बापूसाहेब आणि वहिणीसाहेब ४१व्या विवाह दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

बापूसाहेब अन वहिनीसाहेब उभयतास हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी 

सेवापुर्ती!सेवानिष्ठा!आणि अथक परिश्रम म्हणजेच ४१वर्षांची सेवा!एक आदर्श सेवा!..सेवा आधार असतें!सेवा आत्मसंतुष्टी असतें!सेवा कार्याचा आत्मसन्मान असतो! ४१वर्षांची सेर्वांपूर्तीचं समाधान 🌷होतं!सेवेत काही राहून गेल्याची अतृप्ती देखील होती!बरेचसे हळवे क्षण तेथेच राहून गेल्याची हुरहूर  देखील होती!आज... आज आमचे बंधू मोठे बंधू आदरणीय श्री बापूसाहेब माळी खऱ्या अर्थाने 👍 सेवानिवृत्त झाले आहेत!🌹

.... ०७एप्रिल २०२३ रोजी श्री. बापूसाहेब माळी वयाच्या ६३व्या वर्षी 'ईगल बर्गमन' या जगदंविख्यात MNC कंपनीतून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेत!....अपार कष्ट,मेहनत,सचोटी,कामाप्रति निष्ठा, अशा अनेक सद्गुणांचं दर्शन आपल्या कार्यवृत्तीतून समोर ठेवलं!नोकरी लागल्यापासून अतिशय कष्टाने एक एक पायरी वर चढत  राहिले!कंपनीत वरच्या पदावर पोहचतं राहिले!म्हणूनचं.... बापूसाहेब वयाच्या ६०व्या वर्षां ऐवजी ६३व्या वर्षी अतिशय समाधानाने,आनंदाने,तृप्तीनें सेवानिवृत्त होत आहात!निष्ठेने केलेल्या कार्याची दखल कंपनीने ०३वर्षे वाढवून दिलें होते!हा बापूसाहेबांचा विशेष गौरव होता!🌹

आदरणीय बापूसाहेब खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत!आज १४मे रोजी त्यांच्या लग्नाचा ४१वा वाढदिवस देखील आहे!सौं आशा वहिनींच्या सोबत बापूसाहेबांनी ४१वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती!...म्हणजेच लग्न आणि नोकरी एकाच वर्षी लागली होती!लग्न आधी अन नोकरी नंतर असं काही दिवसांचं अंतर आहे!४१वर्षं म्हणजे जवळपास अर्ध शतक समजू या!

....आदरणीय बापूसाहेब आज आपलं वय ६३वर्षांचं आहे!दहावी पास झाल्यावर गावाहून फक्त अंगावरील कपड्यांवर आले होते!स्ट्रगलिंग लाईफ होत!आपल्याला गावाकडे पळून जावसं वाटत होत!घरी गरिबी तोंडं आं वासून उभी होती!माघारी फिरणे दुरापास्त होत!पुण्यात पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता!छोट्या मोठया खोल्यांमध्ये भाड्याने राहून!कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून,लहान मोठया वर्कशॉपमध्ये सुरुवातीला हेल्पर म्हणून काम करत होते!नंतर तेथेच लेथ मशीनवर काम करीत राहिले! पुढे ITI,NCTVT पास झाले!पुण्यातल्या सेंट जोशेप इन्स्टिटयूटमधून मेट्रोलोजी and ispection चां कोर्स पास झाले!.. अनुभव संपन्न झाल्यावर योगायोगानें आजची इगल बर्गमन पण त्या काळच्या sealol कंपनीत आपल्याला नोकरी मिळाली होती!कष्टाला फळ आलं होत!..आपली सेवा कंपनीसाठी अनमोल होती!आपली रोजी रोटी जीव की प्राण होती!आपण समर्पित भावनेने नोकरी करीत राहिले!कंपनी आणि स्वतःचा विकास करीत राहिले!वय आणि ज्ञान समृद्धीतं वाढ होत राहिली!शून्यातून येथवर पोहचलातं!यशाच शिखर गाठलंतं!आपले कष्ट, आई-दादांचा आशीर्वाद!थोरा मोठ्यांचा हातभार!साद!साथ यामुळे आपली सर्वांगीण प्रगती झाली!

