मोरपीसाचा क्षणिक स्पर्श
मोरपीसाचा क्षणिक स्पर्श
********************
... नानाभाऊ माळी
......भेट या शब्दातील ऊर्जा ऊबदार असतें!हवी हवीशी वाटत असतें!भेटीचा क्षण कधी संपूच नये असं वाटतं असतं!भेट कधीतरी गुलाबाच्या फुलासारखी असतें!फुलणारी असतें!हसणारी असतें!लाजाळूच्या झाडा सारखी असतें,क्षणगंधित असतें!मोरपीस हळूच स्पर्श करीत जगण्याची आसं लावीत असतं !स्वतःतील सदगुणांना कुरवाळीत असतं!भेटीचा तो क्षणिक योग आपल्याला काहीतरी देवून जात असतो!डोळस करीत मार्गदर्शिका होतं असतो!भेटीचा स्पर्श सप्तरंगी असतो!इंद्रधनुष्यासारखा असतो!मोरपीसाचा स्पर्शासारखा असतो!मोरपीसाच्या त्या सप्तरंगात मन प्रसन्नतेची जादू असतें!ते क्षण संपूच नये असं वाटतं असतं!🌹
मोरपीसाचा स्पर्श डोळ्यांना गालाला,मनाला,हृदयाला मोहमयी दुनियेत नेणारा असतो!कृष्णकमळ असचं असतं!मी देखील अजून त्या अवीट गोड स्पर्श भेटीतून बाहेर पडलेलो नाहीयें!तो क्षण धावत्या रेल्वेगाडी सारखा होता!तो क्षण हळूच हृदयाची तार छेडून गेला होता!धावत्या बस सारखा होता!क्षणभर, फक्त दोन ते तीन मिनीटांची ती अविस्मरणीय भेट होती!पण त्याचं क्षणी त्या भेटीच्या प्रेमात पडलो होतो!मी मंत्रमुग्ध झालो होतो!मी क्षणांच्या अधीन झालो होतो!मी माझा नव्हतो!मी मोरपिसाच्या स्पर्शाने रोमांचित झालो होतो!🌹
......झालं असं की मी बुधवारी ०८मार्च२०२३रोजी संध्याकाळी ०७ वाजता घरून निघालो होतो!
हडपसरहून निघालो होतो!मी म्हणण्यापेक्षा आम्ही निघालो होतो!त्यात नातू 'शिव' आणि आमची सौभाग्यवती सौ अश्विनी होती!अर्थात अर्धांगिनी सोबत होती!प्रवासाची सुरुवात सिटी बसमधून होती!मुलाने आम्हा तिघांना गाडीवर हडपसरला सोडलं!हडपसरहून पी.एम.टी बसमध्ये बसलो!तिकीट काढलं शिवाजीनगरचं अर्थात..... न.ता. वाडीचं!नरवीर तानाजीवाडीचं हडपसरहून बस निघाली!
.... रस्त्यावर गर्दी इतकी होती की बस सायकलच्या गतीने पळत होती!हल्ली आपण पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावर पहा,वाहनांची प्रचंड गर्दी दिसतं असतें!मुंगी शिरायलाहीं जागा मिळू नये असं झालं आहें!दोन चाकी,तीन चाकी,चार चाकी वाहनांनी रस्ता तुडुंब भरलेला असतो!त्यात एखादी सायकल नजरेस पडतं असतें!मग आठवतं... पुणे सायकलींचे शहर होतं का?आता विश्वास तरी ठेवतील का तरुण मंडळी?एखादी सायकल नजरेचं पारणं फेडीत असतें!शहरात प्रत्येकाला घाई असतें!प्रत्येकाला वेळेचं नियोजन पाळायचं असतं!प्रत्येकाच्या डोळ्यासमोर टार्गेट दिसतं असतं!..'मला लवकर अन वेळेत पोहोचायचं आहें!'🌹
....अनेक सिग्नल पार करीत बस हळूहळू एखाद्या हत्तीच्या जड पावलांसारखे.. त्याचं गतीने पुढे सरकत होती!प्रवाशी आसनरुपी अंबारीवर बसून बसच्या खिडकीतून बाहेरील दृश्य पाहत होती!वाहनं पाहत बसली होती!काहीजन बसमध्ये उभ्यानेचं हातात बसमध्ये असलेला स्टील रोड घट्ट धरून उभी होती!बस प्रवाशांनी फुलून गेली होती!🌹
संध्याकाळी सात वाजता हडपसर येथे होतो!बस निघाली होती!अन रात्री आठ वाजता वाकडेवाडीहून धुळ्याला जायला स्लीपर लक्झरी बस होती!'विनीत ट्रॅव्हल्सची' बस होती!सिटीबस रस्त्यारील गर्दीतून मार्ग काढीत नरवीर तानाजी वाडीला पुढे सरकत होती!एका तासात पोहोचेल की नाही? पुढची पूणे -धुळे लक्झरी बस निघून तर जाणार नाही ना? त्यात दुसऱ्या दिवशी गुरुवारी धुळ्याहून पन्नास किलोमीटरवर अंतरावर लामकांनी गावाजवळील म्हसाळे येथे एका नातेवाईकांचं लग्न होतं!विवाह सोहळ्याला अत्यावश्य जाणं होतं!🌹
सिटीबस आपल्या मार्गावर एक एक थांबा पार करीत निघाली होती!छातीत धडधड सुरु होती!मन बेचैन झालं होतं!बस कंडक्टर आणि
ड्राइवरला काय सांगणार होतो? गर्दी चेंगरून जाणार होती का बस मग? मन थाऱ्यावर नव्हतं!चित्त थाऱ्यावर नव्हतं!अन मोबाईलवर अचानक मेसेज आला!लक्झरी बसने गूगल मॅपवर स्वतःच लोकेशन पाठविले होते!विनीत ट्रॅव्हल्सची बस आमच्या सिटी बसच्या मागे साधारण एक किलोमीटरवर होती!🌹
गर्दी टाळत सिटीबस संध्याकाळी ०७-५०ला नरवीर तानाजी वाडीला पोहचली होती!तेथून दिड किलोमीटर वर वाकडेवाडीला जायचं होतं!तेथे ट्रॅव्हल्सची बस थांबणार होती!आम्ही घाईघाईत बसमधून खाली उतरलो अन रिक्षाची देखील वाट न पाहता
पायी पळत निघालो!न.ता.वाडी बस डेपोपासून मी, माझा नातू शिव आणि आमची प्रिय सौभाग्यवती वाकडेवाडीच्या दिशेने अक्षरशः पळत होतो!मागे धावणारी पत्नी तोंडात पुटपुटत असावी असं जाणवत होतं!कदाचित माझ्या सतरा पिढ्यांचा उद्धार करीत असावी!हळूहळू वाकडेवाडीचा रेल्वे बोगदा जवळ आला!मी नातूचा बोट धरून पळत होतो!मागेमागे सौभाग्यवती होती!मध्येचं मागे पाहून पुढे पळत होतो!मध्येच लक्कझरी बस ड्राइवरचा फोन आला!बस ठरलेल्या स्टॉपवर येऊन थांबली होती!🌹
आम्ही रेल्वे बोगदा पार करणारं होतो!मी मागे वळून सौभाग्यवतीचं अंतर नजरेनेचं मोजतं होतो!मी मागे पाहत असतांनाचं अचानक एका सदगृहस्थाची आणि माझी नजरानंजर झाली!माझ्याकडे पाहत दुचाकी वाहन चालवीत माझ्या जवळ येऊन बोलले,'आपण नानाभाऊ माळी का?? मी दचकलो सरळ माझं नाव घेणारी ही व्यक्ती कोण असावी बुवा बरं ??अशी प्रश्नार्थक हावभाव माझे झाले होते!....लहानपणापासून खारीक,खोबरे,काजू,बदाम यांचा लाडू आमच्या नशिबी नव्हता!जेवणा खाण्याची पंचायत होती!हे नखरे तरी कोण पुरवणार होत बरं?म्हणून माझ्या बुद्धीला ताण देता येत नव्हता!बुद्धीत सकस नव्हतंच!जगण्याची भ्रातं तेथे चांगलं जेवण मिळून तल्लक बुद्धी कुठे होणार होती?🌹
आमच्या डोक्याच्या बुद्धीत मिरचीचा ठेसा,कांदे,झणझणीत चटणी, मुळा, वांग्याची स्वस्तातील भाजी,बाजरीची भाकरी होती मला काहीही आठवत नव्हतं!मी चालतंच त्या सदगृहस्थानां विचारलं देखील,'सर,माझं नाव कसं माहीत आपल्याला?' ते सन्माननीय सदगृहस्थ सहज बोलून गेलेत,'आपलं फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपवरील लिखाण मी वाचत असतो!आपण छान लिहिता सरजी!'... ते पुन्हा म्हणाले 'मी सोडवतो वाकडेवाडी स्टॉपला बसा आपण माझ्या गाडीवर!' मी नातुचा बोट धरून पळत भूमी मोजत होतो!अंगाला थोडा घाम देखील जाणवत होता!पण त्यांच्या बोलण्यातून घाम पळून गेला होता!🌹
मोरपिस चेहऱ्यावर फिरवावा!अंगावर फिरावा!सप्तरंगी स्पर्शात जणू कृष्णकमळ फिरावा असं जाणवत होतं!हे काही क्षणंच जाणवले पण स्थळ,काळचं भान येऊन मी त्यांच्या सोबत कसं जाणार होतो?जिच्यासोबत अग्निसाक्ष सप्तपदीचे फेरे घेतले होते ती मागून धापा टाकीत येत होती!साता जन्मीच नातं याचं जन्मात बांधून घेतले होते!तिला सोडून कसं जाणार होतो?मी विनम्रपणे त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला!तें सन्माननीय गाडीवरून पुढे निघून गेले!मी त्यांच्या पाठमोरी प्रकृतीकडे पाहत पुढे पळू लागलो!🌹
दोन मिनिटातचं आम्ही वाकडेवाडी बस स्टॉपला येऊन पोहचलो होतो!लक्झरी बसमध्ये बसलो!स्लीपर होती!सौभाग्यवती पळून थकली होती!बसमध्ये आल्याबरोबर सीटवर अंग टाकून झोपूनहीं गेली होती!नातू शिव सुद्धा आमच्या सोबत पळून थकला होता!तो हीं आजीच्या कुशीत विसवला!झोपेच्या अधीन झाला होता!मी मात्र त्या सदगृहस्थाच्या भर रस्त्यावरील संभाषणाचं विश्लेषण करीत होतो, तो बोलला होता ,'तुम्ही नानाभाऊ माळी का? आपलं लिखाण मी वाचत असतो!'.... हा मोरपीसाचा स्पर्श होता का? मनाला, तनाला मोहावीत होतं!मी हुरळून जावं त्यांच्या स्तुतीने? मी ग.. म.. भ.. म..असं काहीतरी लिहायचा प्रयत्न करीत असतांना!लेखणीत अमृतरस भरायचा प्रयत्न करीत असतांना!लिहिणे शिकत असतांना!
माझा फुगा झाला होता!त्यांनी हवा भरली होती!मी मनानेच हवेत उडत होतो!🌹
माझा रबरी टायर झाला होता!मी स्तुती रस्त्यावर पळत होतो!.. म्हणे 'तुम्ही छान लिहिता!'...मी टायर अन फुगा दोन्हीहीं रूपात फुगलेलो होतो!माझ्या सारखा व्हाट्सअप आणि फेसबुक लिहिणारा रस्त्यावरील पहिलीचे पाढे गिरवणारा so called लेखक फुगून गेला होता!ज्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत अशा महान साहित्यिकांना मी टक्कर देत होतो!मनानेच हवेत उडतं होतो!🌹
गर्व आणि अंहम कुणाच्या मनात जाऊन बसेल सांगता येत नसतं!मी लेखक झालो होतो!!!!मी छान लिहीत होतो!!!!!मी स्तुती सुमनांनी फुगलो होतो!आमची बस पळत होती!तिचे टायर पळत होते!तिच्या टायरमध्ये माझा so called लेखक पळत होता!माहीत नाही पण बस पुण्याच्या बाहेर पडली अन बसचा टायर पंक्चर झाला होता!बसला रत्याच्या कडेला घेऊन दुसरा टायर रिप्लेस करून नवीन टायर बसवीत होते!त्यात माझ्या मनाचा हवेत उडणाऱ्या फुग्यास देखील कोणीतरी टाचणी टोचली होती!🌹
साहित्यातील दिग्गज लेखक त्यांच्या स्थानावर अढळ होते!आहेत आणि राहणार देखील आहेत!पण मी सोशल मेडियावर थोडंफार लिहिणारा!मत मांडणारा रस्त्यावरील लेखक आपली औकात विसरून हवेत तरंगत होतो!मी त्या प्रांतातील किस झाड की पत्ती आहे?दोन शब्द लिहून झाले म्हणजे खूप काही "छान"चा पोकळ शिक्का बसत नसतो!लिहिणे हीं खरोखर कला असतें!त्यात अनेक महान लेखकांनी मेहनतीने ती कला आत्मसात केली असावी!वास्तव, सत्य आणि रंजन या तिन्हीचा रस ओतून त्यांनी समाज प्रबोधन केलें आहें!मानव समाजासं दृष्टी दिलेली आहें अशा महान लेखकांच्या चरणांशी नतमस्तक होत माझ्या मनातील मोरपीसारा फुलला होता!मोरपीसचा सुखद स्पर्श मनाला काही क्षणासाठी आनंद देत होता!लिहिण्यासाठी कथानक जन्म घेत होतं!.. 'तुम्ही छान लिहिता!'..च्या परीक्षेसाठी नवीन दमाने बसलो होतो!....रात्रभर आमची बस धुळ्याकडे धाव घेत होती!माझं मन सीटवर अंग टाकून धाव घेत होत!साहित्यतीलं नवीन पाढे गिरवायला सुरुवात केली होती!हा स्पर्श उभारी आणि उमेदीचा होता!मोरपंखी होता!प्रतिभेला पंख फुटण्याचा होता!चित्तास ज्ञानडोळे येणाचा होता!
💐💐💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-९९२३०७६५००
दिनांक-११मार्च २०२३
Comments
Post a Comment