चला जाऊ गड किल्ल्यांवर (भाग-०४)

********************
चला जाऊ गड किल्ल्यांवर
        (भाग -०४)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
... नानाभाऊ माळी 

........मन तृप्तीचं साधन आनंद असतो!मन तृप्त झालं तर जीवन देखील धन्य होत असतं!माणूस आनंदी राहायचा असेल तर तो निसर्गाच्या सानिध्यात रमला पाहिजे!निसर्ग मित्र असतो!सखा असतो!दोस्त असतो!डोळ्याच्या तृप्तीचं साधन आहे!..... मग आम्ही आलो!आम्ही पाहिले!तृप्तीने माघारी परतीच्या प्रवासाने जिंकलो!जिंकणे ही सात्विक भावना आहे!सकारात्मकता आहे!सकारात्मक ऊर्जा आहे!अशी ऊर्जा अंगात घेऊन निघालेले काही पर्यटक मावळे किल्ले सर करण्यासाठी गेलो होतो!... काही मावळे म्हणजे!.. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ते ऐशीव्या वर्षांपर्यंत असलेले जिद्दी अन शूर मावळे होते!मावळ्यांचे सरसेनापती होते आदरणीय वसंतराव बागूल सर!🌷

आदरणीय बागूल सर आणि सहकार्यांच्याआदेशानुसार आम्ही प्रवासाला निघणारे शूर मावळे, यासाठी म्हणावे की मार्च महिन्याच्या कडक उन्हात!सुष्क गवतातून!झाडांच्या पांनगळतीतून!तापलेल्या काळ्याशार खडक पाषाणातून!अंगातून निघणाऱ्या घामातून!गुडघ्यावरं येणाऱ्या अंगाच्या वजनातून!तोंडाला तृष्णा देणाऱ्या वातावरणात हिम्मतीची तलवार घेऊन लढाईला निघालो होतो!🌹

काल दिनांक २३मार्च २०२३रोजी तीन बसेस गड किल्ल्यांच्या दिशेने पळत होत्या!एका बसमध्ये ४१जन होते!तीन बसेस मिळून १२३व्यक्ती चंदननगर,पुण्याहून निघाल्या होत्या!किल्ला म्हणजे स्फूर्ती आणि शक्तीचं प्रतीकं असतात!म्हणून तिन्ही बसेसमधून आलेल्या व्यक्तीच्या मुखातून "जय शिवाजी!जय भवानीची गर्जना ऐकू येत होती!बसेस रस्त्याला मागे टाकीत पळत होत्या!वाघोलीहून केसनंदमार्गे सकाळी ७-३०वाजता आधी थेऊरला पोहचलो!गणेशाचं दर्शन घेतलं! चिंतामणीचं दर्शन घेतलं!तेथून उरुळी कांचनमार्गे पुढे शिंदवणे गावाच्या पुढे शिंदवणे घाटातून तिन्ही बसेस धावत होत्या!🌹

पहिला किल्ला होता आंबळे गावातील सरलष्कर दरेकरांची गढी!शिवाजी महाराजांच्या काळातील साताऱ्यातील दरेकर घराण्यातील सरदारांना ही जहागिरी मिळाली होती!इंग्रजानीं नंतर जहागिरी ताब्यात घेतल्या अन सरकार जमा केल्या!तरीही गढी ही खाजगी स्वरूपात दरेकर घराण्याकडेचं राहिली!भुईकोट सारखी येथील गढी आहे!आता जरी ढासळलेल्या, पडक्या स्वरूपात असली तरी इतिहासाची पाने उघडणारी आहे!प्राचीन आत्म्यांचा हुंकार आहे!बांधकाम कलाकृतीच्या खानाखुणा आहेत!...आंबळे गावातच प्राचीन शिव मंदिर आहे!पूर्णतः आखीव रेखीव दगडात असलेलं हे मंदिर सरळ भक्तीरसात भिजवून टाकतं असतं!मन प्रसन्न आणि आनंदित होत राहतं!त्या काळात पाषाण अन मळीच्या चुन्यातून भक्कम बांधलेलं वैभव सर्वांना मोहवीत आहे!इतिहास अमृतपान करीत आहे!🌹

तेथून पुढील प्रवास होता!ढवळगड किल्ल्याचा!आंबळे गावापासून साधारणतः चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला खुरट्या जंगलात असलेला कमी उंचीच्या पुण्यातल्या पर्वती सारख्या पर्वतावरील हा किल्ला जुन्या काळात घेऊन जातो!हा किल्ला त्या काळात कदाचित टेहळणीसाठी वापरात असावा!पायथ्या पासून साधारण एक किलोमीटर उंचावर असलेला!वेडीवाकडी,नागमोडी वळण घेत आपण वरती पोहचतो!अलीकडे पायऱ्याचं बांधकाम सुरु केलं आहे!तटबंधीवजा किल्ला पठारावर प्राचीन शिवमंदिर आहे!उत्तम कला शिल्पातील मंदिर मन वेधून घेतं असतं!उन्हातही थंडगार,प्रसन्न वाटणाऱ्या गर्भगृहात आपला माथा पिंडीवर टेकवला जात असतो!उंचावर असल्याने थंड गरम हवा हवेची झूळूक अंगाला स्पर्शून जात होती!मंदिरा बाहेर पाण्याचा टाका देखील आहे एवढ्या उंचावर पाण्याचं अस्तित्व असणं म्हणजे आश्चर्य
वाटण्यासारखं होतं!हा संदेश मानवी मनाला प्राचीन भूतकाळातील अस्तित्वाची ग्वाही देत असतो!🌹
मन तृप्त होतं किल्ल्यावरून खाली उतरत होतो!इतिहासातील घट्नांची नोंद मनात पुंजीरूपात गोळा करीत निघालो होतो!🌹

......पुढील प्रवास शेवटच्या टप्प्यातील होता!तिन्ही बसेस दौलत मंगळ किल्ल्याकडे निघाल्या होत्या !म्हणजेच प्रवास भुलेश्वरकडे या प्राचीन मंदिराकडे निघालो होतो!आजूबाजूचा संपूर्ण परिसर वनखत्याच्या अख्त्यारीत आहे!खरं म्हणजे प्रवास जीवनाचा उजेड असतो!उजेडाचा आरसा देखील असतो!मागील घटनाचं प्रतिबिंब यातून प्रकट होतं असतं!आम्ही किल्ल्याकडे निघालो होतो!किल्ला दर्शन उजेडाकडे नेत होता!पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला म्हणजेचं "भुलेश्वर मंदिर" परिसर आहे!अखंड घडीव दगडांतं अतिशय कलाकूसरीतून घडवलेल्या अनेक पाषाण मूर्ती मन वेधून घेतात!

भुलेश्वर देवस्थान हे माळशिरस गावाच्या उत्तरेला असून पुणे जिल्ह्याततील पुरंदर तालुक्यात आहे!मुख्य मंदिराचं बांधकाम हे आठव्या शतकातील असावं आणि बाहेरील बांधकाम हे यादवकालीन १२व्या शतकातलं असावं!नंतर पेशवे काळात याचा जीर्णोद्धार झाला आहे!या मंदिरापासून बाहेरील बाजूस त्याकाळातील भिंती बांधलेल्या दिसतात!भक्कम तटबंधी असलेल्या भिंतीचें अवशेष आपलं अस्तित्व टिकून आहेत!.. सर्वचं पडके अवशेष दिसतात!याला पुरातत्व विभागात दौलत मंगळ किल्लाम्हणून नोंद आहे!खुरटे जंगल परिसर हिरवाईने नटलेलं दिसतं होतं!सुरक्षित जंगलात एकांत ठिकाणी असलेल महादेव मंदिर अतिशय प्राचीन धरोवर आहे!हे मंदिरशिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे!असो या प्राचीन वास्तू संस्कृतीच दर्शन देत उभ्या आहे!प्राचीन मंदिर इतिहास साक्षी म्हूणन स्फूर्ती देत ऊर्जेचा स्रोत बनून उभी आहेत!🌹

