चार धामच्या वाटेवर (भाग-०४))
चार धामच्यां वाटेवर
(भाग-०४)
****************
🌷🌷🌷🌷🌷🌷
... नानाभाऊ माळी
...आज रोजी दिनांक २१मे २०२३!... पहाटेचे ०४ वाजताहेत!ब्रम्हपहाट!आम्ही यमनोत्रीला जाण्यासाठी बसमध्ये बसलो आहोत!यमनोत्री पहिलं पवित्र धाम,आम्ही खरादी या गावातून निघालो आहोत ........
.....खरादी हिमालयाच्या उंच शिखरावर असलेलं पण यमुनामैयाच्या तिरावर वसलेलं गावं!.. आम्ही आतुर झालो आहोत धाम दर्शनासाठी!.....यमनोत्रीच्या उगमस्थांनाच्या अलीकडे ३५किलोमीटर अंतर असलेलं ठिकाण खरादीहून आम्ही निघालो आहोत!🌹
यमनोत्री चार धाम पैकी एक धाम आहे!हे ठिकाण हरिद्वारहून १८०किलोमीटर दूर असलेलं श्रद्धा मोक्षधाम आहे!हरिद्वारहून काल दिनांक २०मे रोजी सकाळीच आमची बस ७-३०ला डेहराडूनमार्गे निघाली होती!संध्याकाळी ५-३० वाजता खरादीला पोहचलो होतो!
...काल घनदाट किर्रर्र जंगलातून प्रवास सुरु होता!उंच डोंगर!खोल खोल दरीच्या तळातून मार्ग काढत सापसूळी सारखी वाहतं होती!यमुना मैयेच्या काठा काठानें उगम स्थानाकडे प्रचंड उभट डोंगराच्या पोटाच्या अवती भोवती रस्त्यावरून पळत होती!!जागेवरचं डाव्या-उजव्या बाजूला तीव्र घाट वळनं होती!खोल खोल दरी!हृदयाचा ठोका चुकवंत पळत होती!बस गाड्या वळण वळण घेऊन यमनोत्री धामाकडे निघाल्या होत्या!खाली खोल दरी अन उभट कडा छातीत धडकी भरवत होता!हरिद्वारहून साधारण डेहाराडून गेल्यावर ६०किलोमीटरवरती आमराई अन फंणसांच्या गर्द झाडबागेत, लदलदलेल्या आंब्यांच्यां बागेतल्या तोमर रेस्टोरंटमध्ये दुपारचां जेवणाचां आस्वाद घेतला!अन बरोबर दुपारी १-१५ ला खऱ्याखुऱ्या आव्हानात्मक प्रवासाला सुरुवात झाली होती!
...कसलेला,मुरलेला,अनुभवी ड्रायव्हर कसरत करून गाडी चालवत होता!एका बाजूला उंच उभट कडा तर डाव्या बाजूला ओबडं-धोबड रस्त्याच्याकडेने खोल पवित्र यमुना नदीचांही प्रवास सुरूचं होता!!कधी नदी वेडीवाकडी तर कधी रस्ता वेडावाकडा दोघेही एकमेकांना लपेटून खेळ खेळत आमच्या बसला पूढे जाण्याच आवाहन करत होती!कडेकडेने डोंगरावरून निखळलेली भली मोठी दगडं नदीतल्या पाण्यातून डोकंवतांना दिसतं होती!घाट,कडा, दरी,निखळलेली दगडं प्रवासातील भाउबंदकी जपत होती!आमची बस सर्व आव्हानांनां समोरे जात होती,पार पाडीत पुढे निघाली होती!मध्येच धरणाची उंच भिंत दिसली अन डोळे विस्फारल्यागतं पाहतच राहिलो!त्या खोल दरींतलं अडवलेलं पाणी पाहत होतो समुद्रासारखं विस्तीर्ण पसरलेलं दिसतं होतं!कित्येक फूट खोल दिसतं होतं!🌹
....नागमोडी वळण घेत रस्ता मागे जात होता!मध्येच कुठेतरी पाण्याचा धबधबा मे महिन्यातल्या उन्हाळ्यातही दर्शन देत होता!हा जीवंत देखावा प्रसन्न वाटत होता!
हवाहवासा वाटत होता!नांविन्याची ग्वाही देत होता!बसचं इंजिन नागमोडी वळणदार रस्त्यासोबत जोरजोरात गप्पा मारण्यात दंग होतं!चढावर चढ येत होती!पोट फाटल्या डोंगरातूनं,डोंगराच्या पोटाला बिलगून रस्ता पुढे सरकत होता!बस वेलीसारखी लपेटून पुढे सरकत होती!मध्येच झाडांच्या,वेलिंच्या पारंब्या स्पर्शून जात होत्या!
रस्ता एकेरी असतानाही येणाऱ्या जाणाऱ्या वहानांची कसरत धडकी भरवणारी होती!डोंगर कोरलेल्या पोटातून वळणा वळणानें रस्ता पळत होता!गाडी वरवर सरकत होती! खोल दरी अजूनही खोल खोल, कित्येक खोल किलोमीटर दिसतं होती!देवदाराची प्रचंड उंच झाडं डोंगर उतारावर नेटाने उभी होती!कित्येक पिढ्यांना पाहात उभी होती!रस्त्याच्या खोल दरीच्या लागून लोखंडी बॅरिकेट्स लावलेली दिसतं होती!🌹
रस्त्याचां वळणदार चढ-उताराचा खेळास आम्ही प्रवाशी स्थब्द होऊन पाहत होतो!भीतीने डोळ्यांना गरगरी येत होती!डोळे विसफारून या खेळाकडे पाहत होतो!त्यांच अंग झालो होतो!कधी भीती वाटत होती, खोल नदीतील पाणी खळखळून वहात होतं!मध्येचं कचकन ब्रेक लागल्या वर छातीची धडकी वाढत होती!हळूहळू पुन्हा खाली येत यमुना नदीवरील लोखंडी पूल ओलांडून पुन्हा चढाकडे प्रवास सुरु होता!
....हिमालयाच्या कुशीतील वळणा वळणावर प्रवास सुरु होता!श्रद्धेनें माथा टेकण्यासाठी यमनोत्री
धामाकडे निघालो होतो!१०८किलोमीटर दूर असलेलं यमनोत्री धामाअलीकडे पुन्हा लोखंडी पूल आला!अन पुन्हा आव्हानाचं स्वागत करीत आमची बस यमनोत्रीच्या दिशेने पळत होती!"तो"परमात्मा!"तो"ईश्वर देवभूमी उत्तराखंडवर इतका प्रसन्न झाला असेल,म्हणाला असेल 'जा!!निसर्गाचं अवर्णनीय भूतो नं भविष्यती असं दान देत आहे!'असं म्हणत भगवान शंकर अंतर्धान झाले असतील!देवभूमीने हे दान पदरात स्वीकारून निसर्ग रचितानें या देवभूमीस पावन करून टाकलं असेल!🌹
.....बस पुढे पळत होती!खायी, दरी, नदी घनदाट जंगलांनी डोंगर-कडे सजलेले दिसतं होते, डोंगर शृंगारूनी मन अन डोळे मोहित झाले होते!कधी खोल दरी पाहून अंगावर काटे उभे राहत होते!यमनोत्री धाम करणं एक आव्हान आहे!जन्माचं सार्थक आहे!एक तपश्चर्या आहे!उंच उंच आभाळाला टेकणारे विशालकाय पर्वत भारत भूमीचीं प्राचीन संपदा आहे!निसर्गाचं अविनाशी विशालकाय रूप डोळ्यात मावत नाहीये!उत्तरकाशी जिल्ह्यातील हिमालयाच्या विविध रंगातून रस्ता पळत आहे!कुठेतरी डोंगर कडेला, पोटाला एखाद पिटुकलं गावं नजरेस पडतं आहे!आश्चर्य म्हणजे मे महिन्याच्या शेवटी डोंगर दर्यातून आंब्याची आमराई फुललेली दिसतं होती!महाराष्ट्रातील आंब्यांचा हंगाम संपन्याच्या मार्गांवर आहे!येथे कैरी झाडांच्या फांदयावरं झिम्मा खेळताहेत!कुठेरी अगदीच ०१तें ०२ टक्के शेती नजरेस पडते आहे!दहा -बारा घरांचं गावं कुठेतरी दिसतं होतं!खोल दरीच्या कमरेवर वसलेली गावं म्हणजे मानवी जीवनाची आश्चर्य चकित करणारी बाब आहे!मध्येच यमनोत्री धाम मार्गांवर उत्तर काशी जिल्ह्यातील डामठा गावं आलं अन अखंड जंगलात छोट्याशा गावाचं दर्शन झालं!तेथेच फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचं (वनखात्याचं)चेकपोस्ट आहे !🌹
....भारत भूमिच्या डोक्यावरील मुकुट...देवभूमीच्या विशालकाय पर्वत रागांमधून होणारा अविस्मरणीय प्रवास जणू अनुभूतीचां अलोट खजिना आहे!खजिनादाता ईश्वराकडे आम्ही श्रद्धाळू भक्त निघालो आहोत!जीवन हरीत करणारी यमुना मैयेच्या उगम स्थानाकडे प्रवास सुरूचं होता!
भक्तीची महिमा न्यारी असतें!या उभ्या देहातील दिव्यज्योती प्राण चालवणारा महाआत्मा कोण असेल बरं?अशा अनाकलनीय दिव्य स्वरूपासं शोधतो आहे!विशालकाय आभाळाला टेकलेल्या हिमालयातील पर्वतराईतं त्याला शोधतो आहे!प्राणस्वरूप दिव्यात्म्यासं प्रचंड खोल यमुना नदीच्या पांढऱ्या शुभ्र दगड गोट्यातून वाहणाऱ्या खळाळत्या पाण्यात शोधतो आहे!🌹
...बसने काल सकाळी ७-३०वाजता हरिद्वारहून निघालो होतो!१८०किलोमीटर लांबचां प्रवास म्हणजे क्षणोक्षणी पुनर्जन्म वाटत होता!माता यमुना नदीच्या उगमा जवळ निघालो होतो!बस पर्वताच्या पोटाला धरून पुढे सरकत होती!दोन उंच डोंगरांच्या खोल खोल दरींतून वाहणारी माता यमुना खळखळून हसत वहात होती!देवदार वृक्षाच्या साक्षीनें वहात होती!!सारिगड, डामटा, नौगांव, बडकोट सारखी गावं मागे टाकीत आमची बस खरादीला येऊन पोहचलीं संध्याकाळचें ५-३०वाजले होते!संध्याकाळी यमुना तटावर जावून वाहत्या पाण्याचं दर्शन घेतलं!रात्री जेवण करून झोपी गेलो होतो!🌹
...आज सकाळी पहाटे ४-००वाजता खरादीहून निघालो अहोतं!यमुना मैयेच्या मुखापाशी निघालो आहोत!यमनोत्री दर्शनासाठी निघालो आहोत!माता यमनोत्रीसाठी निघालो आहोत!🌷
*************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे
(आता यमनोत्री उगम मुखाकडे निघालो आहोत)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२१मे २०२३
(सकाळी ५-१४वाजता)
Comments
Post a Comment