चारधाम यात्रेच्या वाटेवर(भाग-०८)
चार धाम यात्रेच्या वाटेवर
🌷🌷🌷🌷🌷🌷
(भाग-०८)
*******************
... नानाभाऊ माळी
....काल सकाळी ०६-००वाजता
उत्तरकाशीतून बस निघाली होती!चाकं गोलाकार पळत जमिनीला मागे टाकत होती!"मै काल हुं".. असं म्हणत कालचक्रसारखे बसची चाकं फिरत होती!उत्तरकाशी पासून उंच पर्वताच्या शिखराशी,पोटाशी पाणी भरून आलेले ढग अलगद तरंगतांना, उतरतांना दिसतं होते!मध्येच जमलंचं तर जल फवारणीही होतांना दिसतं होती!निसर्गाने डोंगर उतारावर हिरवीगार चादर अंथरून ठेवलेली दिसत होती!झाडं डोंगराकडे न झुकता आभाळाकडे ताठपणे वाढलेली दिसतं होती!चार-पाच, चार-पाच किलोमीटरवर,घाटाच्या वळणावर लहान मोठी गावं वसलेली दिसत होती!डोंगरदर्यात खाचरे
करून स्टेप फार्मिंग केलेंली दिसत होती!पर्वत उंचचं उंच होती!रस्ता नागमोडी होता!वळणदार होता!रस्ता अनेक गावं जोडीत निघाला होता!
उत्तराखंड देवभूमीच्या हिरवाईतून सृष्टी सौंदर्याची उधळण होतांना दिसते होती!भागीरती नदीच्या कधी डाव्या काठावरून तर कधी पूल ओलांडून उजव्या काठावरुंनं बस पळत होती!वेळी अवेळी केव्हाही ढग भरून येत होते!देवभूमीवर जलाभिषेक करून निघून जात होती!आमची बस धरासू,टेहरी, श्रीनगर(गडवाल),रुद्रप्रयाग, गुप्तकांशी पर्यंत पोहचलो होतो!त्यात भारताच प्रसिद्ध टेहरी डॅम पाहण्याचं भाग्य लाभलं!टेहरी जिल्ह्यातील डॅमच्या भिंतीवरून बस जात होती!डॅमचं एवाढव्य काम आश्चर्य करण्याजोगे होतं!अनेक दऱ्यातून पाणी आपलं अस्तित्व दाखवत होतं!धरण सागरा सारखे या अवाढव्य अन समुद्रासारखे वाटत होते!मिलंगणा- अलकनंदा-भागीरतीच्या
संगमावरील हे धरण उत्तराखंडातील मोठे धरण आहे!बस अशीच अनेक गावं मागे टाकतं होती!अनेक नद्याचं पुण्य प्राप्त केलेलं उत्तराखंडनें भगवान महादेव,भगवान विष्णूचीं कृपा प्राप्त केली आहे!अनेक नद्या या देवभूमीत अवतरल्यामुळे वहात जातांना अनेक तिर्थांचा उद्धार केलेला आहे!डोळयांतल्या दुर्बीनीत जे मावले तें आधाशीपणे ओढून ओढून हृदयातल्या खोल भांडारात पोहचवीत होतो!साठवीत होतो!आमचा प्रवास केदारनाथ धामाकडे सुरु होता!अंतःकरणातून भाग्यविधात्याचे ऋण या जन्माच्या अंतापर्यंत घेत सुटलो होतो!जगण्याचं बळ मागण्यासाठी भगवान केदारनाथांच्या धामाकडे निघालो होतो!🌹
आपलं देवदर्शन सहजरीत्या झालं तर अंतकरणातून आनंद मिळतं नसतो!महत्वही वाटत नाही!सहज प्राप्त झालेलं असतं तें!... जसे विना कष्ट मुलांना वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळाली की त्याची किंमत राहात नाही!वडिलांनी अतिशय कष्टातून मिळविलेलं असतं!त्यांनाचं कष्टाची जाणीव असतें!१००%पैकी २०टक्के मुलं मजेत जगून आयुष्य जगतात, घालवतात,संपत्तीची विल्हेवाट लावतात!कारण कष्टाचीं जाणीव नसते!... चार धाम यात्रा अशीच आहे!अतिशय कष्टाची आहे!शारीरिक,मानसिक त्रासाशिवाय देवाजवळ पोहचता येत नसतं!अंतर्बाह्य सोन्यासारखं तापल्याशिवाय,कसोटीला उतरल्याशिवाय श्रद्धेजवळ जाता येत नसतं!आम्ही त्या परीक्षेला बसलो आहोत!दोन पेपर कठीण होते!दोन धाम झालेतं!यमनोत्री आणि गंगोत्री धामाचं निर्विघ्नपणे पार पडलं!दर्शन झालं!🌹
धाम भक्तीचा भुकेला आहे!त्यात अंतःकरण ओतून दिलें तरचं दर्शन सुकर होतं असतं!कष्टातून देवभूमीच्या पायथ्याशी पोहचलो आहोत!रुद्रप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम पाहिला!पावसाचीं फवारणी सुरु होती!मनात देवपणाची जाणीव होतं राहिली!अनेक घाट आणि जीवघेणे रस्ते पार करीत आम्ही गुप्त काशीला येऊन पोहचलो होतो!संध्याकाळचें ०७-३०वाजले होते!गुप्तकाशीत हॉटेलवर जेवन केलें!काल रात्री १०-३०वाजता झोपी गेलो!झोप तर किती असावी? फक्त दिड तास झोपलो!रात्री १२-००वाजता उठलो!मध्यरात्री आजचा नवीन दिवस उगवला आहे!अंघोळी करून आता रात्री ०१-३०नव्या दिवसाच्या साक्षीने केदारनाथ धामाकडे प्रयाण केलें आहे!केदारनाथ धाम भक्तीचा भुकेला आहे!भक्ती कष्टाची आहे!मध्यरात्री अंधाऱ्या घाट रस्त्यावरून आम्ही मार्गस्त झालो आहोत!🌹
कधी होईल दर्शन तुझे भगवान केदारनाथा? आम्ही श्रद्धेनें तूझ्या द्वारी येत आहोत!आता विरह सहन होतं नाहीये!जगूनी जागतो आहोत देवा!गुप्त काशीतून निघालो आहोत!गौरीकुंडापर्यंत अंधारात पोहचतो आहोत!तू थंडीची चादर ओढून बसला आहेस!आम्ही भक्त सर्व सहन करीत,पाऊस सहन करीत तूझ्या दर्शनासाठी अंधाऱ्या रात्रीत प्रवास करीत येत आहोत!देवा आम्हाला आपल्या चरणाशी घ्यावे!आपली कृपादृष्टी आम्हावर असू द्यावी!केदारनाथा आम्हावर कृपा करावी!आमची बस पळते आहे!अंधार कापीतं,चढ उतरांनां सामोरे जात!पळते आहे!आम्ही आमचा जीव कुठीत, मुठीत घेऊन दर्शनाला येतो आहे!केदारनाथा तुझी कृपा असू द्यावी!🌹
💐💐💐💐💐💐💐💐
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे
(आता घन रात्री केदारनाथ धामाकडे प्रवास सुरु आहे वेळ रात्रीचे ०२-१५वाजता)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२५मे २०२३
(वेळ रात्री २-१८ वाजता)
Comments
Post a Comment