कुणाशी स्पर्धा नाही!स्वतःशीच स्पर्धा होती!आपण खोल समुद्रातील नावेचे नावाडी होतें!निकराची झुंज यशाकडे नेत राहिली!कष्टाशिवाय यश नाही हे हे आपण जाणत राहिले!आम्ही सुद्धा कष्ट करणे आपल्याकडून शिकलो!आपली अनमोल सेवा उज्वल भवितव्याचं दार उघडतं होती!४१वर्षांच्या अथक परिश्रम आणि सौं.आशा वहिनींनी दिलेली ४१वर्षांची भक्कम साथ म्हणून आपण यशस्वी झालात आदरणीय बापूसाहेब आपण!म्हणूनचं उत्तम सेवा पार पाडीत अभिमानाने ६३व्या वर्षी निरोपासाठी उभे आहात!.. अन आज आपण खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त झाला आहात!🌷

आदरणीय बापूसाहेब!...सेवानिवृत्ती नंतरचं आपलं बोनस आयुष्य देखील अतिशय अनमोल असतं!जीवन अनमोल आहे!शरीर स्वास्थ्य अनमोल आहे!आपण आनंदी अन तणावमुक्त जीवन जगून वयाच्या १००रीं पार वर्षे आरोग्य संपन्न आयुष्य जगावे!ताण न घेता,ताण न देता!सकारात्मक भाव ठेवून सुखी जीवन जगावं!माणसाच्या मनातील सकारात्मक विचार दररोज वाढत राहिलेतं तर त्या विचारांचं अमृत बनतं असतं!आपण सकारात्मक भावनेला सदविचारांची जोडणी करीत पुढील सेवानिवृत्त आयुष्य आनंदाने जगावं!सभोवती आनंदाची बाग फुलवावी!बागेतली आनंदी, हसरी,उमलती फुल सर्वांना खुशाल वाटत राहावी!हसरे जीवन अनमोल आहे!तुम्ही अनमोल आहात!जगणं अनमोल आहे!🌷

आदरणीय बापूसाहेब!६३व्या वर्षी यश शिखरावर पोहचून सेवानिवृत्त झाला आहात!सकारात्मक भाव हृदयात जपून रक्त वाढ करून घेत राहावी!अनेकांचे दोष आपल्या नजरेत असतीलही!आपल्या हृदयात असतील ठाण मांडून बसले असेल!दोष गाळणीत गाळून सद्गुण झोळीत घेतं राहावे!सदगुणांच्या संगतीने दोषही पळून जातील!कोणी दुखवल असेल!दुखवायचा प्रयत्न केला असेल आपल्या विशाल आभाळा एवढ्या हृदयातून चुकलेल्यांनां उदार मनाने माफ करून टाकावे!सर्व कसं शांत, निरव,निर्मळ अन हलकं हलकं वाटतं राहील!धो धो पाऊस पडल्यावर आभाळ मोकळं होत असतं!आपलं मन देखील हलकं,ताण तणावमुक्त होईल!आदरणीय बापूसाहेब आज आपण रिटायर होत आहात!🌹

माणूस अनेक गोष्टीत गुरफटलेला असतो!अति लोभ!अति मोह!तिरस्कार!मत्सर..एखाद्या विषयी नकारात्मक विचार.. अशा दुर्गुण शक्तिमुळे आपण शक्तीहिन होत असतो!!नकारात्मक प्रभाव मनात सापासारखे विंचूवासारखे डुक धरून असतात!मनात नकोसा गाळ साचलेला असतो!वेळीचं नकारात्मक गाळ काढून टाकावा!उपसून फेकून टाकावा!निर्मळ स्वच्छ विचारांचा तलाव भरू द्यावा!सदविचारांची रामझोळी घेऊन आपण हिंडत रहा!झोळीतील "राम" प्रत्येकाच्या हाती देत रहा!वाटीत रहा!आनंदी हृदयात ईश्वर निवासाला आल्याशिवाय राहणार नाही!आज आपण रिटायर होत आहात बापूसाहेब!🌹

