वार्ग व्हयी उडतं ठिकाण धुंडी ऱ्हायना!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वार्ग व्हयी उडतं ठिकाण धुंडी ऱ्हायना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 
... नानाभाऊ माळी 

वार्ग!!...वार्ग वहात ऱ्हास!वार्ग
तंगाडतं ऱ्हास!वार्ग व्हडत ऱ्हास!वार्ग वार्ग ऱ्हास तवलोंग चांगलं ऱ्हास!वार्गानीं वांधी व्हवावर तीं तितरबीतर करी टाकस!तव्हयं त्या वार्गानी वांधी दुःख दि जास!वार्गानं धाकलं रुप वार्गी ऱ्हास!वार्गी हालकी फुलकी ऱ्हास!बठ्ठा जीवसले वार्गी सतानी वाटस!हाक्कानीं वाटस!जीव भावनी वाटस!थंडीनीं वार्गी हालकी ऱ्हास!शिनेल देहले ख़ुशी दि जास!शीन निंघी जास!आंगवर हुभारीनां काटा हुभा करी जास तव्हयं मनम्हा गुदगुल्या फुटत ऱ्हातीस!🌹

उंडायानां चटकानीं हुनी वार्गी भुधभवरी व्हस तव्हयं तीं परकी वाटाले लागस!खोडाय वाटाले लागी जास!आगजायी वाटाले लागी जास!भांड कुदायी वाटाले लागी जास!भुदभवरी उचडेलं आनी वाच्चाय व्हयी बठ्ठास्न तिरप दार करी निंघी जास!संगेमांगे बठ्ठ उडायी लयी जास!भुधभवरी भवरा व्हयी गोलगीटिंग फिरीफिरी फफुटा उडावत दूर निंघी जास!🌹

उंडायांनां चटकाम्हा आथ तथ बठ्ठ कोल्लखटक सुखायेलं दिखत ऱ्हास!निय्ये गवत निरानाम कोठे दिखत नई!मंग तेचं कोल्लखटक हुभ आड पडेल गवत वार्गासंगें उडत ऱ्हास!सुक्कय ऱ्हावो का सुकायेलं पांदंडा,सुकायेंल गवतन्या कोल्ल्या खटक बारीक बारीक बीय्या वार्गासंगे उडायी लयी जास!कव्हयं- मव्हयं वार्गानीं भुदभवरी व्हयीं,भवरा व्हयी गोलगीटिंग आंगले बिलगी,घोमाली एक जागा वरतीन दुसरा जागावर उडायी लयी पयीं जास!माटीनां फफोटा गोलगीटिंग व्हयी उडी नजरे पडतं ऱ्हास!वार्गासंगे जे सापडी त्याले लयी उडत ऱ्हास!गवतन्या बिया,झाडेस्न्या कोल्ल्या खटक शेंगा, आखो हालक-फुलकालें बैजबरी व्हडी संगे संगे,वर वर उडत ऱ्हास!जागा बदली, जग बदली दुसऱ्या दुन्याम्हा नवा झेंडा गाडी तठेनचं व्हयी जास!हावू निसर्गाना नियम से!यांले स्थलांतर म्हंतंस!यालेच Migration म्हंतंस!🌷 

वार्ग बीन पायनं इमान रास!राकेट ऱ्हास!ऱ्हायी सुयी त्याले मारोतीभी म्हनतंस!कव्हयं म्हव्हय हाड्या, चिड्या,व्हलगा भी म्हंतंस!कव्हयं टिटूयी सारखी वाटस!कव्हयं घार व्हयी उडस!तें कव्हयं गरुड व्हयी उडतं ऱ्हास!वावर,जंगलेस्मझारन्या बीय्या वार्गा संगे उडत ऱ्हातीस!खारबयां बीय्या भी मझ्याम्हा वरवर उडत ऱ्हातीस!पहिलं ठिकाण सोडी दुसरा ठिकाने उडी पडतीस!migration व्हतं ऱ्हास!जागा बदली नयी जिंदगी सुरु व्हतं ऱ्हास!दुसरा ठिकाने जिमीनम्हा जनम व्हयीं जास!निय्येगार रुपडं व्हयी तीन चार महिना नाचतं ऱ्हास!वाढतं ऱ्हास!मव्हरे पानी पेवानं सोडी आंगनां रस कोल्ला व्हयी जास!उडी-वाडी कोसो दूर वार्गानां फेराम्हा सापडी,जागा बदलतं ऱ्हास!आखो पानी पडावर त्या जिमीनम्हा तें बी एकजीव व्हयी हुभ ऱ्हायी जास!फुल,फय,बीय्या व्हयी जीवन सन्मार्गालें लागी जास!पुल्ली पिढीनां उजागरा करी निंघी जास!🌷

पुल्ला परवास कोठलां ठिकाने ऱ्हायी कोनंलेच सांगता येत नयी!वार्गानां परवासम्हा जिंदगी फुलत ऱ्हास!झूलत ऱ्हास!म्हलातं ऱ्हास!जनम मरनंनां सृष्टीनां खेय बिनबोभाट चालू ऱ्हास!कोना जनम कोठे व्हयी सांगता येत नई!मरन कोठे व्हयी सांगता येत नई!पानीम्हा निसर्ग सृष्टी वलातं ऱ्हास!नय्येगार फुलत ऱ्हास!जागा बदली बदली हावू खेय चालूचं ऱ्हास!

