चार धाम यात्रेच्या वाटेवर (भाग-०९)
चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-०९)
🌷🌷🌷🌷🌷🌷
**********†********
... नानाभाऊ माळी
आज ब्रम्हपुर्व सकाळ आहे!रात्रीचे ०२-००वाजलेले आहेत!केदारनाथ भगवान दर्शनाला निघालो आहोत!थंडी प्रचंड आहे!....काल २५ मे २०२३ तारखेच्यां पूर्वरात्रीसं ०१-३० वाजता आमचा गुप्तकाशीवरून प्रवास सुरु झाला होता!केदारनाथ मार्गाच्या दिशेने बस निघाली होती!पावसाची रीपरीप सुरु होती!थंडीचीं दुलई देखील पावसाला साथ देत होती!बस मागून बस, छोटी मोठी वहानें ओळीने जात येत होती!अंधाऱ्या रात्रीत पावसाच्या संगीतावर प्रवास सुरु होता!ट्रॅफिक जॅममुळे वाहने इंचइंच पुढे सरकत होती!रात्री ०१-३०वाजता प्रवास सुरु झाला होता!सकाळी ०७-००वाजले तरी सोनप्रयाग दृष्टीस पडतं नव्हतं!बस इंच इंच पुढे सरकत होती!आम्ही सर्वजन झोपेच्या अधीन होतो!कधी कंटाळून,अवघडल्या सारखे बसून बसून पाय!प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे कोणी काहीही करू शकत नव्हतं!अवघे ३५ते ४०किलोमीटर अंतर पार करायला सकाळचें ०७-३०वाजले होते तरी सोनप्रयाग दृष्टीस पडतं नव्हतं!सोनप्रयागहून पुढे सीता..
गौरीकुंडलां जाणार होतो!तेथून पुढे केदारनाथ धाम १८किलोमीटर दूर होतं!गौरीकुंड तें केदारनाथ प्रवास अजून करायचा होता!
पर्वताच्या उंच शिखरावर ढग तरंगत होते!पर्वताच्या मुकुटावर जलाभिषेक होतं होता!आम्ही असाह्य होतो!गौरी शंकरासं आराधना करीत होतो!लक्ख उजेड पडला होता!गाड्या इंच इंच पुढे सरकत होत्या!दोन्ही बाजूनी गाड्यांची दुहेरी रांग होती!ट्रॅफिक जॅमलां भगवान भोलेनाथ ही काही करू शकत नव्हता!मनुष्य पराधीन आहे!स्वप्न पाहात जीवनाचा प्रवास सुरु असतो!थंडगार पाणी उंच पर्वताचीं अंघोळ करीत खाली घरंगळत होतं!उभे कडे विक्राळ रूप धारण करून आ वासून उभे होते!खाली वाकून पाहात होते!झाडं उभट कड्यातं मूळ्या घुसवून माकडासारखी अधांतरी लटकली होती!रस्त्याच्याकडेने ट्रॅफिक जॅममुळे वाहने डिझेलचा नकोसा धूर सोडतं होती!काही ठिकाणी बॉटलंनेक वळणामुळे येणारी जाणारी वहान ठप्प झाली होती!गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या!शेवटी सोनप्रयागच्या अलीकडे तीन तें चार किलोमीटरवर आम्ही गाडीतून खाली उतरलो!पुढे जाऊन पाहिलं तर चक्रावून गेलो होतो!🌹
...सोनप्रयाग पासून गौरीकुंडलां जाण्यासाठी लोकांची सहा किलोमीटरचीं भली मोठी रांग होती!गौरीकुंडला मोठी वाहनं जात नाहीत!फक्त लहान जिभगाड्या जात असतात!रस्ता लहान,उभट,अवघड असल्याने येथील सरकारने ठरवून दिलेल्या जीभ गाड्यांनांचं परवानगी दिलेली आहे!सहा किलोमीटरचीं रांग पार करूनं मोठया त्रासाने आमचा नंबर आला होता!रात्री ०१-३०लां २५ मे २०२३च्यां पूर्वरात्रीसं ०१-३० वाजता आमचा गुप्तकाशीवरून प्रवास सुरु झाला होता!केदारनाथ मार्गाच्या दिशेने बस निघाली होती!पावसाची रीपरीप सुरु होती!थंडीचीं दुलई देखील पावसाला साथ देत होती!बस मागून बस,छोटी मोठी वहानें ओळीने जात येत होती!अंधाऱ्या रात्रीत पावसाच्या संगीतावर प्रवास सुरु होता!ट्रॅफिक जॅममुळे वाहने इंचइंच पुढे सरकत होती!रात्री ०१-३०वाजता प्रवास सुरु झाला होता!सकाळी ११-००वाजले तरी सोनप्रयाग दृष्टीस पडतं नव्हतं!बस इंच इंच पुढे सरकत होती!आम्ही बसमध्ये बसूनच झोपेच्या अधीन झालो होतो!कधी कंटाळून, सारखे बसून बसून पाय अवघडले होते!प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे कोणी काहीही करू शकत नव्हतं!अवघे ३५ते ४०किलोमीटर अंतर पार करायला १२तास गेले होते!सकाळचें १२-००वाजले होते तरी सोनप्रयाग दृष्टीस पडतं नव्हतं!सोनप्रयागहून पुढे सीता पार्किंग गौरीकुंडलां जाणार होतो!तेथून पुढे केदारनाथ धाम १८किलोमीटर दूर होतं!गौरीकुंड तें केदारनाथ प्रवास अजून करायचा होता!🌹
पर्वताच्या उंच शिखरावर ढग तरंगत होते!पर्वताच्या मुकुटावर जलाभिषेक होतं होता!आम्ही असाह्य होतो!गौरी शंकरासं आराधना करीत होतो!लक्ख उजेड पडला होता!गाड्या इंच इंच पुढे सरकत होत्या!दोन्ही बाजूनी गाड्यांची दुहेरी रांग होती!ट्रॅफिक जॅमलां भगवान भोलेनाथ ही काही करू शकत नव्हता!मनुष्य पराधीन आहे!स्वप्न पाहात जीवनाचा प्रवास सुरु असतो!थंडगार पाणी उंच पर्वताचीं अंघोळ करीत खाली घरंगळत होतं!उभे कडे विक्राळ रूप धारण करून उभे होते!खाली वाकून पाहात होते!झाडं उभट कड्यातं मूळ्या घुसवून माकडासारखी अधांतरी लटकली होती!रस्त्याच्याकडेने ट्रॅफिक जॅममुळे वाहने डिझेलचा नकोसा धूर सोडतं होती!काही ठिकाणी बॉटलंनेक वळणामुळे येणारी जाणारी वहान ठप्प झाली होती!गाड्या पुढे सरकत नव्हत्या!शेवटी सोनप्रयागच्या अलीकडे तीन तें चार किलोमीटरवर आम्ही गाडीतून खाली उतरलो!अन पुढे जाऊन पाहिलं तर चक्रावून गेलो होतो!🌹
.....सोनप्रयाग पासून गौरीकुंडलां जाण्यासाठी लोकांची चार किलोमीटरचीं भली मोठी रांग होती!मोठी वाहनं जात नाहीत!फक्त लहान जिभ गाड्या जातात!रस्ता लहान, उभट,अवघड असल्याने येथील सरकारने ठरवून दिलेल्या जीभ गाड्यांनां परवानगी आहे!पाच किलोमीटरचीं रांग पार करून आमचा नंबर आला होता!रात्री ०१-३०वाजता गुप्त प्रयागहून बसवर सोनप्रयागलां आलो होतो!तेंव्हा काल दुपारचे ०१-०० वाजलें होते!गुप्तकाशीहून ३५किलोमीटर अंतर जाण्यासाठी जवळपास १२ तास लागले होते!सोनप्रयाग पासून गौरीकुंड पाच किलोमीटर अंतर आहे!घाट माथा असल्याने फक्त जीभ गाडीने जाता येत असतं!
सोनप्रयागच्या प्रचंड मोठया रांगेतून खोल नदीवरील मोठा लोखंडी पूल पार केला अन जिभगाडीवर बसलो!
काल गौरीकुंडलां पोहचलो होतो!तेंव्हा दुपारचे ०३-३०वाजले होते!तेंव्हा अंगात बळ उरलं नव्हतं!तरीही गौरी मातेचं दर्शन घेण्यापूर्वी गरम पाण्यात अंघोळ झाली!गौरीकुंडलाचं मंदाकिनी नदी किनारी एका हॉटेलमध्ये share बेसिसवर थांबलो होतो!समोर वाहत्या नदीचा प्रचंड आवाज कानी पडतं होता!तापमान जवळपास ४ तें ५ डिग्री सेंटीग्रेड होतं!बाहेर पाऊस आणि आत थंडीचं साम्राज्य होतं!रात्री समोरच हॉटेलमध्ये जेवण करून अंगावर जाडजूड दुलई पांघरून झोपलो होतो!दुसऱ्या दिवशी पूर्वपहाटे ०२-०० वाजता १८ किलोमीटर दूरवर असलेल्या बाबा बर्फानी!भगवान केदारनाथ धामासाठी निघायचं होतं!
..आज ब्रम्हपूर्व पहाट, दिनांक २६मे रोजी १-४५लां उठलो!.. सर्व तयारीकरून केदारनाथ दर्शनासाठी निघण्याची तयारी सुरु आहे!प्रचंड थंडी आहे!पावसाचे थेंब सोबतीला आहेत!थकव्यालां चकमा देत धावपळ सुरु आहे!प्रवास खरोखर कष्टाचा आहे!कष्ट फळा जवळ पोहचत असतं!)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
(आता गौरीकुंडहून केदारनाथ दर्शनासाठीचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२६मे २०२३
Comments
Post a Comment