एसटी अर्ध्या तिकिटाची कमाल
एसटी अर्ध्या तिकिटाची कमाल
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी
इकडं पाहावं तिकडं पाहावं
मला बायाचं बाया दिसतांत
काम वाटुनी नवऱ्याला खुशाल
एसटीत जाऊन बसतांत!
एकट्या दुकट्या बाप्यालाही
नाही बसायला जागा उरली
.......एसटी भरते महिलांनी
साऱ्यांनी गावाची वाट धरली
शूर नारी झालीच भारी
रोज एसटीने करतेय वारी
अर्ध्या तिकिटावर भरते भारी
साऱ्या बायांची मजाच न्यारी!धृ!
बायांची होते,धावपळ भारी
साऱ्या येऊन थांबतात जरी
नवरा बनवून देतो न्याहारी
स्वतः पोहचवूनी देतो द्वारी!!
लग्न सोहळ्यात दिसते नारी
नवरा वाढवूनी बसलाय दाढी
कधी माहेरी दिसतेय नारी
धुराळा उडवीत पळते गाडी!!
बाई घालुनी बसलीय मांडी
नवरा घासत बसलाय भांडी
महिला पाडतं आहेत धाडी
कशी एसटीत फिरते लाडी!!
पूर्ण एसटीत दिसतेय नारी
अर्धे तिकीटाची कमाल भारी
सु..शी धुत बसलाय घरी
नवरा ओढीतो पाळणा दोरी!!
गावं गल्लीच्या बाया साऱ्या
एसटीने करुनी येती वारी
नटून थटून निघती साऱ्या
...नवरा खातो घरी खारी!!
बायको लावते लाडी गोडी
नवरा घेऊनी देतो साडी
नटून थटून ही निघते लाडी
धावते एसटीची लाल गाडी!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०६एप्रिल २०२३
Comments
Post a Comment