....नेहमीच आव्हान आणि आवाहन देत असलेल्या गड किल्ल्यांचे मानवी मनाला आकर्षण राहिलेले आहे!ओढ राहिलेली आहे!खडतर वाट,अतिशय दुर्गम कडे-कपारीतून रस्ता शोधित उंचावरील किल्यांचं दर्शन होतं राहात!माणूस त्यांच्या ओढीने तेथे पोहचतं असतो!ओढ नैसर्गिक असतें!ती जीवन श्राफल्याकडे नेत असतें!🌹

भक्कम तटबंदी आव्हानात्मक उभा कडा अन बुरुज गड किल्ल्यांची ओळख असतें!ओळख असतें जिद्द आणि जबरदस्त चिकाटीची!किल्ले भक्कम असूनही असुरक्षित भावनेची सतत जाणीव असलेलं ठिकाण असतांत!त्या काळातील किल्ल्यातून राज्य कारभार हाकला जात होता!लोकभावनेला जागृत ठेवण्याचं कार्य तेथून होतं होते!आज प्रत्येकाला निसर्गाची ओढ आहे!त्यात गडकिल्ले आवाहन आणि आव्हान देत आहेत!इतिहासाला अमृत पुरवीत आहेत!माणूस त्या सानिध्यात जाऊन डोळ्यातून अमृत प्राशन करीत तृप्त होतं या विस्मयकारी वास्तू हृदयातल्या कप्प्यात जपून ठेवत आहे!🌹

किल्ले लढाऊ बाणा शिकवीत असतात!किल्ले शौर्याची गाथा सांगत  असतात!किल्ले अस्तित्वाची निशानी असतात!किल्ले मानव समुहाच्या अस्तित्वाची ओळख असतात!किल्ले माणसाला इतिहासातील घटनांची साक्ष देत असतात!दगड धोंड्यातून ठेचकाळत पुढे जाण्यास सांगत असतात!लढा म्हणत असतात!कितीही बाका प्रसंग आला तरी लढत, झुंज देत पुढे जायला सांगत असतात!🌹

माणसांच्या पिढ्या मागे गेल्या!  जात राहतील त्यांनी बांधलेलें प्राचीन गड-किल्ले आपलं अस्तित्व ठेवून उभे आहेत!इतिहासाची साक्ष देत उभे आहेत!......काल दिनांक २६ मार्च २०२३रोजी 'चला जाऊ या गड किल्ल्यांवर' मोहिमेचे संयोजक, आयोजक आणि मॅनेजमेंट गुरु आदरणीय वसंतराव बागूल सरांनी याचं "तीन" किल्यांवर नेले होते!आंबळे किल्ला,ढवळगड आणि दौलत मंगळ किल्ला असें ते तिन्ही किल्ले पुरंदर तालुक्यातील साह्याद्रीच्या रांगेतील लढाऊ ढाल म्हणून उभी होती!आता ही उभी आहेत!त्यांच्या शौर्य गाथाची साक्ष म्हणून उभ्या आहेत!

अशा गडकिल्ल्यांवर जाता आलं!त्या काळातील वास्तव आव्हान कसं असेल ते पाहता आलं!हे आमचं भाग्य आहे!.... तिन्ही बस परतीच्या प्रवासाला निघाल्या तेव्हा १२३व्यक्ती एकमेकांचें सखा, मित्र आणि आनंदाचा झरा झाले होते!एकमेकात मिसळून गेलेत होते!सर्वचं एकजीव झाले होते!..सर्वांना प्रेम भावनेने नमन करतो!आनंदाचा हाखळखळून वाहणारा जीवंत झरा अखंडपणे वाहत रहावा!...आदरणीय वसंतराव बागूल सरांनी सर्वाना असाच आनंदी क्षणांच्या सानिध्यात नेत राहावे हिचं नम्रपणे विनंती करतो!🌹
**********************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)