प्रवास अनुभूतीचा माणूस शोधण्याचा

प्रवास अनुभूतीचा माणूस शोधण्याचा 
*****************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
.... नानाभाऊ माळी

.....आज प्रचंड उन होत!असह्य उन होत!घाम काढणार उन होत!घाम गळणारं उन होतं!४३-४४डिग्री तापमान असणारं उन होतं!चटक्या सोबत उकळणार देखील होतं!अशा तप्त उन्हात 'भडगाव'.. जि.जळगाव येथे एका विवाह समारंभात आलो होतो!लग्नहॉलमध्ये कूलरचा आवाज गाण्यासारखा गात होता!वरून फॅन गरगर फिरत होता!हॉल बाहेर प्रचंड उकाडा होता!आत थंडगार होतं!आज नेहमीप्रमाणे दुपारीं १२-३५चं लग्न दुपारीचं पण ०२-०० लागलं!यजमान अन पाहुणे आनंदी होते!आम्ही आनंदी होतो!शुभमंगल ध्वनीतल्या पाहुण्यांच्या आशीर्वादरुपी अक्षदा,वधू-वरांच्या अंगावर, डोक्यावर पडतं होत्या!.... नंतर पाहुणे जेवणाचा आस्वाद घेतं लग्न तृप्तीने मंडपातून बाहेर पडतं होते!.. बाहेर मात्र सूर्यदेवाने माणसांची परीक्षा घ्यायंला सुरुवात केली होती!🌷

हळूहळू लग्नमंडपातून पाहुणे मंडळी बाहेर पडत होती!गच्च भरलेला हॉल रिकामा होतं होता!माझ्या सोबत असणारे मित्र मंडळी आपापल्या दिशेला आपापल्या गावांना निघून गेली होती!माझं भडगाव तें पुणे लक्झरी बसचं बुकिंग संध्याकाळचं होतं!संध्याकाळ पर्यंत काय करावं प्रश्न होता!मध्येच मला आठवण येत होती प्रसिद्ध लेखक,कवी रमेशजी धनगर सरांची भेट घ्यावी कां?त्यांना फोन करून त्यांच्या गावी गिरडला जाऊन येता येईल कां भेटीला?? पुन्हा गझलकार विजयजी निकम यांची आठवण झाली त्यांच्याकडे जाता येईल कां धामणगावला?? पुन्हा प्रसिद्ध कवी, शायर गझलकार आदरणीय आप्पासाहेब शिवाजी साळुंके सरांची आठवण आली.. त्यांच्याकडे चाळीसगावला भेटावं आणि पुढे तसंच संध्याकाळी बसनें पुण्याला जावं!... कडक उन्हात ध्येय नसलेल्या, भरकटलेल्या मानसारखे झालं होतं!...सूर्यदेवानें तप्त तव्यावर उभे केलें होतं जणू!... विचार करता करता भडगाव बस स्टॅण्डवर येऊन पोहचलो!तोवर तिसऱ्या प्रहराला सुरुवात झाली होती!३-३०वाजले होते!🌷

स्टॅण्डवर देखील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होतीचं!प्रत्येकाने
स्वसंरक्षणार्थ डोकं,कान गमच्यानें बांधलं होतं!मी ही स्टॅंडवरील
संगमरवरी बाकडयावर येऊन बसलो!अन प्रवाशांचं येणं जाणं टिपू लागलो!खरंच प्रवास शिक्षक असतो बरं!खूप काही शिकायला मिळत असतं!माणसं एकत्र येण्याचं ठिकाण स्टॅन्ड असतं!प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामासाठी एसटीने धावपळ करीत असतो!लालपरीने प्रवासाचं ध्येय गाठीत असतो!स्टॅण्डवर विक्रेते देखील फिरत होते 
'थंडगार रस!चला थंडगार रस!थंडगार पाणी!प्या थंडगार पाणी'.. मध्येच न समजणाऱ्या कर्कश आवाजात बस कंट्रोलरं यांचा आवाज कानी पडतं होता!अनाऊंसिंग सुरु होतं होतं ,'भडगाव पाचोरा गाडी नं....लागलेलीं आहे!'
'भडगाव पारोळा गाडी नं....लागलेली आहे!'भडगाव जळगाव गाडी नंबर......लागलेली!'आपलं निरीक्षण चालूच होतं!🌷

लाल परी येत होत्या!जात होत्या!माणसं जात होती!येत होती!अशा गजबजलेल्या ठिकाणी कोणाचं मन एकचित्त होणार नाही?? सर्व काही दृश्य डोळयांतल्या दुर्बीणीतून ओढत होतो!टिपित होतो!.. अन काय चमत्कार झाला माहीत नाही!स्टॅंडवरील एका बाकड्यावर बसलो असतांना झोपेची गुंगी यायला लागली!मी ही झोपेला थांबवू शकलो नाही!एवढ्या वर्दळीच्या, गजबजलेल्या ठिकाणी त्यात बस कंट्रोलर साहेबांचा आवाज कानी पडतं असतांना मी निद्रेच्या आहारी गेलो!उठलो तेव्हा संध्याकाळचें ०६-००वाजले होते!🌷

माझी लक्झरी बस रात्री पावणे
आठला होती!आपली सॅक पाठीवर मारली अन स्टॅन्ड बाहेर पडलो!.. माणसं जाणायची,वाचायची, चेहऱ्याची-बिनचेहऱ्याची!चेहरा हरवलेल्या अन चेहरा घेऊन हिंडणारी माणसं नावाची मुखवटे वाचत होतो!पाहत होतो!प्रत्येक व्यक्ती पळतो आहे!जगण्याची भाषा बोलतो आहे अशी माणसं नजरेने टिपतो आहे!हृदयातल्या खोल खोल तळात पोहचवतो आहे!चेहरा असलेली, नसलेली माणसं मला भडगावच्या बस स्टॅंडवर वाचायला मिळाली!अनेक चेहऱ्यात हरविलेले चेहरे वाचत होतो!पाहत होतो!मी माणसातील माणुसपण वेचतो आहे!प्रवास मी करतो आहे!कधी माणसं शोधतो आहे तर कधी स्वतःलाचं शोधतो आहे!... माझाही एक चेहरा हरवलेला शोधतो आहे!इतरांसोबतं हरवत हरवत मी मलाच शोधतो आहे!🌷
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
***************************
💐💐💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
(सध्या भडगाव-पुणे प्रवासात)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१५ मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol