आमचा राजा कुठे गेला?
आमुचा राजा कुठे गेला?
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*********************
... नानाभाऊ माळी
........शहराची सावली पांघरून मी गावी गेलो होतो!रणरणत्या शब्द उन्हातं मीचं घायाळ झालो होतो!चटके जाणवू लागतांना मी राबणारे पाहत होतो!घामातं चिंब भिजलेल्यांची गरिबी वाहत होतो!कोण होतो,काय होतो दारीं जात होतो ?दोन वेळच्या भुकेसाठी मी लाचार पाहत होतो!सुटा बुटातील सावली माझी मीचं वाहत होतो!आई वडिलांच्या उन वेदना एकटा गात होतो!🙏
शहराचं सुख पांघरून मी गावी गेलो होतो!शब्द शोधित कविता रांधित मी अक्षरं खेळीत होतो!अक्षराचे द्वार उघडोनी शब्द झाले होते!शब्द अर्थ सांगत सांगत मुठीत कोंबले होते!अंधार मुठीतला गुदमरणारा शब्द सुटण्यासं तडफडत होता!वज्रमुठीला आतुनी कोरीत सुरुंग लावित होता!अर्थबोधाच्या असाह्य मुठीला आव्हान देत होता!गलित गात्र असुनीही असाह्य उमेद घेतं होता!अज्ञानाची उघडूनि दरवाजे आत सूर्य उगवत होता!प्रकाश जाणीव गर्भगृहाला उजेड दाखवीत होता!फिरणारे ते अक्षर मुंगळे चावा घेतं होती!वेदनेच्या किंचाळ्यानीं खोल गर्भ फाटत होता!आई अधाशी ममतेची नवजन्म चाटत होती!🌹
सुटबुटातील काया घेऊनी गावी गेलो होतो!बोडक्या उन्हाच्या काळ्या मातीत लोळण घेतं होतो!भाजूनी स्वतःस जात्यातील दळण दळीत होतो!बोडके ते अपत्यहीन रान लोळण घेतं होतं!सुष्क ते पाणीविना पाने गळत होती!सृष्टी जणू कढईत टाकुनी पुरी तळत होती!फाटक्या कपड्यातील देह जळूणी खाक झाला होता!त्याचं देहाचा ताबा घेऊनी जीव गळूनी चालला होता!गावातील मुखवटे साथीला विधी चालला होता!अनेक टोप्या एक होता निधी बोलला होता!🌷
सुटबुटातील देह घेऊनी विधी पाहत होतो!गावाच्या सुष्कतेत अवकाळभेदी पाहत होतो!गावातील गावपण तें नवख्याने गात होतो!जन्मभूमीच्या देह यातना डोळ्यातं घेतं होतो!असा कसा रें अवकाळी तू शेती गहाण झाली!घराघरातील हृदयांत अनंत बाण छेदितं गेली!पाहू कुणाकडे सांग देवा यांचक आम्ही झालो!मालक आम्ही,दाता आम्ही जाचक तुम्हा झालो?सर्व जगाचा पोशिंदा रें हतबल आज झाला!सर्वव्यापी दान दाता आमुचा राजा कुठे गेला?असा कसा रें सृष्टीदाता यांचक आम्ही झालो!🌹
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२८एप्रिल २०२३
Comments
Post a Comment