मोबाईल मन्हा मुऱ्हाई
मोबाईल मन्हा मुऱ्हाई
🌷🙏🌷🙏🌷🙏
******************
... नानाभाऊ माळी
"सुख दुःख बाधा बनिसनी
हावू मोबाईल घरमा घुसना
चालनं बोलनं इसरीसनी
सवसार चाली ऱ्हायना उसना!धृ!🌹
बायको सांगस नवरा रांगस
घरमा न्यामीनं धुतृम घुसनं
तोंडे कुस्टायें नजर चगाडी
पेरेम वाटी ऱ्हायनं उसनं...!🌹
सांज सकायलें लिखा मारी
वर झिपाट्या ऱ्हातीस मोक्या
बाट्टोडं या मोबाईलनां पाह्यरें
मांगे पडनां घरनां लाख्या....!🌹
नजर आनी बोटेस्ना खेयवरं
पोस्टन्या लागी ऱ्हायन्यातं रांगा
शानलां सुरता उचकेस्लें
कोनी समजाडी आते सांगा..!🌹
मोबाईलम्हा डोया रसिमां पुरी
हावू दांगडो कवलोंग चाली
खीर ऱ्हायी गयी ताटलीम्हा
ताट उचलालें कोन से वाली..!🌹
मुक्सा भांदी घर भरेलं हायी
मोबाईलम्हा दखीदुखी हासतसं
बोलनं चालनं इकत व्हयी गे
निस्ता येरायेरनां आंगे बसतसं..!🌹
चालनं बोलनं इसरीसनी
सवसार चाली ऱ्हायना उसना
सुख-दुःखम्हा बाधा बनींसनी
हावू मोबाईल घरमां घुसनां..!"🌹
....मोबाईल येंवाफाईन कान,तोंडं आनी डोयास्ना उज्जी यायांम व्हयी ऱ्हायना!तिनीसलें निरानाम आराम नयी से!पहिले बोलागुंता मूक्ला पैसा लागेतं!बोलानं मूक्ल ऱ्हाये पन पैसा आखडायी लेतं!आते तीन महिनाम्हा एकदावं रिचार्ज करां का रात-दिन बोलत बसो!कान,तोंडं आनी डोया दुखाडातं बसो!कामंपुर्ता ठिक से!पन बिनकामनां टाइम पासले मोबाईल डोकं दुःखाडी ऱ्हायना!घरमा,दारमा, आंगनमां,गल्लीम्हा,रस्तावर,बजारम्हा बठ्ठास ठिकाने लोकेस्ना आंगमां घुसी नाचाडी ऱ्हायना!🌹
मोबाईल सुखनं साधन से!सुखम्हा लोयेतं ऱ्हावो नां?जसी छत्री पानी झेलस!उनभी झेलस!तसा मोबाईलनां वापर सुख पह्येरागुंता व्हवाले जोयीजे!आते ते सुखमेतां दुःख भी संगेमांगे घरमां घुसी ऱ्हायनं!कोनी कोनी तें एक देड तास बोलत बठतंसं!एखादा दोन तास या दबडालें कानलें लायी बठस!तें इतलं हूनं व्हयी जास तें इचारता सोय नयी!त्यांनंसंगे कानभी तपी जास!बोलतां बोलतां तोंडंनं नयडं कोल्ल पडी जास!आखो टाइमनी खुवारीभी व्हयी जास!🌹
गंजज माय-मावल्या तें फोनवर निस्त येडीस्नीमायेक बोलत बठतीस!काय सांगो?चाव्वयंनीं ढंग रंग तीसलेचं कयो जानें!चाव्वयलें सवाद ऱ्हास!पत्ता नयी ऱ्हास!मंग फिरी फिरी लब्बरंलें चायी चुयी चघयतं ऱ्हावो! चाव्वय काय सरत नयी!पोट काय भरत नई!फिरी फिरी निस्त बिनखुरप्यानं मुल्लानं फिरायी ऱ्हावो!तनपट जागवरचं ऱ्हास!यां मावल्या मव्हरे मव्हरे सरकत ऱ्हातीस!उसनीं मायेक निस्ता चायी-चुयी चोथा व्हस!फिरी फारी त्याचं ईस्टॅन्डवर येवो!हासी खुसी चाव्वयं सरकतं ऱ्हासं!चाव्वय काय सरसं नयी!गोठा सरतीस नयी!येंय मातरं पुरतं नयी!कव्हयं मव्हयं तें जेवता जेवता भाहेरनां फोन उना का जेवनभी इसरीं जातीसं!बोलानां नांदम्हा ताट मझारंलीं भजी उखली खीरम्हा बुडायी खातीस!हावू मोबाईल काय समजू-उमजू दि नई ऱ्हायना!🌷
माय माऊलीनां माहेरनां फोन उना का मंग दखो गंम्मत!मोबाईल देव्हाराम्हानां देव व्हयी जास!आपन मंदिर मव्हरे हुभा ऱ्हायीस्नी देवनं नाव ली पुटपुट करत ऱ्हातसं!तसं मोबाईलनं आयकांनं मुसडं (रिसिव्हर)कानलें लोहचुंबकनां गत चिटकी बठस!आनी खालनं बोलानं मुसडं(कॉलींग)तोंडले चिटकी बठस!काय बोलत ऱ्हातीस कोन जानें?आंगे ऱ्हायीसनीभी दुसरांनां कानलें वार्ग लागतं नयी!!उच्चारनां इतला सांकेतिक साउंड ऱ्हास तें इचारता सोय नई!मोबाईलवर आक्सी बोली बोली इतली आदत पडी जायेलं ऱ्हास काय म्हनो,"चिमनीनां आवाज तथानां हाडयालें नेम्मन आयकु जास!
