सार सामाननी आडजी पडजी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सार सामाननीं आडजी पडजी
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
आज व्हयी से!होळी से!मनम्हानां उल्टा इचार!नको तें बठ्ठ संगयेलं आज व्हयीम्हा बायी टाकनं से!चांगलं तें अस्सल सोनासारखं बठ्ठ आपला संगे लयी फिरनं से!अहिराणी मायना जेठा मोठा भाऊ बहिनीसलें
व्हयीन्या शिय्या-काटका खावन्या शुभेच्छा!पुरणपोयी खावान्या शुभेच्छा!🌹
आते उन चटकी ऱ्हायन!गावं गल्ली-वावरम्हानां झाडे,जुना पाला- पाचोया झटकी-झूटकी आंगवर आखो नवीन शिनगार घाली ऱ्हायनातं!नेसी ऱ्हायनातं !फांट्यासलें निय्यागार पांदडां फुटी ऱ्हायनात!एक पांदडं,दोन पांदडां,तीन पांदडां!
पांदडाचं-पांदडास्ना निय्यागार सिंनंगार चढी ऱ्हायना!
फेब्रुवारी महिना सरना!दिनन्हा चटके उनम्हा रातनी थंडी घुसी खे चालू व्हता!रातले हिवं वाजे!दिनलें जिमीन धपे!आते मार्च महिनाफाईन तें तय पाय,आंग-डोकालें चांगलाचं चटका बठी ऱ्हायना!या वरीसले थंडी कती उडी गयी,आन कती चालनी गयी,पयी गयी कयनीच नयी!हिवायांनां यांय डोकावरथून सरकनातं नयीतं!यांय खांदवरनां(शोल्डर)कुडचिनी शिलायी दखत दखत कानी व्हयी जाये!भर डोयावरी दखत-दखत तिरपा-तिरपा व्हयी खाले उतरी,पयी-उडी निंघी जाये!वरलांगे बल्लांमांगे बुडी जाये!धाकल्ला यांय जल्दी उगेतं आनी जल्दी माव्वी जायेतं!त्या हिवायानां यांय कयेत नई!🌷
दिनेदिन आते यांय मोठा व्हयी उगी ऱ्हायनातं!दिन मोठा,रात धाकली येवाले लाग्नी!नेम्मन आते आपला डोकांवरना बालेस्ना गोलगीटिंग भवरा दखतं यांय वरलांगे जायी ऱ्हायना!जोरथाईन उंडायां लागानी कांनंगी करी ऱ्हायना!यांय दवंडी पिटी ऱ्हायना!वरतून निक्खार चटका दि मव्हरे पयी ऱ्हायना!हुपारा व्हयी ऱ्हायना!डांबरी रस्ता,सिर्मेटनां रस्ता चप्पलासलें भुंजी ऱ्हायनांतं!🌹
आथा-तथा वावर-मयाम्हा उनन्हा चटकाम्हा निय्यागार पिकें दिखी ऱ्हायनात!आजून रातनं हिवं कमी व्हयन नयी!रातनी थंडीलें तंगाडांगुंता आज सोमवारनी ०६ तारीखले व्हयी(होळी)यी धडकनी!व्हयी चेटनी का ऱ्हायेलं-सुयेल थंडी दूरलोंग पयी जायी!मंग मातरं गदारा घाम काढतं ऱ्हायी!सवूड करी पंघरागुंता जाडीझटक पुरनन्ही 'झावर'लें खटलानीं धोयी-चोयी घडोशीवर ठी दिन्ही!म्हनस कसी,'हिवाया सरी ग्या, झावरनं काय काम से!'🌹🌹
सिरमिटनां घरमां फरशी टाकेल ऱ्हास!दिनभर सिरमिटम्हानं लोखंड उनन्ही आग व्हडी व्हडी रातना थंडीम्हा गरमायी बाहेर काढत ऱ्हास!आते तें रातलें भी घरमा दारनन्हा मझार गदारा व्हयी ऱ्हायना,नी दारनां भाहेर थंडी वाजी ऱ्हायनी!🌷
अशा चटकाडू उनन्हा खरा फायदा घर,गली-आलींन्या शानल्या सुरत्या बायामानसे लेत ऱ्हातीस!अशा टाइमलेचं सार-सामाननी याद येस!आपली जीभ भलती चटोरी ऱ्हास!थाटीम्हा जेवालें चिकनं-चोपडं व्हाडेलं जोईंजे!शाक भाकरंसंगे लोणचं,पापड,कापेल कांदानी फोड,कव्हयं निंबूनी फोड जोईंजे!पापडे भी कधयं नागलीना,कधय चिकनीना,कव्हयं गहू-तांदूयीना, कधय उडीदना जोईजे!खावाना गंजज नखरा ऱ्हातस!चटोरी जीभलें या वानवाननां वास्तू लागतीस!यानं शिवाय थाटीलें शोभा ऱ्हात नई!🌹
आते दिनलें चांगलचं उन पडी ऱ्हायन!सार-सामान बनावानं चालू व्हयी जायेल से!हेटली-वरली गल्लीन्या बाया एक जुगथीन सार सामान करालें लटकेल सेतीस!चुल्हावर खालतुन उब्या,वरथून बोघनं ठेयेंल दिखी ऱ्हायनं!अडजी पडजी चालू से!पापडेस्न पीठ नि कुल्लायास्न चीक घेरायी ऱ्हायनं!गावमां गल्लीधरी आडजी-पडजी चालू से!येरायरनां बोघनास्मा पापडे,कुल्लाईस्न पीठ घेरायी ऱ्हायनं!दांड-चाटू बोघनास्मा फिरी ऱ्हायनात!🌹
दार मव्हरे साय पसरी टाकेल दिखी ऱ्हायनी!लाटी लाटी पापडे टाकायी ऱ्हायनात!कुल्लायास्न चीक ठसाम्हा टाकीस्नी गोलगीटिंग कुल्लाया खाटलावरनां वल्ला धोतरवरं टाकायी ऱ्हायन्यातं!चाव्वय गोंधान्या हिनीमिनी कामे उरकी ऱ्हायन्यातं! आतेनां कायलें शिया-काटका, उडीदनां पापडगुंता मशीन यी जायेल सेतं!आते मूक्ल कस्ट ऱ्हायनं नयी!तरीभी हातलें भंग नई!व्हयी, गुडीपाडा,आखाजीधूर सार सामाननां गोमडा चालू ऱ्हास!🌹
सार सामानन्या घरन्या कनंग्या, उडतीन भरी ऱ्हायन्यातं बाई-माणुसले उज्जी हावरं ऱ्हास पन!बठ्ठ सार-सामान आवरा शिवाय समाधान नयी ऱ्हास तिले!चैन पडतं नयी तिले!घरनां डबा-डुबा,उडतीन भरतसं तवलोंग हावरं काय जात नयी तिन्ह!पाह्येटे जल्दी उठी,हिनीमिनी यानंत्यानं दारें पापडे कुल्लायास्ना सिंगार चालू ऱ्हास!बाई माणूस भलती नेकदार -टेकदार ऱ्हास पन!फुकटनं दुसरांघर पापडे,कुल्लायां मांगालें जावावू नई!!!
सोतानं हासू कारावू नई!नाकनां मव्हरे चालानं नेम्मन गणित बाईगंमथून शिका सारखं ऱ्हास!नेकदार,टेकदार, करमावती बाई घर सार-सामान बनावस!चटोरी जिभले,घरना तोंडेसलें देत ऱ्हास! बाईनां सवसार अशाच व्हडा तानी करी चालतं ऱ्हास!या जोजारलें भंग ऱ्हात नयी!
पोरें-नवरा झूलू झूलू करतसं!वटका करतसं!कव्हयं-मव्हय नाया भी पाडतंस!घालीपाडी भी बोलतसं!पन ती उक्खयमां डोक ठीस्नी कामले लागी जास,फुटो का तुटो!उमेदथीन बठ्ठ आवरी-वूवरी वड्या,पापडे, कुल्लाया करत ऱ्हास!खान्देशनी माय माऊली कष्टालें भ्यात नयी पन कोनदारें मांगालें जावानं इज्जतलें भ्यात ऱ्हास!🌹
आखाजी गयी का मव्हरे देव घाऱ्यावाऱ्या कराले लागी जास!पानकायाना भूदभवरा उठी आगीन तारावर उडालें लागी जास!
जोरथाईन एखादी वांधी उठस!बगीस्करी एक दिन दडदड पानी पडस!मंग पहयेरनीगुंता बी बिवारानी तयारी सुरु व्हयी जास!मंग वाला वाला वानंनां सार सामानलें कुस्टायें लागी जास!माय माउली एक सोडी दुसरा कामले लागी जास!सार सामाननां गोमडां आवरी आखो नवा बिप्तासलें तोंडं देत सवासार घडी मोडत ऱ्हास!🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०६ मार्च २०२३
होळी(व्हयी)
nanabhaumali.blospot.com
Comments
Post a Comment