केलेल्या ऋषिकेशला महादेव मंदिरात गेलो होतो!सच्चा अखिलेश्वर महादेवशिवलिंग सव्वा अकरा फूट उंचीचें असून अखंड एकाच दगडात असलेलं भारतातील एकमेव शिवलिंग आहे!!मनोभावे दर्शन पूजा केली!भारतीय आदर्श संस्कृतीचीं देणगी ऋषी मुनींनी दिलेली आहे!अशा तपोभूमीचं दर्शन घेतलं!मध्येचं वादळ वाऱ्याने हजेरी लावली होती!गंगामातेच्या तटावर वसलेल्या ऋषिकेशला नमन करीत आम्ही हरिद्वारला निघालो!🌷
आम्ही हिमालयाच्या कुशीत गेलो होतो!कित्येक फूट उंचीवर गेलो होतो!चार धामाची पूर्णतः भरलेली पुण्यघागर घेऊन आम्ही हिमालय पर्वत उतरत होतो!खाली खाली येत होतो!ऋषिकेशपर्यंत आलो होतो!ऋषिकेशहून माघारी निघालो तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी होतो!आम्ही चारधामाची पुण्यघागर घेऊन हरिद्वारला प्रयाण केलं होतं!हरिद्वारला आम्ही १९ मे रोजी संध्याकाळी गंगा आरती केली तेव्हा त्या दिवशी अमावस्या होती!त्या दिवसापासून सुरु झालेला गंगा
दशहरा ३०तारखेपर्यंत सुरु होता!गंगा दशहराचा समारोपचा दिवस होता!आम्ही हरिद्वारला मुक्कामी पोहचणार होतो!दुसऱ्या दिवशी ३० तारखेला गंगा मातेतं डुबकी लावणार होतो!🌷
🌹🌹🌹🌷🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
(हरिद्वार तें भुसावळ रेल्वे प्रवासात)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-३१ मे २०२३
Comments
Post a Comment