गुढीपाडा तें आखाजीनां गोमडा

🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
गुढीपाडा तें आखाजीनां गोमडां 
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
**************************
... नानाभाऊ माळी

......सक्कायनां उगता यांयमव्हरे आंग धोयीस्नी आवर सावर चालू व्हती!सक्कायनीं थंडी वार्गी आंगलें बिलगी हुभारीबन कामले जुपी ऱ्हायंती!कमाल से!!!!सक्कायमां थंडी
कुमचाडी ऱ्हायतीं!डोकावर यांय येवावर तपेल उन चमकाडी ऱ्हायंत!..दारना मव्हरे धाबांपार,हुभा उच्चातडांगं टोकर भांदेलं व्हता!जिमीनवर पाटलं व्हतं!पाटलांवर टोकर हुभा व्हता!टोकरलें सजाडी सुजाडी त्यांवर तांब्याना गडूनंखाले नव्वी-कोरी साडी नेम्मन खोसी भांदेलं व्हती!साखरन्या गाठी संगेमांगे हाली ऱ्हायंत्यातं!निमनं डक्स उल्टा तांब्याम्हा नेम्मन खूपसी ठेयेंल व्हतं!पूजा-अर्चा करेल गुढी दारना मव्हरे हुभी व्हती!गुढीना डोकावर घसेल घुसेल तांब्या चमकी ऱ्हायंता!त्यांवर वल्ला कुकुघायी काढेल स्वस्तिक चमकी उठी दिखी ऱ्हायंता!गुढी नव्वा सालनं आगाजा करी ऱ्हायंती!नवा सालनां पहिला दिन व्हता!चैत महिनानां पहिला दिन व्हता!गुडीपाडा व्हता!🌹

घरपरात गुढी भांदेलं दिखी ऱ्हायंती!बठ्ठया गल्यास्मझार आल्लग आल्लग रंगन्या गुढया दिखी ऱ्हायंत्यांत!बठ्ठ गावं आनंदन्ही गुढीम्हा रंगी जायेल व्हतं!गुढी हार एक घरनं भूषण व्हती!गुढी श्रद्धानीं व्हती!गुढी डोयानं पारनं फेडी ऱ्हायंती!नव्वा सालनां पहिला यांय उगेल व्हता!प्रभू श्रीरामचंद्रनीं गुढी हुभी व्हती!लंका जिकीस्नी श्रीराम आयोध्यालें जायी ऱ्हायंतातं!आथ-तथ चौम्हेर बठ्ठ रामनं उजाये दिखी ऱ्हायंत!दारना मव्हरे गुढी हुभी व्हती!राजा राम हुभारी दि ऱ्हायंतातं!घरेघर पुरणपोयीनां सयपाक सुरु व्हता!🌹

२२मार्च २०२३नां दिन श्री. शालिवाहन शके १९४५ चैत महिनानीं सुरुवात व्हती!हिंदू पंचांग थीन वरीसना पहिला महिनानीं सुरुवात व्हती!पहिला दिनन्ही सुरुवात व्हती!दुपारनांभरे यांय चटकाडी ऱ्हायंता!गावना भाहेर बठ्ठ गुमसुम व्हतं!खेतीनां कामे आवरी-उवरी कुनबी घरे-दारे बठेल व्हता!नांगरटी व्हयेलं वावरना ढेकाया उन शेकी ऱ्हायंतातं!उन वार्गीम्हा ढेकायां मज्या ली ऱ्हायंतांत!चौम्हेर झाडंनां कोल्ला पांदडां गयीगुयी नवा निय्यागार पाने दिखी ऱ्हायंतातं!
बांधवरना झाडे सतानां आंगवर उन शेकी सावली दि ऱ्हायंतातं! हाड्या-चिड्या झाडेस्नी सावली दखी नेम्मन फांट्यास्वर जायी बठेल व्हतात!ढोरे ढाकरे,बकऱ्या वाडगांसावलीम्हा बठेल दिखी व्हतात!🌹

भाहेर उनन्हा चटका व्हता!घरमा थंडावा व्हता!गुडीपाडा व्हता!पुरणपोयींनं जेवण व्हतं!बोघनाम्हा दायगुयीं शिजी ऱ्हायंत!आल्लग शिजेल दायनं पानी धाकला बोघनाम्हा वती ठेयेंल व्हतं!समार वाटीस्नी जर्मेलनीं धाकली बोघनीम्हा तेलफुलं वती,वाटेल समारसंगे दायन पानी रसीलें गदक फोडी ऱ्हायंतं!चुल्हा हासी ऱ्हायंता!दाथडया काढी ऱ्हायंता!रसीना गदकलें उक्कय फोडी ऱ्हायंता!रसीना मगमागात वास तें चाटोऱ्यास्नी भूकलें न्युत दि ऱ्हायंता!दोन्ही हातस्मा धुडकधरी चुल्हावरनीं रसीन बोघनं खाले उतारी ठेयेलं व्हतं!दाय-गुयीं शिजाडीस्नी नेम्मन वाटी-उटी रवरवात पुरन दिखी ऱ्हायंत!🌹