मानोसनीं जिंदंगीभी आशीच जागा बदली बदली मव्हरे sarkat🌷ऱ्हास!पोटगुंता migration चालू ऱ्हास!आपन जनमलें कोठे येतंस?शिकतंस कोठे?काम-धंदा,नोकरी, खेतीबाडी करतस कोठे?धयेडपन कोठे जास?आखेरनां सासं कोठला ठिकाने निंघी जास हावू तितरबितर जिंदगीनां खेय कोनलेचं सांगता येतं नई!मानोसनां जिंदगीना परवास चालूचं से!मानोस जित्ता ऱ्हास तवलोंग परवास सुरु ऱ्हास!पहिली पिढी जास!दुसरी पिढी मव्हरे उभी ऱ्हायी जास!मांगली पिढी आपला पायस्ना निशानीवर मव्हरे सरकत ऱ्हास!🌹

 शे-सव्वासे लोकसंख्यानं खेडा गावमां जनम व्हयेलं मानुस खावाना तसबा नयी तरी हावरं करी मव्हरे चालना जास!गावंमां चौथी पावूतं झेड.पी नीं साय सरावर,मव्हरे पुल्ली सायगुंता माय-बाप मोठा गावंनीं सायम्हा टाकी देतंस!पोरगं तठे शिकसं!मव्हरे त्याचं गावमा १०वी-१२ वीनां मव्हरे साय ऱ्हात नयी!आखो माय बापले कायजी लागी जास!ज्या गावमा कालिज ऱ्हास तठे हातपाय हालांयी शिकसन व्हयी जास!🌹

मानोसनां कामधंदा नई तें मंग नोकरी गुंता आखो मोठा सहेरगंम परवास सुरु व्हयी जास!मव्हरे गावे मांगे टाकी पोटगुंता मानोस पयेत ऱ्हास!सतान गावं कोठला ठिकाने से तें भी सांगता येत नई!एक एक कावड आगय व्हतं ऱ्हास!त्या पत्तावर पानींना शीतडा पडी जायेल ऱ्हास!पत्ता पुसायी जास!नेम्मन गावं कोठलं??ठिकाना ऱ्हात नई!पोट पाठगुयी भांधी पयेत ऱ्हावानं!पत्ता बदली मव्हरे जात ऱ्हावानं!migrated व्हयी जिंदगीलें मव्हरे व्हडत ऱ्हावानं!हावू खेय चालू व्हता!चाली ऱ्हायना!मव्हरे चालतं ऱ्हायी!कवलोंग चाली हावू खेय??? 🌹

मानोस पयी पयी,थकीथुकी एक ठिकाने धयेडपने आसरयलें,इसावालें थांबी जास!तठली वयख-पायेक, शेजार-पाजार बठ्ठा सक्खा वाटालें लागी जातंस!त्यास्मा एकजीव व्हयी जावानं!त्यासलेंचं भाउभन समजी लेवान!ज्या आंगे पांगे ऱ्हातस त्याचं पयेत येतंस!त्याचं सक्खा समजी कायेज वाटालें लागी जातंस!मानोस्ना धायडपननां दिन तठेचं निंघी जातंस!कोन? कोठला? कोठे थांबांनं?हायी बठ्ठ काय से? कोणता फेरा से हावू!मनम्हा आनी डोयांमव्हरे गंजज दल्ला खल्ला दिखतस!उत्तर सापडत नई!जिंदगीनं हावरं सुटत नयी!जिंदगी थांबत नई!हावू
डोकांभाहेरनां कुंवा से!नाडगं से!दयडं से!आंग टाकेल से!कुदेलं सेतं, तरो का बुडो!.. हायी मानोसनीं जिंदगी से!गंजज वयख पायेखनां भेटतंस!बीन वयखनां भेतसं!जिंदगी थांबत नयी!🌹

माले पुनालें,आळंदीजोगेनां दिघी गावंम्हा आश्याचं दोन महान हिरा मोतीस्ना उजायाम्हा जावाना योग उना व्हता!प्रा.शांतारामजी सोनार सर आनी रेल्वे इंजिनियर पी.झेड.माळी सर!दोन्हीभी रिटायर व्हयी दिघीले ऱ्हावालें सेतंस!एक जन पारोया जोगेना तें दुसरा चाईसगावनां!दोन्ही गुरुतुल्य महानुभवसलें भेटानां पहिला परसंग व्हता!भेट हिरदनीं व्हती!दोन्ही हिरा मोतीस्ना उजायाम्हा मी उजयी गयथू!त्यास्नी माले कलयी फिरायी दिंथी!.. त्या कोठला? शिकी सवरी एक कोकणम्हा अष्टविनायक नां "पाली"नोकरीलें तें दुसरा रेल्वेम्हा व्हतात!पन दोन्ही आते ऱ्हावाले 'दिघी'लें व्हतातं!हायी migration नं नातं सक्ख व्हयी एकजीव वाटी ऱ्हायंत!रंगतन्ह वाटी ऱ्हायंत!
कायेजन्ह वाटी ऱ्हायंत!मंग मानोस वार्ग व्हयी!पक्षी व्हयी!जागा सोडी उडी ऱ्हायना!नातं जोडी ऱ्हायना!अंधाराम्हा भरम झामली फिरी ऱ्हायना!कसानां गोमडा से हावू?🤔
*************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे
(ह.मु.हडपसर.पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३९७६५००
दिनांक-०४एप्रिल२०२३ nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)