माझी आई अशीच आहे(भाग-१७वा)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माझी आई अशीच आहे
       (भाग-१७ वा)
💐🌷💐🌷💐🌷💐
*********************
... नानाभाऊ माळी

आई आसवं डोळयांतील
आपुल्या ओंजळीत घ्यावे
थेंब थेंब अमृतासम आई 
तीर्थ सारे पिऊनी घ्यावे...!🌹

गुफिंतं गुफिंतं नाती सारीं 
आई जीवनाचा होते धागा
आकाशाहुनी विशाल आई
........घेते अंतरीचीं जागा..!🌹

.....आई साखर झिरा असतें!आई गोड गाणे असतें!आई फुलांची वेल असतें!आई प्रसन्न सकाळ असतें!आई साऱ्या मुलांचीं भूत,वर्तमान काळ असतें!आई फक्त राबत असतें!आई अभिन्न नाळ असतें!आई सुगंधी फुलांची माळ असतें!आई देव गाभाऱ्यात असतें!आई शीतल चंदन असतें!आई उंबऱ्या आतील लाडघर असतें!सर्वांना म्हणूनचं आई असतें!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे 🌷

आई अंतरीचे बोल असतें!फळाहून गोड असतें म्हणून घराघरात आई असतें!आई झोक्याचीं गोधडी असतें,गोड गाणे गात असतें!आई अंतरीच्या शब्दांचीं वाणी असतें,बाळ झोपत असतें!आई सुरक्षेची हमी असतें,बाळ कुशीत असतें!बाळ खुशीत असतें!आत्म्याजवळी नेणारी, शंभर टक्के खात्री देणारी जगातील आई असतें!ममता रुपी ईश्वर भेटीला येत असतो,आईमुखे खात्री देत असतो!आई श्रद्धेचीं शिडी असतें, जीवनाचं दान असतें!जगात आई झिजत असतें!माझी आई देखील अशीच आहे!🌷

आई नारळातील गोड पाणी असतें! आई विश्वातील चमत्कार असतें!आई एक जादूगार असतें,बालमन खेळवीत असतें!आई तप्त उन्हातील सावली असतें,उन थोपवीत असतें!स्वतः सहन करीत,सुख दान करीत असतें!आई आनंद मळा असतें!आपण बागडतं असतो,आई संकटांशी झगडत असतें!आई लोहचुंबक असतें,घट्ट नाते घडवत असतें!आई व्यवहार शून्य असतें, मुलं पाहतं धन्य होत असतें!फक्त काळीज देणे असतें!स्वार्थाशी ओळख नसते,म्हणून जन्मार्थ देत असतें!घरोघरचीं आई अशीच असतें!माझी आई शंभरी पार झाली आहे अशीच आहे!🌹

  श्वासातील श्वास आई
  प्रत्येक श्वासात तू भेटते
  जन्म देऊनी बाळाला 
        सारें रक्त तू वाटतें..!🌹 

तुझ्या डोळ्यातील अश्रू 
सारे ओंजळीत घ्यावे
 अमृतासम पिऊनी घ्यावे
हळूच आईच्या कुशीत जावे 🌹

तूझ्या काळजात खोल
आई घुसावे कधीतरी
खूप केलेलें कष्ट ढिग
 मोजावेत आता तरी..... 🌹

...........आई शब्द फुटतांना अंतरीचा खोल मुळासकटचा आनंद वेगळाचं असतो!आईस मग डोक्यावरी ओतून घेत असतो!आईचं वात्सल्यरूप शोधत असतो!करुणा शोधत असतो!ममता शोधत असतो!विशाल काळीज शोधत असतो!आईचं हसरं मुख शोधित असतो!आईवर हक्क गाजवीत असतो!आई मग कधी बालपणी मुलांचीं स्वप्न होते!आई डोळस होते!आई ज्ञान होते!संस्काराची शाळाचं होऊन बसते!बाळाचे लाड पुरविता पुरविता आई स्वतःस विसरते!अशी व्यक्ती एकच असतें,ती आईचं असतें!गोड शब्दांसाठी आसूसलेली आई स्वतःस दान करते!अशी आई घराघरात असतें!माझी आई अशीच आहे!

बरेच दिवस झाले असतील!कदाचित महिना देखील झाला असावा!आम्ही सात बहीण भावंड!पुण्यातल्या कात्रज आणि हडपसरमध्ये राहायला आहोत!शंभराव्या वर्षी देखील सावली सारखी मागे पुढे असणारी आई!कात्रजला बहिणीकडे गेली आहे!'कधी येणार?'.. विचारल्यावर सांगते,'येतेय पाच सहा दिवसात!'... एकदोन दिवसा आड फोन होतो!आई हसत बोलते,'नातवंडे कसे आहेत?'..त्यांच्याशी बोलते!आईचा आवाज सतत ऐकावासा वाटतो!आईचें शब्द कानावर पडल्यावर नवीन उमेद जन्म घेतं असतें!आई उमेदीचं झाड आहे!दूरदृष्टीचीं अमृतकुपी आहे!सतत आईच्या सभोवती बसावस वाटतं!आईचें माणसं जोडणारें शब्द गोड वाटतात!कुटुंबाचें धागे जोडणारी आई या जन्माची देवदूत आहे!आमच्या भल्यासाठी अनुभवाचे चार शब्द सांगत असतें!डोक्यावरून हात फिरवत असतें!आम्हाला जग जिंकल्याचा आनंद होत असतो!आई तुझे आशीर्वाद अजूनही काही वर्षं हवे आहेत!ऐकशील नां?देवाजवळ प्रार्थना करतो आहे!घरोघरी अशीच आई असतें!स्वतःचं काळीज देऊन बसते!मुलांसाठी दानी होते!आमची आई अशीच आहे!🌷

काळजाचं दान देऊन 
काळजी घेतंलीस तू 
 दुःखातं उभी राहिलीस
जगदंजननी झालीस तू..!🌹

यातना खूप भोगतांना 
वात्सल्य ओतलेस तू 
दुःखास हरवितांनाही 
कधी नां आटलेस तू....!🌹

आई रक्ताचा थेंब मी
मज उभे केलेस तू
नऊ महिने वाढवूनी
आई जन्म दिलास तू...!🌹

दुडुदुडू चालतांना मी
आई बोट धरलेस तू
भूक लागली पोटास
उराशी मज धरलेस तू.. 🌹

 जगण्याची उर्मी आई असतें!पावलोपावली जागत असतें!जागल्यास काय म्हणावे?आई जागलकरी असतें!आई मृदू वीट असतें!बाप दगडाहून कठीण असतो!दगड विटांच्या रूपातून घर भक्कम होत असतं!भक्कमतेच्या नात्यातून सुंदर तें जगणं असतं!घरालाही स्वर्ग करणारी कोमल मनाची आईचं असतें!घराघरात अशीचं आई असतें!माझी आई अशीच आहे🌹

आई अवेळी उठूनी
हात डोक्यावरी फिरविते
अनमोल आशीर्वादाने 
........आई घास भरविते!🌹

आई आशीर्वादी आभाळ 
आपुल्या दुःखास हरविते.!
विशाल हृदयातून आई 
....मुलांचं वैभव मिरविते!🌹

आई अमृताचे झाड 
पाना पानात भेटते
कुशीतल्या ममतेतुनी 
आई आभाळ वाटते..!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*******आई **********
💐💐💐💐💐💐💐

... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१० मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol