आरोग्य मित्र सुनील डांगमाळी
आरोग्य मित्र सुनील डांगमाळी,नंदू जरांडे!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
....नानाभाऊ माळी
....जीवन शैली सुधारण्यासाठी चांगल्या गोष्टी स्विकारल्या पाहिजेतं !आहार विहार या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत!दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम व्यायाम आहे असं सूर्यनमस्कार तज्ञ आणि महिन्यातून ९०००सूर्यनमस्कार करणारे श्री.नंदू जरांडे यांनी शतायु जेष्ठ नागरिक संघात सांगितले!🌷
हा व्यायाम वयाच्या ८व्या वर्षां पासून ते ८०व्या वर्षांपर्यंत करू शकतात!आपल्यात ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते!आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार आहे असं उत्तम विवेचन श्री जरांडे यांनी सांगितले!🌷
देह चितेवर जातो!मानूस चालता बोलता जातो!असं टाळण्यास साधा,सोफा व्यायाम हा सूर्यनमस्कार आहे असें जरांडे म्हणाले!सोबत सात्विक आहार असावा आणि आपल्या आयुष्याची दोरी आपण स्वतः वाढवून घ्यावी!व्यायामात सातत्य ठेवावे!महिन्यातून ९०००हजार सूर्यनमस्कार करणारे श्री नंदू जरांडे आरोग्यसंपन्न जीवनासाठी आरोग्य रक्षक म्हणून कार्य करीत आहेत!🌷
त्यानंतर सायकलपट्टू आणि योगा शिक्षक श्री सुनील डांगमाळी यांनी आहार विहार या विषयी उत्तम विचार मांडले!'व्यायाम केला तरच जेवायचा अधिकार आहे' असं ते म्हणाले!२४तासातून कमीत कमी स्वतःसाठी दोन तास दिलेच पाहिजे!जेवन सकाळी राजकुमार सारखे,दुपारी राजासारखे आणि संध्याकाळी भिकाऱ्या सारखे जेवन असावे!असं ते म्हणाले!🌷
संध्याकाळी जेवन सूर्य मावळतांना झालं पाहिजे!जेवण आणि
झोपेमध्ये कमीत कमी दोन तासाचं अंतर असावे तरच रात्री झोप चांगली येईल!..आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपण योगा,व्यायाम आणि ध्यान धारणा अत्यंत आवश्यक आहे असं सुनिलजी बोलले!
सुदृढ मरण्यासाठी सुदृढ जगणे अत्यंत आवश्यक आहे!निरोगी शरीरासाठी वेळेवर जेवन,सात्विक जेवन ध्यानधारणा महत्वाची आहे!श्री सुनिलजी यांनी त्यांच्याकडील असलेल्या आरोग्य रक्षक पावडरींतून प्रयोग करून दाखविले!आरोग्य संपन्न जीवनसाठी जेवन आणि पाणी पिण्याचे योग्य सूत्र सांगितले!दुधाचा चहा हा विष आहे!ते प्यायंल्यास आपण आपल्या आरोग्याची हानी करीत असतो!जेवणात फळे आणि दूध योग्य प्रमाणात घेतलं तर उपायकारक आहे असं श्री सुनील डांगमाळी म्हणाले!🌹
आरोग्याविषयी नेहमीच सतर्क राहून आनंदित जीवन जगण्याचा उत्तम सल्ला देत असतांना व्यायाम ही जीवनाची शिदोरी आहे असं ते म्हणाले!आयुर्वेदिक शास्र जीवन संजीवनी आहे!त्याचा लाभ घ्या!स्वतःत बदल करा!आनंदात रहा असं सुनिलजी डांगमाळी म्हणाले!🌷
'पहाटे लवकर उठा!रात्री लवकर झोपा!सातत्याने व्यायाम करा!घरी बायका मुलांनाही वेळ द्या!... कार्य उत्तम करा!ड्युटी करा!'असं Y आणि Z सुरक्षा अधिकारी श्री आबासाहेब शिंदे सर म्हणाले!... देवाचं नाव घेतं स्वयंपाक केलात तर सात्विक जेवन मिळतं!पाच गुण आहेत..., 'शिक्षण, संस्कार,संगत,संघटन आणि आपलं अस्तित्व अशा उत्तम पंच गुणांचा उपाय म्हणजे जीवन आहे!... असं उत्तम विश्लेषण देत शिंदे सरांनी सांगितले!💐
💐💐💐💐💐💐💐
*********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
दिनांक-२३एप्रिल २०२३
Comments
Post a Comment