चारधाम यात्रेच्या वाटेवर (भाग-१०)
चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-१०)
🌷🙏🌹🙏🌷🙏🌹
*********************
... नानाभाऊ माळी
....भक्तीची शक्ती किती असावी बरं? श्रद्धेच्या ताटात विश्वास,आत्मिक ओढ,जिद्द अन निष्ठा वाढलीं असेल तर त्या भक्तीचीं चव महाभोजनाहून स्वादिष्ट असतें!भक्ती गोड असतें!पेढ्याहून गोड असतें!भक्त एकजीव अन एकचित्त होऊन जात असतो!भक्तीची महिमा अपार असतें!आपण ज्याची भक्ती करीत असतो 'तो' तरी कसा असेल बरं?उदारदाता!भोळेपणाने सर्व काही देणारा!कृपादृष्टी ठेवणारा!वरदहस्त असणारा!त्रीनेत्रधारी!नीलकंठधारी!स्मशानवाशी!त्रिशूलधारी!जटाधारी!महादेव!शंकर!डमरूधारी!बंम बंम भोले!भगवान केदारनाथ!...किती दूर!किती उंचावर भगवान निवासाला आहेत? रुद्रप्रयागपासून जवळपास १३०किलोमीटर लांबवर असलेलं धाम!मंदाकिनी नदीच्या उगमास्थानी असलेलं श्रद्धास्थान!हिमालयाचीं शुभ्र बर्फाची चादर पांघरलेलें भगवान केदारनाथ आहेत!🌷
दिनांक २६ तारखेच्यां ब्रम्हपहाटे ०२-३०वाजता आमचा मुक्काम जिथे गौरीकुंडलां होता तिथे गौरीमाता मंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केली!पाणी खुपचं गरम होतं!अंघोळ करून प्रवासाचा थकवा निघून गेला होता!शेजारीच नदी वहात होती!खळखळून वहात होती!उंच वनराई पर्वत रांगेचं गौरीकुंड गाव पहाटे विजेंच्या प्रकाशात उजळून निघालं होतं!पहाटे अंघोळ करून भराभर तयारी करीत घोडे बुक करण्याच्या रांगेत उभे होतो!बरोबर पहाटे ०४-०० वाजता घोड्यावर बसलो!घोडे भगवान केदारनाथ धामाकडे चालतं होती!आम्ही चालतं जाणार होतो पण आमच्या योगेश ट्रॅव्हल्स च्या व्यस्त कार्यक्रमामुळे शक्य झालं नाही!🌹
गौरीकुंड तें केदारनाथ धाम साधारण २३-२४किलोमीटर आहे!जायला हेलिकॉप्टर सेवा घोडे,भक्तीची शक्ती किती असावी बरं? श्रद्धेच्या ताटात विश्वास,आत्मिक ओढ,जिद्द अन निष्ठा वाढलीं असेल तर त्या भक्तीचीं चव महाभोजनाहून स्वादिष्ट असतें!भक्ती गोड असतें!पेढ्याहून गोड असतें!भक्त एकजीव अन एकचित्त होऊन जात असतो!भक्तीची महिमा अपार असतें!आपण ज्याची भक्ती करीत असतो 'तो' तरी कसा असेल बरं?उदारदाता!भोळेपणाने सर्व काही देणारा!कृपादृष्टी ठेवणारा!वरदहस्त असणारा!त्रीनेत्रधारी!नीलकंठधारी!स्मशानवाशी!त्रिशूलधारी!जटाधारी!महादेव!शंकर!डमरूधारी!बंम बंम भोले!भगवान केदारनाथ!...किती दूर!किती उंचावर भगवान निवासाला आहेत? रुद्रप्रयागपासून जवळपास १३०किलोमीटर लांबवर असलेलं धाम!मंदाकिनी नदीच्या उगमास्थानी असलेलं श्रद्धास्थान!हिमालयाचीं शुभ्र बर्फाची चादर पांघरलेलें भगवान केदारनाथ आहे!🌹
केदारनाथधाम गौरीकुंड गावापासून जवळपास २३तें २४ किलोमीटर लांब अंतरावर आहे!जाण्यासाठी दगडी पायऱ्या,सिमेंटच्या पायऱ्या आहेत!
यमनोत्रीधाम मार्गापेक्षा प्रशस्त आहेत!पायरी रस्ता बरा आहे!केदारनाथलां जाण्यासाठी हेलिकॉप्टर,पालखी,घोडे,पिटू आणि चालत जाणे हे पर्याय निवडू शकतो!हेलिकॉप्टर गुप्तकाशीवरून उड्डाण करतं!केदारनाथलां जाण्यासाठी ०९-१०मिनिटे लागतात!घोडा
गौरीकुंडपासून निघतो!घोड्याला ४-३०लागतात,पालखीला ०८तास लागतात!पिटू(कंडी) आणि चालतं जाणाऱ्यांनां १० तास लागतात!आम्ही ०४-००वाजता घोड्यावर बसून निघालो होतो!काळा कुट्ट अंधार होता!अंगावर एक थर्मल वेअर,त्यावर स्वेटर होतं!डोक्यावर गरम टोपी होती!पायात जाडजुड बूटं होती!थंडी परीक्षा घेत होती!
खोल दरी,उभट कडा काहीही दिसतं नव्हतं!आमचा घोडा चढ उतार पार करीत पायऱ्या चढत होता!🌷
हळूहळू दिवसाला जाग येत होती!उजेड अंधाराला मागे ढकलीत होता!उजेडातं घोड्यावरून एक एक पायरीं मागे जातांना सृष्टी सौंदर्यानें दर्शन द्यायला सुरुवात केली होती!आमच्या डोळ्यांची दुर्बीन उघडून निसर्ग सौंदर्याचा अजब नजारा टिपण्यात दंग झाली होती!असं सौंदर्य असा नजारा कधीही पाहण्यात आलां नव्हता!इंग्रजी व्ही V आकाराच्या खोल दरींतून मंदाकिनी नदी वहात होती!🌹
केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी येणारे श्रद्धाळू अधीर झाले होते!गर्दीचा अलोट महापूर जात येत होता!उत्तराखंडच्यां विशाल सृष्टीत देवं निवासाला आलें होतें!हिमालय भक्तीची शक्ती किती असावी बरं? श्रद्धेच्या ताटात विश्वास,आत्मिक ओढ,जिद्द अन निष्ठा वाढलीं असेल तर त्या भक्तीचीं चव महाभोजनाहून स्वादिष्ट असतें!भक्ती गोड असतें!पेढ्याहून गोड असतें!भक्त एकजीव अन एकचित्त होऊन जात असतो!भक्तीची महिमा अपार असतें!आपण ज्याची भक्ती करीत असतो 'तो' तरी कसा असेल बरं?उदारदाता!भोळेपणाने सर्व काही देणारा!कृपादृष्टी ठेवणारा!वरदहस्त असणारा!त्रीनेत्रधारी!नीलकंठधारी!स्मशानवाशी!त्रिशूलधारी!जटाधारी!महादेव!शंकर!डमरूधारी!बंम बंम भोले!भगवान केदारनाथ!...किती दूर!किती उंचावर भगवान निवासाला आहेत? रुद्रप्रयागपासून जवळपास १३०किलोमीटर लांबवर असलेलं धाम!मंदाकिनी नदीच्या उगमास्थानी असलेलं श्रद्धास्थान!हिमालयाचीं शुभ्र बर्फाची चादर पांघरलेलें भगवान केदारनाथ आहेत!🌷
उत्तराखंडच्यां सृष्टीत देवं निवासाला आलें होतें!हिमालयाच्या उंच शिखरावर बर्फ जन्म घेत होता!बर्फ वितळून नद्या जन्म घेत होत्या!मानव बुद्धीच्या पलीकडे हे सारं सारं घडतं होतं!घडतं आहे!..आमचा घोडा पळत होता येणाऱ्या जाणाऱ्या श्रद्धाळूच्यां अंगाला घासून वर चढत होता!श्रद्धेचीं अलोट गर्दी भक्तीच्यां ओढीने व्याकुळ झाली होती!भगवान केदारनाथाच्या भावाभोळ्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी अतिशय व्याकुळ झाली होती!गाभाऱ्यातल्या देवरुप दर्शनासाठी जीव कासावीस झाला होता!🌹
पायी चालणारे भक्त चढ-उतारांच्या एक एक पायरीवरून पुढे चालतं होती!थंडीत घाम गाळत,दम लागतं काही क्षणांच्या विश्रांती नंतर पुन्हा केदारनाथ बाबाच्या ओढीने पुन्हा पुढे चालतं होती!ईश्वराच्या अतीव ओढी पुढे कष्ट नगण्य होतं!मनात,हृदयात, अंतःकरणात केदारनाथ बाबाचा जप चालू होता!व्याकुळता विरह घेऊन श्रद्धाद्वारी निघाली होती!श्रद्धा मंगल होती!पायी चालणारे,घोड्यावरून जाणारे,पालखीवर जाणारे सर्व
लख्ख प्रकाश पडला होता!दुरून पर्वत शिखरावरील शुभ्र बर्फ
सूर्यप्रकाशात चांदी सारखा चमकत होता!वरून खाली घरंगळून येणारें अनंत धबधबे दिसतं होते खाली घरंगळून येणारा(लँडस्लाईड सारखा)बर्फ देखील खाली आलेला दिसत होता!कुडकूडणाऱ्या थंडीत अनंत पायऱ्या पुढेपुढे सरकत होत्या!भेटीची ओढ वाढवीत होत्या!माणसांचा भिन्न प्रवाह या घाट माथ्याच्या पायरीवरून खालीवर होतांना दिसतं होता!गर्दी वाढत होती!आतुरता वाढली होती!नजर केदारनाथ धामाला लागली होती!आराध्यासं डोळे भरून पाहायचं होतं!🌹
सकाळचे ०८-३०वाजले होते!२२किलोमीटर अंतर पार करून
घोडाअड्डा आला होता!समुद्र सपाटी पासून ३५८१मिटर उंचावर थंडीचा कडाका अंगावर घेत अजून दोन किलोमीटर अंतरावरील देवादी देव महादेवासं!केदारनाथ भगवानाकडे पायी चालत निघालो होतो!आत्मा परमात्म्याकडे ओढला जात होता!जाता जाता हेलिकॉप्टरचं हेलिपॅड दिसलें!दर एक मिनिटाला हेलिकॉप्टर उडत होतं,येत होतं!श्रद्धा अनमोल असतें!देवं भक्तीचा भुकेला असतो!भक्तवत्सल भगवान केदारनाथाच्या दर्शनासाठी हजारो श्रद्धाळू डोळ्यात प्राण आणून, रांगेतून मंदिराकडे चालला होता!हेलिपॅडला लागून नोंदणीसाठी एक किलोमीटरचीं रांग होती!त्या नंतर पुन्हा दर्शन रांग होती!ती देखील दोन किलोमीटरचीं होती!भगवान केदारनाथ अतिशय परीक्षा घेत होता!
.. अन रांगेतून मंदिर गर्भगृहात पोचल्यावर प्रत्यक्षात साक्षात केदारनाथ भगवानचं दर्शन झालं!आत्मा परमात्म्यास जाऊन भेटला होता!तो आनंद कसा वर्णन करू?? जीव जीवात विलीन झाला होता!समुद्र सपाटीपासून ११७८२फूट उंचावर असलेल्या अन मंदाकिनी नदी उगमस्थांनी असलेल्या!स्वयंभु ज्योतिर्लिंग असलेल्या अन १२ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या अतिशय अवघड ठिकाणी असलेल्या धामाचं दर्शन झालं!महाभारताच्या संग्रामानंतर प्रायश्चित घेण्यासाठी पांडवानीं द्वापारं युगातील प्राचीन मंदिर बांधले आहे अशी अख्यायिका आहे!
आदिशंकराचार्यानीं या मंदिराचां जीर्णोद्धार केला होता!मंदिरा पाठीमागेचं आदि शंक्रचार्ययांचा पुतळा आहे!६६फूट उंच असलेलं,दगडातं बांधकाम केलेलं मंदिर अतिशय सुरेख अन प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना आहे!सन २०१३सालच्या ढगफुटीत खूप मोठं नुकसान झालं होतं!त्यात एक प्रचंड मोठी दगडी शिळा मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबली होती!मंदिराला कुठलंही नुकसान झालं नव्हती!हे पण एक आश्चर्य आहे!येथे सहा महीने बर्फ पडतं असल्याने बंद असतं!बर्फ कालावधीत भगवान केदारनाथांची पालखी खाली उखी मठात असतें!..अक्षयतृतीयेच्या दिवशी धार्मिक पूजा अर्चा होऊन पालखीतून केदारनाथ भगवान पुन्हा वरती मंदिरात विराजमान होतात!
केदारनाथ भगवानचं दर्शन झालं होतं!कष्ट पडलं होतं !कष्टातून देवदर्शन झालं होतं!मनाची तृष्णा शांत झाली होती!परतीच्या प्रवासात पावसानें हजेरी लावली होती!पुढे बद्रीनाथ धामाकडे निघणार होतो!..
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
(आता बद्रीनाथधाम दर्शनाला आहोत)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२८मे २०२३
Comments
Post a Comment