आखाजी
🌷।।आखाजी।।🌷
( भाग-०२रा)
**********
🌹🌹🌹🌹🌹🌹
*.....नानाभाऊ माळी*
आखाजी कडक उंडायांम्ह येस ! आखाजीन्या!...नवा सालन्या!.. बठ्ठा* *खान्देशी भाऊ-बहिनलें!मामा-काका,चुलता* *!* *आजला-आजलीस्ले!..मन्ह्या* *हिरदथिन हार्दिक शुभेच्छा!आवंनं* *साल बठ्ठास्ले आबादानीनं* *जावो हाईचं गवराई मायनां पायवर डोक ठेयी प्रार्थना* करसं!
खान्देशना सननी वयख आखाजी से!ती अक्षयतृतीया से!त्रेतायुगनी सुरुवातच आखाजी से!खान्देशनं नवं साल आखाजीचं से!गवराई म्हणजे पारबती माय से!संकर भगवान तिन्हघरनां मानोस से!देव से!घर-घरमा नवरा-बायकोना जोडा...संकर पारबतीनं रूप से!गवराई माहेरलें येस!आनंदम्हा माय-बापनाकडे!माहेरलें!..आंडेर येस!आखो थकवा काढी सासरले चालनी जास!
*आंडेर हायी गवराई से!म्हणीसनी आखाजी*
*खान्देशनी वयख से!खान्देशनं नवं* *साल से!लागता वैशाखलें* *आखाजी यी जास!ती गवराई मायनी* *वयख से!आंडेर-बेटीनी* *आखाजी से!शंकर भगवाननी* *पारबतीलें माहेरलें धाड व्हत!तव्हय* *फाईन आंडरी माहेरलें यी* *ऱ्हायन्यात!..तव्हयस्नी हायी* *रीत पडी जायेल से!आखाजी* *लागी जास!नवं साल लागी जास!घर-घर हारकी जास* *!खेती करालें शेतकरी मोक्या व्हई जास!*
भाऊ-बहिनीस्वन!
आखाजीलें खान्देशनं नवं साल लागी जास!वरीसना साडेतीन मुहूर्त!...साडे तीन मुहूर्तम्हायीन आखाजीलें आर्ध मुहूर्त म्हंतस!... प्रेम! आखाजी गोडवानां सन से!वाड-वडीलस्न डेरगं भरान!त्यासले जेवाडानं!नीव्वद दखाडानं!आगारीनां सन आखाजी से!पित्रेस्ना सन आखाजी से!गव्हारक्या!बकरक्यास्ना सालभरनां वायदा पक्का करानां सन से!सालदारनं साल ठरावतसं तो दिन आखाजीनां ऱ्हास!
*खेतीनां हंगाम सरी जास!हेरी तयलें लागी जातीस!उपसा-उपसा उपसी* *मोटरी पाणीन्या 'उलट्या' करत ऱ्हातीस!मोटर गुयीन्या टाकत ऱ्हास!ऱ्हायेलं-सूयेलं पानीलें मोटरी थायनाम्हा* फेकत ऱ्हातीस!..जमीन!.…जुवरीनां पापडेस्नागत व्हयी जातीस !हुंनं *वारग बठ्ठा पाला पाचोया उडाई लयी पयी जास!धरनीमायनं रूप* *निखरी जास!चैत मव्हरे वैशाख ऱ्हास!*
भाऊ-बहिनीस्वन!
.. मंग वैशाखनां उंडाया चटकाडस!आथ माहेरलें चटकाडस तथ सासरलें चटकाडस!यायी-यायीस्ले चटकाडस!दोन्ही ठिकानें धपाडस!दोन्ही ठिकाने हुपारा व्हस!आंडेर बेटीलें ...या हुपाराम्हा मंग माहेरनी याद येवाले लागी जास!याद ह्या हिरदना बोल ऱ्हातसं!याद आकसी आनंदम्हा येस!कुडापाम्हा भी येस!आंडेर माहेरना निरोपगुंता डोया लायी बठस!म्हणीस्नि आंडेर म्हणस ....
*माय बाप काय सांगू,*
*सेतस त्या कोसो दूर!*
*मन्हा दाटी येस उर,*
*तून्ह उघडं माय घर!*
*सवसारनां आठे,*
*माय हूबा से पसारा!*
*बिन जीवनां तयमये,*
*मन्हा चिडीनां पिसारा!*
*मन्हा माहेरनां समुंदर*
*बठ्ठा दुनियाथिन न्यारा!*
*नाव चालाये बाप...*
*सुटे थंडयगार वारा!*
*माय माहेरंनं आमरूद*
*सारं बलावस सुख!*
*हिरदयात दाटीयेल*
*नको लावू नां तू नख!*
*गवराई माय हुबी*
*गावनां दूर शिवलें!*
*माय बाप धाये पये*
*पोरलें लेव्हालें शिवले!*
*चितांग तोडाम्हा हुबी*
*माय वं गवराई.....!*
*पायघड्या टाकी*
*हूबा भाऊ मुऱ्हाई!*
*धव्या घोडानां रथ हूबा*
*त्याम्हां बसनी गवराई!*
*बंगयी झोका खेयी*
*गये दुःख भराई...!*
भाऊ-बहिनीस्वन!
...माहेरनी याद मव्हरे सन-पावन नां येलेंचं फिरीफिरी येत ऱ्हास!उंडायामा आखाजी तोंड मव्हरे यी जास!मुऱ्हाई आंडरीस्ले लयी येल ऱ्हातस!माहेर भरी जायेल ऱ्हास!हारकी जायेल ऱ्हास!आंडेरनं प्रेम!आंडेरनी माया साखरनां झिरांगत ऱ्हास!नितंय पानीगंत ऱ्हास!माहेर येयेल आंडरी म्हंतीस कशा .....दखा तुम्ही..!
*...,'काय सांगू माय,*
*आखाजीनां झोका!*
*आभायालें भेटनां,*
*वर जावानां व्हका!*
*फांटी नाचाडस वर*
*मनिं हिरकनी पोर...!*
*मन्हा माहेरनं सुख*
*बठ्ठ हारकन घर!*
*गवराईमाय आखाजी*
*पुरन लागे गुईचट*
*निव्वद गवराईलें ठेवा*
*तिले मांडेलं से पाट..!'*
आखाजीनां मव्हरे घरमा दोन-तीन दिन फायीन सांजऱ्या करानी गडबड चालू व्हई जास!सांजानां घम-घमाट दारे-दार येत ऱ्हास!गवराई मायना निव्वदगुंता दुसऱ्या धाकल्या संजोऱ्या तयेल ऱ्हातीस!पुडा तयेल ऱ्हातीस!
भाऊ-बहिनीस्वन!
. *...आखाजीना एक दिन मव्हरे बठ्या आंडेर-बेटी!पोरी....कुंभार दादानां घर* *टिपऱ्या खेयेत जातीस!कुंभार दादांनी माटीनां भगवान शंकर तयार* *करी ठेल ऱ्हास!आथा सुतार दादा लाकूडनी गवराई बनाडी* *देस!घडायी देस!माटीनां बनायेल भगवान शंकरलें पिव्या* *कपडाम्हा गुंढाई!सजाडी-सुजाडी!कपडा नेसाडी!मंग बठ्या पोरी* *टिपऱ्या खेयेत शंकरलें घर लयी येतीस!*
बठ्ठया आंडरी टिपऱ्या खेयेत!फुगड्या खेयेत घरे-घर गवराईमाय संगे शंकरलें जोडीमा पाठलावर बसाडतीस!दोन्हीसन्या गयाम्हा!टरबूज,डांगरन्या बियास्नि माय!बोरे,भुईमूगन्या शेंगा!धाकल्ल्या सांजऱ्यासन्या माया बनायी गवराई-संकरलें घालेलं ऱ्हातीस!दिनमावतलें शिया-सांजऱ्यास्ना निव्वद दखाडी आंडेर-बेटी मन लायी पूजा करतीस!...
*..रातभर संकर-गवराई मायना गयाम्हा त्या बठ्या माया मोतीस्ना* *हारनीमायेक चमकी- खुली दिखत ऱ्हातीस!...कैलास परबत बठ्या* *आंडरीस्ना माहेरलें उतरेल ऱ्हास!गवराई मायनं रूप आखो उजई* *जायेल ऱ्हास!माय लाकूडनी बंगयी वर बठेल ऱ्हास!गवराई मायनं रूप* *दखी..!पोरी हिरदायथिन दवडत जातीस ! आपलं डोक गवराई* मायनां पाय *वर ठेवतीस!*
भाऊ-बहिनीस्वन !
आंडेर-बेटी!...मायना गाना म्हनत ऱ्हातीस!नवा कपडा घाली!सजी-सुजी!या देवघरन्या पऱ्या टिपऱ्या!फुगड्या खेयेत चेष्टा मस्करी करत रहातीस
*...आखाजीनां दिन बठ्ठा गावंमा पुरन* *टाकेल ऱ्हास!खापरवर पुऱ्या शेकात ऱ्हातीस*
*कुल्लाया!भज्या!रसी-भात!आंबानां रस..अश्या पाच पक्वाननां सयपाक* *बनायेल ऱ्हास!*
.....आखाजीनं मोठं मुहूर्त ऱ्हास!बठ्ठ पाच-पक्वान.... माजघरमा नवी माटीनं घल्लावर!केळी-करावर ठेवतसं!त्यांवर धाकलस मडक! त्यांवर डांगर आनी डांगरवर खापरन्या पुऱ्या!कुल्लाया पापड ठेवतस!त्या मोठा घल्लावर पोरीस्नि धवी माटीवरी रांगोईनं नक्सी काम करेल ऱ्हास!त्यांनी पूजा-अर्चा व्हत ऱ्हास!काही घरेसमा आवन्न सालंलें कोणीतरी जात ऱ्हायंना ....ते त्यासन डेरग भरनं ऱ्हास!चुल्हामा बठ्ठा पित्रेसलें आगारी टाकी!मनोभावे निव्वद दखाडी घरमानां बठ्ठाजन जेवालें बठतस!आगारी टाकी जेवने व्हत ऱ्हातस!..
...जेवने व्हयी... गणज गावेस्मा आखाजीनां दिन पत्ता खेवानी चाल से!रीत-भात से!गावं गल्लीना गनज आट्टल!.. तीसमारखा पत्ता खेवाले बठतस!डाव वरथीन कव्हय उठो यानं भान ऱ्हात नई!खेनारसना दांगडो चालूच ऱ्हास!बठ्ठा पत्तास्ना अट्टल जुगारी एक दुसरालें भेटी गोया व्हयेल ऱ्हातसं!बठ्ठास्नी पत्तास्ना खेयम्हा येरायरलें गुताडी ठेयेलं ऱ्हास!हाई भी आखाजीनी वयेख सांगतस!
*भाऊ-बहिनीस्वन!*
*दुपारथिन....बठ्या* *आंडेरी-बेटी...नटतीस- थठतीस!नवीन कपडा* *!चितांग,तोडा,कड,कल्ला,गोट* *पाटल्या,बांगडया घालतीस!टिकली-पावडर लायी 'ऐण्या'* *घालतीस!गहू-मक्की कव्या धान्यांस्नि माय व्हईस्नि गावण्या बठ्ठया* *आंडेर-बेटीसनी डोकाले लायेल ऱ्हास!धान्यां माय पारबती नी* *!गवराई मायनी याद से!वयेख से!*
बापनी!नई ते मंग भाऊनी! पोरीसगुंता आंबा,चीच,मोठ्ठला वड-पिप्पयनां झाडेस्ले झोका भांदी देल ऱ्हास!आंबान्या कैऱ्या तनगी झोका खेयेत ऱ्हातीस!झोकावर माय-बापनी यादम्हा गंजज गाना म्हनतीस!बठ्ठ गावं एक व्हयी जास!आंडरीस्न मुख देखी माय-बाप हारकी जातस!घरलें घरंपन यी जास!गवराई!पारबतीनं रूप या माहेरवाशीन पोरी ऱ्हातीस!त्यास्ना मुखे जथा-तथा झोका खेयेता-खेयेता गवराईनां गाना ऐकू येतस!आखाजी व्हवावर संकर गणगोत संगे लेवाले यी जास!आखाजी संकर पारबतीनां सन से!बठ्ठा खान्देशम्हा गवराई मायनां मान ऱ्हास!पोरी पखे लायी येल ऱ्हातीस!बठ्ठया नटेल-थटेल गवराया ऱ्हातीस!....
*...आंडेर-बेटी!..टिपऱ्या खेयेत-खेयेत गावंनां शिववर जायी धडकतीस* *!न्यारा-न्यारा गावंन्या पोरी शिववर भेटतीस!टिपऱ्या* *खेयेत!..खेसर मस्करी चालू व्हयी जास!मनम्हा वरीसभरन्या संगयेल गाया* *!मनम्हाथुन सासर बद्दलनी उबग ठायकेच निंघत ऱ्हास* *!मंग संकरनं गनगोत समजी येरायेरलें दगडे मारत ऱ्हातीसं!हायी* *खेसर-मस्करीनी चाल पूर्वापार चालत यी ऱ्हायनी!*
*गवराईनां माहेरन्या पोरी संकरना गंनगोतले गाया-सिया दि दगडे मारत* *ऱ्हातीस....*
भाऊ-बहिनीस्वन!
*'गणगोत संकरनं*
*दगडे खातस भारी!*
*माहेर गवराईनं घर*
*खेसर कर्तीस पोरी!*
*टिपऱ्या-टुपऱ्यास्ना ठेका*
*खेयनीं रंगत भारी*
*गोडी गुलाबीनां रंग*
*पोरी खेयेत चोरी चोरी*
*शिव शिवनी वलांडी*
*खेसर भलती से न्यारी*
*पयीं पयीं जातस दूर....*
*मांगे दखतीस फिरी*
*पायलें भिंगऱ्या बांधी*
*खेयेत जातीस दुरी*
*गणगोत संकरनं.....*
*पयेत जास माघारी*
*माहेरन्या आंडरी*
*दिखतीस सुंदरी!*
*मुखडा उजयेल*
*मांगे फिरतीस डोया भरी!'*
*आखाजीना सन*
*हायी माहेरंन धन!*
*वाटी वाटी गवराई*
*जिकी जास ती मन!*
*यांय मावयना आज*
*डोया टिपतस जुनं*
*संकर उना लेवाले*
*थांबे माहेरनं गाणं*
*टिपरी खेयेत!थट्टा मस्करी करत!यांयबुडान ये लें दोन्ही परका गावण्या* *पोरी येरायेरनां गया भेटीतीस!आंसूमा बिलगी-बिलगी!* *येरायेरलें भेटतीस!सासरनां उंडायाना चटका झेलालें निंघी जातीस!*
,'पुल्ला वरीस्ले आखो भेटसुत!'आसं सांगी निंघी जातीस!🌹
डोयाले मोके सोडी देतीस!यादलें डोयाम्हा ठेयी मांगे फिरी दखत!मव्हरे रस्ता व्हडत ऱ्हातीस !यांय वरलांगे मोठल्या बल्ल्यास्ना मांगे धिरेधिरे चालना जास!
..वरीसभर आखाजीनी याद मनमा बठी जास!मांगल मांगे चालनं जास!पुल्ल वाट दखागुंता मव्हरे निंघी जास!नवं-नवंतिना हाऊ खे!पिढ्यान पिढया चालूच से!माहेरपननां हाऊ उमाया पोरनां हिरदयमा उक्कय फोडत ऱ्हास!मव्हरे भी चालूच ऱ्हायी!...
सूर्यदेव गव्हारक्या व्हई!सकायले सोतां उगी!मानोसनां गव्हारालें चरालें लयी जायी ऱ्हायनां!सोतां बुडावर ह्या गव्हारालें ....रातलें वाडगाम्हा सोडी जायी ऱ्हायनां!वाडगानां शिवाडालें कुस्टाये लायी जायी ऱ्हायनां!
*चैत-वैशाखनं उन*
*_तोडी पयेस दावन_*
*झेली दुःख गवराई*
*फिरी येयेस गव्हान*
*फोडे व्हयेल पायलें*
*माय तडपस मन*
*चटका फफोटानां*
*नही ऱ्हायन भान*
भाऊ-बहिनीस्वन!
हायी आंनबक कोडं आजून भी उमग्न नई!कवलोंग मननां अंधारानां खेय चालू ऱ्हायी??खरंच मानोस जलंमनां ढोर से का?उबगी जावापाउत हापक्या मारत मव्हरे जात ऱ्हास!मव्हरे चालतं ऱ्हास!
*आखाजी!.. हासी-खुशी निंघी जास!प्रेम-आनंद वाटत जास!शंकरना संगे* *गवराई भी चालनी जास!आंडेर सासुरवाडीलें चालनी* *जास!उंडायांनं उन चटकत ऱ्हास!आखाजीनां आनंद या चार दिन**लिं!---वसरीम्हाईन सरकत मांगला दारे चालना जास! पोर सासरलें* *चालनी जास!..*
...आते गावे पहिला सारखा नई ऱ्हायंनात!घरे बदली ऱ्हायंनात!माणसे बदली ऱ्हायंनात!आते गावंमा भकास वाटस!आखाजी आखाजीचं ऱ्हावालें जोइजे!गवराई बसाडी आखाजी पुजाले जोइजे!नवं साल दर वरीसले साजर व्हावाले जोइजे!खान्देशनं धन मनमा रुजाडालें जोइजे!हायीचं आखाजीनी याद आंडरीस्ना मनम्हा ऱ्हायी!!
भाऊ-बहिनीस्वन!
*आखाजीलें निरोप देता देता!मव्हरे चालत ऱ्हानं पडी!आपुन बठ्ठा चालत* *ऱ्हाहुत!...आखो भेटसुत * *!तवलोंग राम राम मंडयी!राम राम!🌷🌷🌷🌷🌷🙏*
...नानाभाऊ माळी,
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
,मो.न-७५८८२२९५४६/
९९२३०७६५००,
दिनांक-२२एप्रिल २०२३
(आखाजी)
Comments
Post a Comment