परवास पांटाभरी आनभव से
परवास पांटाभरी आनभव से
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
.... नानाभाऊ माळी
...परवास मज्याना ऱ्हास!कव्हयं कज्यानां ऱ्हास!परवास सुख-दुखनं काली-कुली संगयेंलं,भरेलं गोंटं ऱ्हास!गोंटानीं चुंगयी नेम्मन सुतयीघायी भांदी कायेजनां आंधाऱ्या खोल खड्डामां फेकी देवो! लोंचं-पापडनां मायेक तोंडंलें लायीलायी खावालें पुरावत ऱ्हावो!आपली थाटीम्हा गंजजं जिन्नसं
ऱ्हातंस!शाक,भाकरी,लोंचं, पापड, खुडा,कांदा,....आखो गंजजं
ऱ्हास!याम्हा शाक-भाकरी काला मोडीमाडी खात ऱ्हावानं ऱ्हास!..बाकींना आपली चटोरी जीभलें-तोंडंलें जिन्नस निस्ता चवगुंता,पानी सुटागुंता ऱ्हातस!आपन आक्सी परवास करत ऱ्हातस!नवनव्वा,वाला-वाला आनभवनां संग्रो आपला जिंदगीम्हा वंगननं काम करत ऱ्हास!आनभव घसायेलं वंगन ऱ्हास!दिखालें कायेमटकं दिखस पन हावू दांडगा आनभव खजिना ऱ्हास!मी भी आक्सी दूरदूर,लामेनन्हा परवास करत ऱ्हास!कव्हयं एसटीम्हा,कव्हयं लकझरी बसम्हा,कव्हयं खाजगी गाड्यास्वर!.. जे भेटन ते!.. आपला कार्यभार उरकायी मव्हरे पयेत ऱ्हावो!हार एक परवास शिकवनीनां गुरुजी ऱ्हास!खजिना ऱ्हास!🌹
.....परवासनां खजिना भालकूतं ऱ्हास!डोयांनीं दुर्बीनंघायी आनभवनां लेखा जोका व्हडी टिपत ऱ्हावो!कव्हयं चांगलं दिखस!कव्हयं वांगलं दिखस!बठ्ठ खरबेल बट्ट गोया करीस्नी संगे ठी लेवो!बाकीनं बरबट,खरघटं फेकी मव्हरे निंघी जावो!परवासम्हा कोन तोंडं झोडंसं ते कोन आंग झोडंसं!कोन तें बयजबरी गये पडी झगडालें आंगवर येत ऱ्हातंस!कव्हयं एसटी निंघी जास!जठे जावानं ऱ्हास तें टई जास!मंग मातर मनन्ही 'व्हई' हुभी ऱ्हायी जास!तव्हयं मंग व्हईम्हा बयेत ऱ्हानं पडस!कव्हयं मव्हयं तें एकाएक आंगवर आनंनंन्हा ढोका भुधूमकरी पडस तव्हयं आपन वल्लाचिंब व्हयी नाचतं ऱ्हातस!आखेर हावू जिंदगीनां परवास गाडीवर बट्ठी चालूचं से!
परवासम्हा मी गंजजं सावा भुंजायी जायेल से!खुंदाई जायेल से!रुंजाई जायेल से..पन आजून परवास काय सुटना नयी!... पहिले एसटीवर परवास ऱ्हाये!आते जपीस्नी लकझरी बसवर जावो!न्यामिना आनभव ऱ्हास!पुनें तें धुयें लकझरी बसनां गंजजं आनभव सेतस!त्या जिंदगीना डबोलं सेतस!शिरीमंतीनां निय्यगार पाने सेतंस!डोयांमव्हरे आठनुक व्हयनी कां सुख-दुःखनां या पांटा हिरदले कव्हयं कोल्ल-वल्ल करी सोडतस!आपुन हासी लेवो!कव्हयं एकलाचं कोपरे रडी लेवो!मी कच्चा हिरदनां से!.. या आनभव डोयालें टचकनं पानी काढतंस!आज भी मी रातले पुणे-धुये लकझरी बसम्हा बठेल व्हतू!...आते मव्हरे शिंदखेडा जायी ऱ्हायनु!धुळे-शिंदखेडा एसटीम्हा बठी मांगली आठनुक काढी एसटीनां खिडकिंभाहेर दखी डोया वल्ला करी ऱ्हायनु!🌷
गंजजं पांटा सेतस!एक एक करी हुगडी दखो!एसटी डोयांम्हायीन हिरदम्हा उतरी जास!एक एक आनंभवनं पांट लिखूशी वाटस!डोये दखेल!संगयेलं बठ्ठ बठ्ठ आपला मव्हरे वाटूशी वाटस!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०३मे २०२३
Comments
Post a Comment