चार धाम यात्रेच्या वाटेवर (भाग -०३)
चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-०३)
*******************
🌹🙏🌹🙏🌹🙏
... नानाभाऊ माळी
....देवभूमी हरिद्वार!अमृतभूमी उत्तराखंड!पावन भूमी उत्तराखंड!अशा पवित्र भूमीत लोकमान्य टिळक हरिद्वार ही रेल्वेगाडी हरिद्वारला काल दिनांक १९ मे रोजी दुपारी १२-३० वाजता येऊन पोहचली!पावित्र्याचीं रोपं जिथे लावली गेली असतील अशा हरिद्वारला आम्ही श्रद्धेचं दर्शन करायला पोहचलो होतो!हर की पौडी या गंगा तटावर जन्माच सार्थक करण्यासाठी येऊन पोहचलो होतो!... हरिद्वार हिरवाईने अच्छादन केलेलीं ईश्वर भूमी आहे!या भागावर साक्षात निसर्ग देवतेनें मेहेरनजर केली असावी!आम्ही सर्व सहयोगी, सहकारी हरिद्वार स्टेशनंमधून बाहेर आलो!सामान उचलण्यासाठी कुली पळत आले होते!योगेश ट्रॅव्हल्सनें मॅनेज केल्यामुळे आम्ही सरळ बसमध्ये जावून बसलो!
स्टेशनं पासून साधारण चार किलोमीटरवरं मुखीया गल्लीतील श्री.व्यंकटेश हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय केलेली होती!.. अन जेवणाची तर कमालचं होती!... हरिद्वारमध्ये दुपारी पुरणपोळी, आमटी,भजी,कुरड्या आंब्याचां रस असा उत्तम मेनू होता!आम्ही खवंय्य अक्षरशः जेवणावर तुटून पडलो होतो!पोटाचा अग्नी शांत होत असतांना तृप्तीचं ढेकर देत,अन्नपूर्णा देवीचें हृदयाततून आभार मानले!अन्नदाता सुखी भव म्हणतं हॉलच्या बाहेर पडलो!
... अन काल संध्याकाळी ०४ वाजता व्यंकटेश हॉटेलहून रिक्षाने भीमगोडाला गेलो!तेथून गंगा घाटावर पोहचलो!हर की पौडीला पोहचलो!गंगा मैया विस्तीर्ण,विशाल रूपात वहात होती!अतिशय शुद्ध,स्वच्छ निळसर पाणी डोळ्यातून,हृदयातून अंतःकरणाच्या खोल खोल पवित्र कुंभात ओढून घेत होतो!!गंगा मातेला जणू महापुर आला असावा अशी दुथंडी भरून वाहतांना दिसली!पाण्याला ओढ दिसली!आम्ही सर्व यात्रेकरू देवभूमीच्या हरिद्वारमध्ये गंगा मातेच दर्शन घेत होतो!हर की पौडी श्रद्धाळूनी भरून गेली होती!हरिद्वार भारतातील सप्तपूर्यांपैकी एक आहे!
....आम्ही गंगा मातेच्या हरी की पौडी या गंगा मातेच्या तटावर संध्याकाळी ०५-०० वाजता पोहचलो!गंगामाता आरती संध्याकाळी सूर्यास्तासं होती!हरी की पौडी या ठिकाणी गंगा मातेस अतिशय वेगवान प्रवाह दिसला!गंगा माता मंदिरासमोर नदी घाटावर हजारो-लाखो श्रद्धाळू,यात्रेकरू गंगा मातेच्या प्रवाहात अंघोळ करतांना दिसली!श्रद्धेचं अमृत वहात होतं!श्रद्धाळू मनोभावे गंगा आरतीसाठी उभी होती!दगडी विशाल घाटावर नतमस्तक होऊन प्रत्येक श्रद्धाळू मातेचं दर्शन घेत होते!या ठिकाणी भगवान विष्णुचे पाऊल उमटले आहेत असा प्राचीन काळापासून समज!या ठिकाणाला हरी के चरण असें ही म्हणतात!संध्याकाळच्या गंगा आरतीची वेळ झाली होती आम्ही सर्व श्रद्धाळू गंगा घाटावर पोहचलो होतो!दिव्य ज्योती आरती सोबतचं हजारो द्रोण ज्योतीदिवे गंगा मैयाच्या विशाल पात्रातून वहात होते! रात्री चमचमणारे तारे वाटावे असें तें दिव्य स्वरूप श्रद्धेला गाभाऱ्यात नेत होते!खळाळत्या नीलसर पाण्यावर भक्तीभावाने,द्रोणदिवे सोडले जात होते!हे भक्तिमय पण अनोखे विहसंगम दृश्य डोळयांतून टिपून घेत होतो!🌹
हरिद्वारला गंगा आरतीचीं वेळ सकाळी सूर्य उगवतांना आणि संध्याकाळी सूर्य मावळतांना असतें!काल लाखों गंगा माता भक्तांच्या उपस्थितीत संध्याकाळी सूर्यास्तासमयी हर की पौडी येथे गंगा आरती होतांना डोळ्याचं पारणें फिटत होतं!भारातातूनचं नव्हे तर जगातील भक्ती सागराच्या साक्षीने आरती सुरु होती!अनेक पंडे आरती गात होते!गंगामाता गौरव आरती एक सुरात कानी पडतं होती!साक्षात डोळयांतून आरतीचं दर्शन होतांना दिसलं!गंगा सभा पवित्र गंगा मातेच्या भक्तीत न्हावून निघत होता!माझ्या डोळयांवर खरोखर विश्वास बसत नव्हता!मी स्वप्नात होतो!कैलासातं होतो!साक्षात भक्ती सागर माझ्या डोळयांतून खोल अंतःकरणातं प्रासुन घेतं होतो!भक्ती आणि आरतीत एकचित्त झालेला लाखोंचा हा जनसमुदाय गंगा मातेच्या भक्तीत हृदय अर्पन करून बसला होता!गंगा मातेच्या पात्रातून अमृताचा झरा वाहतांना दिसतं होता!पंडेच्यां पवित्र गंगास्तुती स्तोत्रांनी गंगा मैया रोमरोमात जाऊन बसत होती!मी लीन झालो होतो!गंगा माता आशीर्वाद देत होती!डुबकी मारून माझ्यातील अमंगलचां ऱ्हास होतं होता!गंगामाता वहात होती!मानवी शरीर पवित्र करीत वहात होती!लोकांचं पाप स्वतःच्या पोटात घेत होती!समस्त श्रद्धाळूचं कल्याण करणारी योगिनीं महागंगा हरिद्वार तीर्थाला पवित्र करीत वहात होती!
काल शुक्रवारी बडी अमावस्या होती!गंगा मैयाचीं पालखी गंगा माता मंदिरातून हर की पौडी तटावर आली होती!... याचं देही याचं डोळ्यांच्या साक्षीने लाखो श्रद्धाळूच्या साक्षीने!.. हर हर गंगे!हर हर माँ गंगेचां उच्चार हृदयाला शांत,शितल,प्रसन्न करीत होता!प्रत्येकाच्या मुखातून हर हर गंगेचां श्रद्धामयी धून कानी पडतं होता होता!हर हर शंकर,हर शिव शंकरचां लाखोंचा एक सूर हृदयात श्रद्धा जागवत होता!धूप आरतीचा पवित्र गंध श्वासातून पवित्रतेच्या द्वारी जात होता!तल्लीन होऊन ऐकत होतो!गंगा आरतीच्या या पवित्र वातावरणात बडअमावस्या पर्वाचीं विशालता डोळ्यातून पिऊन घेत होतो!
या देहात!या मानवी देहात जन्माचं समाधान काही और होतं!मी माझा राहिलो नव्हतो!या विशालतेचा एक बिंदू बनून एकजीव झालो होतो!जीवनाचं सार्थक झाल्याचं मनोमन समाधान वाटत होतं!जन्मूनं जगण्याचा अर्थ कळू लागला होता!आमच्या सोबत,या श्रद्धेच्या वाटेवर धुळ्यातील प्रसिद्ध डॉ. पती-पत्नी अर्थात डॉक्टर संजयजी देसले देखील आहेत!तें ही या चराचर सृष्टीतील या भक्तीत एकचित्त झाले होते!... विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांना प्रणाम करीत होते!आदर करून चार धाम यात्रेच्या अनाकलनीय पवित्र विशालतेत
तादात्म होतांना दिसतं होते!
हिरव्यागार सृष्टीच्या देवभूमीत हरिद्वारच्यां गंगा तटावर आज दिनांक २०मे रोजी सकाळी ५-३०ला सूर्यदेव उगवत होता!आज उगवत्या सूर्य साक्षीने हर की पौडी येथे गंगा मातेच्या पवित्र घाटावर डुबकी मारली!थंडगार पवित्र जल माझ्या मनाच्या, तनाच्याआत प्रवेशित होतं!मी शुद्धतेच्या कडे ओढला जात होतो!माझं प्रदूषित मन स्वच्छ होतं होतं!उगवत्या सूर्य देवाला अर्ध्य दिलें!अन गंगा मातेस विनम्रपणे नमस्कार करून आज सकाळी आता आम्ही यमनोत्री धामाकडे निघालो आहोत!१८०किलोमीटरवर दूर असलेल्या खरादी येथे मुक्कामी निघालो आहोत!पहिलं धाम यमनोत्रीकडे आमची बस निघाली आहे!
💐 !हर हर गंगे!💐
************************
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
(आता चार धाम यात्रेतील यमनोत्री धाम कडे प्रवासात)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२० मे २०२३
Comments
Post a Comment