माझी आई अशीच आहे
माझी आई अशीच आहें
(भाग-१४)
💐💐💐💐💐💐💐
***********************
.... नानाभाऊ माळी
आई सगुण साकार
आई ममता आकार..!
आई प्रकाश स्वरूप
आई देवाचीये रूप...!
आई कंठाची वाणी
आई पाळण्याची गाणी!
आई घालते फुंकर
आई हृदयाचां अंकुर..!
आई बासरीचां उर
गोड निघतोयं सूर...!
आई संस्कार शाळा
दारी उजेड आला....!
आई माहेरची फोडणी
आई सासरची मांडणी..!
आई अथांग वारी
आई पाळण्याची दोरी..!
आई अथांग क्षितिज
कधी नभातली वीज..!
जीव लावीला पनाला
आई कळली कोणाला?
....अशी देवस्वरुप आई जगाला आनंद,सुगंध देणारी असतें!सुखाची मांडणी करणारी असतें!शब्द काव्यातही बसणारी नसते!ममतेचा अखंड झरा वाहत असतें!...आई जेव्हा मौनातून संवाद साधते!स्वगतात बोलते तेव्हा तिचं देणं देवाहून विशाल होत जातं!आई अशीच असतें!देता देता सर्वस्व देवून जाते!आपल्या मुलाविषयी आई म्हणते आहे........... 💐
...... "बाळा!बाळा!!... तू आता वयाने आणि कर्तृत्वाने खूप खूप मोठा झाला आहेस!खरंच खूप मोठ्ठा झाला आहेसं!मान-सन्मान सर्व काही तूझ्या चरणांशी लोळणं घेत आहें रें!हो!मोठ्ठा हो!जरूर मोठा हो!माझे आशीर्वाद तूझ्या पाठीशी आहेतचं!माझे हात तूझ्या डोक्यावर आहेत!आशीर्वादी हात सतत तूझ्या सोबत आहेत!साथ देत राहतील तूला!आशीर्वादाची शक्ती आभाळाहूनही मोठी असतें रें बाळा!एवढं मोठं, विशाल आभाळ आशिर्वादासाठी ठेंगणे झालंयं रें!त्यानें माझा शब्द राखला रें बाळा!केवळ माझ्या शब्दाखातरं आभाळ खाली आलं बघ नां!केवळ तूझ्या साठीच बाळा!मला तुझ्याकडून काहीही नकोयं रें बाळा!
...आभाळ खाली येऊ शकतं!तू तर माझ्या रक्तामांसाचा आहेस ना!मी..!मी... तूला जन्म दिला आहे!माझ्या पोटचा गोळा आहेस तू!माझे आशीर्वाद अन श्वासही तुझेचं आहेत रें बाळा!माझे डोळे तुचं आहेस!माझे कान देखील तुचं आहेस!माझं काळीज तुलाच दिलेंलें आहे!तू केंव्हाही माग मी तूझ्या स्वाधीन करेन बरं!माझ्या डोळ्यातल्या तलावात तुचं पोहत असतोस रें बाळा!🌷
मला आठवतंय !!लहानपणी एकदा तू खूप तापला होतास!खूप आजारी होतासं!तूझ्या कपाळावर हात ठेवला तेव्हा जाणवलं होतं,माझ्या हाताला चटका बसत होता!मला धस्स् झालं होतं!खेडं गावं होतं आपलं!रात्रीची वेळ होती!'हे' तुझे बाबा देखील गावाला गेलें होते!तू तापाने फनफनत होतासं!काय करावं सुचतं नव्हतं!मी घाबरलें होते!तूला कुशीत घेऊन एकटीच अश्रू गाळत बसले होते!तू तीन वर्षांचा असेल तेव्हा!ताप कमी होतं नव्हता!मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवून ठेवुनही ही ताप खाली येत नव्हता!डॉक्टर शेजारच्या गावी राहात होते!गावाचं अंतर तीन एक किलोमीटरचं होत!शेजारी सर्वचं झोपलेले होते!🌹
एक अतिशय अवघड निर्णय घेतला होता!तूला जाड गोधडीतं गुंढाळलं! अन खांद्यावर घेऊन अंधाऱ्या किर्रर्र रात्री एकटीच त्या गावी घेऊन पोहचलें होते!रात्री अवेळी मला पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले होते!डोळ्यासमोर मला तेव्हा फक्त आणि फक्त माझं बाळ दिसतं होतं!हो बाळा... तेव्हा मला फक्त तुचं दिसतं होतास!डॉक्टरांनी तूला ऍडमिट करून घेतलं होतं!मी तूझ्या सभोवती फिरत होते!माझ्या काळजाचा तुकडा होतास रें तू!🌹
.....असंच एकदा तू कोणालाही न सांगता शेजारच्या गावी यात्रेला निघून गेला होतास बाळा!संपूर्ण दिवस गेला!संध्याकाळ झाली!अंधार झाला होता तरी तू घरी आला नव्हतास!तू कुठे गेला होता आम्हाला माहीत नव्हतं!तुझे बाबा अन मी वेड्यासारखं तूला शोधीत होतो! शोधून कुठेही दिसला नव्हतास!मी रडून रडून डोळे लाल करून बसले होते!गावातं यात्रेहून काहीजन आले तेव्हा कळलं,तू त्यांना यात्रेतं भेटला होतासं म्हणून!आम्ही खूप घाबरलो होतो!रात्रीचं त्या गावी तूला शोधायला आलो होतो!बस स्टॅन्डवर एका कोपऱ्यात स्वतःची वळकुटी करून बसलेला होतास बेटा!तू थंडीने गारठाला होतासं!तूला तशा अवस्थेत पाहून माझं काळीज कसं झालं असेल तेव्हा?त्याचं रात्री तूला घेऊन आम्ही घरी आलो होतो!
.......असें अनेक प्रसंग आहेत रें बाळा!कुठला प्रसंग आठवूनं सांगू बरं ?अशा अनेक प्रसंगातून बाहेर काढीत,सावरत,योग्य तें संस्कार करीत तूला उभा करीत होतो!शिक्षण घेत पुढे जात राहिला!शहरात जाऊन,कष्टातून खूप मोठा झालासं!मागचं मागे ठेवून तू पुढे जात राहिलास बाळा!आम्हाला अभिमान आणि गर्व वाटू लागला होता!🌹
... तुझी धावपळ,वणवण अन दगदग पाहून आम्ही गावालाच राहाणे पसंत केलं होतं!गावातच तेथल्या तेथेचं होतो!कष्ट उपशीत होतो!तू शहरात आला,रमला,लग्न झालं!सर्व तूझ्या मनाप्रमाणे घडतं राहिलं रें बाळा!त्यात तुझे कष्ट होतेचं!तू पुढे जात राहिलासं!खूप खूप पुढे जात राहिलास!तूला मागे बघायला वेळ मिळाला नाही!तूला अडथळा नको म्हणून तूझ्या वर्तुळाबाहेरचं राहिलो!तुझं जगणं तुझंच होऊन गेलं!आमचं जगणं आमचंच राहिलं!आमचं गावं सुटलं नाही!गावपण सुटलं नाही!तूझ्या आठवणींनी जीव कासावीस व्हायचा बाळा!पण मनाची समजूत काढत उभे होतो!🌷
....आम्ही गावाच्या वेशीबाहेर पडलो नाही!तू गावाकडे येत नव्हतास!हळूहळू पाठ फिरवली!व्यक्ती जास्त काळ दूर राहिली की घट्ट असलेलें धागे आपोआप विरळ होत राहातात!तूला शहरं मानवलं होतं!तू तूझ्या विश्वात आणि संसारात एकरूप झाला होतास!आम्हाला ही एक-दोन वेळा तूझ्या घरी घेऊन गेला होतासं!आम्ही गावात मोकळे ढाकळे राहणारी माणसं!तुझं घर बंदिस्त कोंडवाडागत वाटतं होतं रें!विचारपूस करणारं!हृदयातून बोलणारं नव्हते!उठ-बस करायला,गप्पा मारायला गल्लीसारखे ओटे आणि माणसं नव्हती रें तूझ्या इथं!आमचं मन रमतं नव्हतं!कोंडमारा होत होता म्हणून नाईलाजाने आम्हाला गावी सोडून गेलास!गावातल्या मोकळया गल्लीची सवय होती आम्हाला!पण तू दूर दूर जात राहिला!आम्ही मागे पडत होतो!
वय अन वेळ थांबत नसतें रें बाळा!दोन्ही नियमित पुढे सरकत राहातात!तू गावाला येत नव्हता!आम्ही शहरात येत नव्हतो!हळूहळू तुझं गावाकडे येणं बंद झालं!तू तूझ्या जगात एकरूप होतं गेलास!आम्ही तूझ्या वर्तुळा बाहेर पडतं गेलो!काही दिवसांनी तुझे बाबा आजारपण अंगावर घेऊन निघून गेलेतं!तू आला होतास!कर्तव्याच्या सर्व बाजू सांभाळून पुन्हा निघून गेलास!मी एकटी पडले होते!घर खायला उठत होतं!तू एके दिवशी आला अन मला घेऊन गेलासं!घरी न नेता एका वृद्धाश्रमात घेऊन गेलास!काही दिवस बरें वाटले रें तेथे!सवय नव्हती!जीव कोंडल्यागत होतं होता!पुन्हा गावी घेऊन आलास!पुन्हा तेचं एकटे जगणं होतं बाळा!आयुष्याची संध्याकाळ नकोशी वाटते!जवळचे असें कोण राहिले नाहीत!गल्लीतली बाया माणसं रक्ताच्या नात्यासारखी आहेत!तरीही घर खायला उठत बाळा!🌹
.... बाळा तू उभा राहिला!तुझा सवसार उभा राहिला!मी आई तुझी!...तू उन्हात उभा दिसतो तेव्हा वाटतं,तूझ्या डोक्यावरचं प्रखर उन ओढून कवेत घ्यावं!अंगावर घ्यावं!उन्हाला पांघराव!तूझी सावली होत जगावं!तू सतत सावलीत असावा म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करीत असतें रें बाळा!!तू सुखात दिसला पाहिजेसं!माझ्या डोळ्यादेखत तू आनंदी दिसला पाहिजेसं!माझ्या डोळ्यातल्या पाण्यात सतत येत रहा!अंघोळ करत रहा!जमलंच तर पोहत रहा!तू सुखात रहा बाळा!🌷
मी संध्याकाळ सोबत जगते आहे!सूर्य अस्तास जात आहे!डोंगराआड सूर्य जात आहे!पण तूला माझं काळीज द्यायचं आहे बाळा!बोलावलं की पळत येईन बरं!पोटात खस्कन वार करून माझं उडणारं काळीज तूझ्या हाती देईन मी!मी वाट पाहते बाळा लवकर यें!संध्याकाळचां अस्तास जाणारा सूर्य नकोसा झाला आहे!💐... तुझीच आई!"🌷
आई तू जगदंजनंनी आहेसं!
निराकारास साकार रूप देणारी आहेसं!तूला देवाच्या देव्हाऱ्यात का ठेवू बरं?चंदन सहवासात
ठेवण्यापेक्षा तूला काळजात ठेवीन आई!... अशी.... अशीचं ... माझी आई आहे!अशीच माझी आई आहे ****************************
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment