राम उजेड
राम उजेड
***********
.. नानाभाऊ माळी
राम पहाटे उठूनी
मला भेटतो राम नाम
दमून थकून निघतो घाम
राम करून घेती काम...🌹
देवी सीता माय ...
जगी आदर्शांची शाळा
राम घेऊनि हृदयाशी
आई लावीतसे लळा.... 🌷
सीता माईचें राम
जग लिहत आहें नाव
राम राम पेहरीत
उगती पवित्र गावं🌷
रामामृतचा पेला मुखे
जग पिऊनी घेती राम
सतमर्गाची संजीवनी
दुप्पट देती राम दाम..🌹
राम नामाचा रस्ता कठीण
अश्रू डोळे धुऊन घेती
राम रस्ते चालत चालतं .....
पवित्र तुळशी पाने व्हाती🌷
***************
💐💐💐💐💐💐
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं- ९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०७मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment