साहित्यधारा डॉ. बापूराव देसाई सर

साहित्यधारा डॉ.बापूराव देसाई सर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
****************************

... नानाभाऊ माळी 

बंधू-भगिनींनो!या जगात तीन दैवतं सर्वात श्रेष्ठ आहेत!आभाळाहून विशाल आहेत!महान आहेंतं!स्वर्ग-कैलास-वैकुंठ याच्या जवळी आहेत!तें आहेत मातृ, पितृ आणि गुरु!ही दैवतं संस्कारी आहेत!देवाजवळी  नेणारी आहेत!सतशीलतेची ओळख करून देण्यासाठीचं देवाने पाठविले असावे!कच्च्या मातीतुन अप्रतिम शिल्प बनविण्याची कला या दिघांना अवगत असतें!माता,पिता अन गुरु हृदयाने सर्वात श्रीमंत असतात!जगण्याला अर्थ देतात!हृदयात राहातात!हीं दैवतं पैशांनी नव्हे तर संस्कारी गुणांची श्रीमंती घेऊन फिरत असतात!आई प्रथम गुरु असतें!पिता द्वितीय असतात तर शिक्षक अनुभवसिद्ध गुरु असतात!त्यांच्या संस्काराचं उत्तम फळं घेत घेत माणूस घडत असतो!🌹

प्रत्येकाला तहान-भूक असतें!पाण्याची!भाकरीची!पोटाची!मनाची भूक!.. नेहमीच अस्वस्थ करीत असतें!व्याकुळ करीत असतें!काहींनां मनाची भूक असतें!तगमग,तळमळ स्वस्थ बसू देत नसते!भेटीचीतीव्र ओढ असतें!आतुरता असतें!हृदय जोडलेले असतें!भेट जर गुरूंची होणार असेल तर भेटीसाठी आतुर होणारा शिष्य व्याकुळ होत असतो!गुरु साहित्यिक असेल तर भेटीची ओढ भक्त सुदामा अन श्रीकृष्णासारखी होते!साहित्यातून जीवन दर्शन होत असतं!गुरुजन जीवन दर्शक असतात!मानव
कल्याण आणि भलं हेचं त्यांचे आदर्श असतात!🌹

काल शनिवारी ०४मार्चचा शुभ दिवस होता!उगवत्या सूर्य साक्षीला सकाळीच फोन आला!फोन पाहिला तर हिंदी,मराठी,अहिराणी साहित्यातील ज्यांचं लिखाण महाराष्ट्रभर, देशात अन परदेशात सुद्धा गजतंय तें बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचें माजी हिंदी विभाग प्रमुख आदरणीय डॉ.बापूराव देसाई सर होते!अन विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष आदरणीय डॉ. श्रीपाल सबनीस सर!... अशी हीं जोडी होती!त्यातील दुसरे म्हणजे आदरणीय डॉ. बापूराव देसाई फोनवर बोलत  होते!
कसं तें बघा,'नानाभाऊ मी तुमच्याकडे यायला निघालो आहें!अर्ध्या तासात पोहचतो आहें!हडपसर गावात घ्यायला थांबा!'.. फोन बंद झाला!🌹

मला हर्ष आणि आनंद दोन्हीही झाले होते!गेल्या दहा वर्षांपूर्वी सर घरी आले होते!त्यावेळेस त्यांच्या साहित्यिक समृद्ध अनुभवांचा मनसोक्त लाभ घेतला होता!माणसं जन्माला येतात!प्रत्येकजन आपलं अस्तित्व ठेवून जात असतो!प्रत्येकाची ओळख वेगळी असतें!प्रसिद्धीच्या झोतातील व्यक्तिमत्व भेटतात तेव्हा त्यांची प्रसिद्धी डोळ्याला दिसतं असतें!त्यांचं कष्ट आणि समर्पण आपणा सर्व सामान्यांच्या लक्षात येत नसतं!एक एक पायरीवरून वर जातांना स्पर्धेतून जावं लागतं असतं!कामाच्या सचोटीतून महान गौरवास्पद कार्य त्यांच्याकडून झालेलं असतं!यश दिसत असतं!कष्ट पडद्याआड असतं!साहित्यातून ज्यांनी माणूस मांडला!असा लेखक आमच्या घरी येत होते!

जगण्याचा आनंद मी 
 क्षणोक्षणी घेत आहे
मातृ पितृ गुरुजनानां 
ओंजळीत घेत आहें..!

आभाळ आशिर्वादानें 
श्रीमंत मी होतं आहें
ऋणाचं विशाल ओझं
 देवाजवळून घेत आहें..!

श्रीमंतीचा सत तराजू
हाती माझ्या येत आहे
माता पित्यांची पालखी 
मी खांद्यावरी घेत आहें..!

शब्दमुखी एक माझा 
चरणी लीन होत आहें 
गुरुजनांच्या शिकवणीने
जीवन धन्य होत आहें...!

माता पिता गुरु माझे 
संस्कार त्यांचे घेत आहें 
श्रीमंतीचं अनमोल देणं 
उरी तृप्त होत आहें.....!

आदरणीय डॉ. बापूराव देसाई सरांनी खूप कष्टातून,मोल मजुरी करून शिक्षण घेतलं!डी.लिट,पी.एच.डी पर्यंत शिकलेतं!विद्यापीठात विभाग प्रमुख देखील झाले अन आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रातील नव विचारांची मांडणी केली!हिंदी,मराठी अन अहिराणी भाषेतून विचारांची पेहरणी केली!सागरासारखे महान योगदान देणारे!विशाल वटवृक्ष होणारे आदरणीय डॉ.बापूराव देसाई सरांचें पाय आमच्या घराला लागत होते हे आम्ही आमचं भाग्य समजत होतो!..🌷

थोर साहित्यिक!रूखठोक व्यक्तिमत्व आदरणीय डॉ. बापूराव देसाई सर आमच्या घरी येत होते!खान्देशातीलं पारंपरिक रूढी,परंपरांना आपल्या साहित्याचा मध्यबिंदू बनवून जन सामान्यांपर्यंत पोहचवलं!साहित्य आरसा असतो मानवी जीवनाचा ठळकपणे मांडणारे तत्वचिंतनकार आपल्या घरी येत होते!🌹

गुरु वाटाडया होतात!गुरु अंधारात उजेड होतात!गुरु नेत्र होतात!गुरु मार्गदर्शक होतात!गुरु ज्ञान देणारे शिक्षक असतात!गुरु अंधार पळवीत असतात!साहित्य हेचं करीत असत!साहित्यातून समाज प्रबोधन होत असतं!आदरणीय डॉ.बापूराव देसाई सरांनी साहित्यातून जगण्याची रीत-भात दाखवली आहें!डोळस विचारवंत माझे, गुरुदेव थोर साहित्यिक आमच्या घरी आले होते!आम्ही भाग्यवान आहोत!

जनसामान्यांची व्यक्तीरेखा साहित्यातून मांडणारे देसाई सर निर्गवी आणि अतिशय बोलके व्यक्तमत्व आहेत!त्यांच्या बोलक्या मुखातून साहित्यामृत बाहेर पडतं होतं!साहित्यिक डोळस करणारे असतात!साहित्यकण वेचणारे आमचे कान अलगदपणे हृदयात पाठवीत होते!एका महान साहित्यिकाच आगमन आमच्या घरी झालो होतो!आम्ही धन्य धन्य,कृत्य कृत्य झालो होतो!आम्ही हृदयातून आभार मानतो ईश्वराचं ज्यांनी आमच्या अज्ञानाला पिटाळून
लावण्यासाठी साहित्यिक गुरु डॉ.बापूराव देसाई सर अमृतघागर घेऊन आले होते!आम्ही ओंजळीतून ज्ञानामृत घटाघटा पीत होतो!तृप्त होतं श्रद्धेणे साहित्यिक गुरुजींच्या चरणांवर माथा टेकवला!🌹
**************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं -७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०५मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)