चारधाम यात्रेच्या वाटेवर (भाग -१२)
चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-१२)
🌷🙏🌷🙏🌷
****************
... नानाभाऊ माळी
माझ्या विशालतेचां
स्वतः गुलाम झालो
मी गर्वाद्वारी गेलो....
जमीन खाली आलो
वागलो फुगूनी छाती
नव्हता कुणी वाली
अभिमान आला खाली
माझी ऐशी दैना झाली
मी मलाच शोधीत होतो
पत्ता मला मिळेना.....
मज जगणं ही कळेना
मी सत्याकडे वळेना
मी हिमालय चरणाला
वाकूनी शरण गेलो
मी गौरीकुंडात न्हालो
सारा गर्व सोडूनी आलो
खरंच आपला पत्ता आपण शोधीत आहोत का?जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःचां पत्ता शोधित आहे!बुद्धीचं प्रचंड मोठं भांडवल घेऊन ओळखीसाठी धडपडतो आहोतं!मार्ग भिन्न असू द्यातं पण भांडतो आहोतं!लढतो आहोतं!प्रत्येक व्यक्ती अस्तित्वाची ओळख घेऊन निघाला आहे!तरीही स्वतःची ओळख पटवून देऊ शकलेला नाहीयें!स्वतःच्या शोधात ओळख हरवून बसलेला आहे!चेहरा हरवून बसलेला आहे!मनाला शांती नाही!सुख नाही!सुखाच्या शोधातून स्वर्ग सापडला नाही!जन्माला येऊन मरणारा जीव आहोत आपण!नंतर मातीत एकजीव होणारे जीव आहोत!जन्मापासून आपल्या अस्तित्वाची ओळख पटवीत संपूर्ण हयात घालवीत आहोत आपण!अस्तित्व आणि ओळख पटविता पटविता अख्खी हयात निघून जाते!ज्या मातीनें आई होऊन आईला जन्म दिला!आईने जन्म दिल्यावर पुढे आपल्या अस्तित्वाच्या लढाईत गुंग होऊन जातो!कुठला प्राणी चिरंजीवी आहे सांगा बरं?मनुष्य प्राणी तरी आहे का?पर्वत आहेत!सागर आहेत!सूर्य आणि चंद्र आहेत!आम्ही हिमालयातील पर्वतराईत गेलो होतो!पदोपदी जाणीव होतं होती!आपण काही वर्षांनंतर जाणार आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली झाली होती!अस्तित्वाच्या शोधातील शून्यमूल्य असलेलं असलेला मनुष्य प्राणी आहोत आपण!🌷
.......आम्ही सोमवार दिनांक २९ मे रोजी सकाळी उत्तराखंडमधील चार धाम पैकी एक धाम श्री विशाल बद्रीनाथ भगवानचं दर्शन घेतलं होतं!मन शांत झालं होतं!स्वतःला भाग्यशाली समजत होतो!नंतर खाली येऊन अलकंनंदा नदी घाटावर मांगलीक पूजा (सौभाग्य लक्ष्मी) झाली!अखंड सौभाग्यवतीसाठी ही पूजा होती!.. त्या नंतर तेथेच दुसऱ्या घाटावर जाऊन "पिंड दान".. विधी पार पडला!पितरांना घरातील मयत झालेल्या सर्व पितरांसाठी हा विधी केला होता!
हृदयात आंतरिक समाधान घेऊन!चार धाम दर्शन आनंदाने पार पडली होती!कठीण रस्ता,खोल दरी,कडक थंडीचं आवरण सर्व काही सहन करीत चार धाम दर्शन झालं होतं!आत्मिक तृप्तीची व्याप्ती वाढली होती!कमळानंद हृदयात फुलला होता!विशाल हिमालयासमोर शूद्र मनुष्य आनंदानें सद्गदीत झाला होता
चारधाम यात्रेचं सुख हृदयात बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो!आयुष्यचंदन माथी लावून निघालो होतो!धामअंतरीचा अवघड घाट चढून पुन्हा उतरून माथा टेकून आम्ही बसमध्ये बसलो होतो!विष्णू नारायणास,भगवान बद्रीनाथासं मनोमनी मनंचक्षुतं पूजत राहिलो!पुढे तीन किलोमीटर "मानागावं" ला जाणार होतो!पण शक्य झालं नाही!तेथे स्वर्गाचा रस्ता आणि तप साधनेसाठी गुहा आहे असं म्हणतात!माना गावापासून १६ किलोमीटरवर चीनचीं सीमा आहे!
आमची बस बद्रीनाथधाम हिमालयीन पर्वताच्या पोटात घुसून घाटघाटाच्या चढ-उतारं खेळात दंग होती!एक बाजू दरीचीं तर दुसरी बाजू पर्वताची होती!वन डे क्रिकेट खेळावं तशी गाडी पळत होती!चाकं पळत होती!खाली येताना विष्णू प्रयाग लागलं!अलकनंदा आणि धवलीगंगा नदीच्या संगमावर असलेलं विष्णू प्रयाग आहे!दोन्ही नद्या एकजीव होऊन वहात होत्या!वाहात राहण्याचा आदर्श ठेवीत होत्या!पुढे जोशीमठ आलं!बर्फ काळात बद्रीनाथ भगवान यांची पालखी खाली जोशी मठात असतें!🌹
आमची बस सकाळी ११वाजता बद्रीनाथधाम येथून निघाली होती!घाट रस्त्याचं ७७ किलोमीटर अंतर पार केल्यावर संध्याकाळी ०५-००वाजता पिंपळकोठी येथे हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलो होतो!
२९तारखेच्या सकाळी ०७-०० वाजता पुन्हा प्रवास सुरु झाला होता!प्रवास जीवनाचा भाग असतो!प्रवास घडतं असतो!कोणीतरी प्रवास घडवत असतो!आम्ही भक्तीचे प्रवासी प्रवास करीत होतो!प्रवास घटनांचा आलेख असतो!अनुभवांचा खजिना असतो!त्यातील चांगलं तें घेत प्रवास सुरु असतो!आमचा प्रवास सुरु झाला होता!श्रद्धेला हृदयात घेऊन आमचा प्रवास सुरु होता!घाट घाटातून आव्हानाला तोंडं देत आम्ही रुद्रप्रयागला येऊन पोहचलो होतो!पर्वताच्या कुशीतील एकेक गावं उंच झाडांच्या आड आपलं सुंदर रुपडं दाखवून नजरेत भरत होती!आश्चर्य म्हणजे डोंगर उतारावर असलेली ही गावं शेतीविना रीती होती!उंच पर्वताशी नाते जोडीत उभी होती!भुस्खलंनंचं भयावह आव्हान घेऊन उभी होती!गावं टूमदार होती!गावागावांना वळसा घालत पर्वताच्या कुशीत वळणदार वळणे घेत आमची बस पळत होती!पुढे देवप्रयाग आलं होतं!अलकंनंदा आणि भागीरथी नदीच्या संगमावर वसलेल्या देवप्रयागमध्ये प्रत्यक्षात प्रभुरामचंद्र तपाराधनेला आले होतें अशी अख्यायिका आहे!आम्ही तपोभूमी ऋषकेशच्या दिशेने निघालो होतो!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
(हरिद्वारहून रेल्वे प्रवासात आहोत)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-३० मे २०२३
Comments
Post a Comment