माझी आई अशीच आहे(भाग-१८)

माझी आई अशीच आहे
        (भाग-१८)
🌹🌹🌹🌷🌷🌷
**********************
... नानाभाऊ माळी

.......१४मे रोजी मातृदिन होता!मदर्स डे होता!आयुष्यभर राबणाऱ्या आईचा दिवस होता!मुलांसाठी झिजणाऱ्या आईचा दिवस होता!झिजून झिजून रक्त वाहिनी होणाऱ्या आईचा दिवस होता!आम्ही १४मे रोजी आईच्या पायांवर डोकं ठेवून ऋण व्यक्त करण्यासाठी जाहिरात करीत होतो!मी तर पार विसरून गेलो होतो!🌷

खरं म्हणजे मी १४ तारखेला मोठया बंधुंच्यां सहजीवनाचां सोहळा साजरा करण्यात दंग होतो!मातृदिन विसरून गेलो होतो!विवाहदिनाच्या आनंदात मी आईला विसरून गेलो होतो!आनंदी आनंद होता!भाऊ आणि वाहिनीचा लग्न सोहळा साजरा करीत होतो!आईचा दिवस पार विसरून गेलो होतो!पूर्णतः विसरलो होतो

१४ तारखेला "आई" व्हाट्सअपवर,फेसबुकवर,सोशल मेडियाच्या सर्वचं साईटवर फिरत होती!आई दिसतं होती!आईचं आई मार्केटमध्ये फिरत होती!आई फक्त एक दिवसाची आहे??तिचे उपकार वर्षातून फक्त एका दिवसात फेडून मोकळं व्हायचं असतं?आई इतकी स्वस्त झाली आहे की एका दिवसात तिच्या उपकाराची परतफेड करून 'फिट्टमफाट झालं बरं कां आई'!!! असं म्हणून मोकळे व्हायचं असतं ?? 

आई-वडील सकाळ,दुपार, संध्याकाळी पूजलें जाणारीं दैवतं आहेत!'दैवतं' पूजले गेलें पाहिजेतं!त्यांच्या कष्टाची परत फेड एका दिवसात करीत आहोत आपण!मनाने इतके दरिद्री झालेलो आहोत आपण? खरं म्हणजे आपण सर्वचं मुलं व्यापारी झालेलो आहोत! व्यावसायिक झालेलो आहोत!वर्षातून मातृदिवस,पितृदिवस साजरे करून उपकार केल्याचां गोंडस आभास निर्माण करीत आहोत आपण!हा आमच्या  प्राचीन भारतीय परंपरेचा,संस्कृतीचां अपमान नाहीये बंधूनो!!!!🤔

...घराघरात दिवसातून आई-वडील कमीत कमी दोन वेळा पूजले गेले पाहिजे!त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला पाहिजे!आई तर देवाने पाठविलेला प्रतिनिधी आहे!अशा श्रद्धेयं देवस्वरूपाची वर्षातून एकदाच जाहिरात करावी?मार्केटिंग करून नंतर वर्षभर कोपऱ्यात धूळ खायला ठेवून द्यायंचं असतं कां?माझी आई आयुष्यभर राबली होती हो!तिचं जीवन रक्ताचं पाणी करणारं होतं!श्रीमंतांची अन गरीबाची आई असं काहीही नसतं!आई ती आईचं असतें!एक आई मुलांसाठी भल्या पहाटे उठून शाळेचा, कॉलेजचा जेवणासाठी डबा करून त्याला दररोज दूर पाठवत असतें!तर दुसरी आई  भल्या पहाटे उठून मुलांचा, डबा करून देते!स्वतःही भाकरी बांधून शेतात, मजुरीला राबायला जाते!दिवसभर काम करून पुन्हा संध्याकाळी सर्वांच्या जेवणासाठी राबते!मुलांना खाऊ घालून पातेल्यात काहीही शिल्लक नसतांना अर्धपोटी झोपणाऱ्या आईसं वर्षातून फक्त एक दिवस मिळावा?? रात्री संपूर्ण घर झोपी गेलेलं असतं!आई उद्याचा विचार करीत रात्रीचं स्वयंपाकाची उजळणी करीत असतें,खरकटी भांडी घासून-धुवून अंधाराच्या उदरात अंथरुणाला टेकते!उद्याच्या उजेडासाठी आई राबत असतें!मुलांच्या स्वप्नासाठी रक्त जाळत असतें अशा मायसाठी,आईसाठी, mother साठी एका दिवसाची ओळख ठेवावी, निवड करावी!
 या देवत्वाचां उदोउदो एक दिवस करून पुन्हा अडगळीत टाकून द्यावे??बैलपोळ्या सारखं!आई हृदयाने श्रीमंत आहे!आपण लंकापती असूनही दरिद्री आहोत!आई ममतेचं विशाल वृक्ष आहे हे पार विसरून गेलो आहोत आपण!!

आई आहे म्हणून आपल्या जिभेला चव कळली हो!आई मुळेचं जिभेने लाड सुरु ठेवलेत!आपण ऑर्डर सोडायची अन आईला त्रास होत असतांना देखील हसत आपल्या आवडीचं जेवण वाढणाऱ्या आईस वर्षातून एकदाच जवळ करायचं?भ्रामक जाहिरातबाजी करून एक दिवसचं आईच्या कार्याल्या आभाळ दाखवायचं?🤔

माझी आई माझ्या बहिणीकडे काही दिवसांसाठी गेली होती!दररोज सकाळ संध्याकाळ आईच्या पायांवर डोकं ठेवून आईच्या सुरकुत्या पडलेल्या हातांच्या आशिर्वादाची सवय झालेली!एकही दिवस गेला नसेल सकाळी अंघोळ झाल्यावर आईच्या त्या पवित्र पायांवर डोकं ठेवलं नसेल!काही दिवस आई नव्हती!आशीर्वाद घेण्याची सवय!मनाला बेचैन वाटत होतं!कालच आमचं आराध्य दैवतं घरी आलं!माझी आई घरी आली!माझ्या आनंदाची काय वर्नावी महती!!आज आईच्या चरणावर मनसोक्त डोक ठेवलं!बऱ्याच दिवसांपासून मोठ्ठा आशीर्वाद घेतला!आज माझ्या आनंदाला चंदन भेटला!पवित्र माय च्या अस्तित्वात चंदन सुगंधित झाला होता!💐

आई.....जिची श्रद्धेनें वर्षातून ७३०वेळा पूजा केली पाहिजे!श्रद्धेनें माथा टेकत आईचा आशीर्वाद घेतं राहिलं पाहिजे!आईच्या शुद्ध अन पवित्र स्पर्शाने आमच्या सारखी गंजलेली लोखंड देखील सोन्यासारखे उपभोग घेतं आहोत!एक एक पायरी वर चढत धनलोभी झालो आहोत!आई नावाचं अनमोल परीस आमच्यातील अशुद्धतां शोषून घेतं आहे!स्वतः सर्वत्याग करीत आहे!

माझी आई साधन नाहीये हो !आई साधना असतें!साधनेमूळेचं आपण अपूर्णतेतून परिपूर्णतेकडे वाटचाल करीत आहोत!आपण बाहेरून घरी आल्यावर आई मायेने पाणी आणून देत असतें!आपल्या चेहऱ्यावर ताण तनावं पाहून मायेने कुरवाळत आपलं मन हलकं करीत असतें!देवाच्या या दुतास वर्षातून एक दिवस मिळावा??

देव कोणी पाहिला आहे ??कृपया मला पत्ता पाठवा हो!दररोज देवरुप उपकार करणारी माझी आई जीवंत देव आहे!मी आई वडिलांमध्ये देव दर्शन घेतं असतो!सूर्य,चंद्र दर्शकारी आहेत!तें डोळ्यातून टिपत असतो!त्यांच्या कृतीतून तें जीवंत वाटतात!... माझी आई अशीच आहे!तिचं माझी आराध्य आहे!तिच्या आशिर्वादानें मी दररोज पटीपटीने श्रीमंत होतं आहे!माझ्या आईची अपेक्षा काहीही नाही!दररोज पाच मिनिटे भरभरून बोललो की आई समाधान पावते!तिच्या समाधानांच्या आशिर्वादात मी लोखंड सोन्याकडे वाटचाल करीत राहतो!... घराघरात सर्वांची आई अशीच असतें!माझी आई आशीर्वादाचं विशाल झाड आहे!... मी श्रीमंत होतं आहे!एक दिवसासाठी नाही तर वर्षभर श्रीमंत होतं आहे!🌹
************************
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१७ मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol