हायी जगबुडीनी नांदी तें नई?

हायी जगबुडीनी नांदी तें नई?
🤔🤔🌷🌷🌷🤔🤔
**********************
... नानाभाऊ माळी 

सव-सात दिन फाईन तद्दन उचकेलंपना चालू से!बांगट खेयचं म्हनो याले!!हायी अभ्राय आडावू भेंडनां मायेक आडी बठेल से!लेनं नां देनं!पन कुशीदनांगत आडावू राव्हठ व्हयी बठेल से!धड हुभारी वाटतं नयी ना मोके चोके आराम वाटतं नयी!आयशी,आयधीगंतं आंग जडजड व्हयी ऱ्हायन!घाम भी येस,उकयेसं भी!गदारा व्हयी नको नको वाटी ऱ्हायनं!मोक्या सांस लेवाले हुनी हवा काय कामंनी से?🤔

मोकी हालकी हवा येवानी वाट दखत बठो हायीचं आपला हातमां ऱ्हायन आते!!आभायनी टोपी 'हुं नां चुं'करी नयी ऱ्हायनी!निस्त गुमसुम व्हयेलं दिखी ऱ्हायनी!कव्हयं उन पडस!कव्हयं पानी पडस!बठ्ठा नित्येनेम  धरम सोडी चालू व्हयी जायेलं से!कपाशीनां रु उडस तश्या इना इना मांजरपाट व्हयेलं धुडक्या ढगस्नी सूर्यदेवलें आर्ध मर्ध झाकी ठेयेंल से!रातले थोडंसं बरं वाटस!काँक्रिटनं हून धपेलं छतलें तीन पातावाला फॅन
आटकायेंलं से!गरगर फिरीं फिरी हूनीडाव वार्गी सोडी ऱ्हायना!बट्ठी हुनी वार्गी घरमा फिरी ऱ्हायनी!दिन उगना का आंगले एकसाय घाम चालू व्हयी जास!जवलंगून घरमा सेतसं तवलोंग बरं वाटस!घरना भाहेर पाय काढा का आंगवर चटका,घाम बठ्ठ एकमझार व्हयी गदारा व्हवालें लागी जास!सोतानी किंव करो आसं वाटी ऱ्हायनं!नातं भाडं सोडी उन पाठगोयी बठी नाचाडी ऱ्हायनं!🤔

आते दखो डोकावर आथ-तथ आभ्राय फाकेल दिखी ऱ्हायन!निस्त गुमसुम व्हयेलं वाटी ऱ्हायन!धड उन  पडत नयी!पुरं आभ्राय भी फाकेल दिखत नयी!झाडनं पांटभी हाली नयी ऱ्हायनं!वावरना बांधवरना झाडे भाउभंदकीनां मारामारीम्हा बठ्ठा तुटी ग्यात!बांध निमाया व्हयी ग्यात!चवडा बांध निरुंग व्हयी ग्यात!जंगल निमाये व्हयी ऱ्हायनं!आंध्या दयी ऱ्हायना!कुत्र पीठ खायी ऱ्हायन!उनन्हा पारा चढी ऱ्हायना!नदी आटी ऱ्हायनी!वाऊनी चोरी व्हयी ऱ्हायनी!नदीनां खडके हुगडा-नागडा दिखी ऱ्हायनात हायी कोंती नांदी से मंग?🤔

गदारा न्यारा व्हयी ऱ्हायना!वार्गी नेम्मन दिन माव्व्यांनं येलें अथांयीन-तथायीन धव्व्या-काया ढगसलें व्हडी लयी येस!ढग भी असा कसा उचकेल म्हनो?कव्हयं चटचट गोया व्हयी येंतसं!डेंडारन्या दि,वकी,उलट्या करी निंघी जातंस!त्यास्न पोट पुरं खाली भी व्हतं नयी ना भरेल ऱ्हात नई!गुदमरेलं जीवडां निस्ता टांगनीलें लागी जायेल सेतसं !मधमाचं कानवर बातनी येस,' बे मोसमी गारनां पानी बठ्ठा शिवारलें शेपाली ग्या!'दुवाड निसर्ग मानोसलें मव्हरे गचाली ऱ्हायना!मानोस
धरतीनां काटवर यीं बठेल से!हायी कोंती नांदि सें मंग?🤔

हायी मोसम बिघडेल पांट मांगला तीन-चार वरीसफाईन चायी चुयी हुगडी ऱ्हायन!पानी भी आश्या पडस,बठ्ठ हुभ पीक आड पाडी धोयी-चोयी जायी ऱ्हायनां!काय करो शेतकरीनी ?निमायांगत आभायंगंम कितला दिन दखत बठी?ठायकाच हात पायनं गासोडं भांदी बठसं!आंगनं भूगलं करी बठस!पैसा-पानीनां टाया नई!व्हडातानी चालूच से!कितला दिन गचालत गचालत काढी?गुढगाम्हा तोंडं दपाडी एखालाच डोये आंसू गायीं ऱ्हायनां!आवकोया करी घरं धकाडी ऱ्हायना!उन पडमथे व्हयीं पडी ऱ्हायनं! चिटपाखरूनां सासूल नई!हायी कोंती नांदी से तेचं उमजी नयी ऱ्हायनं!🤔

आसं वाटस हावू निसर्ग बट्ठी वयख-पायेख इसरी कसाई व्हयी जायेल से!झाडे,मानसे,बठ्ठासलें पुसी उखली ऱ्हायना!चगेलनां मायेक वागी ऱ्हायना!आपन बागेबागे जगबूडींगम तें सरकी नयी ऱ्हायनुत नां?माले चांगलं आठनूक से,मी धाकला व्हतू तव्हयं टाइमें टाइम पानी पडे!आते नित्तेनेम,धरम सोडी कव्हयं भी आंगसोडी पडी ऱ्हायना!पाठगुयी बठी मिरी ऱ्हायना!राजा चगेलनां मायेक खुशाल उखली फेकी ऱ्हायना!पयतांपाठे लागी ऱ्हायना!आते कव्हयं पंडायम्हा पानी म्हात नई!तें कव्हयं गारं पडी पंडाम्हा घुसी बटस!पानी भी गुमसुम व्हयी जायेलं से!कव्हयं येडीमत्थी धरी इंजासं संगे चाव्वय गोंधान्या व्हयी खेय मांडसं!कव्हयं इंजा चमकी जग दुन्यालें आगाजा करी भेमकाडी ऱ्हायना!यांले आडावूपना म्हतंसं नई का ?आपन बांगट सेतस!कितला दिन बांगट बनी ऱ्हावानं?

जंगल तुटी ऱ्हायनं!उंडाया धाकाडी ऱ्हायना!पानी येडा व्हयी भेमकाडी ऱ्हायना!पानींनी भोयरभरी जीव गायी ऱ्हायना!पाऊस ठायकाचं चगाडी ऱ्हायना!हिवाया म्हवरे वसरी ऱ्हायना!.... हायी कोंती नांदी से मंग?जग बुडीनी नांदी तें नई? 🤔

**************************
💐💐💐💐💐💐💐💐
***************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मोनं-७५८८२२९५४६
       ९९२३०७६५००
दिनांक-१५एप्रिल २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)