चार धाम यात्रेच्या वाटेवर
चार धाम यात्रेच्या वाटेवर
🌷🌷🌷🌷🌷🌷
******************
... नानाभाऊ माळी
धाम ध्येयशिखराचं सर्वोच्च ठिकाण असतं!श्रद्धा अन इच्छा शक्तीच्या बळावर घाम गाळल्याशिवाय धाम होतं नसतं!हृदयात आत्मविश्वास असावा लागतो!धाम आत्मानंदाचं स्थळ असतं!धामासाठी श्रम असतात!कष्ट असतात!अडथळे असतात!धाम अवघड असतो पण शक्य असतो!हृदयातून श्रम घेतल्याशिवाय धाम नावाचं अनाकलनीय गूढ उकलतं नसतं!धामातून नाम जन्म घेतं असतं!नामासाठी धाम असतं!नाम श्रद्धेयं असतं!भक्तवत्सल असतं!त्यालाच आपण मोक्ष मार्ग समजत असतो!धाम विशाल अनुभव असतो!अनुभूतीचां अमर्याद खजिना असतो!हा खजिना प्राप्त करण्यासाठी अपार कष्ट असतात!आम्ही उभंयता पती-पत्नी आणि माझ्या शाळेतील वर्गमित्रांसोबत आजचं दिनांक १८ मे २०२३रोजी चारधाम यात्रेसाठी रेल्वेने भुसावळहून निघालो आहोत!🌷
माझ्या जीवंत श्रद्धादैवताला,आईला घरीं ठेवून चारधाम यात्रेला निघालो आहोत!आईचां आभाळाहून विशाल आशीर्वाद घेऊन निघालो आहोत!परिश्रमाच्या वाटेवर निघालो आहोत!प्राचीन परंपरेनुसार आत्मिक समाधानासाठी पाप-पुण्याचां हिशोब देऊन सतमार्ग अंगीकरण्यासाठी चार धाम यात्रेच्या खडतर प्रवासाला निघालो आहोत!धामात एकचित्त होण्यासाठी महाराष्ट्रातील तप्त उन डोक्यावर घेऊन धामातील हिमनग अंगावर घेण्यासाठी निघालो आहोत!
हरिद्वार,यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ सारख्या भारतातील देव भूमीवर माथा टेकण्यासाठी निघालो आहोत!पवित्र पुण्याचा अनमोल खजिना प्राप्त करण्यासाठी आम्ही निघालो आहोत!आत्मिक सुख शोधण्यासाठी निघालो आहोत!निसर्गाचा अनाकलनीय ठेवा पाहण्यासाठी निघालो आहोत!यात्रा जिज्ञासा अन तृष्णा आहे मनाची,ती शमविण्यासाठी कुतूहल सोबतीला घेऊन निघालो आहोत!देवभूमी उतराखंड हिमालयाच्या कुशीत वसलेलं महान आश्चर्य आहे!प्राचीन काळापासून मानवी मनाला विलोभनीय,गुरुत्विय आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे!अशा पवित्र धामाच्या दर्शनाला निघालो आहोत!
धाम येणाऱ्या अन जाणाऱ्या पिढीला आदर्श श्रद्धाभाव शिकवीत असतो!पवित्र दान शिकवीत असतं!!कैवल्य खडतर जीवनाची परीक्षा घेतं आलं असतं!कैवल्य शुद्धीचां संकल्प असतो!आम्ही संकल्प मनात ठेवून शुद्धिकडे निघालो आहोत!.. आम्ही पवित्र धामाकडे निघालो आहोत!गंगेच्या पवित्र जलात डुबकी घेण्यासाठी निघालो आहोत!🌷
आज १८मे रोजी भुसावळहून आताच दुपारी ०२वाजता
हरिद्वारकडे रेल्वेने प्रयाण केलें आहे!जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी हरिद्वारला निघालो आहोत!श्रद्धा पूर्वक चार धाम यात्रेला निघालो आहोत!...💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१८मे २०२३
(आता चार धामसाठी प्रवासात)
Comments
Post a Comment