पांडे पेडगावचे धर्मवीरगड (चला जाऊया गड किल्ल्यांवर )

🌹🌹🌹🌹🌹🌹
पांडे पेडगावचं धर्मवीरगड
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी 

....चला जाऊया गडकिल्ल्यांवर!..
या संस्थेचे संस्थापक श्री बागूल साहेबांच्या सोबत ८२मावळे दोन बसेस मधून आज सकाळी सोलापूर रोडवरून निघाली!.... अन अन किल्ला पाहून इतिहास जीवंत झाल्याचं पदोपदी जाणवत होतं!छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य डोळ्यातून टिपून घेतं होतो!... डोळ्याच्या नजरांतून गतइतिहास हृदयात साठवत होतो!स्फूर्ती घेतं होतो!🌷

.........पडक्या अवस्थेत इतिहास जीवित ठेवणारा धर्मवीरगड रक्ताळलेला आहे!शूर,पराक्रमी,योद्धा धर्मवीर, एकवचणी,कवी महान राजाचं, छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त येथे सांडलं आहे!रक्ताचा एक एक थेंब शोषणारा क्रूरकर्मा औरंगजेब होता!धर्मवेडा होता!भारतीय संस्कृती उध्वस्त करण्याच्या इराद्याने दक्षिणेत आल्यावर परत दिल्ली तक्तही पाहू शकला नाही!माथेफिरू बनून मराठ्यांच्यां नाशासाठी आलेला बादशहा स्वतः याचं मातीत पुरला गेला!मराठ्यांच्या तिरस्कारास पात्र ठरला!अखंड महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृती रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताचा एक एक थेंब धर्मवीर गडात शौर्याची ओळख करून देत असतो!त्यांचं सांडलेले रक्त प्रत्येकाला जगण्याची दिशा देत आहे!ऊर्जा देत आहे!त्यांच्या मर्दपणाची ओळख करून देत आहेत!शूरवीर,पराक्रमी प्राचीन धर्मासाठी लढण्याची मशाल हाती देत असतात!धर्मवीरगड जीवंत माणसातील स्फूर्ती आहे!🌹
🌹🌹🌹🌹💐🌹🌹🌹

किल्ले!दुर्ग आणि गड मानवी मनाला सतत अनाकलनीय वाटत आले आहेत!तेथील ऐतिहासिक घटना स्मरणरूपात आपल्याला साद घालीत असतात!कधी आव्हान देत आल्या आहेत!कधी कट कारस्थानांची रक्तरंजित ठिकानं देखील वाटत आले आहेत!राजसत्ता सत्ता गाजविण्यासाठीचं उदयास आले असतील!किल्ला-गडावरील इतिहास कधी शौर्याने,कधी रक्ताळलेला देखील आहे!कधी रक्त सांडले आहे!तर कधी रक्तपिपासू देखील या ऐतिहासिक वास्तुने पाहिले आहेत!

महाराष्ट्रातील गड-किल्ले जवळपास ०७व्या तें १२व्या शतकात बांधली गेली असावीत अस इतिहासातील पुराव्यावरून समजत!अतिशय मजबूत तटबंदी!शत्रूला कधीही शरण नं जाणारें गड किल्ले कालांतराने यवनी आक्रमकांनी तेथील प्राचीन कलाकृती,मंदिरें उध्वस्त करून आपली संस्कृती लादण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे!सत्ता पिपासू परकी संस्कृतीने प्राचीन  संस्कृती पुसण्याचा प्रयत्न केला होता!🌹....

.......धर्मवीरगड (बहाद्दूरगड)हा अहमदनगर जिल्ह्याच्यां श्रीगोंदा तालुक्यातील पांडे पेडगाव या गावी असलेला भुईकोट किल्ला आहे!समुद्र सपाटीपासून ५७०मिटर उंचावर असलेला हा भुईकोट किल्ला प्राचीन संस्कृतीचा ठेवा आहे!भीमा नदीच्या काटावर, दक्षिणेकडील नगर जिल्ह्यात असलेला हा किल्ला आहे!यादव कालीन १३व्या शतकात बांधकाम केलेल्या या किल्ल्यात पाच मंदिरं आहेत!आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या,पडझडं झालेल्या मंदिरातील प्राचीन कलाशिल्प अतिशय सुरेख,सुंदर आणि हेमाडपंती आहेत!🌹

कालांतराने हाच भुईकोट किल्ला निजामापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पणजोबाकडे ताब्यात होता!नंतर निजामशाहीकडे अन पुढे मोघलांकडे गेला होता!शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सतत नऊ वर्षं मोघलांना नाकी नऊ आणणाऱ्या, सळो की पळो करून सोडणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अंतर्गत छंद फितूरिमुळे औरंगजेबाच्या कैदेत पकडले गेले होते!हिचं खरी शोकांतिका ठरली होती!कोकणात ताब्यात घेतल्यावर  संभाजी महाराजांना पांडे पेडगाव अर्थात तत्कालीन बहाद्दूरगडावर आणले होते!🌷

औरंगजेबचा दूधभाऊ बहाद्दूरखान कोकलताश हा या गडाचा किल्लेदार होता!छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगजेबचीं छावणी अकलूजला होती,तेथून त्याने आपली छावणी बहाद्दूरगडावर हलविली!बहाद्दूरगड हे नाव त्या बहाद्दूरखानच्यां नावामुळे मिळाले असावे!संभाजी महाराजांचां छळ करत याचं गडावर आणले होते!

...या गडावर छत्रपती संभाजी महाराज,कवीमित्र कवी कलश यांना औरंगजेबसमोर घट्ट साखळदंड जखडलेल्या अवस्थेत हजर करण्यात आलं होतें!औरंगजेबाने अनेक प्रलोभनं दाखविली होती!कट्टर
धर्मप्रेमी संभाजी महाराजांनी सर्वचं प्रलोभने ठोकरली होती!नाकारली होती!त्यामुळे वेडापिसा 
चवताळलेल्या,चिडलेल्या
औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून,अत्याचार करून लाकडी ओंडक्याला बांधून धिंड काढली होती!क्रूरपणे अत्याचार करण्यात आले!तें ठिकाण हेचं धर्मवीरगड(बहाद्दूरगड)आहे!

  भीमा नदीच्या काठावरील पांडे पेडगावला असलेल्या या भुईकोट किल्ल्यातं संभाजी महाराजांचीं कातडी सोलली,हाता पायांची नखें काढण्यात आली,डोळे काढले  क्रूरकर्म्याच्या छळानंतरही धर्मवीर संभाजी राजे कुडीत जीव असें पर्यंत वचनाने जगले!आणि प्राणाची आहुती दिली!असें राजे पुन्हा होणे नाही!🌹

************************
💐💐💐💐💐💐💐💐
******************-******
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-३०एप्रिल २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)