कविता कवितेशी एकरूप होतांना

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कविता कवितेशी एकरूप होतांना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी 

.........जन्माला येणारा रडत येत असतो!जन्म जीवनाचं विशाल द्वार असतं!बाळ जन्माने आई परिपूर्ण होतं असतें!नात्यागोत्यातील सर्वांना आनंद होतं असतो!बाळ जन्माचा आनंद साजरा केला जात असतो!बाबा आनंदित होतात!आजी खुश होते!बाळाचे वडील अत्यानंदित होतं असतात!आईला आईपण मिळाल्याचं सार्थकी वाटतं असतं! एका जन्मागमनाने घराला घरपण आलेलं असतं!जन्म उगवत्या आगमनाचं नाव असतं!जन्म घेणाऱ्या प्रत्येक घरातील उगवत्या फुल कळ्यांना नविन्याचीं ओढ असतें!ध्यास असतो!कुतूहल असतं!त्याचं प्रत्येक स्पर्शाशी नवी ओळख होतं असतें!नवागताचं नवपण
लाडकोडाचं असतं!नव नव शिकून पुढे वाटचाल सुरु होतं असतें!एक वर्षांच झाल्यावर पहिला वाढदिवसाचं आगमन होतं!दिवस,महिना,बारा महिने त्यालाच एक वर्षं म्हणतात!बाळ एक वर्षांच होतं!🌹

बाळ स्वतःच्या हाताने खायला शिकत असतं!सेकंदानी,मिनिटांनी, तासांनी,दिवसांनी, महिन्यांनी अन एक वर्षांने बाळ वाढत राहत!शिकत असतं!बघत असतं!अवलोकन करीत असतं!त्याचीं संस्काराची पहिली शिकवणी आई घेतं असतें!आईच्या कुशीतल्या विश्वातं रमत असतो!नंतर वडिलांच्या पाठीमागे लागून पळत राहतो!त्याच्या बालसुलभ खोड्या चालूच राहातात!त्याला सर्वचं नवीन असल्याने उत्सुकतेपोटी वस्तूंची उंड साडं चालुच राहते!त्याच्या बालसुलब निरागस स्वभावाचीं ओढ सर्वांना लागलेली असतें!🌷

बाळ वाढत असतं!घडत असतं!भांडत असतं!लढत असतं!काहीतरी  घडतं असतं!वय वाढत असतं!कधी पडत असतं!पडता पडता उठूनी काहीतरी मोडत असतं!.. वर्षं धडाधड जात असतात!संस्कारांनी, वर्षांवर्षांनी शरीर अन वय वाढत असतं!वाढदिवस प्रतीवर्षी जन्माचं सार्थक करीत असतो!त्यात महिला असेल,तरुणी असेल तर जन्मदिवस जीवनसार बनून जातो!

मुलगी!तरुणी!महिला या हृदयानें कोमल असतात!अफाट सहनशक्ती घेऊन जन्माला येत असतात!क्षणोक्षणी सहन करीत प्रसंगाशी तडजोड करून तोंड देत असतात!त्यातून शिकत नाते,समाज, धर्माचरण करीत असतात!मुलगी जन्माचं सार्थक करीत असतात!अशा माय मायमाऊलीचा वाढदिवस असेल तर? ज्या माय माऊलीस धनाची पेटी म्हणून संबोधतांत!कन्या लक्ष्मी असतें!तिचा वाढदिवस असेल तर?प्रत्येक क्षणी जीवनात रंग भरणारी महिला मानवी समाजाचा ध्यास आणि आसं असतें!तिच्यातूनचं जन्म सिद्धांताचा जन्म झाला असं म्हणावे लागेल!अशा 'स्त्री'चा जन्म रोज होतं असतो!तिचा वाढदिवस दररोज साजरा झाला पाहिजे!अशाचं एका माय माऊलीचा वाढदिवस होता!गुरुवारी २७एप्रिल रोजी एका कर्तृत्ववान महिलेचा वाढदिवस होता!एका जिगरबाज स्त्रीचां वाढदिवस होता!कवियत्री,साहित्यिक कविताई काळे यांचा वाढदिवस होता!🌹

माणसाला एखादी गोष्ट सहज प्राप्त झाली तर तिचं मोल नसतं!स्वमेहनतीने मिळविलेलं धन अनमोल असतं!धन असो वा पुरस्कार दोन्ही अनमोल असतात!सतत साधना आणि समर्पणातून यश प्राप्त होतं असतं!कविताताई काळे गझलकारा कवियत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत!त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटत गेले!अखंड शब्द साधना आणि रियाज यातून त्यांची कविता फुलत गेली!महिला म्हणून काही मर्यादा असतात तरीही आपल्या साहित्य साधनेत रममान असलेल्या कवियत्री कविताताई आपल्या कवितेतून समाजाचां आरसा दाखविण्याचं महान कार्य करीत आहेत!यश मेहनतीवर बसलेलं असतं!नाहीतर तें कुठेही फरार होईल म्हणून आई- वडिल,गाव,समाजाचं जीवंत चित्रण आपल्या लेखणीतून उतरवणाऱ्या कविता ताई सतत जमिनीवर राहून यश शिखर गाठीत आहेत!🌹

ज्ञानजोत लावणाऱ्या कवियत्रीचा वाढदिवस वैशाख वणव्यातील!कडक उन्हाळ्यातील!२७एप्रिल गुरुवार रोजी होता!आचार विचारांच्या तप्त भट्टीत चटके घेतं उभ्या असलेल्या कविताताई, हृदयातील कवितेचा हुंकार बनतं आहेत!आपल्या जीवन अनुभूतींचा डोळस धांडोळा रसिकांसमोर ठेवतांना कधी त्यांना गहिवरून येत असतं!कधी अंतःकरणातील बोल ओठावर येत असतात!शब्दरूप घेतं कविताताई आपल्या कंठ-सुरातून गात असतात!कविता कविता राहतं नाही!कविता प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसते!🌷

कविताताई कविता लिहितांना आणि गातांना कवितेशी एकरूप होऊन जातात तेव्हा कवितेतील शब्द अंतरीच्या खोल कप्प्यात जाऊन बसत असतात!ती कविता एकट्याची राहात नाही!ती सार्वजनिक होते!मनामनाचीं होते!कधी कधी आपल्या आरोग्याशी दोन हात करणाऱ्या कवियत्री 'झुंजार'होत जातात!लढाई लढतांना प्रतिभेला आवाहन करीत शब्द त्यांच्या जवळी घुटमळू लागतात!शब्द अर्थ घेतं कविता जन्म घेऊ लागते!कविता मनात जाऊन बसते!रसिकांच्या हृदयातील होते!

कविताई काळे आपल्या कवितेत जीवन रस ओतून समाज प्रबोधन करीत आहेत!कवी मानवी मनाचा ठाव घेतं सत्यस्वरूप समाजासमोर ठेवत असतो!जीवन मूल्यांचं दर्शन करून देत असतात!कविताताई आपल्या रचनेतून नवीन ओळख निर्माण करीत आहेत!प्रत्येक व्यक्तीच्या नातेसंबंधातील धागे व्यस्थित विनवून घेतं आहेत!जगण्याचीं कवितारुपी अमृतकुपी रसिकास भेट देत आहेत!अशा प्रतिभासंपन्न कवियत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो!अन आम्हा रसिकास आपल्या कवितांचा अर्थगर्भ सार प्राप्त होतं राहो!याचं शुभेच्छा!
*************************
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२९एप्रिल २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol