दहिवडनं अस्सल तूप

🌹🌹🌹🌹🌹🌹
दहिवदनं अस्सल तूप 
🌷🌷🌷🌷🌷🌷
******************
... नानाभाऊ माळी
दूधम्हा थोडस दही टाकानं!रोज रोज दूधनी साय त्यान्हावर टाकत ऱ्हावानं!थर चढी चढी एक दिन त्या सायनी बोघनी बोंब भरी जास!ऱ्हईवरी निस्त घुसयेत ऱ्हावानं!घुसयी घुसयी वर वर लोनी सरकत ऱ्हास!हायी लोनी सत्व ऱ्हास दूधनं! दूध-दही-लोनींम्हान घुसयेल अस्सल सत्वलें तपाडी तपाडी तूप बनतं ऱ्हास!तूपरुपी अमृदनीं चव चखालें योग लागस!तो योग आम्हना नशीबले भेटनां व्हता!आम्ही भाग्यशालीनां गंनतीम्हा यी लाग्नू व्हतूतं!🌹

सांगानां मुद्दा असा से.......मांगला महिनाम्हा माले गुजरात-सुरत थून जितेंद्र बहारे दादास्ना फोन उंथा!त्यास्नी वयख-पायेख धुयाले०६वं अखिल भारतीय अहिरानी साहित्यसंमेलनम्हा व्हयनीं व्हती!तव्हयं त्या बोलता बोलता बोली गयेंतात ,'नानाभाऊ आम्ही आम्हनां गावलें साहित्य संमेलन लीं ऱ्हायनुतं!दहिवद आम्हनं गावं से!'मी नेम्मनं ध्यानमां ठेवं व्हतं!पंधरा तीन हाट पहिले आखो जितेंद्र दादास्ना फोन उना,'नानाभाऊ तुम्हले दहिवदलें येनं से!'मानवता बहुउद्देशीय संस्था' काव्य संमेलन भरायी ऱ्हायनूत!१६एप्रिल तारीख ठरेल से!'...मी व्हकारां भरी दिना!आपला सारखा धाकला
मानसेसले इतला मानपान दिस्नी आभाय इतलं हिरदना मानसे बलायी ऱ्हायनात!आपले जावाले काय व्हस!कोठेगंतरी हिरदनीं तार जुडी जास!प्रकाश पडी जास!त्या प्रकाशनं उजाये आपला बुद्धीम्हा पडी जास!मी मोका दखी हा म्हतं!

चुलांगेनम्हानं लाक्कुड राख झटकी लालभुदुख दिखस!१६एप्रिलनां दिन उगेल व्हता!उंडायानं खर रंग-रुपडं दिखी ऱ्हायंत!केयी पिकाडंनारा जयगावं जिल्हा!सखाराम महाराज यास्ना आमयनेर तालुका!१५-१६ किलोमीटरवर चोपडा रस्तालें एक फाटा फुटस तठेंग दोन-आडीच किलोमीटरवर शिंगाड्या मोर्चा प्रसिद्ध आदरणीय आमदार गुलाबराव पाटील यासन 'दहिवद गावं सें'!दहीम्हान लोनी काढनारं गावं सें! गावं धाकल्सचं,हेट्या-वरा लामेनधरी दख ते १५-१६हजार लोकसंख्यानं गावं व्हयी!या गावंरलागा एसटीभी जास!या गावलें येवागुंता एखाद वाहन व्हयी ते मानोस येयवर यी भिडी!नई ते मंग गाड्या-घोड्यासले तंनंगी-तुंनंगी 'दहिवद'लें येनं पडस!गावंनां मानसे प्रेमळ आनी कष्टाळू सेतंस!आते नव वारं व्हायी ऱ्हायनं तसं गावं भी बदली ऱ्हायनं!समाज कारण,राजकारणनं,माहिती अधिकार जागरूक गावं 'दहिवद' दिखनं!

मानूस मानवतानां पुजारी ऱ्हासं! पूजागुंता मानसे दुरथीन,कोठेंगभी यी भिडतंस!मंग अंतर आनी येयनं गनित बसाडी मानवता या दैवतगुंता जीव टाकतं ऱ्हास!आशी मानवता बहुउद्देशीय संस्थानां धाकला-मोठा खांदेकरीस्नी दहिवदले साहित्य संमेलन ठयेंल व्हतं!साहित्य संमेलन  हाऊस म्हनीस्नी ठेयेंल नही ऱ्हास!!ती हिरदनीं पूजा ऱ्हास!हिरदनीं एक्खट्टी व्हयेलं ऊर्जा ऱ्हास!
कायेजनां भाव तठे उतरी हुभा ऱ्हास!साहित्य संमेलन भरावागुंता उज्जी कष्ट ऱ्हातसं!तव्हयं तो साहित्य आननंन्हा दिन डोयालें दिखस!तो दिन १६एप्रिल व्हता!🌷

मानवता बहुउद्देशीय संस्थांना मेढ्यास्नी या उंडायाम्हा जे कष्ट उपसं,पहिलेंग त्यास्न अभिनंदन कराले जोईजे!दुर दूरथीन साहित्यिकसले बलायी त्यास्ले त्यास्ना मानपान आनी जेवा खावानीं सोय करी बहारदार कार्यक्रम करनारा 'बहारे' भाऊस्न हिरदथून कवतुक आनी आस्तोल करस!💐💐💐
(हावू आपोरा भाग से!याचं इशयनीं चाव्वयं ०२भागम्हा करसुत!तवलोंग राम राम मंडयी!जय अहिराणी!जय खान्देश!)

************************
     🌹🌹🌹🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२०एप्रिल २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)