अहिराणी भाषानी मैना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अहिराणी भाषानी मैना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
मानोस जित्ता ऱ्हास तवलोंग सवसारनं ढुमकं वाजत ऱ्हास!सोतानं आनी दुन्यानं ढुमकं संगेसंग वाजत ऱ्हास!हायी जित्तापनीं निशानी ऱ्हास!हेट्या यांय उगस!उगता सूर्य देवबानं तोंडं दखावर दोन्ही हात जुडी जातंस!त्यान्ह दर्शन लेवो!पाय पडो,नवा दिनन्ही सुरुवात व्हई जास!सक्कायंपाह्ययरें कामनां व्हडा ऱ्हास!गराडा ऱ्हास!घरमानां,गावम्हाना बठ्ठा जो तो आपापला कामेसले लागी जातंस!जुपी लेतस!घर,वावर,बजार, माल-हालनां गिरजदारीम्हा लागी जातंस!सवसारनं चाक दिन उगाफाईन तें माव्यापावूत सडकवर पयेत ऱ्हास!🌹
सडकवर कव्हयं गारा ऱ्हास,खडके ऱ्हातस!दगडे ऱ्हातस!चाक व्हडी- व्हाडी मव्हरे सरकत ऱ्हास,पयेत ऱ्हास!व्हढनारा कटबन ऱ्हातस!जोरबन ऱ्हातस!जोर लायी व्हडतस!कव्हयं चाक ठाय बठी पयेतं ऱ्हास! कव्हयं चाक वट वाटलें आटकी बठस!पन मव्हरे मव्हरे जावान्ह सुटत नई!हावू बठ्ठा गोमंडां सवसारन्हा व्हडानां ऱ्हास!🌷
व्हडा गंजज गोठना ऱ्हास!सवसारम्हा आडकेल कुडी,हुभी ऱ्हास तवलोंग पयेत ऱ्हास!कुढीम्हायीनं व्हडा नींघावर कुडी बीनकामनी व्हयी जास!एक दिन व्हडा पयी जास नी कुडी आडी व्हयी थंडी पडी जास!आपली कुडीना माथावर देवनी डोक बसाडेल से!त्या डोकाम्हा बुद्धी नावनी एक डबी नेम्मन बसाडेलं ऱ्हास!आड्या-हुभ्या रंगतन्या नसास्ना हाऊ गोया,मानोसनी कुडीलें सवरी-सुवरी ऱ्हावानं शिकाडतं ऱ्हास!मटमट दखानं आनी बोलानं शिकाडतं ऱ्हास!बुद्धीन्हा,मेंदून्हा या चिखूलनां गोयाम्हा इचार-विचार- आचारन्हा रस व्हात ऱ्हास!तो रस पीस्नी डोकान्या नसा तटतुंब व्हयी इचारन्ह हेलग पयदा व्हस!हेलगान्हा मुखे वाचा फुटस!तठे भाषांना जलम व्हस!हेलामुखे संत ज्ञानेश्वर महाराजस्नी वेद बोली काढात!तसं जलम येलं वल्ल लेकरु,वल्ली बायतीननं लेकरू जनमताचं निस्त घर उठी आरायां मारत ऱ्हास!पोटमां ऱ्हास तवलुंग भूक लागत नई!जग दुन्यामां येता खेपे कितला गटांना करो बरं त्या लेकरूनी?
जलमलें येता खेपे मायलें काकूयीदी करी लेक काय सांगस दखा.....
वं माडी!वं माडीssss
मी सर्गेनी से तून्ही मैना
मन्हा पोटले दूध तू देना
तुन्हा पोटनी से मी मैनाssss
मन्हा आंगनी करू नको दैना🌹
वं माडी!वं माडीssssss
हायी भूक कैदासीन से ना
मी आगीन तारा वरतीन वूनु
तू हिरदथीन जीव लयी पये ना🌹
वं माडी!वं माडी!sssss
तू ल्हायें ल्हायें ल्हकरी ये ना
तुन्हा पोटनी वल्ली मी मैनाsss
मन्हा पोटनी करू नको दैना 🌹
वं माडी!वं माडी!sssss
कोन देवबानी दुन्याम्हा लय ना
तू झुंगी धरी रवसडी पये नाssss
मन्हा व्हटलें थाना तू दे ना 🌹
वं माडी!वं माडीsssss
तू दम भरी पाय उखली पय ना
मन्हा पोटनी करू नको दैनाssss
तुन्हा कायजनी ज्योत मी से ना🌹
मैना सांगलीथून मुंबई चालनी गयी थी!मुंबईनी मैना भुकी तिशी सर्गे चालनी गयी!देवबानी तिले खान्देशम्हा धाडं!मायना पोटे जलमलें येता खेपेचं रावनायी करी ऱ्हायनी!पन खान्देशमां पानी नई!ऊस नई!
नियीगांर बागायती जिमीन नई!कोल्लीखटक,डखडख व्हयेलं
मायनां थाना व्हडी ऱ्हायनी!उडतीन रचेल कनंगीम्हा दाना नइतं!माय
म्हनस कशी,
मैना!वं मैना!ssss
आठे कोल्लानी जिमीन से ना
बापना कोपरीम्हा पैसा नई नां
आठे बिप्तास्नी बयडी से नांss🌹
वं मैना!वं मैना!ssss
आठे जिवडालें सवूड नही ना
मी ल्हायें ल्हायें व्हकालें पयनू
आठे घाम गायी माटीम्हा मयनू🌷
वं मैना!वं मैना!ssss
मन्ही आंडेरं प्यारी तू मैना
बापनं इस्टन बारदान नहीं ना
तूलें दुरथीन देवबाप्पा लयनाss🌹
वं मैना!वं मैना!sssss
आठे गुलालनी न्यामिनी हाऊस
उज्जी सेतस डोकालें खवडाsss
यांसना खीसामा नई सेत दमडां🌹
खान्देशनी मैना पोटे उनी!दूधगुंता आयडाय ऱ्हायनी!कोल्ल उक्खमां मुस्सय दनकाडी ऱ्हायनी!मोठायीन मोठायीनथीन बोंबली ऱ्हायनी!येडी माय भुके पोटे डालकीम्हा थंडी भाकर चाफली ऱ्हायनी!तुकडं ताकडं हातशी लाग्न!थाटीम्हा कोल्ल तिखानं भुकटं टाक!भाकर चिवडी-चावडी खाद!गये उतरनं!..मैनालें पोटले धरी लिध!तिन्हा तोंडे थाना दिन्हा!.. व्हट चुट चुट करी ऱ्हायंतात!मैना कोरडबोण्डया कत्रायेलंनां घर उनी!तिजोरीनी किल्ली म्हणीसनी उनी!दवडी जायेल लक्षुमी रडत खडतं उनी!गह्यरी रडत उनी!🌹
मन्ही अहिराणी मायनी दशा आशीच से!मैना व्हयी गऱ्हानं सांगी ऱ्हायनी!सुपडाम्हा दाना पाखडी ऱ्हायनी!गायी-गुयी पीठ,खाली से गायनी!बठ्ठा खान्देश भावूभनलें आप्रुक वाटस!मायलें इवानवर बठाडेल से!माय सुखनां चांद दखी ऱ्हायनी!सप्पनम्हा राजा रजवाडानं सुख धुंडी ऱ्हायनी!उताना पडी गुन्ना-मुन्ना लेकरे भाषानां दर्जागुंता उंब्रा घसी ऱ्हायनात!पन जठेना तठे वाटस!पांट मव्हरे सरकत नई!पलटी व्हतं नई!आम्हनं -तुम्हनं, यानं त्यानं कराम्हा चाव्वयं मव्हरे सरकत नई!सरकारना बहिऱ्या कानले वार्गभी पोचत नई!🌹
इशय चेटत ऱ्हास!बयतन बयी ऱ्हायन!धूर निंघी डोया चूरचूर करी ऱ्हायनात!भाषानां हुपारा आजून व्हयी ऱ्हायना!जराखंड बयतन ऱ्हायेलं से इस्तोवरं फेकी देवो!धूर
काढी चेटत ऱ्हायी!काही दिनथीन म्हलायी जायी!राखनां पोटे धग जित्ती ठेवो!दरटाईमलें राख सरकायी बयतन बायेत ऱ्हावो!इस्तोनी धग जित्ती ठेवो!मैना यां दारे त्या दारे उंब्रा चाफली ऱ्हायनी!लायी लायी पुरायी भाते झटकी ऱ्हायनी!🌷
"मैना! ओ मैना!
कटाकुटास्नी से तुन्ही वाट
तुले लागेल से कोनी नाटsss
बसाले ठेवू का तुले खाट🌷
मैना!वं मैना!
चौमेरं वांदन उठी ऱ्हायनं
घोंगट उडी वर वर ऱ्हायनंssss
दुःख कयन नई ना मायनं🌹
मैना!वं मैना!sssss
हाते हात झेंडा तू लयनाssss
हावू खान्देश तयमयी ऱ्हायना
बठ्ठा खान्देशी गोया आते व्हयना
*************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०२मार्च २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment