प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी 

......चौफेर अंधःकार पसरलेला होता!कित्येक शतकांचा अंधार परंपरेने लादलेला होता!गावं उजेडातं होती!वेशीबाहेर काळाकुट्ट अंधार होता!उजेडासाठी याचना करणारे, धडपडणारे अंधःकारमय जीवन जगत होती!कित्येक शतकं अंधारातं यातनामय जीवन जगत होती!कित्येक शतकांपासून सुर्याचं दर्शन झालं नव्हतं!🌹

वेशीबाहेरील वस्तीत एके दिवशी अचानक अंधार कापित उजेड दिसू लागला होता!अंधारात खितपत पडलेल्यांना त्या दिवशी पूर्व दिशा कळली होती!अंधार पुढे सरकत होता!मागून उजेड पळत होता!उजेडाची सवय नसल्याने सर्वचं भांबावली होती!उजेड पुढे सरकत होता!उजेडाच्या दिशेने हळूहळू पिवळसर तांबूस छटा दिसू लागली होती!क्षितिज जेथे टेकले आहे त्या धरतीतून प्रकाशमय लाल गोळा वर येत होता!त्या प्रकाशित गोळ्यांचं नाव होतं ज्ञानसूर्य!त्या प्रकाशित गोळ्यांचं नाव होतं प्रज्ञासूर्य!🌹

अंधार पिटाळून प्रकाश देणारा सूर्य वर येत होता!तो दिवस होता १४एप्रिल!प्रकाशसूर्य वर वर येत होता!त्याच्या किरणांनी तिमिर दूर पळत निघालं होतं!प्रकाश सर्वदूर पसरत होता!त्याच्या तेजाने,प्रकाशाने अखंड विश्व प्रथमचं तेजळालं होतं!त्या ताऱ्याचं नाव होतं ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!

क्रांतीसूर्य!विश्वरत्न!बोधिसत्व!भारतरत्न!भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार!महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे!आज १४एप्रिल आहे!उन्हाळ्याचें दिवस आहेत!भूमी तप्त झालेली आहे!गावाच्या वेशीतून प्रवेश करीत गावं,शहर,राज्य देश अन विदेशात ख्यातकीर्त झालेले महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत!

अस्पृश्य जातीचा शिक्का!गरिबीचा विशाल डोंगर उभा!जगण्याची भ्रातं!!समोर जातींची प्रचंड मोठी दरी 'आ' वासून उभी होती!शिक्षण घेतांना यातनामय जगणं!सर्व विपरीत परिस्थितीत राखेतून उंच भरारी घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील पहिले उदाहरण असावेत!स्वप्नांचं विश्व विस्तारित होतांना वेदनेच्या हुंकाराला जगण्याचं बळ येत असतं अशा वेळेस नवनिर्मितीचं दालन उघडतं असतं!त्या निर्मितीचे दिग्दर्शक,निर्माता अन रक्ताचं पाणी करून वास्तव भूमिका साकारणारे महान तत्वज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते!आज त्यांची जयंती आहे!🌹

हजारो वर्षांनंतर अशा महान योग्याचा जन्म झाला होता!गरिबीत, अंध:श्रद्धेतं,लाचारीत,अर्धपोटी उपाशी,तिरस्कारयुक्त हीन नजरेतून आयुष्य वेचणाऱ्या अतिशूद्र, दलितांच्या,अस्पृशांच्याचं घरी जन्म घेणारा महाआत्मा त्यांच्याचं
उद्धारासाठी उभा राहतो!कडवी झुंज देत!अन्यायाला वाचा फोडीत ताठ मानेने उभे राहायला सांगणाऱ्या महामानवाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!🌹

'शिक्षण हे वाघिणीच दूध आहे' असं ठणकावून सांगणाऱ्या बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात कष्टाने अभ्यास करून अनेक पदव्या मिळवल्या!शिक्षण अस्तित्वाची जाणीव करून देत असतं!ज्ञानसंपन्न होतं जगण्याचा मार्ग दाखवीत असतं!भारतातून शिक्षण पूर्ण करून विदेशात अतिशय हलाकीत शिक्षण पूर्ण करीत तेथील विद्यापीठात नावलौकिक मिळविला!

ज्ञानसंपन्न अनेक व्यक्ती अनेक क्षेत्रात आपलं भाग्य अजमावून पाहत असतात!भरपूर पैसा कमावून स्वतःपुरते जीवन जगत असतात!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार केला असता तर तें विदेशात कुठेतरी स्वतःपुरते जीवन आनंदाने जगू शकले असतें!अनेक डिग्र्या खिशात घेऊन हिंडणाऱ्या व्यक्तीस अजून काय हवं असतं!या महामानवाने अत्यंत दरिद्री अन
व्यस्थेने नाकारलेल्या स्वतःच्या समाजासाठी आपलं जीवन अर्पित केलें होते!त्यांना शिक्षण नावाचं बाळकडू पाजित उभे करीत राहिले!

वंचित समाजाला न्याय मिळविण्यासाठी आयुषभर झटणाऱ्या या महामानवाने समतेचा, प्रज्ञाशिलतेचा,शिक्षणाचा मंत्र दिला होता!शिका,संघटित व्हा अन संघर्षातून समाजाची खऱ्या अर्थाने मुक्तता होईल असें तें म्हणत!त्या प्रमाणे वंचित समाज जागृत झाला आणि सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीला दिशा दिली होती!

कष्ट, मेहनत,शिक्षण,संघर्षांशिवाय दास्यत्वातून खरी मुक्ती मिळणार नाही म्हणून अवडबरं,जुन्या परंपरांचा विरोध करीत नवीन मार्ग शोधला त्या मार्गाचं नाव होतं बुद्धमार्ग!वैज्ञानिक रचनेवर उभा असलेला हा बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला!मार्ग बदलला होता पण जीवन समर्पण तेचं होतं बुद्ध वंदना!अशा धम्माचा अंगीकार करणाऱ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य कित्येक शतकांनंतर या भारतात उगवला होता!अंधःकारात खितपत पडलेल्या वंचित समाजासं अन्यायापासून, दस्यात्वातून मुक्त करून थांबला!🌹

गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरु मानणाऱ्या भारताचा लखलखणारा तारा प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२वी जयंती!कधी कधी साम्य असतं!भाग्यनें तें साम्य उदयास येत असतं!डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती ११एप्रि ची  आहे!१९६वी जयंती आहे!दोघेही भर उन्हाळ्यात जन्मले!अन दोघेही क्रांतीसूर्य-प्रज्ञासूर्य होऊन
समाज उद्धाराचं आभाळवून विशाल कार्य केलें!...🌹

प्रत्येक गोष्टीच शिल्प तयार होतं असतं!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते!आज ज्यांच्या घटनेप्रमाणे भारत वाटचाल करीत आहे अशा महामानवास!विश्वमानवास!
प्रज्ञासूर्यास!बोधीसत्वास त्यांच्या १३२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो!चरणावरती हृदयातल्या श्रद्धेनें माथा टेकवतो!
       🌹जयभिम🌷
**************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२८५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१४एप्रिल २०२३
  (१३२वी जयंतीनिमित्त)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)