सत्याचा शोध

💐💐💐💐💐💐
           सत्याचा शोध
   🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
... नानाभाऊ माळी 

.....सत्य म्हणजे काय असतं बरं? सत्य कोणाला म्हणायचं मग? सत्याजवळ कसं पोहचायचं ?घटित घटनांची डोळे,कान अन मुखाद्वारे साक्ष होते त्याला आपण सत्य म्हणावं का मग?विज्ञान,तत्वज्ञान, अध्यात्माच्या ठोस पुराव्यातून सत्याची पडताळणी होत असतें!सत्य जिवंत असतं असं म्हणतात!सत्य काही दिवस झाकता येत,कोंडून ठेवता येत पण सत्य कधीच लपवता येत नसतं!सत्य अस्स्सल सोनं असतं!सोन्याला तापवून कस लावतातं!पिवळेधमक सोनं सत्याजवळ नेऊन सोडत असतं!🌹

.......सत्य जाळून जळत नसतं!संपत नसतं!सत्य त्रिकाल टिकावू असतं!सत्य जन्माचा श्वास असतो!आपण श्वास घेतो तें सत्य आहे!सूर्य उगवतो, मावळतो,डोळ्याला दिसतो हे त्रिकाळ सत्य आहे!ते लपवता येणार नाही!झाकून चालणार नाही!म्हणून तें सत्य आहे!मानव कल्याण हेतू कर्म असतं तें सत्य असतं!सत्याला
परीमाण असतं!सत्याचा ताळा असतो!सत्य सुसंस्कारातून जन्म घेत असतं!सत्य हिंसेपासून दूर असतं!सत्य वास्तव दुःखाचं पेनकिलर असतं!मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सत्याधारीत असतात!

डोळ्याला दिसणारे सर्वचं सत्य नसतं!कानांनी ऐकलेलं सर्वचं सत्य नसतं!अंतरीचा सकारात्मक आवाज सत्याकडे नेत असतो!अंतरीचे बोल सत्याकडे नेत असतात!सत्याची ऊर्जा दिव्यस्वरूप असतें!सत्य माणुसपण जपत असतं!सत्य सुखाची भाषा असतें!आनंदाचा साक्षात्कार असतो!सत्य निरपेक्ष असतं!सुख दुःखापासून अलिप्त असणारं सत्य तेजस्वी असतं!🌹

....सत्याला चटके बसत राहिले!सत्याची परीक्षा होत राहिली!परीक्षा देत,त्यातून सिद्ध होत,उत्तीर्ण होत सत्य अति नम्र होत गेलं!मुलायम होत गेलं!मग त्याला आपण परमेश्वर म्हणू लागलो!सत्याच परिमाण ईश्वर असतं!सत्य कुठेही बुडत नसतं!सत्य विज्ञान गृहीतकांच्या अनेक परीक्षा देत राहिलं!उत्तीर्ण होत राहिलं!सत्याची तुलना होत राहिली!आई वडिलांनी जन्म दिला हे सत्य मान्य झाल्यावर मुलाला वारसदार समजलं गेलं!सत्याचा श्वास जोवर सुरु असतो तोवर कुठलंही असत्य प्रदूषण परिणाम करीत नसतं!सत्याचा उजेड, सत्याचा प्रकाश,सत्याचा प्रवास सत साध्याकडे जात राहिला आहे!

....सत्याजवळ नेणारे,सत्याची अनुभूती देणारे अनेक महापुरुष होऊन गेलेलें आहेत!सद्गुरू होऊन गेलेले आहेत!मानवी समाजाचं खरं हित कशातं आहे हेचं या महापुरुषांनी सांगितलं!वैज्ञानिकांनी सांगितलं!संतांनी सांगितलं!कर्मयोगीनीं सांगितलं!धर्मपंडितानी सांगितलं!मानव समाज या विचारवंताच्या सत पावलांवर चालतं राहिला!विचार प्रवाहक होत राहिले!तें सूर्यासारखे तेजस्वी असतात!संपूर्ण समाज त्यांचा अनुयायी होतो!सत्याची भिंत कधीही तुटणारी,फुटणारी नसते!हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय होते!हे सत्य आहे!आजही प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्यां लढावू बाण्यातून सत्यासाठी रक्त सळसळत असतं!त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्र मुलुख कधीही विसरणार नाही!ते योगपुरुष होते!युगपुरुष होते!तें वीरपुरुष होते!ते लढाऊ किर्तीवंत महाराजां होते!महापुरुष होते हे त्रिकाल सत्य आहे!

....छत्रपती शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारें देखील महापुरुषचं होते!महात्मा ज्योतीराव फुले हे विद्वान महापुरुष होते!माणसाला सत्याजवळ नेणारे युगपुरुष होते!सर्व माणसं एका देवाची लेकरे आहेत मग त्यांच्यातं भेदाभेद का?उचनीचता का? समानतेपासून चार हात दूर का? अशा सत्य दर्शनासाठी उभे राहिलेले  "सत्य शोधक" होते!क्रांतीसूर्य होते!विचारक होते!

....सत्यासाठी सतत तात्विक अन सात्विक लढा देणारे महात्मा ज्योतीराव फुले आयुष्याच्या अखेर पर्यंत सत्य दर्शन दाखवीत राहिले!अंधार पांघरलेल्या बुरसट कर्मठांशी लढा देत राहिले!तात्विक अन सात्विक सत्य प्रदान करीत राहिले!सत्य गरम तव्यावरची भाकरी असतें!सत्याची भूक असणारा व्यक्ती महामानव हाऊन प्रबोधनकार होत असतो!सदगुणांचा प्रसार प्रचार करणाऱ्यासं यातना दिल्या गेलेल्या आहेत!अंधाणूकरण करणाऱ्या, बुरसटलेल्या आप मतलबिंकडून  सत्यावर सतत प्रहार होत राहिले आहेत!सत्य झुकत नसतं!वाकत नसतं!म्हणून सत्य टिकून आहे!

.... अनन्वित छळ करणाऱ्या धर्ममार्तंडाचां जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कृतीतून समाचार घेतला आहे!आपल्या वाणीतून समाचार घेतला आहे!तें सत्याची काठी घेऊन प्रतिकार करतं राहिले!संत तुकोबा बहुजनांना अंधारात ढकलणाऱ्या आप मतलबिंवर कठोर होतात!सत्याचा उजेड दाखविणारे संत हे जनसामान्यांचें,बहूजनांचे प्रतिनिधी होते!अंधारातून उगवत्या सूर्याकडे नेणारे दर्शनकार होते!सत्यरुपी सोनं लपवणारे धर्माचे दलाल स्वार्थी होते!संतांनी अशा दलालांचा समाचार घेतलेला आहे!

....सत्य स्वच्छ अस्सल पाण्यासारखं असतं!सत्यावर श्रद्धा ठेवून मानवी जीवनाची वाटचाल सुरु असतें!मानव कल्याण हे सत्याचं निरपेक्ष रूप असतं!आई-वडील जन्म देणारे, सुसंस्कार करणारे अन डोळस करणारे आदर्श श्रद्धास्थान असतात!सतमार्गी,आदरणीय,वंदनीय, पूजनीय असतात!सतगुरूच्यां डोळस मार्गदर्शननाने काळाकुट्ट अंधार पिटाळून लावला जात असतो तेव्हा सत्याचं दर्शन होत असतं!हे सर्व सत्यरूप आहे!🌹

...काळानुरूप सत्याची झीज होत चालली आहे!असत्य त्यात मिसळलें जात आहे!या उपटसूभं नवसत्याच्या उदयाने मानवी मूल्य ढासळू लागली आहेत!त्यालाच सत्याचा मुलामा देऊन गर्दीदलाल मोठे होत आहेत!गर्दी खेचून अर्धसत्य हेचं सत्य आहे असं मनामनात रुजवू लागले आहेत!डांगोरा पिटीत हिंडत आहेत!पूर्ण
सूर्यसत्य गुदमरू लागले आहे!

....सत्याचा शोध घेणारे अन तीच वाट जोपसणाऱ्या महानशक्ती,महापुरुष काळाच्या पडद्याआड चालले आहेत!त्यांच्या डोळस मार्गांवर चालणारे अनुयायी सत्य दर्शनासाठी जनजागृती उजेड दाखवीत आहेत!भारतीय सांस्कृतिक,धार्मिक मूल्यांची जोपासना करणारे तत्वचिंतक पडद्याआड जाऊनही त्यांचें सत्कार्यमूल्य जिवंत आहेत!लढा सत्याचा आहे!अनुयायी सतउजेडाची ज्योत घेऊन हिंडत आहेत!

.....संत तुकाराम महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महात्मा गांधी,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज,महाराजा सयाजीराजे गायकवाड,स्वामी विवेकानंद ....हे सतदर्शनकार आहेत!सत्याचा शोध घेऊन त्या मार्गांवरून चालत राहिले!जनसामान्यांना सत्याची कवाडे उघडी करून दिली!त्या उजेडाचा अनुभव देणाऱ्या सर्वचं सत्य शोधकांना विनम्रपणे अभिवादन करतो!

************************
💐💐💐💐💐💐💐💐
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२१मार्च २०२३
nanabhaumali.Blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol