ताणका आण्णा कोठे ग्या व्हयी

ताणका आण्णा कोठे ग्या व्हयी?
💐💐💐💐💐💐💐💐
************************
... नानाभाऊ माळी 

.......सक्कायम्हा तानका आण्णा गावन्या बठ्ठया गव्हारान्या बकऱ्या घरना आंगे गोया करे!तिसले लवंनांकाटे-काटे,जंगले-जंगले चराले लयी जाये!देडशे-पवनें दोनशे बकऱ्या गोया व्हयेत व्हतीन!गावनां घरपरात एक एक जन शिवाडांतोंडे बकरी सोडी जाये!ताणका आण्णानं घर भिलाटीमाचं व्हतं!एकलाचं ऱ्हाये!खटलं गमीस्नी गंजज वरीस व्हयी जायेल व्हततात!एक आंडोरं व्हता तो भी पोट भरालें सुरत चालना जायेल व्हता!आजून बापले तोंड दखाडालें येलं नई व्हता!आण्णान्हा घरना आंगे एक खये व्हतं!घरना आंगेचं व्हतं!दिन उगांमव्हरे ताणका आण्णा खयानं शिवाडं हुघडी दे!बकऱ्या येत ऱ्हायेत!खयामां कोंडांत ऱ्हायेतं!🌹

ताणका अण्णांनां दिन पाह्यटे झापाटामां सुरु व्हयी जायें!खयामां झाडझूड करी खतमुत उक्खल्लावर टाकतं ऱ्हाये!तितलाम्हा हेट्या जिमीनम्हातून लालभुधुक यांय वर वर सरकत ऱ्हाये!येर पाठे येर बकऱ्या लयीस्नी,बकरीस्ना मालक येत ऱ्हायेत!त्या खयामा आथ्या-तथ्या पयेत ऱ्हायेत!आण्णा शिवाडांतोंडे बसी नजर देतं ऱ्हाये!

एक एक बकरी खयाना हुघडा शिवाडांमझार चालन्या जायेत!खयामां निस्त्या आथ्या तथ्या लेंड्या गायेत ऱ्हायेत!खयानी वडांग हेन्कयनां काटा,धव्याबरफ बाभुईनां काटास्नी व्हती!वडांग काटास्ना भर टाकी नेम्मन रचेल व्हती!बकऱ्या गोया व्हतं ऱ्हायेत!तानका आण्णा शिकेल नई व्हता!पन घरपरात कितल्या बकऱ्या सेतीस ते नेम्मन सांगे!कोनी बकरी उनी,कोनी नई उनी!आण्णानं पक्क ध्यानमा ऱ्हाये!बकऱ्या गोया व्हयन्यात का आंग तोंड धोयी लें!सोता चुलाम्हा लाकडे चेटाडी धाकली जर्मेलनीं बोघनीम्हा एकादी कोल्ली वल्ली शाक शिजाडाले टाके!भाकरी ऱ्हान्धी-रुंधी तवावर भुंजातं ऱ्हाये!सक्कायमा हुनाहून्हया सयपाक करी,कुमचाडी न्ह्यारी करी नींघे!संगे आखो दु्पारंगुंता धुडकामा निय्या मिर्चीस्ना खुडा,कांदा नई ते मंग खाराम्हानी तेलफूलनी कैरीनीं चिरी भाकरमां गुंडायीसनीं धुडकानां भात्यामां भांदी लें!पक्की गाठ मारीस्नी एक हातमां भाकरीस्न गासोडं आन दुसरा हातमां शेवटेलं-सुवटेल भरीम लांबलचक कयकनी काठी ऱ्हाये!काठीनां तोंडले एक करवत्या इय्या नारयनी दोरीघायी बांधी-खुपसेल ऱ्हाये!रस्ता धरी जाता येता निम,हिव्वर,बाभुई जे दिखे त्या झाडेंस्न्या फांटीन्या आग्र्या ढाइ काढे!बठ्ठया बकल्ल्या निय्यागार पाला तुटी पडेतं!बगर बगर खात ऱ्हायेत!🌷

बकरीस्न गव्हारं लेंड्या गायेत मव्हरे मव्हरे सरकत ऱ्हाये!आथ-तथ तोंडंम्हा जे निय्या डिर फुटेल गवत सापडे ते कुर्तडी-कार्तडी लवननां काटधरी मव्हरे सरकत ऱ्हायेंतं!चरत चरत बकऱ्या जंगलनीं बल्ली चढी आंगे पांगेनं गवत खायी कुर्तडत मव्हरे सरकत ऱ्हायेत!खरं म्हणजे जिन्ह कव्हयंचं पोट भरत नई त्या बगरीलें बकरी म्हंतंस!आण्णा गबर गबर चरनाऱ्या बक्कल्लीलें मव्हरे मव्हरे हाकलंत ऱ्हाये!ढकलत ऱ्हाये! बकऱ्या चरता-चरता आपलं मुसडं वर नई करेत!आण्णा दनकारी-दुनकारी तिसले मव्हरे सरकावत ऱ्हाये!वाटवरचं एखादा निम,समडी, बाभुई लागे लांबलचक काठीले भांदेल करवत्या इय्याघायी झाडन्या वरन्या आग्र्या ढायी ढुयी काढे!बकऱ्या गोयम करी फांट्यास्वर तुटी पडेतं!🌹

एखादी गाभन बकरी चरता-चरता तठेचं रस्तावर जनी जाये!आण्णा तिन्ह बायतपन तठेचं उरकी टाके!बकरीनं कोकरू 'बे!बे!' करत आर्धा एक घंटाम्हा हुभ ऱ्हायी,उड्या
मारालें लाग जाये!हायी बट्ठी देवबानीं करनी से!मुक्का जित्रबले जलमताचं  आक्कल-हुशारी यी जास!सोतान खावानी, हुभ ऱ्हावानं ग्यान सोतालें यी जास!मानोसलें आशी अक्कल हुशारी ऱ्हात नई!

 दुपारनां भरे यांय डोकावर उनां का  ताणका आण्णा एखादा झाडना खाले सवरी सुवरी,मांड्या घाली बठी लें!चाली चाली पोट चिप व्हयी जाये!पाट पोट सपाट व्हयी जाये!धुडकानां भात्यामां भांदेल भाकर सोडीस्नी, लोसन टाकेल खुडांसंगे लायी लायी, एक-एक बलका तोंडे टाकत ऱ्हाये!बालका गये उतरत ऱ्हाये!दुसरा बलका लोंचानां चिरिंसंगे ऱ्हाये!तोंडले कोल्ल-मोल्ल फुट्र फाट्र चव देत ऱ्हाये!खुडामां तेल नई ऱ्हाये!लोंचानी चिरीलें तेल ऱ्हायें!चिरी भाकरवर घसडी घुसडी खायीस्नी तोंडलें चव यी जाये!🌹

बकरक्यानां जिंदगीलें आखो काय जोईजे व्हतं?कोल्ल मोल्ल खायीस्नी पोटलें भर व्हयी जाये!भाते गुंडाईस्नी नेम्मन ठी देवानं!बल्लींना आंगे लवन व्हता!व्हाता पानीलें चटकाये उन पी जाये!लवनम्हा वांवूखाले जित्त पानी ऱ्हाये!वांवूलें हातवरी आथी-तथी सरकायीस्नी पानीनां झिरा उपसी-हापसी आस्सल पानी दिखतं ऱ्हाये!आण्णा गुडघा टेकीस्नी,कंबर वाकी झिराम्हा तोंडं बुडायी घटंग- घटंग पानी व्हडत ऱ्हाये!पानी पेत ऱ्हाये!पानींनी तीस पुरी व्हवावर डर डुरं दि छाती मोकी करी लें!पोट भरावर आण्णा डोकावरनां यांयलें डोया बन करी,हातजोडी नमस्कार करे!आन म्हनें,'देवबा आज तु खावाले दिन्ह!जित्ता से तवलुंग तुन्हा पायनाजोडे ठेव माले!'

दुपारनांभरे बकऱ्या सावली दखी आंगे पांगेच बठी लेयेत!आथ्या तथ्या शिंगडा,शेपट्या हलावात ऱ्हायेत!थकेल बकऱ्या आखो तिसरापारलें हुभारीबन उठीस्नी कोल्ल-निय्ये गवत कुर्तडतं-कार्तडतं बयडीनां खाले उतरी जायेत!खाले लवनधरी चरत चरत मव्हरे सरकत ऱ्हायेत!ताणका आण्णा काठी धरी मांगे मांगे चालतं ऱ्हाये!

आण्णान्या तुटेल चपला फफुटा उडावत ऱ्हायेतं!मयकटेल धोतरनां बुंग्रा डोयाम्हा भरायेतं ऱ्हायेत!ठिगयलें भी गुदारा नई देतं!धोतरनां बुंग्रा कॅमेरा बनिसनी ताणका आण्णान्या मांड्या,गुडघा,कुल्ला दखाडतं ऱ्हाये!आण्णा दिन कठी ऱ्हायंता!जोगेनं सक्ख कोन व्हतं ज्याले छातीम्हा आडकेल हुंडूक सांगता यी?बठ्ठा परका व्हतात!बीन धागाना व्हतात!बीन टाकाना व्हतात!बीन रंगतनां व्हतात!.... तठे गव्हारान्या बकऱ्या समायानां मतलबी येव्हार व्हता!रातना अंधारामां गयतां डोयासलें धीरेस्करी पाच बोटे लावणारा कोन व्हता?

लवनमां धाकला मोठा खोल डाबरां व्हतातं!त्यास्म्हा निय्येगार पानी व्हतं!सक्कायमां चरालें नींघेलं बकऱ्या, यांय वरलांगे जावा पाऊत पुऱ्या तिस्या व्हयी जायेत!बठ्ठया बकऱ्या
डाबरांस्म्हा तोंडं घालीस्नी घट घट पानी पेयेंत ऱ्हायेत!यांय बुडानां ये लें दोन्ही कुखा तट्ट व्हयेंलं बकऱ्या गावंगंम पयेत ऱ्हायेत!मांगे लेंडया गायेत ऱ्हायेत!खुटानां व्हडा बलावत ऱ्हाये!🌷

ताणका आण्णालें  गव्हारकिना महिना भरावर कोन पैसा दे!कोन नई दे!आण्णा कोनलेचं बोलें नई!दिन मावयावर दोन्ही कुखा तट व्हयेलं बकरीलें दखीस्नी बक्रीस्ना मालक खूष व्हयी जायेतं!आण्णानं हिरद भरी यें!मन भरी यें!"बकरीनं पोट भरन ते आपलं पोट भरन!" आसं आण्णा म्हने!लोकेस्नी गव्हारकीनां पैसा येयंवर देवानी बोंब नई व्हती!जिव्वर येलं नीं मायेक करेत!आण्णा कोनले सांगे नई!बोलें नई!मन लायी बकरीस्नी सेवा चालू व्हती!🌹

.....आज आक्सीमांयेक ताणका आण्णा बकऱ्या चराले लयी जायेल व्हता!यांय बुडावर ज्यानंत्यांनी बकरी,ज्यानंत्यानं घर यी लागेल व्हती!बकऱ्या नेम्मन रस्ता धरी पयेत सुटन्या व्हतीन!बीन बकरक्यान्या बकऱ्या ब्यांsss ब्यांsss करत घर यी भिडण्यात!तिस्ना मांगे ताणका आण्णा दिखना नई!दिन मावी ग्या!आंधारं पडी गये!गावं गल्लीनां लोके बॅटरी चमकाडतं एक-देड कोस दूर अंधाराम्हा आवाज देतं जायी उनात!दूर पाऊत दखत फिरनात!आण्णा कोनाचं नजरे पडना नई!दिखना नई!

दुसरा दिन आण्णानां दार मव्हरे जो तो हुभा व्हता!घरले कुस्टायें व्हतं!खयानं शिवाडं हुघडंचं व्हतं!आण्णानां ताल तपास लाग्ना नई!बकऱ्या चरानां रस्ते लवन,बल्ली, आंगे पांगे धुंडी दख!आण्णा कोठेचं दिखना नई!आण्णा कोठे ग्या व्हयी बरं ??
💐💐💐💐💐💐💐💐💐
***************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं -९९२३०७६५००
दिनांक-०८मार्च२०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol