सेवापुर्ती शुभेच्छा बापूसाहेब
सेवापूर्ती शुभेच्छा बापूसाहेब
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी
सेवापुर्ती!सेवानिष्ठा!आणि अथक परिश्रम म्हणजेच ४०वर्षांची सेवा!सेवा आदर्श असतें!सेवा आधार असतें!सेवा आत्मसंतुष्टी असतें!सेवा सन्मान आहे कार्याचा!आज ४०वर्षांची सेर्वांपूर्ती होती!.. समाधान अन काही राहून गेल्याची!सोडून दिल्याची हुरहूर होती!..आज आमचे बंधू मोठे बंधू आदरणीय बापूसाहेब माळी सेवानिवृत्त झालेत!🌹
...आज दिनांक ०७एप्रिल २०२३ रोजी आमचे मोठे बंधू आदरणीय श्री. बापूसाहेब माळी वयाच्या ६३व्या वर्षी 'ईगल बर्गमन' या जगदंविख्यात MNC कंपनीतून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत!....अपार कष्ट,मेहनत,सचोटी,कामाप्रति निष्ठा, अशा अनेक सद्गुणांचं दर्शन आपल्या कार्यवृत्तीतून दिसून येत आहे!कष्टाने एक एक पायरी वर चढत कंपनीत वरच्या पदावर पोहचतं राहिलेत!म्हणूनचं वयाच्या ६०व्या वर्षां ऐवजी ६३व्या वर्षी अतिशय समाधानाने,आनंदाने,तृप्तीनें सेवानिवृत्त होत आहात!🌹
....आज आपलं वय ६३वर्षांचं आहे!आपली सेवा कंपनीसाठी अनमोल होती!आपली रोजी रोटी जीव की प्राण होती!आपण समर्पित भावनेने नोकरी करीत राहिले!कंपनी आणि स्वतःचा विकास करीत राहिले!वय आणि ज्ञान समृद्धीतं वाढ होत राहिली!शून्यातून येथवर पोहचलातं! यशाच शिखर गाठलं!आपले कष्ट, आई-दादांचा आशीर्वाद!थोरा मोठ्यांचा हातभार,साद,साथ यामुळे आपली सर्वांगीण प्रगती झाली!कुणाशी स्पर्धा नाही!स्वतःशीच स्पर्धा होती!आपण खोल समुद्रातील नावेचे नावाडी होतें!निकराची झुंज यशाकडे नेत राहिली!कष्टाशिवाय यश नाही हे आपल्या कडून शिकलो!आपली अनमोल सेवा आज निरोपासाठी उभी होती!.. आज आपण सेवानिवृत्त झाला आहात!🌷
आदरणीय बापूसाहेब!...सेवानिवृत्ती नंतर आपलं बोनस आयुष्य देखील अनमोल आहे!जीवन अनमोल आहे! शरीर स्वास्थ्य अनमोल आहे!आपण आनंदी अन तणावमुक्त जीवन जगून वयाच्या १००रीं पार वर्षे आयुष्य जगावे!ताण न घेता,ताण न देता!सकारात्मक भाव ठेवून सुखी जीवन जगावे!माणसाच्या मनातील सकारात्मक विचार दररोज वाढत राहिले तर त्या विचारांचं अमृत बनतं असतं असं ऐकून आहे!आपण सकारात्मक भावनेला सदविचारांची जोडणी करीत पुढील सेवानिवृत्त आयुष्य जगावं!आपण आनंदाची बाग फुलवावी!बागेतली आनंदी, हसरी,उमलती फुल वाटीत राहावी!
आदरणीय बापूसाहेब!६३व्या वर्षी यश शिखरावर पोहचून सेवानिवृत्त झाला आहात!पुढे आपण सकारात्मकता भाव हृदयात जपून रक्त वाढ करून घेत जावे!अनेकांचे दोष आपल्या नजरेत असतील!आपल्या हृदयात असतील!दोष गाळणीत गाळून सद्गुण झोळीत घेतं राहावे!मग सदगुणांच्या संगतीने दोषही पळून जातील!कोणी दुखवल असेल,दुखवायचा प्रयत्न केला असेल आपल्या आभाळा एवढ्या हृदयातून चुकलेल्यांनां उदार मनाने माफ करून टाका!सर्व कसं शांत, निरव,निर्मळ अन हलके वाटेल!धो धो पाऊस पडल्या आभाळ मोकळं होऊन हलकं होत!आपलं मन देखील हलकं,तण मुक्त होईल!आज आपण रिटायर होत आहात!🌹
माणूस अनेक गोष्टीत गुरफटलेला असतो!अति लोभ!अति मोह!तिरस्कार!मत्सर..एखाद्या विषयी नकारात्मक विचार.. अशा दुर्गुण शक्तिमुळे आपण शक्तीहिन होतो!नकारात्मक प्रभाव मनात सापा सारखे डुक धरून असतात!मनात नकोसा गाळ साचलेला असतो!वेळीचं गाळ काढून टाकावा!उपसून टाकावा!निर्मळ स्वच्छ विचारांचा तलाव भरू द्यावा!सदविचारांची रामझोळी घेऊन आपण हिंडत रहा!झोळीतील "राम" प्रत्येकाच्या हाती देत रहा!वाटीत रहा!आनंदी हृदयात ईश्वर निवासाला आल्याशिवाय राहणार नाही!आज आपण रिटायर होत आहात बापूसाहेब!🌹
नोकरी निमित्ताने आपली नियमित सेवेतून मुक्तता झालेंली असली तरी कार्यवृत्तीतून सुटी झालेली नाही!जीवनाची दुसरी इंनिंग सुरु होईल!ही इंनिंग वाटली तर कठीण आहे!समजलं तर सहज सुंदर देखील आहे!दुसऱ्या इंनिंगमध्ये आनंदी इंजेक्शन सोबत ठेवावे!हास्याचे इंजेक्शन सोबत ठेवावे!भावभक्तीने भरलेलं इंजेक्शन सोबत ठेवावे!देतांना काही क्षणांची वेदना होईल पण दुःखाला दारात फाटकू देत नाही!सकारात्मक गोळया सोबतीला असू द्याव्यात!नकारात्मक दुखणं जवळ येऊ देणार नाही!मी आपल्या पेक्षा लहान आहे!पण आपणास लहानपणापासून पाहत आलो आहे!आपण नाकासमोर चालणारे आहात!आता नाकावर डोळ्यांसाठी चष्मा आला आहे!वाढत्या वयासोबत अनेक क्लेशदायी नकारांना एखाद्या दणकट पेटीत बंदिस्त करून ती पेटी कुठेतरी खोल दरीत फेकून द्यावी!.. आपण आज रिटायर होत आहात!
सुखानंदाचं पिवळे तांबूस उगवत राहील!नवा सूर्य!नवा दिवस!नव सुख यां अमर्याद सृष्टीच्या
गोंदनातं आपलं जीवन आनंदाच्या सुरमयी झोपाळ्यावर अलगद तरंगत राहील आदरणीय बापूसाहेब!आपल्या डोळयांतल्या असवांना थोडी वाट करून द्यावी!असवांचे ओघळ गालांवर निथळू द्यावे!आपलं कष्ट अन यश दोघांना एकत्रित अंघोळ करू द्यावी असवांच्या डोहात!असवांचा पाऊस बरसु द्यावा!मन निर्गुण सगुणाकडे वाटचाल करेल तोवर!सगळं सगळं परकं वाटेल!... आज आपण रिटायर होत आहात बापूसाहेब!🌹
जेव्हा सर्व नकारात्मक परकं वाटतं तेंव्हा सकारात्मकतेचा जन्म होत असतो!... मग "मी मी अन मीचं" विरघळून नष्ट होतं!हृदयाला नवी पालवी फुटते!मग कळतं..अरेच्च्या आता पर्यंत कुणासाठी जगत होतो आपण!रक्त शुद्धीचं जगणं सुरु होतं!मन शुद्धीचं जगणं सुरु होतं!उभट चढाच्या शिखरावरून मग वाटचाल सुरु होते उताराकडे!... वय अन उताराचा सामना करीत सुखकर आयुष्याच्या वाटचालीस मग रिटायर्मेंटचां थांबा म्हणावा का?
आदरणीय बापूसाहेब आपण आज सेवानिवृत्त होत आहात!आपणास १०० वर्षांचा आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो!माझं स्वतःचं आयुष्य देखील आपणास मिळो!आपण आनंद सुखाच्या रस्त्यावर चालतं बस्स आम्हाला आशीर्वाद देत राहावे हिचं त्या परमपित्या ईश्वराकडे प्रार्थना करतो!सेवानिवृत्तीच्या हृदयातून शुभेच्छा देतो!आपलाच लहान भाऊ... नाना!🌷
***********************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
.. नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
दिनांक-०७एप्रिल २०२३
मो.नं-९९२३०७६५००
Comments
Post a Comment