......गहूनं पीठ पानीम्हा वली-उलीस्नी लाटनाघायी लाट्यास्न पोट फाकाडी त्यास्मा पुरण भरी,पुरी लाटायीं ऱ्हायंती!चुल्हान्हा उब्याम्हा खापर चटकी ऱ्हायंत!पुरण भरेल लाटेलं पुरणपोयीं हातना मनगटवर नाची कुदी ऱ्हायंती!गोल गिटिंग फिरी ऱ्हायंती!फिरता फिरता मोठी व्हयी पसरी ऱ्हायंती!उब्यांवरना हुना खापरवर  शेकायी ऱ्हायंती!पुरी आल्टी-पलटी व्हतं शेकात ऱ्हायनी!पुऱ्यावर पुऱ्या एक एक करी खापरवर शेकात ऱ्हायन्यात!रांधनारीनंलें घाम फोडी ऱ्हायंती!घड्या घाली एकवर एक रचीस्नी ढिग वाढत ग्या!तयेल-तुयेल भज्या, कुल्लाया,पापडेस्ना ढिग वाढत ऱ्हायना!बोघानाम्हा खीर गदकत ऱ्हायनी!भात शिजी सुजी झाकी
ठेयेंल व्हता!घाम फोडी सयपाक आवरायी ग्या!सोतानां हातघायी करेल सयपाकनं भूषण आनी
आननं आल्लग ऱ्हास!यांय गुढीनां डोकावर बठी दखी ऱ्हायंता!🌹

ताटम्हा पुरनंपोयींनं पाच पकवान व्हाढी ठेयेलं व्हतं!गुढी सोडीस्नी पाटवर ठी दिन्ही!पूजा व्हयीनीं!निव्वद दखाडं!रामनं नाव लिसनी, रामलें हिरदम्हा बठाडी घरना बठ्ठा जेवालें बठनात!गुडीपाडा हिरदनीं श्रद्धानां भाव से!भाव तठे देव ऱ्हास!देव आपले परजांनतं ऱ्हास!दुःख आथ-तथ वसारी सुखनीं गुढी हुभी करत ऱ्हास!सुपडाम्हा दयन सोयता सोयता दिन कानी व्हयी जास!घर, वावर,वट्टा करत जिंदगी मव्हरे सरकत ऱ्हास!बठ्ठ नव्व नव्व करी नवा सालनं स्वागत करत ऱ्हास!हुना
वार्गाम्हा निय्येपन दिखत ऱ्हास!त्याले आपलं करी लेवो!हूनं झेली पानकाया यीं धडकस!हिवायानीं थंडी बिलगी बिलगी हुभारी देत ऱ्हास!

खायी खुयी दिन चालना जास!आगाजा आखाजीनां करी जास!नव्वा यांय,नव्वा दिन,नव्वा कोरा चैत महिनानी सुरवात करी जात ऱ्हास!हेरनं पानी,वावरनां काया ढेकाया,हून वार्ग संगे दि जातंस!आखाजी पाउत निसर्गानां हावू खेय चालूच ऱ्हास!आखाजी खान्देशनं नव साल ऱ्हास!आंडेरं बेटी माहेपनंनां सावलीले येलं ऱ्हास!गवराया वाट दखत ऱ्हातीस!..बठ्ठा नवा येंव्हार-पाव्हार आखाजी फाईन चालू व्हतस!मव्हरे रोहिन्या यीं भिडतीस!शेरावर शेरा वावरनं ढेकाये फोडत ऱ्हातीन!बी बिवारांनी पयापय चालू ऱ्हायी!कुनबी डोया हुघाडी जागे व्हयी!हायी चक्र से!हयाती भर सुटावू -तुटावू नई!निसर्ग आनी हयाती चक्र फिरावत ऱ्हास!गुडीपाडा तें आखाजीनं नातं जोगे जोगे येत ऱ्हास!इसनू रुपी राम गुडीपाडालें यीं जातस!आखाजीलें संकरलें संकर येत ऱ्हातस!गुडीपाडा तें आखाजीनां गोमडां आसाचं चालतं ऱ्हायी!🌹
************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह मु.हडपसर,पुणे-४१२०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३१मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)