या पानीले काय म्हनो आते

👏👏👏👏👏👏👏
या पानीलें काय म्हनो आते
👏😥👏😥👏😥👏
**********************
... नानाभाऊ माळी 

कायेज खल्ली उलटं करी वावरलें दि टाको!एकवचनी पतिव्रतांगतं जीव टाकी राबत ऱ्हावो!सोतानं दुख
 लपाडी मेहनत-कस्ट करत ऱ्हावो!आपला पले चाया करनारा,दागंडो करी खेय करनारा बेमोसमी पाऊस गयावर सूरी लायी चालना जास!यांले काय म्हनो?वावरेस्मझार खल्ली वराटा-पाटा फिरायी जास!आपन कोल्ल खावो मांगालें न जावो!आज हात पसरानी पायी यी गयी!तगादा लायी लायी तगाऱ्या भरी लयी पयी ग्या!आते यांले काय म्हनो?👏😥

हायी गार पडेल... चमक्या मोती व्हयीस्नी आते उनम्हा चमकी ऱ्हायनी!देर जेठनागत वागी ऱ्हायनी!वावरनी जनेल हुभा पिकनी कयदासीन व्हयी झित्रा व्हडी ऱ्हायनी!बये बयेज आयवट ली ऱ्हायनी!बठ्ठास्मझार एक नंबरी व्हयी ऱ्हायनी!सोता खट्टा व्हयी आम्हना नशीबनां भोगलें झाडी ऱ्हायनी!... यां पानीलें काय म्हनो आते?

मायनी दातखीडी बसी गयी!बाई भूगलं व्हयी बठनी!हायी गार... चारी तंगड्या उच्च्याकरीस्नी पडतं ऱ्हायनी!दारसे बैल लाय गायेत हुभा सेतसं!येरायेरलें शिंगडा ठोकी, शेपट्या चौमेरं घुमी ऱ्हायन्यात!सईन व्हत नयी!तोंडं लपडता येत नयी!याजवाला सकायले दारसे हुभा ऱ्हातिनं!काय करो मांघे फिरता येत नयी!सवसारलें दारसे ठी जाता येत नयी!हायी गारले काय म्हनो आते!

कालदिन परोनंदिन पानी पडनां!अन्नाडू,बेमोसम,बिनकामना पडना!खेतम्हा घुशी वाल्हाफुक्यांमायेक आडा हुभा उना,हेट्या-वऱ्हा नाची कुदी चालना ग्या!धव्व्याबरफ गारा पिकेसले झोडी ग्यातं,त्या भी
पंडायंम्हा आटकी बठन्यात!पाऊस वारांमांगे लागी घोमालत सुटना!उचडेलपना आनीं उलगेलपना करी,हाद्या-कुद्या मारत हुभा गहू-हारभरालें जिमीनवर आडा पाडी ग्या!जे पीक हुभ व्हतं,ऱ्हायेलं-सुयेलं बठ्ठ लयी पयी ग्या!वावरेस्मा डाबरां न डाबरा भारी ग्यातं!शेतकरीनां डोयास्मझार डाबरा भारी ग्यातं!सोतानं तोंडं ठोकतं ऱ्हायी ग्यातं!या गारलें काय म्हनो आते?😥👏

बीन न्यूतानां पाऊस उना!येता खेपे दनंदनं करत हुभा पिकलें पुरा झामलायी ग्या!!हुभा गहू-हारभरानीं वाट लायी ग्या!काही ठिकाने इतला जोरम्हा पडना तें इचारता सोय नई!शेतकरीलें आवर-सावर करालें निरानाम येय दिन्हा नयी!जथीबनं तथी निस्ती बदबद धव्वीबरफ गार पडेल दिखी ऱ्हायंती!आर्धा घंटा उना पन व्हावाडी लयी ग्या!या पानीलें काय म्हनो आते?😥👏

हावू बेमोसम पाउस!बे भरोसे पानी!कव्हयंभी गारनां दगडे लयी येस!रवसडी येस!गार फेकी जास!बठ्ठ शिवार शेपाली जास!ठोकरायी जास!पिकेस्ना छातडावर बठी ठायकाचं चित्त करी जास!चिखोलनां कंबरलें गुद्धा गुद्धी करी आखो वाल्हा फुक्यांमायेक वांधीसंगे पयी जास!काही आढावू-भेंडे लोके नाया पाडी निंघी जातंस!आते कोन कोनगंम दखू?काय म्हनों या पानीलें 😥👏

डोकावरनं कायमटकं आभ्राय पोट खाले करी आथ तथ फाकनं!आर्धा घंटाम्हा जीव गूदमरेलं,डोया चोयेत सूर्यदेव मोक्या सास लेवाले लाग्ना व्हता!साजूकनींमायेक, निच्चीतनारायण नींमायेक हासी ऱ्हायेतां!कडक उन पडी जायेलं व्हतं!पिकें आडा व्हयेलं दिखी ऱ्हातातं!जथ बन तथ निस्त चिखूल नजरें पडी ऱ्हायेंतं!ज्या लेकरूलें पोटना गोयाथीन मूक्ला जीव लावा व्हता!त्यालेच हावू भोराभोटा पानी कायमना उखली लयी ग्या!निजाडी ग्या!शेतकरी कोनंजोडे तोंडं ठोकी आते? कोनजोडे तोंडं झोडी आते? हाक ना बोंब,बठ्ठ संगे लयी ग्या
पाप्पीधोत्रा!बठ्ठास्ना डोयालें पंडाय लायी ग्या!डोयासले झडी लायी ग्या!गहू,हारभरा,कांदा,केयी,द्राक्ष,आंबा, संत्रास्नी वाट लायी ग्या!शेतकरी कोना भरोसावर जगी आते?शेतकरी कावड लायी,कडी आगय करीस्नी घरमा गुडघास्मा डोकं ठी आंसू गायी ऱ्हायना!बेमोस्मी पानीलें काय म्हनो आते!😥👏

बी-बिवारानं कर्ज!खतन्या थैल्या! मोल-मजुरी!मोटरनं बिल!!बठ्ठ बठ्ठ छातडावर नाची ऱ्हायनं!कोन्ह कोन्ह चुकतं करु?कोन कोनगुंता रडू नि कोन कोनगुंता लढू?वजी जिव्वर यी जायेल से!मांगला वरसारदम्हा पीक काढानं येले असाच झोडी गयेतां!तें कर्ज डोकावर बठेल से!आते गहु-हारभरा टाकेलं व्हतात!जराखा केयी व्हतात!दरखेपे असाच कंबर मोडी जायी ऱ्हायना!गारपीठनी तें केयीस्ना घड भी सोडात नई!पुरा घोडा वांधीम्हा मोडीग्या!आडा करी ग्या!आते हावू बेमोसमी पाउस घोमाली चारी मुंड्या चित करी ग्या!दारसे भांदेल जितरबलें मारी ग्या!घरमा खावलानां  तसबा नयी!काय म्हनो या पानीलें?😥👏

वावरम्हा दखाडागुंता काय ठेयेंलं से आते?धल्ली वटका करी ऱ्हायनी!डोकावर हात ठी ऱ्हायनी!समजाडी ऱ्हायनी!खटलानी हाय खायेंलं से!धल्ला असाच एक दोन वरीस मांगे वावरलें कटाई सर्गे जायी बठना!तठे महाल बांधी ऱ्हायना!पोरें सायनं वझ पाठगोयी मारीस्नी चिखूलमां लंगडी खेयेत सायमां जायी ऱ्हायनात!उख्खयमां डोकं पडी जायेल से,फुटो का तुटो आते!काय म्हनो या
गारपीटलें?😥👏

दारसे भांदेलं दुध देती गाय कायनु मायनु करी ऱ्हायनी!ती गारनां मार खायीस्नी पुरी आदमलायी व्हयी गयी!तिले हुभ ऱ्हावालें पाय लेता यी नयी ऱ्हायनातं!निस्ती मटमट दखी डोयाथुन आंसू गायी ऱ्हायनी!बागीस्कन मान धरी वासरिंगम दखी ऱ्हायनी!खोयाखोसी हातम्हा सोटा लिसनी तडतड पडेल गारनी... शेतकरीनं नव्व लेयेल डफडं फोडी गयी!राजा चगेल बेमोसमी पानी, सोतानं डफडं वाजी ढागेंढागं पयेत निंघी ग्या!काय गोडी ऱ्हायी यांनी आते? हुद्या कुद्या मारत येस!ठगाडीस्नी चालना जास!हायी कोनी करनी करेल व्हयी बरं?पाप आम्हना माथे,आम्हना पले बांध ग्या !दुखनां लोंढा दारसे वती ग्या!काय म्हनो या पानीले आते?😥👏
************************
👏😥👏😥👏🤔👏😥
************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४१२०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१९मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)