मरणा आधी सावध व्हावे आपले स्वहीत करून घ्यावे 💐💐💐💐💐💐💐 ********************* ... नानाभाऊ माळी जगणं परम साध्य आहें!जन्म मिळाला हे खरं आहें!त्यात मनुष्य जन्म मिळाला हे सर्वात मोठ भाग्य आहें!माणूस म्हणून जन्माला आलो हे भाग्यातील मोठं भाग्य आहें!जन्म मिळणं, आणि त्या नंतर जन्मानंतर मरण निश्चित आहें!मरण कसं असावं बर?सहज साध्य मरण जगणं सुकर असतं!आनंद देतं,सुखं पेहरीत, आपलं जीवन कोणाच्या कामी येत असेल असं जीवन जगून मनाची तृप्ती अन समाधानी जीवन जगत असतांना मरण आलं तर तें मरण यशस्वी जीवनाची इतिश्री असतें!अशा अनेक व्यक्ती त्यातून पार होतं गेल्या!चांगलं तें देऊन गेले!कोणी तत्वचिंतकं असेल!कोणी साधा शेजारी पण परोपकारी आणि सतत आपल्यासाठी धावून येणारा व्यक्ती असेल तर अशा व्यक्ती जीवनहित साधून निघून जातात!इतरांच्या काळजात नाव कोरून निघून जातात समाधान संत सानिध्यानें होतं असतं!संतांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनातून आपण समाधानाच्या जवळ पोहचत असतो!तत्वचिंतक अन संत सतगुणांचा प्रचार करीत असतात!आपण सदगुणांच्या संगतीत जातं राहिलो तर,आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळतं राहिलं!मग आपला जन्म सिद्ध करण्...
Comments
Post a Comment