माझी आई अशीच आहे (भाग १६)

🪷🪷🪷🪷🪷🪷
माझी आई अशीच आहे
      (भाग-१६)
🌹🌹🌹🌹🌹🌹
*******************
... नानाभाऊ माळी 

"श्रीमंतांची मम्मी असतें
  गरीबाची माय असतें
आई दोघांची सेम असतें
आई ती आईचं असतें!..🌷

आई रावणाची असतें 
आई रामाचीही असतें
हृदयाची माया असते
संस्कार शाळा असतें!..🌹

काट्यातील फुल असतें
आई देवासारखी दिसते
बाळाशी गोड हसते
..आई सर्वांचीचं असतें!🌷

आई स्वतःचीचं नसते
ममतेचा बाजार असतें 
गोड बोलण्यात फसतें 
कणकणात आई असतें!🌹

..माझ्या दोन्ही बहीणी पुण्यातल्या कात्रजमध्ये राहायला आहेतं!माझ्या मोठया बहिणीचा मुलगा,माझा भाचा काल अचानक रिक्षा घेऊन आमच्या घरी आला होता!तसा तो पुण्यात रिक्षा चालवतो!त्याच्या सोबत उगवत्या सूर्य साक्षीने गप्पा टप्पा सुरु होत्या अन मला सहज बोलून गेला,'दोन-चार दिवस आजींना कात्रजला घेऊन जातो मामा!आजींना वातावरणात थोडा बदलही होईल!आजींना बरं वाटेल!माझ्या आईलाही बरं वाटेल!..माझं बालपण आजींच्या ममतेच्या सावलीत गेलेलं आहे!माझ्या खोड्यांची जंत्री खूप मोठी होती!आजीमुळे मी कित्येकदा अनेकांचा मार खाण्यापासून वाचलो आहे!मला आजीने घडवलं जगण्याची तालीम दिली!आज मी आजीमुळेचं उभा आहे मामा!आई तर दिवसभर बाजारात भाजी विक्रीला गेलेली असायची!'.. थोडा थांबला अन पुन्हा बोलू लागला ,'मामा आजींना घेऊनचं जातो ना काही दिवस!आजींच्या मांडीवर बरेच दिवस डोक ठेवायला मिळालंच नाही हो मला!आज माझी मुलगी १०वीला आहे!तरी मी लहानच आहे!आजी आहेच अशी!'

काळ मागे सरकत असतो!आपण पुढे सरकत असतो!आई दिवाणवर बसली होती!अलीकडे आईला वयोमानानुसार कमी ऐकू यायला लागलं आहे!भाचा माझ्याशी बोलतं होता!आईच्या कानावर एखादा दुसरा शब्द पडतं होता!नातू आल्याचा आनंद आजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता!एक वेगळ तेज, झळाळी आईच्या चेहऱ्यावरून दिसतं होती!नातू आल्याचा आंनद काही वेगळाचं होता!!.. सकाळ होती!आईने सुनेला अर्थात आमच्या अर्धांगिनीला प्रथम कळण्याची भाकरी (दोन-तीन डाळी एकत्र करून थोडं मीठ टाकून दळून आणलेलं पीठ)करायला सांगितले!तव्यावर चटका घेतं भाकरी चांगली भाजली गेली!भाकरीची पूड,पोट उघडून,पोपडा काढून आतल्या पोटात तेल तिखट टाकून भाकरी ताटात ठेवून भाऊसाहेबा समोर ठेवली!🌹

भाऊसाहेबाला कळण्याची भाकरी अजिबात आवडत नव्हती!आजीच्या हट्ट रेट्यापुढे त्याने हात टेकला अन कशीतरी गळ्याखाली भाकरी ढकलली!भाकरी खातांना भाऊसाहेब बोलला,'आजी तयारी कर,आपल्याला कात्रजला जायचं आहे!'थकलेली!हातापायांची नाजूक वळकुटी झालेली माझी आई काही वेळ माझ्याकडे पाहत होती!काही वेळ सुनेकडे पाहत होती!काही वेळ नातसूनेकडे पाहत होतीअन रागावून बोलू लागली,'तुम्हाला माझा कंटाळा आला आहे का? माझी ही गलितगात्रे येथेच तुमच्या येथे ठेवून कायमची जाणार आहे!'..आईच्या यां शब्दांनी माझ हळव मन द्रवलं होतं!मनाला खूप वाईट वाटले होते!आई अशी का बोलली? आई ती आईचं असतें!आई देवाकडून मिळालेली जन्माची  हृदयातली भेट असतें!टचकनं डोळयांतून पाणी आलं!मी स्वतःला सावरत बोललो,'आई नसेल जायचं तर नको जावू!' पुन्हा भाच्याकडे पाहत बोललो,'भाऊसाहेब जा तू!आजींना यां वयात प्रवासाची दगदग  सहन होत नाही!''🌹

भाऊसाहेब हट्टाला पेटला होता,'आजी आमच्याकडे येऊन खूप दिवस झालेत तूला!चल ना आजी!तूला कुठला ही त्रास होणार नाही इतकं फुलासारख जपू!फक्त सात आठ दिवसचं यें'.. आई शेवटी जायला तयार झाली!आईची पिशवी तरी किती मोठी असावी बरं?फक्त दोन साड्या!झालं!!!आई कधीच कोणासाठी ओझं झाली नाही!ती कोणासाठी ओझं होणारच कशी!जन्मोजन्मीचें आभाळभर उपकार आईचे असतात!आईची पिशवी कशी कशी हलकी फुलकी होती!ममतेचे बोल सतत साथ संगत करणारे!... आई नेहमी म्हणत असतें,'आपण सोबत काय घेऊन आलो आहोतं ? मागे ओझं का ठेऊन जावे!सर्व येथेच यां मातीत ठेवून एकट्याने निघून जायचं आहे!हलकं हलकं होऊन निघून जायचं आहे!कोणाला त्रास नं देता निघून जायचं आहे!'.. आईच्या मुखातून अशा निरवानिरवीचें शब्द कानी पडल्यावर मन भरून येत होतं!
अलीकडे आई खुपचं हळवी झाली आहे!१०० वर्षे पार केलीतं तरी उत्तम आरोग्य लाभलेल्या आईसोबत रहाणे आम्हास भाग्य लाभले आहे!🌹

आईचें हात धरून हळूहळू घराच्या पायऱ्या उतरलो!आईने माझा हात घट्ट धरला होता!माझा मानसिक आधार असणारी आई!माझा हात धरून खाली उतरत होती!भाच्याच्या रिक्षात बसवलं!आईच्या मायेचे हात माझ्या डोक्यावरून फिरत होते!रिक्षातच आईच्या पायांवर डोकं ठेवलं!अन आशीर्वाद घेतं असतांना मनोमन देवाला प्रार्थना केली,'माझ्या आईचं आयुष्य स्वतःच्या पायांवर चालते आहे,स्वतःची सर्व कामं स्वतःच्या हातांनी करते आहे तोवर तिला दीर्घायुष्य दे देवा!अजून दहा वर्षांचं तरी आयुष्य वाढवून दे हिचं प्रार्थना करतो !' भाच्याने रिक्षाचा एक्सलेटर पिळला तशी कात्रजच्या दिशेने निघूनं गेली!आई वळून वळून हात देत होती!मी हात हलवत होतो!रिक्षा दिशेनांशी होईपर्यंत मी रिक्षाकडे पाहत होतो!माझे हलणारे हात खाली आलेत!मन भरूनं आलं होतं!आई बहिणीकडे गेली!मी डबडबलेल्या डोळ्यांनी घरी आलो!घरात आईच बसायचं ठिकाण रिकामं होतं!तिकडेच टक लावून पाहत होतो!सौभाग्यवतीनें आवाज दिल्यावर मी भानावर आलो होतो!
माझी आई अशीच आहे!सर्वांचं हृदय घेऊन गेली होती!🌷

आई मानसिक आधार असतें!तिचं हळवेपण आपल्यात आलेलं असतं!आई हृदयाचा ठोका असतें!आई शिवलेला टाका असतें!आई  गजबजलेलं गावं असतें!पूर्ण काठोकाठ भरलेलं मन रिते करण्याचं हक्काचं ठिकाण असतें!घरात आल्याबरोबर हसरंमुख असणारीं, जीव भांड्यातं पडल्या इतकं हळवं मन असणारी व्यक्ती आईचं असतें!आई आपल्या जगण्याचा धागा असतें!अन्य फाटकें,तुटकें हृदय आपल्या मायेच्यां धाग्यानीं शिवत असतें!दूर गेलेली कित्येक हृदय आपल्या विशाल ठिगळांनी शिवत  नाते जोडत असतें!आई विठाई सारखी असतें!भक्तांसारखे सर्व नाते आपल्या भक्कम खांद्यावर घेऊन श्रद्धा मंदिर होऊन जात असतें!माझी आई अशीच आहे!🌹

वडील खोबरे अन खोबऱ्याची टणक कवटी असतात!आई खोबऱ्यातील गोड पाणी असते!आई आपल्या आजारी मुलांसाठी रात्र रात्र जागत असतें!आई रत्नपारखी असतें, परक्यालाही पारखून आपलेसे करीत असतें!आई सेवाव्रत्ती असतें!आई प्रेम स्नेहाचां मेघ असतें,धो..धो बरसून मोकळे होणारी असतें!निरभ्र होणारी असतें!आईला अष्टपैलूपद देवानेचं दिलेलं आहे!सर्व भूमिका हसत पार पाडणारी,सहन करणारी  स्वतःचं दुखी-कष्टी मन कोणाला कधीही न सांगणारी आई महान असतें!आई कधी चहाच्या कपातील वाफ होते!जिभेला चव देत स्वतः हवेत एकजीव होऊन जाते!प्रेमाचे नाते पेहरणारी आई घराघरात असतें!मी आईच्या बसण्याच्या जागेकडे जागेकडे एक टक पाहत होतो!आई कात्रजला गेली,घराचा चंदन सुगंध घेऊन गेली होती!माझी आई अशीच आहे!🌹

बालपणापासून सत्य,शिव अन सुंदरतेची ओळख करून देणारी आई स्वतः ईश्वरी रूप असूनही ती विसरून गेलेली असतें!आईच्या दृष्टीत अन हृदयात सत्य निवासाला असतं!सत्य अस्सल पिवळे सोनं असतं!आई मुलांना याचं सत्याची ओळख करून देत असतें!मुलांवर संस्कार करीत असतें!वडील घराबाहेरील संस्कार देत असतात तर आई आयुष्यभर हृदयातलं अमृतरस वाटीत राहते!जन्मताच बाळाची नाळ कापल्यावर बाळाच्या मुखातून 'आई' नावाचा पहिला उच्चार बाहेर पडतो!म्हणूनचं आई देवस्वरूप दूत असतें!अखंड आयुष्यभर हृदयातून जिभेवर शब्द येत असतात 'आई'!.. माझी आई अशीच आहे!🌹

अंतःकरणापासून आईवर अपार निष्ठा,असणाऱ्या अनेक सुपुत्रांनी जीवनात अलौकिक गौरव प्राप्त केला आहे!स्वतःचं जीवन घडवीत असतांना इतरांचे जीवनही घडवीत जगदंविख्यात झालेत!आई अशीच असतें!पाण्याच्या निर्मळ,स्वच्छ प्रवाह प्रमाणे,वहात वहात सर्वांना संस्कारक्षम करून सोडते!स्वतः चिखल होऊन जगत असतें!आई श्रद्धेचं,पावित्र्याचं,सहानुभूती,
सहनशक्तीचं विद्यापीठ बनून जाते!परोपकाराची बीजे पेहरणारी आई आपलं आयुष्य प्रदान करीत असतें!माझी आई अशीच आहे!🌹

दळलेल्या गरम पीठात हात टाकून पाण्यात भिजवून मळून उत्तम भाकरी थापून तव्यावर भाजणारी आई आयुष्यभर चटका घेतं जगत असतें!आनंद, सुख, ममता, कोमलता, वाटीत असतें!स्वतः जळत उजेड देत असतें!आईची गोड अवीट वाणी कानांना मंत्रमुग्ध करीत असतें!आई आयुष्याचं पुण्य असतें,मुलांना सहज मिळतं म्हणून आईचं महत्व मुलं उशिराने जाणतात!माझी आई कात्रजला गेली!तिच्या जाण्याने घरातलं सुगंध निघून गेला होता!सर्वांच्या घरात आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹

अंतःकरणापासून आईवर अपार निष्ठा,असणाऱ्या अनेक सुपुत्रांनी जीवनात अलौकिक गौरव प्राप्त केला आहे!स्वतःचं जीवन घडवीत असतांना इतरांचे जीवनही घडवीत जगदंविख्यात झाले आहेत!आई अशीच असतें!पाण्याच्या निर्मळ, स्वच्छ प्रवाह प्रमाणे,वहात वहात सर्वांना संस्कारक्षम करून सोडते!आई श्रद्धेचं,पावित्र्याचं,सहानुभूती, हळवेपणाचं,सहनशक्तीचं,मातृपणाची संस्कार विद्यापीठ बनून जाते!परोपकाराची बीजे पेहरणारी आई पवित्र श्रद्धेचा गाभारा असतें!.. माझ्या मंदिराचा शांत, शितल,
कनवाळू गाभारा कात्रजला गेला होता!गाभाऱ्यातील मूर्ती मंदिर सोडून कात्रजला गेली होती!घरोघरी आई रुपी सुंदर मूर्ती असतात!माझी आई अशीच आहे!पवित्र गाभाऱ्यातील सुंदर मूर्ती आहे!🌹

महाली चपाती लाटते
झोपडीत भाकर रांधतें
आई वासरूस चाटते
मायेने घरं ती थाटते..🌷

कधी आभाळ फाटते
 ....कधी जंगल पेटते 
........तेथे आई भेटते
   मज आभाळ वाटते!🌷

अशी माझी आई आहे!ती कात्रजला गेली आहे!!!
*************************
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*************************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१३एप्रिल २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)