नोकरी निमित्ताने आपली नियमित सेवेतून मुक्तता झालेंली असली तरी कार्यबाहुले वृत्तीतून सुटी झालेली नाही!जीवनाची दुसरी  इंनिंग सुरु झालेली आहे!सौं आशा वहिनींची भक्कम साथ होती पुढेही त्यांची साथ राहील!... तरीही पुढील इंनिंग ही वाटली तर सोपी आहे!वाटली तर कठीण आहे!समजलं तर सहज सुंदर आहे!दुसऱ्या इंनिंगमध्ये आनंदी इंजेक्शन सोबत ठेवावे!हास्याचे इंजेक्शन सोबत ठेवावे!भावभक्तीने भरलेलं इंजेक्शन सोबत ठेवावे!इंजेकशन देतांना काही क्षणांची वेदना होईल, कळ येईल पण दुःखाला दारात फटकू देणारं नाही!सकारात्मक गोळया सोबतीला असू द्याव्यात!नकारात्मक दुखण्याला जवळ फटकूही देणारं नाही!बापूसाहेब मी आपल्या पेक्षा वयाने लहान आहे!पण आपणास लहानपणा पासून पाहत आलो आहे!आपण नाकासमोर चालणारे आहात!आता नाकावर डोळ्यांसाठी चष्मा आला आहे!वाढत्या वयासोबत अनेक क्लेशदायी नकारांना एखाद्या  दणकट पेटीत बंदिस्त करून ती पेटी कुठेतरी खोल दरीत फेकून द्यावी!..हलक्या आनंदाची झूळूक वहात राहील!बापूसाहेब आपण आता रिटायर झाला आहात!

जीवन पूर्वसकाळी..... सुखानंदाचं पिवळे तांबूस उगवत राहील!नवा सूर्य!नवा दिवस!नव सुख यां अमर्याद सृष्टीच्या गोंदनातं आपलं जीवन आनंदाच्या सुरमयी झोपाळ्यावर अलगद तरंगत राहील आदरणीय बापूसाहेब!आपल्या डोळयांतल्या असवांना थोडी वाट करून द्यावी!असवांचे ओघळ गालांवर निथळू द्यावेतं!आपलं कष्ट अन यश दोघांना एकत्रित अंघोळ करू द्यावी!
आसवांच्या खोल डोहात!आसवांचा पाऊस बरसु द्यावा!मनसोक्त रडून मन हलके करावं!मन निर्गुण सगुणाकडे वाटचाल करतं राहील!सगळं सगळं कसं निर्गुण निराकार अन सगुण साकार वाटेल!बापूसाहेब आपण आता रिटायर झालेले आहात!🌹

जेव्हा सर्व नकारात्मक परकं वाटतं तेंव्हा सकारात्मकतेचा जन्म होत असतो!... मग "मी मी अन मीचं" विरघळून नष्ट होतं राहात!हृदयातल्या खोल मशागत केलेल्या मातीत नवी पालवी फुटत राहील!...मग आपल्याला कळू लागतं..अरेच्च्या आता पर्यंत कुणासाठी जगत होतो आपण? येथूनच मग स्वतःसाठी रक्त शुद्धीचं जगणं सुरु होतं!मन शुद्धीचं जगणं सुरु होतं!उभट चढाच्या शिखरावरून वाट काढीत वाटचाल सुरु होते!वय अन चढ-उताराचा सामना करीत सुखकर आयुष्याच्या वाटचालीस मग रिटायर्मेंटचां थांबा म्हणावा का?बापूसाहेब आपण रिटायर झाला आहात!६३व्या वर्षी आनंदाने रिटायर झाला आहात!

आपणास १०० वर्षांचं आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो!माझं स्वतःचं आयुष्य देखील आपणास मिळो!आपण आनंद सुखाच्या रस्त्यावर चालतं बस्स आम्हाला आशीर्वाद देत राहावे हिचं त्या परमपित्या ईश्वराकडे प्रार्थना करतो!सेवानिवृत्तीच्या हृदयातून शुभेच्छा देतो!आपलाच लहान भाऊ... नानाभाऊ !🌷
***********************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
.. नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
दिनांक-१४एप्रिल २०२३
मो.नं-९९२३०७६५००

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)