.....तें जावू द्या तथ!!बोलाना मुद्दा हावू से,सुखनं फुल व्हयी मोबाईल आपला गाले भवडी ऱ्हायना!कव्हयं दुःखनां समुंदरम्हा डोयांन खाटें पानी मियीं ऱ्हायनं!सुख-दुःखनां रस्तालें लागेल मानोस ऱ्हावो,बाई-मानोस ऱ्हावो,कोठेतरी मनगुंता 'इसावा' धुंडी ऱ्हायना!पहिले ढोरे-ढाकरे दार मव्हरे ऱ्हायेतं!दान-चारा करना पडे!खये ऱ्हाये!वावरनं पीकें बठ्ठ खयामां गोया करी टाकेतं!गाय-बकऱ्या बठ्ठया गव्हारांमां चरालें जायेत!पोरें सायमां जायेत!नवरा-बायको आनी पोरें-सोरे या गिरजदारीमां इतला थकी जायेत का रातलें अंधारं पडताज जेवने-खावनें व्हयी खाटलांस्वर आंग टाकेतं!आंग टाकताचं डोयावर निंद चढी जाये!येयं घडायंमव्हरे पयेत ऱ्हाये!दिन समजे नई!कामनां गिरसदारीम्हा दिन कता उगे आनी माव्ये तेंचं समजे नई!...आते बठ्ठ चलिंदर बदली जायेल से!मानसेस्ना कामे कमी व्हयी ग्यात!बठ्ठ धीरे धीर हालकं व्हयी ऱ्हायनं!यांत्रिक खेती व्हयी ऱ्हायनी!मूक्ला 'टाइम' हातशी ऱ्हावालें लाग्ना!आते येयं जात नयी! मशीनें कामे करी ऱ्हायनात!आपुन आयशी आनी आयधी बनी गवूतं!आंगम्हा रवरव करा सारखं काम ऱ्हायन नई!पोटम्हा सतराशे साठ आजार पैदा व्हयी ग्यात!डाक्टर आनी मेडिकल दुकानन्हा कायमनां गिऱ्हाईकं व्हयी ग्यात!दिन ढकली येयं जात नई!काय करो समजी नई ऱ्हायन?त्याम्हा आते हावू मोबाईल घरमां घुसना!टाइम भिन्नाट पयी ऱ्हायना!यायाम नई!डाक्टर मातरं मज्यामां सेतसं!घरबठी गिऱ्हाईक दारसे यी ऱ्हायनं!🌹
तंत्रज्ञाननं नवीन धुतृम घरमा घुसनं!मोबाईल नावनां धुतृमंनी येयं दखी बठ्ठासलें येडं करी सोडेलं से!त्याम्हा चांगलं से!वाईट भी से!वाईट आपला,हिरदनां,डोयानां गायनीघायी गायी लेवो!चांगलं तें गायेलं बारीक पिठाये आपला संगे ठी लेवो!बाकीनं उक्खल्लावरं फेकी देवो!उक्खल्लानं खड्ड भरत ऱ्हास!शिगेशिग भरावरं मंग त्याचं उक्खल्लानं मुरेलं सोनं जिंदगीनां वावरम्हा फेकी पसारी देवो!आखो मुरायी-मारायी,नवनव चांगलं तंत्रज्ञाननं पीक येत ऱ्हास!नवं लेत ऱ्हावो!येय(वेळ)नावनं धुतृमलें आपला आवकातमां ठेवं तें कोनी कितलं का ढोलकी वाजे नां!कोनी काय म्हनें का नां 'मेरे आकां मुझे कामं दो नही तो मैं तुम्हे खाजाऊंगा!'
...... तर मंग माय माऊली मोबाईलवर दोन तास बोलत बसनी तरी तिन्ह सरत नई!उरकत नई!आपुन तींनंगंम दखत बठो!ती कव्हयं हासत दिखस!कव्हयं रडत दिखस!सवसारनां जोजार व्हडी व्हडी मोबाईललें भाऊ मानीस्नी
मुऱ्हाईलें निरोप धाडतं ऱ्हास!
बठ्ठ माहेरपन फोनवर यीं लागस!फोन मुऱ्हाई से माय माऊलीनां!हासी,रडी, नवरानीं वाकडी वाटलें पोटम्हा घाली, सासरनं चांगलं नाव काढतं ऱ्हास!कोपराम्हानी गोठले दारसे येवू देत नयी!डोयांना आंसू सुखनां सेत का दुःखनां सेत,गल्ली मैदान व्हवू देत नई!....फोनवर बोलानं सुटत नई!
येयंनं गाडं मव्हरे सरकत नई!मोबाईलनां पायरे काम उरकत नई!हायी जिंदगीनीं नाव मव्हरे मव्हरे सरकी ऱ्हायनी!मोबाईल मुऱ्हाई व्हयी निरोप धाडी ऱ्हायनां!!ख्यालीं खुशाली रात दिन दि ऱ्हायना!आपुन त्याले धुतृम म्हनंसूत पन माय माऊलीनां हावू मुऱ्हाई दिवाई-आखा जीनं काम सोता करी ऱ्हायना!माय माऊलीनां हासू-आंसू वाटी ऱ्हायना!
🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹
****************************
💐💐💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१६एप्रिल २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment