ज्ञानज्योती शैलाताई रतन माळी
ज्ञानज्योती शैलाताई रतन माळी
************************
💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
.......आज थोर समाजसुधारक कै.सौ.शैलाताई रतन माळी यांचा स्मृतिदिन!आमच्या थोरल्या वहिणीचां स्मृतिदिन!२२वर्षं मागे निघून गेलीत!दिवस, महिना वर्षे निघून गेलीतं!काही व्यक्तिमत्व!महापुरुष....असें असतात जे सतत त्यांच्या कार्यरूपात जीवंत असतात!स्मृतीतून जीवंत असतात!नजरेसमोर असतात!त्यांच्या विशाल आभाळा एवढ्या महान योगदानातून जीवंत असतात!कार्य कर्तृत्वातून हृदयात निवासाला असतात!तेथे मन, हृदय, अन काळीज जुळतं तेथे आपुले कर आपोआप जुळत असतात!💐
कै.सौ.शैलाताईंचा जन्म धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला होता!न्याहळोद या गावात झाला होता!आई-वडिलांची आर्थिक स्थिती अतिशय गरिबीची होती!दोन मुलं अन दोन मुली असलेलं हे कुटुंब गावोगावी भाजीपाला विकून उदरनिर्वाह करीत असतं!अशा परिस्थितीतून सुद्धा मुला-मुलींना शिकवित मोठे करीत होतें!💐
कै.सौ.शैलाताई या देखील भावांसोबत शिक्षण घेत होत्या! त्याकाळी जुनी ११वी म्हणजेच एस.एस.सी परीक्षा असायची!ताई उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या होत्या!आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शिकायला पैसे नव्हते!त्या अज्ञानी समाज पगडा असल्यामुळे मुलीलाही पुढे शिकू देत नसतं!अशातचं चांगलं स्थळ आलं म्हणून त्या त्यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्याचें परंतू पुण्यात असलेले रतन माळी यांच्याशी झाला!दोन्ही अतिशय कष्टाळू,मेहनती आणि जीवन स्वप्न पाहणारी होती!🌹
श्री.रतन माळी सर एका लहान कंपनीतं कामाला होते!आर्थिक परिस्थिती नाजूक होती!पुण्यातील हडपसर येथील ससाणे नगरला भाड्याच्या खोलीत राहातं होते!सर नंतर टेल्को कंपनीतं नोकरीला लागलें!त्याचं दरम्यान शैलाताईंनी घरी बसून काय करणारं? म्हणून ससाणे नगरमधीलचं लहान मुलं गोळा करून बालवाडी सुरु केली होती!🌹
बालवाडीच्या रूपाने पहिलं रोपटं लावणाऱ्या ताईंचा एक एक वर्ग वाढत राहिला!रतन माळी सरांच्या भक्कम साथीने एक एक शाळा वाढत राहिल्या!शिक्षणाप्रति असलेली ओढ जीवनाचा मार्ग बदल्यास भाग पाडीत असतो!पती-पत्नी दोन्हीही राबत होते!कष्ट करीत होते!शिक्षणाच्या वाटा शोधित होते!शाळांचा विस्तार होतं राहिला!व्याप वाढत राहिला!ताण वाढत होता!पुढे टाकलेलं पाऊल मागे नं घेता पुढेच वाटचाल सुरु होती!कधी वर्ग कमी पडू लागले तर कधी शाळा लहान वाटू लागल्या!अडी अडचणीवर मात करीत एक एक भक्कम पाऊले पुढे पडतं होती
कै.सौ.शैलाताईंना दूरदृष्टी होती!शाळांचा विस्तार होतं असतांना शिक्षणाचा दर्जाही टिकवून ठेवण्याचं महत्वपूर्ण कार्य त्या करीत राहिल्या!प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या वास्तूत शाळा भरत होत्या!विध्यार्थी घडत होते!शाळेतील सर्व विध्यार्थी आणि शिक्षकांच्या कै.सौ शैलाताई म्हणजे "मोठ्या बाई"होत्या!रतन माळी सर म्हणजे "मोठे सर" होते!शांत स्वभाव,संयमी वृत्ती,सर्व विध्यार्थीप्रिय आणि शिक्षकांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या ताईंची जिज्ञासा वृत्ती होती!💐
आदर्श शिक्षक हा आदर्श विद्यार्थी घडवीत असतो!संस्कार करीत असतो!विध्यार्थी संख्या वाढत होती!गुणवत्ताही वाढत होती!प्रत्येक बाबतीत प्रत्यक्ष लक्ष देऊन ज्ञान दान करणाऱ्या या ज्ञानमाऊलीच्या पुण्यातील विविध ठिकाणी शाळा सुरु झाल्या!मोठया बाई ज्ञान उपासिका होत्या!जीवन शिक्षिका होत्या!आदर्श माता होत्या!रतन माळी सर आणि शैलाताईंच संपूर्ण जीवन शिक्षणासाठी समर्पित होतं!शिक्षणानेच विकासद्वार उघडतं हीत्यांची नितांत श्रद्धा होती!💐
स्वप्न पाहणे!ते सत्यात उतरवणे!कितीही कष्ट झाले तरी न डगमगता कृतीतून सिद्ध करणे अशी जिद्द बाळगणाऱ्या शैलाताईंचा विविध ठिकाणी शाळा सुरु केल्याने प्रचंड ताण अन व्याप वाढत होता!क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले अन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मार्ग आणि वसा चालवणारे रतन माळी सर अन कै.सौ.शैलाताई उभंयता रात्रंदिवस अविश्रांत राबत होते!उभयतांच्या पोटी अतिशय गोंडस अन सुंदर अशा कन्यारत्नाचा जन्म झाला!.. तिचं नाव "स्मिता" असं ठेवलं होतं!
कै.सौ.शैलाताईंच जीवन त्याग अन समर्पित होतं!जेव्हा सन १९८२साली शाळा सुरु केली तेव्हा ज्या भागात त्या राहात होत्या त्या ससाणेनगर मध्ये गल्लोगल्ली हिंडून शाळेसाठी मुलं गोळा केली होती!तेंव्हापासून त्या भागात शैलाताईंची ओळख "माळीण बाई"म्हणूनचं झाली होती!माळीण बाईंच्या शाळेत जाणारें विध्यार्थी देखील अतिशय हुशार होते!ताई समाजाच्या तळागाळातील घटकांशी एकजीव झाल्या होत्या!
शिक्षणाच्या विकासासाठी जीवन समर्पित करणाऱ्या विशाल हृदयी "मोठया बाई"प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसल्या होत्या!शाळेचं छोटंसं रोपटे लावणाऱ्या या ज्ञानसावित्रीचं रोपटं मोठं होतं होतं विशालवृक्ष झालं!या वटवृक्षाच्या विविध शाखा पुण्यातील वारजे माळवाडी, आंबेगाव दत्तनगर, कात्रज,लोणी काळभोर, साडेसतरा नळी, ससाणे नगर, काळे बोराटे नगर अशा विविध ठिकाणी शाखेचा विस्तार होतं राहिला!गुणवत्तापूर्ण ज्ञानदानामुळे सर्व शाखामधील विध्यार्थी संख्या सात ते आठ हजार पर्यंत गेली होती!
दिव्यत्वाचा अंश असणाऱ्या
शैलाताईंविषयी,त्यांच्या महान ज्ञानदान कार्याविषयीं कितीही लिहिले तरीही शब्द अपुरेच पडणार आहेत!बालपणी दारिद्र्याचें चटके सोसणाऱ्या कै.सौ.शैलाताईंनी आपल्या पतीसह अपार कष्ट उपसलेतं !आपल्या संस्थेचा... "महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचा"विशाल वटवृक्ष ज्ञानदानात एक एक टप्पा पार करीत गगनाच्या दिशेने निघाला आहे!ज्या ज्या ठिकाणी संस्थेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी बालवाडी ते १२वी पर्यंत वर्ग सुरु आहेत!विध्यार्थी ज्ञानजागृत झाल्यावरच मानव समाजाचा विकास होतो!हे तत्व अंगीकरलेल्या ज्ञानज्योती!कर्मयोगी!समाजसुधारक कै. सौ. शैलाताई रतन माळी यांचा आज २३मार्च रोजी "स्मृतिदिन" आहे!
महात्मा फुले विद्यानिकेत संस्थेमधून शिक्षण घेत आपलं आयुष्य घडविणारी मुलं "मोठया बाईंना" आपला आदर्श मानतात!कच्च्या मडक्याला आकार देणाऱ्या या ज्ञानसावित्रीचा आज स्मृतिदिन दिन!ध्येयवादी समाजसुधारकांचा आज स्मृतिदिन आहे!वंचित
घटकास आपल्या शाळेत प्रवेश देणाऱ्या महात्म्याचा आज स्मृतिदिन!प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण प्रपंच उभ्या करणाऱ्या ज्ञानज्योतीचा आज स्मृतिदिन आहे!मोठया बाईंचा आज स्मृतिदिन आहे!ज्ञानदान देणाऱ्या,नंदनवनं फुलविणाऱ्या,विचारांचा कायापालट करणाऱ्या अन विध्यार्थी हेचं उदिष्ट मानणाऱ्या कै.सौ.शैलाताईंचा आज २३मार्च २०२३रोजी स्मृतिदिन आहे!
...कन्या सौ.स्मिताताई वाघ आणि जावाई.. प्राचार्य रवींद्रजी वाघ सर या संस्थेची धुरा सांभाळून मोठया बाईंचं स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत आहेत!कै.सौ.शैलाताई माळी डी.टी. एड अध्यापिका विद्यालयाची सुरुवात करून बाईंच्या स्मृतीनां कार्यरूपात ज्ञान विस्तार करीत आहेत!अशा महान योगिनीचा!ज्ञान ज्योतीच्या!समाजसुधारकांच्या स्मृतिदिनी हृदयातून भावपूर्ण अभिवादन!विनम्र अभिवादन!
************************
💐💐💐💐💐💐💐
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२३मार्च २०२३(स्मृतिदिन)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment