माझी आई अशीच आहे (भाग -१५)
💐💐💐💐💐💐
माझी आई अशीच आहे
(भाग-१५)
💐💐💐💐💐💐
********************
... नानाभाऊ माळी
माय देवाचीही लेक
फिरे संसाराचं चाक
होई लेकुरवाळा देव
आई संसाराच नाक!🌷
देव उगेयुगे उभा
सार ममतेचं गावं
होई विटेलाहीं भार
देव वसवितो गावं..!🌷
माय ममतेची वात
आत उजळतो देव
माय जळणारी ज्योत
होई गाभाऱ्याचं नाव!🌷
आई देवाची सावली
त्याचं चालवीते नाव
कधी होई धावाधावं
लागे संसाराची हाव!🌷
आई अनमोल हिरा
कोण करील रें भाव
नाही भेटला तराजू
आई अमृताचें नाव!🌷
......आईची किंमत अन मोल कधी कुठे झाली आहे का हो? कधीतरी काही महाभागांनी करायचा प्रयत्न केला असेलहीं निश्चितचं त्या मापाचा तराजू मिळाला नसेल!आईचं मोल ठरविणारा देवा शिवाय दुसरं कोण असणारं आहे बरं ?आईच्या हृदयात देव वास्तव्याला असतो!आईच्या मनात सतत विचारांची धावाधावं सुरु असतें!आईच्या जिभेवर साखर पेहरणी करणारा देवस्वरूप आत्मा महान असतो म्हणून आई देवपुत्री असतें!आई हळव्या मनाची असतें!कोणी तिचा अपमान केला तर तिचं मन खूप दुखावलं जात असतं! गहिवरून येताचं टचकण डोळ्यातून पाणी काढत असतें!... माझी आई अशीच आहे!🌹
२३मार्च २०००साली अतिशय हळवा,वेदनादायी,काळीज पिळवटून टाकणारा,कधीही न विसरता येनारा दुःखद दिवस उजाडला होता!आमच्या थोरल्या वहिणी, महात्मा फुले विद्यानिकेत संस्थेच्या संस्थापक कै.सौ.शैलाताई यांचं निधन एका दुर्धर आजारनें झालं होतं!त्यांनी पुण्यातल्या हडपसर मधील ससाणे नगर भागात प्रथम बालवाडी सुरु केली होती!पालकांच्या मागणीमुळे शाळेचे एक एक वर्ग वाढत गेले!आमचे बंधू आदरणीय रतन माळी सरांची भक्कम साथ होती!दोघांचें कष्ट उपसनें सुरूच होतं!शाळारुपी रोपट्याचं रूपांतर पुढे विशाल
वटवृक्षातं झालं होतं!विविध ठिकाणी स्वतःच्या जागेत शाळा सुरु होत्या!वारजे माळवाडी,आंबेगावं,कात्रज, साडेसतरा नळी,कदम वाक वस्ती, लोणीकाळभोर अशा विविध ठिकाणी शाळां सुरु झाल्या होत्या!🌹
एकटीच कन्या स्मिता(सोनू)दिदी खुपचं लहान होती!ज्ञानदानाच्या पवित्र ज्ञानकुंडात उभंयता पती पत्नीनीं झोकून दिलें होते!सोनू दिदीकडे मायेने,ममतेने जीव लावणारी आई,आपल्या पोटच्या गोळयास अचानक सोडून देवाघरी गेली!आई असणे किती महत्वाचं असतं हे त्यावेळेस कळलं होतं!मुलगी धायमोकलून रडत होती!जिवाच्या एकांताने रडत होती!अतिशय वेदनेने रडत होती!आई.. आई..आईचां हंबरडा फोडून रडत होती!आई गेल्याचं दुःख काय असतं हे त्या वेळेस रडणाऱ्या त्या निरागस लेकीकडून,सोनू दिदीकडे पाहून शिकलो होतो!आईचं असणं किती महत्वाच असतं!आईचं नसणं काय असतं हे त्यावेळेस मुलीच्या अश्रूतून दिसतं होतं!आई आपल्या अस्तित्वाची ओळख असतें!तिचं देवाघरी गेली तर किती दुःख होतं असतं हे दुःख सहन करणाऱ्यांकडून शिकावं!💐
....आपला जन्म झाल्याबरोबर आई ज्ञानकुंड पेटवीत असतें!अखंडपणे आईरूपी ज्ञानकुंड पेटलेला असतो!ज्ञानदानाचा अग्नी सतत तेवत असतो!उठता,बसता जागेपणी-झोपतांना आई सतत आपल्या मागे लागून कच्चे मडके भाजीत असतें!आयुष्यभर हे ज्ञानकुंड पेटत राहतं!आपल्या अपत्यांवर संस्काराची शिकवण सुरूच राहते!हे ज्ञानकुंड विझतं तेंव्हा स्वर्गवारी सुरु होतं असतें!मुलांवर आयुष्य खर्ची घालणाऱ्या मातेचा ज्ञानकुंड शांत होतो!आईच्या थोरपणाचें उपकार फेडणारे कोणी आहेत का? कोणी भक्त पुंडलिक अन श्रावणबाळ होणारे असतील तर तें भाग्यवान आहेत!परतफेड तरी कशी करावी?....आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत असतील तर ते पुण्य गाठीशी बांधणारा सुपुत्र भाग्यवान म्हणावा!
आई श्रेष्ठ आणि विशाल हृदयी असतें!आईच्या वृद्धापकाळात तिची सेवा करून आपला वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी धडपडलं पाहिजे!आपली मुलं हे सर्व पाहत असतात!आई जन्माचं साधन नसून संस्कार शाळा असतें!मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आई झटत असतें!माता सुखधागा विनित असतें!स्वतःफाटकी होतं राहते!रिते होऊन जातें!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹
आई जवळ जिव्हाळा असतो!जिव्हाळा अत्तर अन कस्तुरी सारखा असतो!सतत सुगंध दरवळत असतो!कोमल हृदयात आईने जिव्हाळा जपून ठेवलेला असतो!आई मुलांच्या यशात असतें!प्रगतीत असतें!दुसऱ्यांच्या सुखासाठी दुःख सहन करणारी आईचं असतें!तिची माया अन प्रेम कधीही अटणार नसतं!तिचे कष्ट विशाल आभाळाहून मोठे असतात!आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌷
.....आई स्वतः कंदील होतं अंधार पळवीत असतें!उजेड होतं ज्ञानप्रकाश देत राहते!आईची कुशी देवाहून श्रेष्ठ असतें!ऊबदार अन सुरक्षित असतें!आईची बाग हिरवीगार असतें!आई क्षमाशील असतें!मुलांचं उलटे सुलटे वागणं पोटात घालत असतें!तरीही त्यांना दृष्टी देत असतें!आई प्रेम अन मायेचं झाड असतें!आईची पूजा श्रेष्ठ सेवा असतें!सर्वांचीच आई अशी असतें!... माझी आई अशीच आहे!🌷
.....आई आपल्या जीवनाचा पहिला प्रकाश आणि गोड आवाज असतें! निर्मळ पाणी असतें!पाणी सतत वाहत असतं!परमेश्वरानें निर्माण केलेली वात्सल्यमूर्ती असतें!आई कनवाळू कन्या-पुत्रवत्सल असतें!आई उन्हातील हिरवळ असतें!आई आशेची सर्वश्रेष्ठ पूर्ती असतें!आई आत्मसात करण्यासाठी जीवन अपूर्ण असतं!आई माऊली असतें!विठ्ठलात एकरूप झालेली माऊली असतें!आई माया ममतेचा गाभारा असतें!आई पंढरीतील चंद्रभागा असतें!सर्वांनाच पवित्र करीत वाहत असतें!आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹
आई विसावा ठिकाण
माथा टेकन्याची जागा
तूझ्या कुशीच्या उबेत
माय वाहते चंद्रभागा.!🌹
आई होतेस जागल्या
......रात्रंदिन तू जागते
सु-शी भरते दररोज
......देवरुपी तू वागते..!🌹
आई खोल खोल बोल
आयुष्य बाळाचं मागते
.....श्वास देतेस अर्पुनी
आई कुणासाठी जगते?🌹
**********************
💐💐💐💐💐💐💐
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२९मार्च २०२३
Comments
Post a Comment